1

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

मिपा दिवाळी अंक २०२२ - लेखकांना आवाहन

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in काथ्याकूट
15 Sep 2022 - 9:48 am
गाभा: 

गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे.

या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही .

आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत.

तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची.
या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता.

लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये.

आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.

किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता.
जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका.

काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच.

आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल.

अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती.

मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं...

आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत
-टीम मिपा दिवाळी अंक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2022 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार

भारी,
दिवाळी अंक चांगला होईल यात काही शंका नाही,
अनेक शुभेच्छा,
पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

15 Sep 2022 - 10:00 am | चांदणे संदीप

आता मिपा दिवाळी अंकाची प्रतिक्षा.

सर्व लेखकांना आगाऊ शुभेच्छा!

सं - दी - प

कुमार१'s picture

15 Sep 2022 - 10:07 am | कुमार१

शुभेच्छा !

पाषाणभेद's picture

15 Sep 2022 - 10:07 am | पाषाणभेद

मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!

सुरिया's picture

15 Sep 2022 - 10:29 am | सुरिया

मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!

लेखक बाय डिफॉल्ट आगावू असणार, तुम्हाला शुभेच्छा आगावू द्यायच्यात का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2022 - 12:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

सरसकट सर्व लेखकांना आगावू ठरवण्या आधी तुम्ही आमच्या श्री श्री १०८ महागुरुंचे महान आत्मचरित्र वाचावे ही नम्र विनंती करतो. ते वाचल्यावर लेखक अगावू असतात हा आपला गैरसमज निवळण्यास मदत होईल.
पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

15 Sep 2022 - 12:45 pm | धर्मराजमुटके

नेहमीप्रमाणे दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ नका ही मिपास खास विनवणी. मुख्य फळ्यावरचे धागे, दिवाळी अंकाचे धागे यांची सरमिसळ होऊ द्या. काय की पीडीएफ अंक उपलब्ध झाला की तो संग्रही ठेऊन कधीही वाचता येतो, इतरांना पाठवता येतो त्यामुळे मिपावरची ट्राफीक कमी होते.

वामन देशमुख's picture

15 Sep 2022 - 12:56 pm | वामन देशमुख

मिदिअंकाला शुभेच्छा!

- वाचनप्रेमी

तुषार काळभोर's picture

15 Sep 2022 - 2:15 pm | तुषार काळभोर

यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकाला शुभेच्छा!!
आगाऊ लेखकांना आगाऊ शुभेच्छा!!
सर्व वाचकांना शुभेच्छा!!
सर्व शुभेच्छुकांना शुभेच्छा!!

चांदणे संदीप's picture

15 Sep 2022 - 6:38 pm | चांदणे संदीप

कविवर्य पाडगावकारांच्या 'सलाम' कवितेसारखं होऊ शकतं. आणखी काही लोकांना शुभेच्छा लिहा हिंदकेसरी. :)

सं - दी - प

खेडूत's picture

15 Sep 2022 - 4:57 pm | खेडूत

छानच फार!
आताच वाट पहायला सुरुवात केली आहे.
आगावू शुभेच्छा.

मित्रहो's picture

16 Sep 2022 - 11:00 am | मित्रहो

नक्की लिहणार. ५ ऑक्टोबर पर्यंत लेख पाठवितो.
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा

विजुभाऊ's picture

16 Sep 2022 - 1:42 pm | विजुभाऊ

नक्की लिहीतो

अनिंद्य's picture

19 Sep 2022 - 8:37 pm | अनिंद्य

निर्धारित वेळेत लेख पाठवण्याचा प्रयत्न असेल.
लेखासाठी काही शब्दमर्यादा असल्यास कळवावे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2022 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

दिवाळी अंका करता कोणतीही शब्दमर्यादा नसते,
किंबहूना शशक सोडून कोणत्याही लेखनप्रकारासाठी मिपावर तरी शब्दमर्यादा नाही
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2022 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक टीमला शुभेच्छा. लिहायचा प्रयत्न आहेच.

-दिलीप बिरुटे

अथांग आकाश's picture

22 Sep 2022 - 10:58 am | अथांग आकाश

मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!!
.

नीलकंठ देशमुख's picture

28 Sep 2022 - 10:42 pm | नीलकंठ देशमुख

नक्की पाठवतो.
मिसळपाव मुळेच , 'देशमुखी'हा विनोदी कथा व ललित लेख संग्रह प्रकाशित करायची प्रेरणा मिळाली असे मला वाटते.सुदैवाने त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.

अरुण मनोहर's picture

30 Sep 2022 - 8:30 am | अरुण मनोहर

खूप काळानंतर मिपावर आलो. दिवाळी अंकासाठी मिपाला आणि सर्व लेखकांना शुभेच्छा.
कथा पाठवली आहे.

साहित्य संपादक's picture

1 Oct 2022 - 9:13 am | साहित्य संपादक

दिवाळी अंका करता साहित्य देण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत.
जरा ढिले सोडा आपल्या लेखण्यांचे लगाम आणि लिहुद्या त्यांना मुक्त पणे.
साहित्य संपादक,