निर्झरातून वाहणारे
सागरातून लहरणारे
खोल आतून उमलणारे
मी पणाशी झुंजणारे
वास्तवाच्या वाळवंटी
मृगजळे साकारणारे
जाणतो मी स्वल्प काही
जाणिवेला छेदणारे
नेणिवा ओलांडणारे
भोवताला व्यापणारे
व्यापुनी हुलकावणारे
नश्वराच्या चौकटीतून
शाश्वताशी बोलणारे
शोधतो मी गूढ काही
प्रतिक्रिया
5 Feb 2022 - 10:49 am | प्रसाद गोडबोले
आली आली आली , कच्च्या मालाची ऑर्डर आली !
किती वाट पहायला लावलीत राव !!
=))))
5 Feb 2022 - 11:20 am | कर्नलतपस्वी
वाट पहतोय
5 Feb 2022 - 11:37 am | गड्डा झब्बू
आमचा पर्यत्न :)
5 Feb 2022 - 2:21 pm | कर्नलतपस्वी
पघीतला अन ठिगळपण जोडलयं
5 Feb 2022 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली गूढ कविता
पैजारबुवा,
6 Feb 2022 - 3:21 pm | श्रीगणेशा
खूप छान!