Skip to main content

मिपा दिवाळी अंक २०२२ - लेखकांना आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 15/09/2022 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -टीम मिपा दिवाळी अंक

वाचने 21691
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

भारी, दिवाळी अंक चांगला होईल यात काही शंका नाही, अनेक शुभेच्छा, पैजारबुवा,

आता मिपा दिवाळी अंकाची प्रतिक्षा. सर्व लेखकांना आगाऊ शुभेच्छा! सं - दी - प

In reply to by पाषाणभेद

मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
लेखक बाय डिफॉल्ट आगावू असणार, तुम्हाला शुभेच्छा आगावू द्यायच्यात का?

In reply to by सुरिया

सरसकट सर्व लेखकांना आगावू ठरवण्या आधी तुम्ही आमच्या श्री श्री १०८ महागुरुंचे महान आत्मचरित्र वाचावे ही नम्र विनंती करतो. ते वाचल्यावर लेखक अगावू असतात हा आपला गैरसमज निवळण्यास मदत होईल. पैजारबुवा,

नेहमीप्रमाणे दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ नका ही मिपास खास विनवणी. मुख्य फळ्यावरचे धागे, दिवाळी अंकाचे धागे यांची सरमिसळ होऊ द्या. काय की पीडीएफ अंक उपलब्ध झाला की तो संग्रही ठेऊन कधीही वाचता येतो, इतरांना पाठवता येतो त्यामुळे मिपावरची ट्राफीक कमी होते.

यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकाला शुभेच्छा!! आगाऊ लेखकांना आगाऊ शुभेच्छा!! सर्व वाचकांना शुभेच्छा!! सर्व शुभेच्छुकांना शुभेच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

कविवर्य पाडगावकारांच्या 'सलाम' कवितेसारखं होऊ शकतं. आणखी काही लोकांना शुभेच्छा लिहा हिंदकेसरी. :) सं - दी - प

In reply to by अनिंद्य

दिवाळी अंका करता कोणतीही शब्दमर्यादा नसते, किंबहूना शशक सोडून कोणत्याही लेखनप्रकारासाठी मिपावर तरी शब्दमर्यादा नाही पैजारबुवा,

दिवाळी अंक टीमला शुभेच्छा. लिहायचा प्रयत्न आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by अथांग आकाश

मिपा अखंड व्यवस्थित चालावे यासाठी शुभेच्छा :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..

नक्की पाठवतो. मिसळपाव मुळेच , 'देशमुखी'हा विनोदी कथा व ललित लेख संग्रह प्रकाशित करायची प्रेरणा मिळाली असे मला वाटते.सुदैवाने त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळी अंका करता साहित्य देण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. जरा ढिले सोडा आपल्या लेखण्यांचे लगाम आणि लिहुद्या त्यांना मुक्त पणे. साहित्य संपादक,

दिवाळी अंकाकरता आपले साहित्य देण्याची मुदत दोन दिवसांनी संपत आहे, तेव्हा झरझर लेखण्या चालवा आणि भरभर व्यनि करा, साहित्य संपादक,

मी देखील लिहीण्याचा प्रयत्न करतो. ह्या आधी कविता लिहील्या आहेत काही. मिपावरही एक दोन प्रसिध्द केल्या आहेत. २०११ साली मी एक्टीव होतो तेव्हा प्रसिध्द केल्या होत्या. आता तो आयडीही विसरलो नी पासवर्डही.

In reply to by विजुभाऊ

हेच म्हणतो पण दिवाळी अंक संपादक आणि बाकी टीमला या डाऊनटाईममुळे ओव्हरटाईम करायला लागतो की काय आता. असो, आता मिपा चालू झालय आणि दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित होण्यासाठी सर्व संबंधितांना ऑल द बेस्ट

मी प्रतिसाद दिल्यानंतर असा संदेश येतो: The website encountered an unexpected error. Please try again later. माझा प्रतिसाद प्रकाशित झालेला असतो परंतु मला दिसत नाही. आणि पुन्हा मुख्य पानावर त्याच धाग्यावर गेले असता माझ्या प्रतिसादाला न वाचल्याचे लाल वर्तुळ असते.

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद

संपादक मंडळ , सस्नेह नमस्कार . कथा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे . हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे . कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता . मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा . दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा . धन्यवाद

In reply to by श्रीगुरुजी

मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे 'मिपा दिवाळी अंक २०२२' च्या प्रकाशनास थोडा विलंब होत आहे त्यासाठी दिलगीर आहोत. दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित होणे अपेक्षीत आहे. टिम - मिपा दिवाळी अंक

In reply to by साहित्य संपादक

नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 

In reply to by साहित्य संपादक

नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या. 

मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत नुकताच दिवाळी अंकाच्या विश्वातला वेगळा प्रकार पहायला मिळाला त्या बद्दल सांगतो 'ऑल दि बेस्ट' 2022 चा  हा दिवाळी विशेषांक इतरांपेक्षा वेगळा म्हणजे Multimedia विशेषांक आहे.कृपया पुढील लिंकवर क्लिक करा

https://tinyurl.com/All-the-Best

हा स्मार्ट  दिवाळी अंक असून मजकूर, रेखाचित्रे, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ एकाच सेल्फ-कन्टेड पॅकेजमध्ये एकत्रित करणारा हा अशा प्रकारचा पहिला प्रकार आहे . क्लिक केल्यावर यातल्या कलाकृतींचे वाचन करता येते ! फॉण्ट मोठा करता येतो ( हे मोबाईल वर खुप फायद्याचे आहे) वाचून बघा / पाहून वाचा अन सांगा कसा वाटतोय ते !

अशी संपादक मंडळाला नम्र विनंती आपले नम्र मि दी अं २०२२ ची आतुरतेने वाट पाहणारे वाचक मंडळ सदस्य व एकही अपडेट्स न देणाऱ्या संपादक मंडळाच्या णिशेध मोर्च्याच्या तयारीतील समूह कार्येकरता.

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक. मिपाच्या यंदाच्या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतोय.

In reply to by श्रीरंग_जोशी

अंकाची मांडणी, सजावट सुरेख. पूर्ण वाचून मग अंतरंगाबद्दल नक्की पोच देईन. या दुव्यासाठी रंगाभाऊंना धन्यवाद ! स्नेहा

In reply to by श्रीरंग_जोशी

रंगाभौ धन्यवाद. अंक सजावट छान आहे. वरवर चाळला. व्यंगचित्रे व मंदिराचे चित्र खुप आवडले. श्रेया राजवाडे यांची कविता खुप सुंदर आहे. माझा पाऊस ही कवीता सुद्धा छान आहे. सवडीनुसार पुर्ण वाचणार आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग जोशी, आपण सादर केलेली लिंक पाहिली. अंक दिमाखात सादर केला आहे. या अंकातील विविध लेखांवर प्रतिक्रिया व्यक्त करायला सोय आहे का? फ्रान्सुआ गोतिए यांनी लोहगाव पासून ४ किमीवर श्री शिवाजी महाराज म्युझियम बनवले आहे याची ओळख करून दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की मिलिटरी कमांडर्स कंबाईन्ड या बॅनर्स मधून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या लढाया सध्याच्या मिलिटरी कमांडरांना नियोजन करून पार पाडायची कामगिरी करायची आज्ञा दिली तर ते कसे काय पूर्ण करतील या प्रमेयावर आधारित नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन जून २०२२ पासून कायमचे उपलब्ध आहे. ते वाचायला हवे असेल तर https://alkaoaksebookshoppy.online या इथे ईबुकसाठी अधिक माहिती मिळेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

मराठी कल्चर अ‍ॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक ...... सुं द र आहे.... डोळ्यांना सुखावणारा आशुतोष बापट यांचा मंदिर विषयक लेख वाचला... सुरेख आणि माहितीपूर्ण. बाकीचा अंक टप्याटप्याने वाचत आहे. धन्यवाद श्रीजो!

अंकाच्या प्रतीक्षेत इतके दिवस गेले आहेत की भाऊंचा पुढचा चघळचोथा " मिपकरांच्या हालाला जबाबदार आघाडी की बिघाडी?(सूज्ञास काय अधिक सांगणे?)" या विषयावर असेल हे नक्की.

दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत अंक प्रकाशित होणे अपेक्षित आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे अंक प्रकाशनास होत असलेल्या विलंबासाठी दिलगीर आहोत.