1

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

पानात लपलेल्या फुलाला पाहून...

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
1 Aug 2022 - 12:34 pm

मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही. बागेतली फुले सगळ्याची,कुणा एकाचि नाही,हवी आसतील तर विकत आणा तेव्हढेच शेतकर्यान चार पैसे मिळतील.

mipa

आशाच एका वळणावरती
दिसली मजला हिरवी पाने
लपले होते फुल सयाने
उधळत होते गंध तराणे

निरागस,निरामय,प्रफुल्ल
डोलत होते वार्‍या संगे
धुंदी होती नव यौवनाची
तमा न होती त्यास उद्याची

कोण चितारी चित्र काढतो
रंगा सवे गंध पेरीतो
रंग,कुंचले मला मीळावे
भाव कवीच्या मनी दाटतो

विस्फारून नयन, ललना आली
फुल तोडण्या अधिर झाली
पाठ फिरवून उभी राहीली
जणू म्हणाली....
जातील काका मग भेटू आपण

तीच्या मनीचे गुढ कळाले
तिथेच काकाने ठाण मांडले
निराश होऊन निघून गेली
मग दोघे ते खुदकन हसले.....
१-८-२०२२

दृष्टीकोनमुक्तक

प्रतिक्रिया

"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!"
--- कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत (१८६६-१९०५)

कवितेतील आशय आवडला, परंतु काहीशी घाईत लिहील्यासारखे वाटली. उदाहरणार्थ, 'आशाच' 'फुल' 'मीळावे' वगैरेतील र्‍हस्व - दीर्घ भेद, 'दिसली' 'डोलत होती' 'आली' झाली' राहिली' 'ठाण मांडले' 'गेली' 'हसले' या शब्दातून व्यक्त झालेला काळ 'भूतकाळ' असताना तिसर्‍या कडव्यात मात्र 'काढतो' 'दाटतो' असा सामान्य वर्तमान काळ, तसेच 'प्रफुल्ल' 'नव यौवनाची' 'विस्फारुन' वगैरे श्ब्दांमधून काहीशी भंग होणारी गेयता/नादमयता ...
'फुल सयाने' म्हणजे काय ते समजले नाही. फुल प्लेट - हाफ प्लेट वगैरेसारखे काहीतरी 'फुल सयाने' आहे की काय, असे वाटले.
पहिल्याच प्रतिसादात टीकास्त्र सोडल्याबद्दल क्षमस्व.
पानाआडून हलकेच दर्शन देणार्‍या फुलाचा फोटो आवडला.

हे कसे वाटते:
अशाच एका वळणावरती
दिसली मजला हिरवी पाने
लपले होते फूल लाजरे
उधळित होते गंध तराणे

प्रफुल-निरागस आणि निरामय
डोलत होते वार्‍या संगे
धुंदी होती नव-चैतन्याची
तमा न होती त्यास उद्याची

कोण चितारी चित्र काढतो
रूप-रंग अन गंध पेरितो
रंग-कुंचले मला मिळावे
भाव कवीच्या मनी दाटले

शेवटल्या दोन कडव्यातही काही बदल करून गेयता वाढवता येईल, असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2022 - 11:40 am | कर्नलतपस्वी

पहिल्याच प्रतिसादात टीकास्त्र.

वाचकांचा प्रतीसाद लेखकाचा प्राणवायू. तेव्हा बिनधास्त परखड मत व्यक्त करा.

सविस्तर, व्यनि केला आहे.

चित्रगुप्त's picture

2 Aug 2022 - 6:33 am | चित्रगुप्त

या कवितेच्या निमित्ताने केशवसुतांची 'रांगोळी घालताना पाहून' ही शार्दुलविक्रीडित वृत्तातली कविता आठवली, आणि त्या कवितेचे पुन्हा एकदा वाचन घडले. नवीन पिढीच्या काव्य-रसिकांसाठी ही जुनी कविता इथे देतो आहे:

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!

चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!

तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!

चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”

“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Aug 2022 - 12:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

काका, केशव सुतांच्या कविते बद्द्ल अनेक अनेक धन्यवाद, कधी वाचनात आली नव्हती.

कसले तपशीलवार आणि चित्रदर्शी वर्णन आहे, यथोचित चित्र डोळ्यासमोर उभे राहिले

बाकी कर्नल साहेबांना केलेल्या सूचनांशी बाडीस

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2022 - 5:16 pm | कर्नलतपस्वी

राम गणेश गडकरी यांनी केलेले विडंबन सुद्धा सुदंर आहे.
"रांगोळी घातलेली पाहून "

बाकी वाचकांच्या सुचना "सर ऑखों पर".

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2022 - 10:08 am | कर्नलतपस्वी

रांगोळी घातलेली पाहून

राम गणेश गडकरी यांनी केशवसुतांचे नाव घेवून विडंबन काव्य केले आहे.

या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.

नुकतीच गणपतीपुळे,मालगुंड येथे गेलो होतो. केशवसुत यांच्या स्मारकाला भेट दिली. भटकंती मधे लेख टाकलाय. खाली लिंक दिली आहे.

https://www.misalpav.com/node/49964/backlinks

सिरुसेरि's picture

3 Aug 2022 - 4:24 pm | सिरुसेरि

या लेखाच्या निमित्ताने अनेक कवींची , कवितांची पुन्हा ओळख झाली. तसेच "घाई नको बाई अशी , आले रे बकुळ फुला " हे एक गाजलेले नाट्यगीत आठवले . ( संगीत धाडीला का राम तिने वनी )