सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे
कृपया सहकार्य करावे
- याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का? मुंबई कोहापूर सुद्धा फार लांबचा प्रवास वाटायचा
- गोवा: गोव्यात गेल्यावर या बाबतीत जरा खुजेपण वाटायचं कारण तिथे असलेला मीत्र "काय तुमची महाराष्ट्र एस टी फक्त एक रंग .. इथे बघ किती रन्गीबेरंगी बसेस ! " असे चिडवायचा... एक तर तिथे ए खाजगी बस सेवाच होती आणि इतर राज्यातून बस यायच्या ..
त्यात कहर म्हणजे त्याला चित्र काढतांना तो बस ची बाजू रंगवायचा विविध रंगात वेगवेळे काल्पनिक लोगो बनववाचा... १५०-२० पानांचा चित्रपुस्तक .. मला वाटते प्रोडक्ट ची ती माझी पहिली ओळख !
गोवा राजा झाल्यावर कदंब सुरु झाली .. सगळ्या नव्या बसेस .. एकदम वेगळं वाटायच! ( गोयतील पण लोकांना राव रे कि असे काही तरी म्हणून पाहजे तिथे बस थांबव्याची सवय होती तेवहा अशी "सरकारी" सेव सुरु झाल्यावर ती पद्धत चाळकू राहिली कि नाही कोण जाणे
तर एकदा पणजी ते पुणे जायचे होते नेहमीची एसटी नको म्हणून कदंब चे आरक्षण केले... .. मग लक्षात आला कि अरे चूकच झाली शेजारीच नवी कोरी लालपरी उभी होती.. अंतर्राज सेवा असल्यामुळे नवी गाडी आणि त्यात खास म्हणजे पूर्ण डोके टेकवता ठेवता येईल अश्या "शीट " आणि कदंब मात्र फक्त खांद्यपर्यंत आणि वर आडवी दांडी .. मनात शिव्या घातल्या पण एक चानस म्हणून सोडायला आलेलया मित्राला बोलून दाखवलं.. बघ लेका आमची एस टी
उत्तर आणि मध्यप्रदेशात ते सुद्धा अगदी छोट्या गावात गेल्यावर आणि तेथील धन्य असे स्टॅन्ड आणि गाड्या बघितल्यावर परत एकदा महामंडळाचा अभिमान वाटला ... उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त ऊस होतो असा मुद्दा आला कि आमचाच पार्टवर म्हणजे बघा आमची एस टी किती भारी आहे
- शाळेचं सहल आणि एस टी हे तर काय एक समीकरणच होत तेव्हा सुधा महामंडळ जरा चांगल्या स्थितीला गाड्या द्यायच्या
- पुढे मग एशियाड आणि शिवनेरी नि वीकेण्ड पुणे करणे सोप्पे झाले धन्यवाद महामंडळ
अजूनही आठवेल... आठवा ... लिहा
प्रतिक्रिया
26 Nov 2021 - 12:04 pm | कुमार१
एशियाडचा अनुभव चांगला असायचा.
26 Nov 2021 - 12:25 pm | चौथा कोनाडा
महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावचा म्हणजे पंढरपुरचा एसटी स्टॅण्ड ऐसपैस होता. पुर्वी मोठ्या चार यात्रा सोडल्या तर गाव सुस्त पडलेलं असायचं, तसंच स्टॅण्ड देखिल निवांत असायचं. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि देखभाल उत्तम असायची. रोज संध्याकाळी स्टेशनरोडने (फुलपाखरं बघत बघत) स्टॅण्डावर पोहोचणे ही आमची रोजची मंझील. तसं थोडं मुख्य मंदिर आणि पेठे पासुन दुर असल्याने लांब गेल्याचा फील मिळायचा. एस्टीच्या वेळा सोडल्यातर शांतता असायची. मग अभ्यासासाठी या पेक्षा उत्तम ठिकाण कोणते ? बर्याच परिक्षांचा अभ्यास इथल्या बाकड्यावर केलेला आहे.
स्टॅण्डावर झकास बुकस्टॉल होता. तिथली मासिकं, साप्ताहिकं, मायापुरी, रसरंग, श्री, सोबत, जत्रा ही न्याहाळत बसणं आवडीचा छंद ! बुकस्टॉलमामाशी ओळख झाल्यावर तिथच बसुन वाचणे अन खराब न करता परत देणे या बोलीवर एक दोन रुपये देउन मला पुस्तकं मासिकं वाचता येणे जमायाला लागले. कित्येक तास तिथे पडीक असायचो वाचत. मामांशी चांगलीच गट्टी जमली. नंतर नाही आलो तर "का नाही आला" असं हक्कानी चौकशी करायचे.
आता ३०-३५ वर्षात गोष्टी खुपच बदलल्यात ! पण त्या वेळच्या एसटी स्टॅण्डचे माझ्या मनात खास स्थान आहे !
26 Nov 2021 - 12:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
लालपरीच्या बर्याच सुखद आठवणी आहेत. बहुतांशी ट्रेक्स शी निगडीत.
मोबाईल फोन नसण्याच्या दिवसात , आणि ५०-१०० रुपये आईवडीलांकडे मागायला लाज वाटण्याच्या काळात दिवसभराची कॉलेज्/ऑफिसची धावपळ उरकुन कसेबसे कल्याण स्टेशनवर पोचुन कर्जत्,कसारा किवा ईगतपुरी पर्यंत लोंबकळत ट्रेनने केलेला प्रवास मग बाहेर पडुन एस टी स्टँडवर केलेला मुक्काम २-३ तासाची झोप आणि सकाळी पहिल्या एस टीने ट्रेकच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात म्हणजे खांडस्,बारी,खुबी,जुन्नर,आंबेगाव,राजुर्,घोटी,पाचनई,काळुस्थे असे कुठेतरी पोचायचे. या टप्प्यात सहसा एस टीची शेवटची लांब सीट पकडली जायची कारण खंडीभर लोक, त्यांच्या सॅक्स, रोप आणि ईतर चित्र विचित्र सामान असायचे. रात्रभर ज्यांचे चेहरे दिसले नाहियेत किवा ट्रेकला प्रथमच आले आहेत अशा लोकांच्या ओळखीपाळखी, मागच्या ट्रेक्सच्या सुरस आणि चमत्कारिक कथा,गाणी,गप्पा,थापा अशा सगळ्या गोष्टींचे तो प्रवास म्हणजे मिश्रण असे. बसमधले सगळे प्रवासी आणि कंडक्टर यांच्यासाठी ती मोठीच एंटरटेनमेंट असे पण आम्हाला त्याची काही एक फिकिर नसे. हळुहळु एस टी गावा गावांतुन प्रवास करत करत दर्या खोर्यात शिरत असे आणि आसपासचे डोंगर जवळ येत जात. कोणीतरी कंडक्टरकडुन पहिली आणि शेवटची एस टी कितीला असते, मुक्कामी असते का? वगैरे माहिती घेइ. ईतर माहितगारांपैकी कोणीतरी एखाद्या डोंगराच्या टोकाकडे बोट दाखवुन आज रात्री आपला मुक्काम तिथे असेल वगैरे सांगे.
आणि विशेष वरुन ट्रेक संपवुन जेव्हा परतीचे वेध लागत तेव्हा पायथ्याच्या खेड्यात, जिथे एस टी मिळेल तिथे वेळेवर पोचणे म्हणजे तर तारेवरची कसरतच असे. एक दोन ताज्या दमाच्या गड्यांना कंडक्टरला गळ घालुन एस टी थांबवुन ठेवायला पुढे पाठवले जाई. बाकिच्या गळपटलेल्या लोकांना हाकलत पुढे पळवण्याची जबाबदारी लीडरवर असे. तरीहे कधीतरी उशीर होई आणि कंडक्टरबरोबरची शिष्टाई फळत नसे. मग ती शेवटची एस टी दुर दुर जाताना बघणे नशिबात येई, त्यावेळचे दु:ख काही औरच. अशा तर्हेने ट्रेकिंगच्या दिवसातील खरी साथी म्हणजे लालपरीच. आज नॅट जिओ किवा डिस्कवरी वरचे कार्यक्रम बघुन ,स्वतःची कार घेउन, आणि डिकॅथलॉनचे तंबु,शुज आणी ट्रेकिंग गिअर्स घेउन फिरणार्या मंडळींना हे फारच डाउनमार्केट वाटेल आणि एस टीचे महत्वही समजणार नाही.
26 Nov 2021 - 1:19 pm | सौंदाळा
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई, पुणे रत्नागिरी या मार्गांवर एस.टी ने भरपूर प्रवास केला.
धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे पूर्वी बस जेवण, चहा पाणी या साठी फक्त एस.टी स्टँडवरच थांबायच्या.
राधानगरीच्या कँटीनमधील काळ्या वाटाण्याची, चवळीची उसळ, मलकापूर कँटीनची मटण राईस प्लेट, कोल्हापूरला रात्री २, २.३० ला खाल्लेले पोहे, दावणगिरी लोणी स्पंज डोसा (हे नाव ऐकून पण तेव्हा कित्येकांना माहित नव्हते तेव्हा), कणकवली आंबोली येथील भजी, उप्पीट-शिरा प्लेट, सोलापूरला जाताना इंदापूरला उसाचा रस, मोहोळ ला वडा, भजी या सर्व आठवणी राहिल्या.
आता कारने प्रवास करताना ही सर्व खाद्ययात्रा आपसूकच बायपास झाली. आणि तसेही २००० नंतर एस.टी वाले हॉटेल, ढाब्यासमोर जेवण, नाष्टा, चहा ला थांबायला लागले नंतर ही कँटीन अजून डबघाईला आली.
एकदा अचानक झालेला गणपतीच्या आदल्या दिवसाचा पुणे कुडाळ प्रवास अजून लक्षात आहे. रात्रीची एक्ष्ट्रा गाडी होती आणि नेहमी २ बाय २ असणारी गाडी नसून ३ बाय २ होती आणि त्यात तीन सिटच्या मधल्या जागेवर (शेजारी दोन्ही अनोळखी) बसून केलेला प्रवास अजून आठवतोय. गणपतीचा उत्साह सर्व प्रवाशांमधे सळसळून वाहात होता. मुलगा झाल्यावर त्याला बघायला सासुर्वाडीला कोकण दौरे व्हायचे तेव्हा अचानक बुधवारी केलेला एस. टी प्रवास अजून लक्षात आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेजारी कोणीच आले नाही बस पण तशी थोडीफार रिकामीच होती तेव्हा पहिल्यांदाच दोन्ही सीटवर मस्त मांडी घालुन नंतर रेलुन बसलो होतो आणि सकाळी घरी गेलो आणि त्याच दिवशी बाळ पहिल्यांदाच स्वतःहून पालथे झाले. अचानक झालेला प्रवास सत्कारणी लागला.
26 Nov 2021 - 1:52 pm | चित्रगुप्त
चांगला विषय घेतला आहे लिहीणारांसाठी. मी लहानपणी फक्त तीनच वर्षे (१९६३-६६) महाराष्ट्रात राहिलेलो असल्याने यष्टीचा तसा फारसा अनुभव नाही.
26 Nov 2021 - 1:58 pm | जेम्स वांड
समान असणारे एसटी स्टँडचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे एसटी स्टँडच्या एन्ट्री किंवा एक्झिटला असणाऱ्या उसाच्या रसवंती, सहसा ह्यांची नावे गोरखनाथ, नवनाथ, गहिनीनाथ अशी नाथ संप्रदायाशी संलग्न असत. ह्यांच्या त्या इलेक्ट्रिक/ डिझेल चरकाच्या चाकाला लावलेल्या घुंगरांचा एक सिग्नेचर आवाज यायचा. एका बाजूला चिपाडे लयीत सुरू असलेला चरक, गिऱ्हाईक उठबस अन तो घुंगरांचा आवाज, मला वाटते एसटी स्टँड म्हणले की महाराष्ट्रात हे हवेच हवे, नाही का ?
🙂 🙂
26 Nov 2021 - 2:35 pm | रावसाहेब चिंगभूतकर
लहानपणी एस टी प्रवासी व्यवस्थित वागत असत असे आठवतेय. खच्चून गर्दी असायची, कदाचित एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला (कायम स्त्री जातीलाच का कोण जाणे) एस टी लागत ही असायची, पण ते वगळता तशी एस टी स्वच्छ असायची. गुटखा हा प्रकार त्यावेळी नव्हता. आता बरेच वर्षे प्रवास केला नाही, पण मध्ये जेव्हा केला तेव्हा सहप्रवाशांमधील स्वच्छतेच्या संकल्पनेचा अभाव, सतत पचपच बाहेर थुंकण्याची प्रवृत्ती, मोठ्ठ्याने मोबाईल च्या रेडियोवर गाणे लावणे इत्यादी प्रकार पाहून काही तरी बदललंय याची जाणीव झाली. कदाचित लहानपणी (त्या काळात) स्वच्छतेच्या जाणिवा इतक्या तीव्र नसतील, हे ही कारण असेल, पण माझ्या मते लोक जास्त जास्त माजोरडे, बेफिकीर, उद्धट बनत चालले आहेत.
26 Nov 2021 - 2:51 pm | सॅगी
तुमचा हा प्रतिसाद एस टी असो वा लोकल ट्रेन, सर्वांसाठी लागू होतो.
विमानतळ अथवा विमाने अशांपासून सध्या तरी दूर आहेत म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही अशीच घाण झाली असती यात शंका नाही.
26 Nov 2021 - 3:04 pm | जेम्स वांड
किती फ्रिक्वेन्टली करता साहेब ? शशी थरूर कॅटल क्लास बोलला म्हणून रागावणाऱ्यात असलात तर विषय कट, पण विमानतळावर असलं पब्लिक नसतं हे मात्र अजिबातच पटत नाही बुआ.
26 Nov 2021 - 3:24 pm | रावसाहेब चिंगभूतकर
विमानतळ हा अगदी वेगळाच विषय आहे. भारतीय इतका इगो असलेले, बेदरकार आणि प्रत्येक गोष्टीचे भुकेले कसे असतात हे पहायचं असेल तर कुठल्याही भारतीय विमानतळावर जाऊन पहावं. सरळ रांग लावतच नाहीत. तिथेही पुढे घुसण्याची घाई. त्यामानाने तिथे काम करणारे CISF चे जवान किती तरी सज्जन वाटतात. विमानतळावर गेल्यावर दोन्हींमधला फरक पहाताना भारतीयांना सक्तीच्या 2 वर्षे मिलिटरी ट्रेनिंग/नोकरीची गरज आहेच हा विचार प्रत्येक वेळी मनात येतो. बाकी विमानतळशी तुलना करायची तर लालपरी किती तरी पटीने बरी.
26 Nov 2021 - 3:50 pm | सॅगी
पण जेव्हा केला तेव्हा तरी तसं जाणवले नाही.
हा, विमानतळावर येणार्या टॅक्सी/रिक्षाचालकांबद्दल बोलत असाल तर समजू शकतो साहेब.
26 Nov 2021 - 4:23 pm | जेम्स वांड
मनःपूर्वक शुभेच्छा, एअरपोर्टवर दिसणारे सर्वसाधारण नमुने
१. फायनल कॉलची मुदत संपत आल्यावर पोचणारे अन कसेबसे बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटीच्या रांगेत सगळ्यांना पार करत माझी फ्लाईट सुटेल सुटेल जाऊ दे जाऊ दे करत शांतपणे वाट बघत लायनीत उभ्या असलेल्या लोकांना मूर्खात काढणारे लोक.
२. चटपटीत एअरहोस्टेस बद्दल तुरट शेरे मारत बसलेली जनता, माणूस कितीही फ्रिक्वेन्ट ट्रॅव्हलर असला तरी ह्या जमातीबद्दल (पायलट, होस्टेस, पर्सर्स) कुतूहल भयानक असतेच, मग "ह्या पोरी तसल्याच" वगैरे शेरे मारून ह्या चर्चा थंडावतात
३. आपल्याला डायबेटिस आहे हे विंडो सीट्स घेताना सोयीस्कररित्या विसरून मिडल अन आईल सीटवाल्याला दर मिनिटाला उठवून प्रसाधनगृह जवळ करणारे, विमानात आलोय तर सगळं वसूल करा ह्या मेंटलिटीने मासिके, सुरक्षा पत्रके (!), तीन तीन वेळा हँडल करत बसलेले, प्युक बॅग्ज मध्ये कचरा भरून ठेवणारे, जेवण पहिले मला द्या म्हणत दंगा करणारे
४. विमानाचे लँडिंग झाले नाही का विमान ऐन टॅक्सीत असतानाच उठून उभे लोक ! तिकडं ती बाई बिचारी बोंबलत बसते कृपया बसून राहा, पण नाही, इथं पायलटला ऐरोब्रिज अन अरायव्हल गेट अलॉट झाले नसले तरी बेहत्तर पण आम्ही ओव्हर हेड स्पेस मधून लगेज काढणारच खोदून बाहेर
असे अजून किमान एक लेख होईल इतके लोक अन त्यांच्या लकबी निघतील ! पण ऑलरेडी विषयांतर झालेला धागा अजून भरकटत जायला हातभार नको म्हणून इथंच थांबतो.
26 Nov 2021 - 5:35 pm | सॅगी
तुमच्या तोंडात साखर पडो आणि मला भरपूर प्रवास करण्याचे भाग्य लाभो.. :)
बाकी मुद्दयांबाबत...अवघड आहे आपल्या लोकांचं,, :(
29 Nov 2021 - 11:33 am | नचिकेत जवखेडकर
अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून एकच किस्सा सांगतो. आमच्याबरोबर एकदा विमानामध्ये एक आजोबा होते. बहुतेक एकटेच.विमान उडाल्या उडाल्या हवाईसुंदरीशी भांडत बसले की जेवणाची वेळ झालीये जेवण कुठेय म्हणून. नंतर स्वतःच जाऊन ज्यूस घेऊन आले आणि इमर्जन्सी एक्सिट च्या खिडकीला जिथे जरा जास्त जागा असते तिकडे ग्लास ठेवला.दुसऱ्या क्षणाला तो ग्लास पडून सगळं कार्पेट खराब झालं.
26 Nov 2021 - 3:53 pm | सॅगी
मोबाईल वर स्पिकर वर गाणी वाजवणारे, पचापच थुंकणारे यांच्याकडे जास्त होता.
लाईन तोडणे, मध्ये मध्ये घुसणे हे भारतात सगळीकडे सारखेच आहे याबाबत दुमत नाहीच..
26 Nov 2021 - 2:56 pm | कर्नलतपस्वी
" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे पांडुरगां" , कानावर पडलेल्या या शब्दां बरोबर जाग आली. बघितले तर बाहेर एक अधं पती आपल्या पत्नी च्या खाद्यांवर हात टाकुन भीक मागत होता. आस्मादिकांच लहानपण आजोळी गेले पहिल्यादांच वडिलांच्या नोकरीतील गावात आलो होतो. १९६४-६५ काळ होता. हिच पहिली लाल परीची ओळख.
पुणे ते चिपळूण खेड सर्वात पहिला लाबंचा प्रवास. खबांटकी घाटाचा मुळ अवतार बघीतला. कोयनानगर भूकंपातुन नुकतेच सावरत होते. "आगार" म्हणजेच एस टी बस स्टँड शब्द कोशात भर पडली.
पुढे उत्तर भारतातून सैन्यातून सुट्टीला येताना भुसावळ, यवत दौंड जवळ कुठेतरी लाल परी दिसायची तेव्हां पोटात गलबलून यायचे. वाटायचे कधी एकदा आगगाडीतून उतरून तीच्यात बसतो अन गावाला पोहचतो. परत जाताना मात्र ती आजीबात आवडायची नाही. कदाचित तीला पण काही वाटत असावे, "आता पुन्हा कधी येणार" आसे विचारत असेल का? असे उगाच वाटायचे.
26 Nov 2021 - 3:17 pm | रावसाहेब चिंगभूतकर
अगदी असाच अनुभव मला परदेशातून येताना मुंबई तली छोटी छोटी घरे, गाड्या दिसला की होतो. अगदी वरून झोपडपट्टी दिसली तरी आलो बाबा घरी असंच वाटतं.
26 Nov 2021 - 4:50 pm | कंजूस
कधी एकदा तो परिचित आवाज ऐकतो असे झालेले असते. आणि सरकन आपल्या समोर थांबून आपण आत शिरतो. "मागे बसून घ्या" आणि तिकिट लवकर घेऊन पेंगायचे असते.
26 Nov 2021 - 8:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अनेक आठ्वणी आहेत लालपरीच्या. घाटातला कोकणातला प्रवास म्हणजे- एस टी 'लागू' नये म्हणून लोक आवळा सुपारी/जिंताच्या गोळ्या घेऊनच बसायचे. त्यातल्या त्यात जास्त सुखकर म्हणजे 'सुपर एक्स्प्रेस्' एस.टीच्या मध्यभागी पांढरा पट्टा व त्यावर लाल रंगात 'सुपर एक्सप्रेस्' असे लिहिलेले असायचे. ही कमी ठिकाणी थांबायची.त्याहुन जलद म्हणजे इंग्रजीत 'नॉन स्टॉप' लिहिलेली लाल परी. ८५-८६ नंतर बहुदा लक्झरी बसेस आल्यावर त्या बंद झाल्या.
27 Nov 2021 - 1:23 pm | चौथा कोनाडा
लिमलेट्च्या गोळ्या सुद्धा. पोरांना त्या लिमलेट्च्या गोळ्या आग्रहाने खाऊ घालायचे. मस्त लिंबाची गोडीली चव प्रवासात जीभेवर तरंगत रहायची.
आजकाल लिमलेटची गोळी दिसली तरी लालपरीत बसल्याचा फील येतो !
26 Nov 2021 - 9:52 pm | पाषाणभेद
एसटी आयुष्यातील वीक पॉईंट आहे.
संपामुळे एसटीची मोडतोड झाली तर आपण एका दुखर्या सुखाला (!?!?) पोरके होऊ.
27 Nov 2021 - 3:29 pm | अभिजीत अवलिया
धाग्याच्या शीर्षकावरून रम्य आठवणी लिहिणे अपेक्षित आहे पण माझ्या आठवणी काही तितक्या रम्य नाहीत. :)
लहानपणी गावावरून (कणकवलीहून) आजोळी कराडला जाणे म्हणजे एकमेव पर्याय होता लालपरीचा. एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या की दोन दिवसांनी आजोबा न्यायला यायचे. सकाळी ६ ची मालवण-सांगली एसटी पकडायची म्हणजे पकडायचीच. त्यासाठी सकाळी ४:३० ला उठून तयारी सुरु. जरा उशिराच्या एसटी ने जात जाऊ ही विनंती 'पुढच्या वेळी बघू 'असे सांगून फेटाळण्यात येत असे. ती पुढची वेळ कधी आलीच नाही.
लहानपणी लालपरीचा प्रवास अजिबात आवडत नसे. आजही करायची वेळ आली तर आवडणार नाही. कारण मला निश्चित बस 'लागायची'. (नंतर अंदाजे १० वी नंतर बस प्रवासाचा त्रास होणे बंद झाले). लालपरीमध्ये येणारा तो वास कधीच सहन होत नसे. त्यात भर घालायला तो खिडक्यांचा आवाज, प्रचंड गलिच्छ बस स्थानके आणि सुलभ शौचालये. कणकवलीला बसमध्ये बसले की माझा उत्साह २० किमीवर असलेले फोंडाघाट येईपर्यंतच. एकदा घाट सुरु झाला की डोके गरगरलेच समजा. राधानगरी येईपर्यंत एकदातरी उलटी होणार हे १००%. कोल्हापूर नजरेत येईपर्यंत 'आज काय आपण जगत नाही' ह्या गर्भगळीत अवस्थेत पोचलेलो असायचो. कोल्हापूरहून दुपारी १ ची कोल्हापूर-कोरेगाव लालपरी पकडून ५:३० च्या दरम्यान आजोळच्या गावी उतरायचे. जनता बस असल्याने ही गाडी जवळपास प्रत्येक स्टॉपला थांबायची. एकदा गाव आले की जीव भांड्यात पडायचा. त्यावेळी एशियाड बस म्हणजे एकदम रॉयल वाटायच्या. 'आपण एशियाडने जात जाऊया म्हणजे मला उलटी होणार नाही.' ही विनंती तिकीट दर जास्त असल्याने कधीच पूर्ण केली गेली नाही. माझ्या एकट्याच्या उलटीपायी सगळ्यांनी एशियाडला जास्त पैसे देण्यापेक्षा ५० पैशाची पिशवी घेणे कम खर्चिक :)
जसे पायी जाणारा सायकलची स्वप्ने बघतो, सायकलवरून जाणारा मोटारसायकलची स्वप्ने बघतो तसे 'आपण मोठे झाल्यावर फक्त आणि फक्त एशियाडनेच प्रवास करायचा' हे लहानपणीचे स्वप्न होते. २००८ साली नोकरीला लागल्यानंतर लालपरीच्या ऐवजी एशियाडने प्रवास करण्यास सुरवात केली. नंतर थोडीफार आर्थिक प्रगती झाल्यावर पुणे-गोवा रूटवर चालणार्या खाजगी अथवा कदंबा महामंडळाच्या वोल्वो गाडयांना प्राधान्य दिले. मुंबईला जायचे असल्यास शिवनेरी. आणि २०११ साली कार घेतल्यापासून तर एस.टी वर फुलीच मारली होती ते अलीकडच्या ऑक्टोबर पर्यंत. हल्लीच काही कारणास्तव २ महिने कार पुण्यात होती आणि ती परत आणायला कराडवरून पुण्याला जावे लागले. त्यावेळी काही आगारात संप चालू झाला होता आणि त्यामुळे एस टी. बराच वेळ येतच न्हवती. शेवटी खूप वेळाने एक लालपरी आली आणि पुणे पोचलो. खूप वर्षांनी लालपरीमध्ये बसलो आणि खूप वर्षांनी साताऱ्याचे बस स्थानक पण बघितले आणि इतक्या वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत किमान साताऱ्यात काहीच बदलले नाही हे पण जाणवले.
लालपरीच्या कितीही चांगल्या वाईट आठवणी असल्या तरी आता जुन्या गोष्टींत न रमता व भविष्याकडे व प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे लक्ष ठेवून लालपरीच्या जागी एशियाड हे बेअर मिनिमम स्टँडर्ड्सचे वाहन एस.टी ने वापरावे व लालपरीला रिटायर करावे हे माझे ठाम मत आहे.
29 Nov 2021 - 4:18 am | चौकस२१२
"आठवणी काही तितक्या रम्य नाहीत" सहमत... हा हि अनुभव महत्वाचा आहे ...
28 Nov 2021 - 8:06 am | चलत मुसाफिर
अनेक वर्षांपूर्वी मी केलेला सलग दोन दिवसांचा एस टी प्रवास
https://chalatmusafir.wordpress.com/2010/01/28/back-to-the-roots-with-ms...
29 Nov 2021 - 12:52 pm | चौथा कोनाडा
लेख छान दिसतोय. मराठीत वाचायला आवडेल.
वेगळा धागा काढावा ही विनंती.
8 Dec 2021 - 7:52 pm | सिरुसेरि
या लेखामुळे लाल परीच्या ( एस टी बस) च्या अनेक आठवणी वाचायला मिळाल्या .
अशीच एक लक्षात राहिलेली छोटी आठवण -- https://misalpav.com/node/32435
10 Dec 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा
मस्तच !
9 Dec 2021 - 8:02 pm | सुबोध खरे
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत.
काही कडू बऱ्याचशा गोड कारण या लहानपणच्या आठवणी आहेत
एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी चा प्रवास अतिशय सुरक्षित असे/ आहे. पूर्वी गाड्या फार वेळेस बंद पडत. (१९७० च्या आसपास). असे झाल्यास मागून येणाऱ्या एस टी मधून तुम्हाला पुढे नेले जात असे. रात्री बेरात्री सुद्धा एस टी स्टॅन्ड हि सुरक्षित जागा असे.
माझ्या आठवणीतील सुरुवातीचे प्रवास हे उन्हाळ्याच्या सुटीत आईच्या गावाला ( अलिबाग जवळील नागाव येथे) जात असू. सकाळी सात वाजताची ठाणे अलिबाग एस टी चे आरक्षण केलेले असायचे. पनवेल पेण वडखळ असे थांबत हि एस टी ९.३०- १० च्या आसपास अलिबाग ला पोचत असे. कार्ले खिंडीत एस टी लागू नये म्हणून आई आवळा सुपारी किंवा एक्सट्रा स्ट्रॉंग ची गोळी देत असे. जर पुढच्या एसटी ला वेळ असला तर आम्ही अलिबाग स्टॅन्ड वर असलेल्या नवनाथ (किंवा कानिफनाथ) रसवंती गृहात आले आणि लिंबू लावलेला उसाचा रस पीत असू. त्याच्या चरकाला लावलेल्या घुंगराचा आवाज हा सर्व एसटी स्टॅन्ड वर सारखाच येत असे. सुरुवातीला एक माणूस मोठ्या हॅन्डल लावलेल्या तर्फेने तो चरक चालवत असे. नंतर पुढे तेथे इलेक्ट्रिक ची मोटार आली.
मग तेथून अलिबाग रेवदंडा एस टी पकडून नागावला पोचत असू. हि एस टी आली कि आम्ही घाईघाईने त्यात चढून ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या उलट्या सीटवर डावीकडे लहान मुले गुढघे टेकून पुढे पाहत असू. नागावला पोचल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी परतीचे आरक्षण करायला नागावच्याच पोस्ट ऑफिसात जात असू.
यानंतर थोडे मोठे झाल्यावर आमच्या वडिलांचे गाव चिपळूण जवळ परशुराम येथे जाण्यासाठी पहाटे पाच ची ठाणे चिपळूण एस टी चे आरक्षण करत असू. या बसेस ठाणे आगारातून सुटत असल्यामुळे नेहमी स्वच्छ असत आणि एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे जेवणाच्या वेळे पर्यंत श्री क्षेत्र परशुराम ला पोचत असू.
लहानपणी केलेल्या असंख्य गाड्यांची आठवण आजही ताजी आहे. उदा मुंबई चिवेली, मुंबई गुहागर, मुंबई चिपळूण, ठाणे चिपळूण, हि एसटी पुढे चिपळूणच्या आमदारांनी आपले गाव तिवरे पर्यंत वाढवली त्यामुळे ती ठाणे तिवरे झाली त्याचा आम्हाला तोटा असा झाला कि परशुरामला बसायची सुविधा काढून घेतली गेली आणि आम्हाला ठाण्याला येण्यासाठी चिपळूण ला जाणे भाग पडले. त्यानंतर आम्ही परत येताना चिपळूण मुंबई चे आरक्षण करत असू आणि चेंबूर मैत्री पार्क किंवा मानखुर्दला उतरून बसने घरी येत असू.
पूर्वी कोकणातील गाड्या या शेवटून दुसऱ्या स्थानकापर्यंत जलद जात असत म्हणजे मध्ये थांबत नसत फक्त शेवटून दुसऱ्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंतच्या सर्व खेड्यात थांबत असत. म्हणजे मुंबई चिपळूण हि एस टी खेड पर्यंत जलद किंवा गुहागर मुंबई एस टी चिपळूण पासून जलद किंवा राजापूर मुंबई एस टी लांज्यापासून जलद असे. यात राजापूर ते लांजा किंवा गुहागर ते चिपळूण मधल्या खेड्याना आरक्षण आणि तेथे चढण्याची किंवा उतरण्याची सुविधा दिली जात असे.
मुंबईला जाणारी/ येणारी गाडी प्रतिष्ठेची असे आणि या गाड्या नवीन असत (कारण मध्ये कुठे बंद पडू नये यासाठी) आणि अनुभवी ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावर असत. बाकी जवळच्या अंतरासाठी असणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळेस जुन्या डबडा झालेल्या असत.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात गाड्या लेलँड कमानीच्या चित्ता किंवा अशोक व्हायकिंग मॉडेल च्या असत आणि देशावर ( पुणे औरंगाबाद इ ) च्या गाड्या टाटाच्या असत
या चिपळूण ठाणे प्रवासाच्या शेवटाची एक आठवण मी https://www.misalpav.com/node/28078 येथे लिहिलेली आहे.