यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई संघांच्या अपयशानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची ...२०२२ च्या आयपीएल मध्ये कोहली पहिल्या १३ सामन्यांमध्ये ५ वेळा १० पेक्षा कमी धावा काढून बाद झाला, ३ सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियन मध्ये परतला. तेरा सामन्यांत त्याने १९.६७ च्या सरासरीने २३६ धावा काढल्या. यादरम्यान तो एकदाच अर्धशतकी पल्ला गाठू शकला. हे सर्व आकडे विराट कोहलीने गेल्या १०-१२ वर्षात जे काही पराक्रम केलेत त्यापुढे एकदम तुच्छ वाटत होते. माजी खेळाडू, क्रीडा पत्रकार, क्रिकेटप्रेमी असे सर्वचजण कोहलीला विश्रांतीचा सल्ला देत होते. आयपीएल पाठोपाठ भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा आणि बीसीसीआय सोबतचं शीतयुद्ध यानंतर कोहली मानसिकदृष्ट्या थकलेला वाटत होता. विराटचा चाहता म्हणून हे सर्व पाहताना खूप वाईट वाटत होत...
या तेरा सामन्यात विराटवर क्रिकेटच्या सगळ्या देवांबरोबरच त्याचं नशीब पण त्याच्यावर रुसल होत बहुतेक... ते म्हणतात ना माणसाच्या खराब काळात त्याची सावली देखील त्याची साथ सोडते.. तसच काहीस झाल होत विराटच्या बाबतीत. तो कधी धावचीत व्हायचा, कधी बाहेर जाणारा चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हाती जायचा, तर कधी एखादा साधा झेल देऊन तो बाद झाला. प्रत्येक सामन्यात बाद व्हायचा नवा प्रकार तो शोधून काढायचा.
पण काल मैदानात प्रेक्षकांना जुना विराट कोहली पाहायला भेटला. अगदी सुरवातीपासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याला "किंग ऑफ क्रिकेट" का बोलतात हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. गुजरातविरुद्व झालेल्या महत्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराटची बॅट चांगलीच तळपली. काल कोहलीने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५४ चेंडूत ७३ धावा केल्या. त्याचा strike rate होता १३५.१९.
कालच्या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्व मस्त फलंदाजी केली. गेल्या २-३ वर्षात तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध सांभाळून खेळायचा प्रयत्न करायचा पण कालच्या सामन्यात त्याने ज्याप्रकारे रशीद खान ला २ खणखणीत षटकार लगावले त्यावरून त्याने फिरकीविरुद्धचा आपला पवित्रा बदलला आहे आहे हे दिसून आल. त्याचबरोबर त्याचा फुटवर्क आणि आखूड टप्प्याच्या चेंडू विरुद्धची बदललेली रनरीती स्पष्ट दिसत होती.
आणखी एक गोष्ट म्हणजे याआधी कोहली कोणतही दडपण न घेता बिन्दास्त फटकेबाजी करायचा पण गेल्या वर्षभरात त्याच्यातला आक्रमक खेळाडू कुठेतरी गायब झाल्यासारखा वाटत होता, त्याच्या देहबोलीतूनही हे प्रकर्षानं जाणवत होत. पण काल प्रेक्षकांना विराटच आक्रमक रूप पुन्हा पाहायला मिळालं, ज्याप्रकारे चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा अर्धशतकानंतर कोहली सेलीब्रेशन करत होता ते पाहताना भारी वाटत होत.
विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू फॉर्म मध्ये आला ही भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. २०२२ च्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T-२० विश्वचकामध्ये त्याची भूमिका महत्वाची राहणार आहे..त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील.....
धन्यवाद ....!!
प्रतिक्रिया
20 May 2022 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट सारखा फालतू खेळ, त्यातल्या एका क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म ईतका महत्वाचा विषय आहे??
21 May 2022 - 10:59 am | जेम्स वांड
21 May 2022 - 11:53 am | कॉमी
मिम फॉरमॅट आवडला आहे !
21 May 2022 - 2:23 pm | अमरेंद्र बाहुबली
द्वेष नाहीहो! आपली भक्ती आपल्या पर्यंत मर्यादीत ठेवावी, क्रिकेटप्रेमींचा भयानक सूळसूळाट आहे आपल्या देशात. कोणत्या ना कोणत्या माझ्यमातून ते ईतरांवर क्रिकटच्या बातम्या, विनोद, पांचट रेकोर्ड मारत असतात. मा तर नेहमी प्रार्थना करत असतो मोठा स्पर्धेतून टीम लगेच बाहेर पडावी जेवेकरून ह्या भक्तांच्या तोंडमारा बंद व्हावा.
21 May 2022 - 2:38 pm | जेम्स वांड
त्या भक्तीलाच हातभार लावताय की बली अश्याने, तुमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या पण तुमच्याजवळ ठेवता येतील की तुम्हाला, विशेषतः धागा क्रिकेटचा अन कोहलीचा आहे हे शिर्षकातून ठळक लक्षात येत असताना. हा आता जर कोणी क्रिकेट अतिशय फालतू खेळ असून आम्ह8 ब्वा त्याला शिव्या देणे कुल समजतो, आमच्या सडेतोडपणाचे (?) उदाहरण समजतो अश्या आशयाचा धागा काढला अन त्यात तुमच्या जाज्वल्य कॉमेंट्स नसल्या तर मात्र नवल वाटलं असतं.
20 May 2022 - 11:50 pm | उन्मेष दिक्षीत
आधीच कॅप्टन व्हायला हवा होता, बराच वेळ झाला !
कोहली इज गुड अॅज अ बॅट्समन ओन्ली.
20 May 2022 - 11:54 pm | श्रीगुरुजी
कोहलीने काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे. अति क्रिकेटमुळे तो अपयशी ठरत आहे. फक्त एक चांगला डाव खेळला की तो पुन्हा पूर्वीसारख्याच प्रचंड धावा करेल. सध्याच्या भारतीय संघात कोहली, पुजारा व रहाणे हे तीनच तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. बाकी सगळे नुसती बॅट फिरवतात. कोहली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.
21 May 2022 - 1:16 am | सुक्या
क्रिकेट हा एक खेळ आहे. त्याकडे खेळ म्हणुन पहा. आवास्तव महत्त्व देउ नका.
क्रिकेटर लोकांच्या व्यक्तीपुजेचा आता वीट आला आहे ..
21 May 2022 - 4:36 am | अमरेंद्र बाहुबली
हेच म्हणतो. आणी ही लोक हे असले धागे काढून लोकांच्या माथी बळजबरी मारतात. तुम्हाला आलडतो तर ठेवा ना तुमच्याजवळ लोकांच्या माथी तूमची आवड/भक्ती का मारावी?
21 May 2022 - 9:00 am | सुजित जाधव
क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही ..त्यामधून घेण्यासारख्या व शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत..महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, कपिलदेव, राहुल द्रविड, व्हीव्हीसएस लक्ष्मण यांसारखे खेळाडू फक्त चांगले क्रिकेटर नाहीत तर आदर्श व्यक्ती सुद्धा आहेत. संयम, निर्भीडता, साधेपणा, नम्रता, दडपण हाताळण्याचे कौशल्य, प्रेझेन्स ऑफ माईंड अश्या कितीतरी गोष्टी या खेळाडूंकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला क्रिकेट आवडत नसेल तर नका वाचू ना लेख. तुमच्यावर वाचायची कुणी बळजबरी केलीये का?
21 May 2022 - 9:09 am | श्रीगुरुजी
क्रिकेटद्वेष्ट्यांना हे हजारदा सांगून झाले आहे.
आपल्याला जो विषय आवडत नाही त्या विषयावरील धागे उघडून वाचण्यात आपला वेळ वाया घालवू नये हे साधे व्यवहारज्ञान आहे. मी मला रस नसणाऱ्या काही विषयांवरील धागे व काही निर्बुद्धांचे प्रतिसाद अजिबात वाचत नाही. परंतु ही मंडळी क्रिकेट आवडत नसताना व क्रिकेटवरील धागे वाचण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना, नुसते धागे वाचत नाहीत तर या विषयावर धागा लिहिलाच का हा जाब विचारण्याचा मूर्खपणा करून फटके खातात.
21 May 2022 - 2:36 pm | अमरेंद्र बाहुबली
मागे एका कायप्पा समुहात बळजबरीने क्रिकेट च्या बातम्या माथी मारला जायच्या तिथे मी भांडून क्रिकेटचा वेगळा समूह काढायला लावला तरीही क्रिकेट शी संबंधं नसलेल्या समुहात बळजबरीने क्रिकेटच्या बातम्या मारल्या जायच्या. मला वाटतं मिपावर “खेळ” हा विभाग आधी होता(?) नसेल तर कृपया काढावा. कारण दर्जेदार लेखनात मध्येच असा काहीतरी व्यक्तिपुजक लेख येतो नी लोकांचा हिरमोड होतो.
21 May 2022 - 2:53 pm | जेम्स वांड
हिरमोड होतोय बली ?
एक काम करा, "क्रिकेट एक फालतू खेळ" नावाचा धागा काढा अन तो पंच हजारी होईस्तोवर तुम्ही अन तुम्ही म्हणताय तसे क्रिकेट द्वेष्टे लोक मिळुन तिथं लाखोली वहा शिव्यांची क्रिकेटला. त्या धाग्यावर रिप्लाय आले नाहीत तर जबाबदारी आमची नाही हो मात्र, कारण आम्ही पडलो ब्वा क्रिकेट शौकीन.
अन खेळ विभाग हवा, ग्रामीण साहित्य विभाग हवा, पुरुष विभाग वेगळा हवा, स्त्री विभाग वेगळा हवा अश्या मागण्या मिपावर कायम पडीक असतात, मुळात संस्थळ आहे खासगी काय विभाजन करून काय व्हर्टिकल्स ठेवायचे हे मालक ठरवणार तुम्ही आम्ही नाही, अन खेळ विभाग होईपर्यंत का सुजितनं काही लिहुच नये का काय मग खेळावर ?
मिपा प्रशासनाला विनंती करा की इतके विभाग काढण्यापेक्षा त्यांनी एक "अमरेंद्र बाहुबली अग्रलेख विभाग" काढावा तिथं क्रिकेट, पुणे, पुणेरी जेवण, गुलाबाचे अन बर्फाळ डोंगरांचे फोटो इत्यादींवर तुम्ही तुमचे सडेतोड लेख लिहा, सोपं पडेल ते सगळ्यांना, तुमचे चाहते अन समर्थक येऊन तिथं उत्तम चर्चा करू शकतील अन सुजित किंवा इतर क्रिकेटप्रेमी, गुलाब फुल फोटोग्राफर इत्यादी लोक विभागाचे नाव पाहूनच तो लेख उघडणे टाळतील.
21 May 2022 - 3:14 pm | अमरेंद्र बाहुबली
एखादी मोठी स्पर्धा असेल तर समजू शकतो पण कुठल्यातरी खेळाडूचा फाॅर्म नाही, काढ धागा.
ऊद्या पुजाराची चप्पल तूटली काढा धागा, धोनाची मूलगी रडतेय काढा धागा. चालूद्या.
21 May 2022 - 3:30 pm | जेम्स वांड
पुजाराची मोडकी चप्पल अन धोनीची मुलगी ह्यांच्यावर निघालेले धागे दाखवा पाहू मिपावर ?
अन असले धागे काढतील ह्या भविष्यकालीन चिंतेतून तुम्ही जर इथं वितंडवाद घालत बसणार असाल तर
Wake up my young friend, throwing down your life on a slippery slope is not at all advisable, take it or not.
21 May 2022 - 3:17 pm | श्रीगुरुजी
क्रिकेट विषयावरील धागा वारंवार उघडलाच पाहिजे आणि वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती, बळजबरी नसतानाही क्रिकेटद्वेष्टे वारंवार तो धागा उघडून, आम्हाला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा का लिहिता क्रिकेटवर लेख असा तावातावाने जाब विचारतात हे पाहून त्यांची कीव कराविशी वाटते.
क्रिकेट विषयावरील लेख उघडलाच पाहिजे, लेख वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती यांच्यावर नाही. आपल्या आवडत्या विषयांवर लेख लिहायला, आपल्या आवडत्या विषयांवरील लेख वाचायला यांच्यावर बंदी नाही. क्रिकेटवरील लेखामुळे इतर लेखांची जागा अडते अशीही परिस्थिती नाही. क्रिकेटवरील लेखामुळे कोणावर अन्याय होतोय, कोणाला आपला लेख प्रदर्शित करता येत नाही अशीही परिस्थिती नाही. हे या संकेतस्थळाचे मालक नाहीत व येथे कोणत्या विषयावर लेख असावे किंवा नसावे हे ठरविण्याचा अधिकारही यांच्याकडे नाही. तरीसुद्धा यांचा विरोध सुरूच आहे.
ज्यांना या संकेतस्थळावरील क्रिकेट विषयावरील लेखांना विरोध आहे त्यांनी स्वत:चे वेगळे संकेतस्थळ निर्माण करून त्यावर अशा लेखांना बंदी घालावी.
21 May 2022 - 2:24 pm | अमरेंद्र बाहुबली
आपले आदर्श आपल्याकडे ठेवावेत.
21 May 2022 - 6:38 am | श्रीगुरुजी
त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील.....
तथास्तु! त्याच्या बरोबरीने रोहीत शर्मा व बुमराह हे सुद्धा पुन्हा एकदा फॉर्मात यावे हीच प्रार्थना _/\_.
21 May 2022 - 9:11 am | सुजित जाधव
रोहितने मागच्या सामन्यात मस्त फटकेबाजी केली..
21 May 2022 - 9:53 am | श्रीगुरुजी
यावर्षी आयपीएल मध्ये त्याचे अजून एकही अर्धशतक नाही. ईशान किशध सुद्धा २-३ सामन्यांचा अपवाद वगळता अपयशी ठरला आहे. बुमराहने एका सामन्यात ५ फलंदाज बाद केले. परंतु उर्वरीत बहुसंख्य सामन्यात त़ निष्प्रभ ठरला आहे.
21 May 2022 - 12:10 pm | चावटमेला
"फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट" - आसं आमी आमच्या लाडक्या दादाबद्दल म्हणायचो कालीजात असताना २००४-०५ मदी, तर लोक आमास्नी येड्यात काडायचे. पण करीअर च्या शेवटी शेवटी, खास करुन २००८, २००९ च्या आय्पीएल मध्ये दादाला अगदी गल्लीबोळ छाप बॉलर्स पुढे चाचपडताना बघून खूप वाईट वाटायचं, आणि आता बास्स असं फीलींग यायचं
22 May 2022 - 8:34 am | फारएन्ड
२००८ मधे तो टेस्ट मधे चांगला खेळत होता. शेवटच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे एकदा १०० व एकदा - बहुधा शेवटच्या मॅच मधे ८० मारले होते.
22 May 2022 - 9:48 am | श्रीगुरुजी
शेवटच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १०२ धावा केल्या होत्या. शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात ८५ व दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला होता.
22 May 2022 - 2:10 pm | श्रीगुरुजी
गांगुलीने आपल्या पदार्पणाच्या कसोटी डावात शतक केले होते तर आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी डावात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. अशी कामगिरी करणारा तो बहुधा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू असावा.
21 May 2022 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली
मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का? असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??
21 May 2022 - 3:37 pm | जेम्स वांड
मूलतः आपल्याला क्रिकेट आवडत नाही म्हणून क्रिकेटवर काढलेल्या, क्रिकेटप्रेमी लोकांनी काढलेल्या अन गेम संबंधित असलेल्या धाग्यावर आपण वाटेल तसे तुसडेपणाने बोलणे हे चुकीचे नाही का ?
निघतील तेव्हा मिपामालक बघूनच घेतील हो, धाग्यावेताळ म्हणून कुप्रसिद्ध अश्या इतर एका संस्थळावरील एका अजब सदस्याला इथंच गार करून हद्दपार केलेलं बघितलं आहे आम्ही मिपावर. आपण असल्या चिंता करण्यापेक्षा आवडतात त्या धाग्यांवर लक्ष केंद्रित करून नावडत्या धाग्यांवर आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या जाहिराती करणे टाळावे, इतकेच आपल्या हाती आहे बघा.
21 May 2022 - 4:37 pm | श्रीगुरुजी
+ १
21 May 2022 - 3:39 pm | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट ला आंतरराष्ट्ीय स्तरावर महत्व किती?
21 May 2022 - 4:35 pm | श्रीगुरुजी
आपली जेवढी समज तेवढी.
21 May 2022 - 4:39 pm | अमरेंद्र बाहुबली
मारीया शारापोवा बोलली होती “वू ईज सतिन तेंडूलकर?“ आता तिची समज काढू नका म्हणजे झालं. :)
21 May 2022 - 5:20 pm | श्रीगुरुजी
मायकेल शुमाकर, टिम काहिल, निक अनहॉल्ट, रॉजर फेडरर ही नावे माहिती आहेत का?
21 May 2022 - 5:37 pm | सुजित जाधव
मला सांगा.. तुम्हाला वाचता येत म्हणल्यावर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असणारच...मग त्या वर्तमानपत्रात क्रिकेटच वेगळं पान असतच ना की तुम्ही ते छापणाऱ्याना/वितरकांना असं सांगता की मला क्रिकेट आवडत नाही माझ्यासाठीं असं स्वतंत्र वर्तमानपत्र छापा ज्यामध्ये क्रिकेटच्या बातम्या नसतील...
तुम्हाला ज्या विषयात रुची आहे त्या विषयावरील लेख वाचा ना....इथे तुम्हाला क्रिकेट वरील लेख वाचायची कोणी बळजबरी नाही करत आहे..आता याउपर मी काही सांगू शकणार नाही..
आणि इथून पुढेपण मी क्रिकेट वर लेख लिहितच राहीन...तुम्हाला काही अडचण असेल तर इथे टिप्पणी करण्यापेक्षा सरळ मिसळपाव मॉडरेटर टीम शी संपर्क साधा.. ते काय तो निर्णय देतील...
21 May 2022 - 6:09 pm | श्रीगुरुजी
+ १
अजूनही डोक्यात प्रकाश पडेल असे वाटत नाही.
21 May 2022 - 6:09 pm | चामुंडराय
भले !!
अनुष्काच्या "ह्यांच्या" फटकेबाजी बद्दल काही तरी वाचायला मिळेल म्हणून हा धागा उघडला तर इथे भलतीच फटकेबाजी होते आहे.
21 May 2022 - 9:30 pm | सुखी
बघा की... म्हणलं मस्त चर्चा चालू दिसते तर आर्मस्ट्राँग च दळण चाललय
21 May 2022 - 10:55 pm | सुजित जाधव
आर्मस्ट्राँग च दळण म्हणजे??
22 May 2022 - 8:18 am | आनन्दा
काय राव तुम्ही? जरा डोकं लावा..
इथे कोण दळण दळतंय?
22 May 2022 - 8:41 am | फारएन्ड
कोहली आवडतोच. पण बहुधा ऑल्मोस्ट दोन वर्षे तो आउट ऑफ फॉर्म आहे.
कालही रशीद ने त्याचा कॅच घेतला असता तर पुन्हा लौकरच गेला असता. पण नंतर त्याने त्याचा फायदा करून घेतला. पुढे चांगला खेळला. त्याचे एक दोन ट्रेडमार्क शॉट दिसले. पण योग्य वेळी पीक होणार असेल तर आरसीबीला प्ले ऑफ्स मधे आणि टुर्नामेण्टमधेही यावेळेस चांगला चान्स आहे.