एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 12:07 am

एक होता कार्व्हर
लेखिका :वीणा गवाणकर

१

साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.

अमेरिकन गुलामगिरीच्या काळात १८६० च्या दरम्यान झाला ,आपल्या जन्माची तारीख कार्व्हरयानाही माहित नव्हती.आईवडील दोघेही गुलाम होते,मोजेस कार्व्हर यांनी त्यांना विकत घेतले होते.एका नाट्यमय अपहरणात मेरी- जॉर्ज कार्व्हरची आई कायमची नाहीशी होती. केवळ जॉर्ज वाचतो ज्याला मोजेसबाबा एका घोड्याच्या मोबदल्यात पुन्हा विकत घेतात.जॉर्ज कार्व्हर मोजेस आणि त्यांची पत्नी सुझेन यांच्या घरातलाच छोटासा भाग होतो.काहीही न बोलणारा हा कृष्णवर्णीय मुलगा मुका असेच सगळ्यांना वाटत.परंतु फुलांविषयी,पक्षांविषयी निसर्गाविषयी त्याचे ममत्व सगळ्यांना आश्चर्यचकित करते.एका जादुगाराप्रमाणे हिरमुसलेली झाडं,रोपं तो खुलवीत असे.

कार्व्हर व इतर कृष्णवर्णियांना डायमंड ग्रोव्हला शिक्षणासाठी परवानगी नसते.मोजेसबाबाचे घर सोडून निओशोला पोहचतो.रात्रभर थंडीत कुडकुडत काढणाऱ्या जीवाला मारिया नावची चांगली स्त्री आसरा देते आणि त्यांचे नाव कार्व्हर बाबांचा जॉर्ज ‘जार्ज कार्व्हर’ होते.शिक्षणासाठी कार्व्हरची धडपड ,कष्ट करून पैसे कमवायचे ,प्रवेश घ्यायचा ,शिकायचे आणि पैसे संपले की पुन्हा शाळा सोडायची.नंतर तेच कष्ट,पैसे कमवा,शिका हे चक्र त्याचे चालूच राहत असे.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हायलंड विद्यापीठाने देऊ केलेला प्रवेश प्रत्यक्षात ते कृष्णवर्णीय आहे समजताच रद्द केला जातो.कार्व्हारंची शिक्षणासाठीची तगमग सिम्पसन कॉलेजमुळे पूर्ण होते परंतु आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या उद्धारासाठी कला आणि संगीतातली आवड आणि संधी सोडून कार्व्हर शेतकी महाविद्यालयात प्रवेश घेतात.तिथेच पुढे ते प्राध्यापक महानुन्ही रुजू होतात.मायकोलॉजी आणि वनस्पती पथोलोजीमध्ये नवनवीन संशोधन करू लागतात.अनेक दुर्मिळ वनस्पती,कीड ,बुरशी यांवर काम करत असतात.

शेकडो वर्ष गुलामगिरीतच जगलेल्या असंख्य कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळते पण त्याचा उपयोग त्यांना मुळी येत नव्हता.अशांसाठी वाशिंग्तोन यांनी दक्षिण अमेरिका मध्ये टस्कीगी संस्थेची स्थापना केली.भांबावलेल्या कृष्णवर्णियांना स्वत:च्या पायावर उभे करायचे हा त्यांचा निर्धार होता.त्यानुसार अनेक लघुउद्योग ते शिकवतात.लक्षात येते की गुलामगिरीत शेतीत गुरांप्रमाणे राबणाऱ्या या बांधवांना शेतीचे खरे ज्ञान मिळाले पाहिजे हे वाशिंग्तोन ओळखतात.यासाठी एकच नाव त्यांच्या समोर येते जॉर्ज कार्व्हर.ते कार्व्हर्नाना निवडीचे पत्र धाडून टास्कीगीत येण्याचे आमंत्रण देतात.आणि कार्व्हरही “येत आहे “या वाक्याने काही दिवसात जुन्या प्रयोगशाळेत सर्व नीट व्यवस्था करून तिथे पोहचतात.तिथे आपल्या बांधवांची डळमळीत अवस्था पाहून कार्व्हर बदलाचे एक मोठे शिवधनुष्य उचलतात.

टस्कीगीतच पुढचे सारे आयुष्य ते व्यतित करतात.पहाटे चारला फिरून आल्यावर ते प्रयोगशाळेत पूर्ण व्यग्र होऊन जात.रोटेशन क्रॉप,कापसाऐवजी सोयाबीन ,भुईमुग असे जमिनीचे पोत वाढविणारे पिकांचा पर्याय ते देतात.भुईमुगाचा एक हंगाम अतिपिकामुळे आणि मागणी कमी असल्याने वाया जाणार तेव्हा कार्व्हर स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतात आणि जवळपास शेकडो बाय प्रोडक्ट तयार करूनच श्वास घेतात.तीच गोष्ट रताळी पिकाची,सोयाबीन ,कापसाची!कृत्रिम रंग महाग म्हणून मातीपासून रंग बनविणे,शाकाहारी मांसाहार असे अनेक प्रयोग वाचतांना कमालीची मौज वाटते.

त्यांच्या अफाट संशोधनाने हळूहळू जगालाही भुरळ पडणार नाही तर नवलच.पण तरीही फंडची गरज म्हणून कार्व्हर पियानोचे प्रयोग करून तो मिळवतात.अनेक त्यांना मोठमोठ्या संशोधन केंद्राचे त्यांना नोकरीसाठी निमंत्रण येते पण ते सर्व नाकारतात.अगदी तुटपुंज्या पगारात काम करतात,तोही ते शेवटी फंड म्हणूनच देतात. आयुष्यभर मित्रांनी दिलेला एकच कोट वापरला.कधीही सुट्टी घेतली नाही.

एव्हढे असूनही या सेवाव्रतीची कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी थांबत नाही.अनेक अपमान पचवून आपल्या कार्यापासून ते तसूभरही मागे हटले नाही.तुम्ही याचा प्रतिकार का करत नाही यावर ते उत्तर देत संघर्ष करण्याऐवजी तो वेळ मी संशोधनासाठी देईल’ खर म्हणजे तुमच कामच तुमची खरी ओळख व्हायला हवी तुमचा वर्ण ,धर्म ,जात ई. गोष्टी नाही हे पुन्हा महान लोकांचे लक्षण अधोरेखित होते.
आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हा सेवाव्रती आपला कधी हयातीत इतर शास्त्रज्ञाशी मिसळला नाही एकलकोंडा राहिला,पण कार्याच्या बाबतीत एकाग्र राहिला.जास्त सहवास लाभालाही नाही तरीही आईला ते कधीच विसरले नाही ,मातृभक्त राहिले.आपल्या कार्याचे बीज योग्य हाती देऊन कार्व्हर १९४३ ला कर्मभूमीतच अनंतात विलीन झाला.

वीणा गवाणकर लिखित हे पुस्तक मराठीतले एक अमुल्य साहित्य आहे.पुस्तक लिहितांना सरळ सोपी तरीही तरल भाषा हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.पुस्तकातली चित्रे,पुस्तकातील उत्कृष्ट दर्जाची पाने हे पुस्तकाची जमेची बाजू आहे
प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे स्थान खूप मोठे आहे.
-भक्ती

१. एक होता कार्व्हर या पुस्तकाचा उत्तम परीक्षण व्हीडीओ
२.कार्व्हर यांच्या इतर फोटोंसाठी

मुक्तकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2022 - 12:26 am | श्रीरंग_जोशी

हे पुस्तक मी १८ वर्षांपूर्वी वाचले होते. पुस्तक वाचून जे भारावलेपण जाणवले तेच आज पुन्हा हा लेख वाचून जाणवले.
या लेखनासाठी धन्यवाद.

धन्यवाद,मला ही तेच वाटलं थोडं आधी दहा वर्षापूर्वी कार्व्हर वाचायला पाहिजे होतं.

स्मिताके's picture

11 Jan 2022 - 12:28 am | स्मिताके

अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं आणि खूप आवडलेलं पुस्तक. आपण छान आठवण करून दिलीत. पुन्हा वाचावंसं वाटू लागलं आहे!
वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं की त्या कार्व्हरचं चरित्र वाचत असताना, मुलांना झोपण्यापूर्वी त्यातल्या गोष्टी सांगू लागल्या. धाकटा लवकर झोपत असे, त्याच्यासाठी त्या लिहून ठेवू लागल्या. ही वही पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली.

ऐसी अक्षरे ...मेळवीन या आपल्या मालिकेतील आधीच्या भागांचे दुवे कुठे मिळतील?

वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं की त्या कार्व्हरचं चरित्र वाचत असताना, मुलांना झोपण्यापूर्वी त्यातल्या गोष्टी सांगू लागल्या. धाकटा लवकर झोपत असे, त्याच्यासाठी त्या लिहून ठेवू लागल्या. ही वही पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. हो , पुस्तकाच्या प्रस्तावनेत याचा उल्लेख आहे.

ऐसी अक्षरे ...मेळवीन या आपल्या मालिकेतील आधीच्या भागांचे दुवे कुठे मिळतील?
इथेच मिपावर माझे सर्व लेखन या भागात लेख आहेत
https://www.misalpav.com/user/me/authored धन्यवाद😃

तुषार काळभोर's picture

11 Jan 2022 - 1:17 pm | तुषार काळभोर

त्या लिंकवर सगळ्यांना आपापलं लेखन दिसतं. :)

https://misalpav.com/user/34812/authored

राघव's picture

11 Jan 2022 - 1:28 pm | राघव

ही लिंक चालणार नाही. :-)
अपडेटेड लिंकः https://www.misalpav.com/user/34812/authored

ओह! तेव्हा लक्षात नाही आलं.
धन्स 😃

स्मिताके's picture

11 Jan 2022 - 7:08 pm | स्मिताके

नंतर आठवलं. लॉगिन न करता वाचण्याची सवय. त्यामुळे वरच्या 'मिपाकरांचे दीर्घलेखन' मध्ये शोधत होते.
आता वाचेन.

कुमार१'s picture

11 Jan 2022 - 8:46 am | कुमार१

चांगला परिचय

Bhakti's picture

11 Jan 2022 - 10:42 am | Bhakti

धन्यवाद कुमारजी.

कर्नलतपस्वी's picture

11 Jan 2022 - 9:04 am | कर्नलतपस्वी

भेदभाव, जातपात फक्त भारतातच नव्हते तर सर्वत्रच दिसते. मी पण पुस्तक वाचलय, इ साहित्य वर बहुतेक उपलब्ध असावे.

हो नाही, राजहंस सहज ध्यानात येत नाही!
धन्यवाद 😃

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jan 2022 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्येक कुमारवयीन मुलाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. आमच्या चित्रकलेच्या बाईंनी शाळेत हे पुस्तक वाचून दाखवले होते.

मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड ठरावे इतके महत्वाचे पुस्तक.

वाचताना वीणा गवाणकर यांनी घेतलेली मेहनत शब्दा शब्दात जाणवते. या पुस्तकाची अनेक भाषांतरेही झाली आहेत असे ऐकले आहे.

पैजारबुवा,

होय
वाचताना वीणा गवाणकर यांनी घेतलेली मेहनत शब्दा शब्दात जाणवते. खुपच सुंदर लिखाण आहे.शिक्षकांनी हे पुस्तक नक्की मुलांच्या हाती द्यावे.
धन्यवाद पैजारबुवा 😃

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2022 - 11:49 am | चौथा कोनाडा

नितांत सुंदर लेख ! 💖
एक होता कार्व्हर मी काही वर्षांपुर्वी वाचले. अत्यंत आवडलेले चरित्र !
एका लेखक मित्रांच्या व्यक्तिगत बैठकीत वीणा गवाणकरांना भेटण्याचा योग आला, ते क्षण संस्मरणिय होते !

Bhakti's picture

11 Jan 2022 - 5:13 pm | Bhakti

वीणा गवाणकरांना भेटण्याचा योग आला, ते क्षण संस्मरणिय होते !

धन्यवाद चौकोकाका.

मुक्त विहारि's picture

11 Jan 2022 - 12:22 pm | मुक्त विहारि

कंटाळा आला की ह्या गुरूंची ही पोथी वाचतो ... कुठलाही चमत्कार नाही...

Bhakti's picture

11 Jan 2022 - 5:13 pm | Bhakti

धन्यवाद मुवि काका.

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2022 - 11:15 am | चौथा कोनाडा

कंटाळा आला की ह्या गुरूंची ही पोथी वाचतो ... कुठलाही चमत्कार नाही...

मुवि साहेब,
+१

Nitin Palkar's picture

11 Jan 2022 - 1:16 pm | Nitin Palkar

हे पुस्तक आधी वाचनालयातून आणून वाचले होते. नंतर लगेच ते विकत घेतले. त्यांची ओघवती लेखनशैली पुस्तक खाली ठेऊ देत नाही. लेखाअंती दिलेला वीडेओ देखील या पुस्तकाविषयी अधिक माहिती देतो. वीणा गवाणकर यांनी या पुस्तकानंतर अनेक चरित्रे लिहिली, 'एक होता कार्व्हर' हे त्यांचं पहिलं पुस्तक. या पुस्तकाएवढं प्रचंड यश त्यांच्या अन्य कुठल्याही पुस्तकाला मिळाले नाही. या पुस्तकाची आत्ता आलेली ही पंचेचाळीसावी आवृत्ती आहे. मराठी पुस्तकांना असे यश विरळाच.
मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली वीणा गवाणकर यांची ही मुलाखत देखील बघण्या/ऐकण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/watch?v=Mlsl_xAhWRk

या पुस्तकाची आत्ता आलेली ही पंचेचाळीसावी आवृत्ती आहे. मराठी पुस्तकांना असे यश विरळाच.

अगदी ! अजून अशाच उत्तरोत्तर वाढत राहतील.

Bhakti's picture

11 Jan 2022 - 5:15 pm | Bhakti

धन्यवाद नितीनजी.

अतिशय आवडतं असं व्यक्तिमत्व! सतत काम करत राहणं हा एक गुण जरी आपण उचलू शकलो तरीही कितीतरी फरक पडेल आपल्या आयुष्यात.

फार खडतर आयुष्य बघीतल्यामुळं असेल कदाचित, पण अगदी गरजेपुरता पैशाचा वापर हे सहज असलेलं जीवनसूत्र होतं या माणसाचं. अचंबित व्हायला होतं.

  • एडिसननं त्यांना येण्याचं आमंत्रण दिले होते. आकर्षक पगारावर - वार्षिक १ लक्ष डॉलर्स [आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वी].
    नाकारण्याचं कारण किती उदात्त होतं? "त्याचा माझ्या बांधवांना उपयोग होणार नाही!"
  • फोर्डनं एखादं गिफ्ट घेण्यासाठी धोशा लावला, तर त्याच्याकडून मिळालेला हिरा हा शाळेतल्या वस्तूसंग्रहालयात मुलांना दाखवायला ठेवण्यात आलेला होता.

त्यांची खालील वाक्ये कुणालाही मार्गदर्शक ठरतील अशीच आहेत -

Start from where you are,
With whatever you have,
Make something of it,
And never be satisfied!

समक्ष कोणा संत व्यक्तीला भेटण्याचा अजून तरी योग आलेला नाही. पण हा माणूस संतच होता असं अगदी मनापासून वाटतं!

वीणाताईंचे आपल्यावर फार उपकार आहेत! त्याचं आयडा स्कडरचं व्यक्तीचित्र देखील असंच गुंगवून टाकणारं आहे! मिळाल्यास जरूर वाचावं.

Bhakti's picture

11 Jan 2022 - 5:16 pm | Bhakti

खुप सुंदर लिहिलंय!
धन्यवाद राघव!

सहमत आहे...

स्मिताके's picture

11 Jan 2022 - 7:17 pm | स्मिताके

हेच लिहिणार होते. आयडा स्कडर आणि सालिम अली ही मी वाचलेली त्यांची आणखी दोन पुस्तकं.
अप्रतिम शैली, रंजक आणि माहितीपूर्ण.

श्रीगणेशा's picture

12 Jan 2022 - 1:45 am | श्रीगणेशा

छान पुस्तक परिचय.
पुस्तक वाचलं नाही अजून. पण हा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचून पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. धन्यवाद.

धन्यवाद नक्कीच वाचा!

एक होता कार्व्हरच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या इतर पुस्तकांचा विषय निघालाच आहे तर त्यांचे मी वाचलेले आणखी एक पुस्तक सुचवतो.

डॉ. खानखोजे - नाही चिरा....
क्रांतिकार्यासाठी भारत सोडणार्‍या व मेक्सिकोमधे जागतिक किर्तीचे कृषी संशोधक म्हणून नावाजले गेलेल्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे छोटेखानी चरित्र.

अरे वाह!
नक्की वाचणार !

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2022 - 11:26 am | चौथा कोनाडा

"नाही चिरा " हे पण वाचलंय ! जबरदस्त आहे !
त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे !

स्वा. सावरकर + कार्व्हर असं "भारतीय क्रांतीकारक + शेतकीतज्ञ" असे दुर्मिळ व्यक्तिमत्व !
आमच्या लेखक मित्रांनी या पुस्तकाचे इंटरनेट रेडिओसाठी अभिवाचन केले होते.

हे पुस्तक वाचनात आले नव्हते परंतु माझ्या मुलाच्या शाळेत (ई. ४ थी) त्याला एक पुस्तक दिले जे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर चे चरीत्र होते. त्याला ते वाचुन त्यावर ४ पानी निबंध लिहायचा होता. तो वाचत असताना मला बरेच प्रश्न विचारत असे. तेव्हा मी ते वाचले आणी त्यांचे काम पाहुन थक्क झालो. काही लोक झपाटलेले असतात हे नक्की.

आता पुढच्या भारत वारीत हे नक्की विकत घेईल.

धन्यवाद Bhakti जी.

धन्यवाद!
तेव्हा मी ते वाचले आणी त्यांचे काम पाहुन थक्क झालो. इंग्लिश का?

काही लोक झपाटलेले असतात हे नक्की.+१११

सुक्या's picture

12 Jan 2022 - 3:08 pm | सुक्या

इंग्लिश का?
हो. साधेच होते पुस्तक. ५० - ६० पानी असेल. परंतु सुंदर होते.

कार्व्हर माझ्यासाठी तसलं पुस्तक होतं. आधी आपलं चंपक , ठकठक, चांदोबा, किशोर, चाच चौधरी इत्यादी वाचन चालत असे. वडीलांनी प्रथम कार्व्हर हातात दिलं तेव्हा निरस वाटलं, पानागणिक चित्र नाहीत का मजेदार कोडी खेळ नाही. पण मग हळू हळू वाचलं अन काहीतरी मोठं दार उघडल्यासारखं वाटलं, उत्तम ठेवा असावा तसं. मग हळूहळू गोडी वाढत गेली.

डॉ. कार्व्हरांच्या काळात निळा रंग प्रचंड महाग होता त्याचे सगळ्यात महागडे व्हर्जन पर्शियन ब्लु असे. डॉक्टर साहेबांचा मदतनीस असणाऱ्या कर्टिस नावाच्या माणसानं त्यातील अजून एक शेड (मातीतूनच) शोधून काढली म्हणून त्या शेडचे नामकरणच कर्टिस ब्लु झाल्याचे त्याच पुस्तकात वाचले होते.

अतिशय उत्तम लेख, थोडं शुद्धलेखनावर लक्ष दिलेत तर अजूनच बहारदार होईल असे नम्रपणे सुचवतो, राग मानू नका, पण त्यामुळे होणारा रसभंग टाळता येऊ शकतो म्हणून म्हणतो आहे.

थोडं शुद्धलेखनावर लक्ष दिलेत

हो , मराठी शुद्धलेखनवर अजून बरेच काम करायचं आहे.

परीक्षण चांगलंच लिहिलंय पण का कोण जाणे हे पुस्तक वाचायला कधीच आवडले नाही, रटाळच वाटले.

Bhakti's picture

12 Jan 2022 - 10:13 am | Bhakti

रटाळच वाटले.

मला आधीच्या आवृत्तीच मुखपृष्ठ पाहून आणि वाचनाची आवड नव्हती तेव्हा असंच वाटायचं!😂
पण जवळची मैत्रीण म्हणाली वाचच!
Hats off to वीणा गवाणकरजी!

Bhakti's picture

12 Jan 2022 - 10:14 am | Bhakti

धन्यवाद प्रचेतस.

गोरगावलेकर's picture

12 Jan 2022 - 9:36 am | गोरगावलेकर

बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे हे पुस्तक . खूप आवडले होते.

Bhakti's picture

12 Jan 2022 - 10:14 am | Bhakti

धन्यवाद ताई!