लसान्या - दिवाळी फराळात बदल.

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
8 Nov 2021 - 7:34 pm

फोटो १

फोटो २

[[साइटवरचे लसान्या पाकृचे किंवा उल्लेख आलेले अगोदरचे धागे

Veg Lasagna /Lasagne |

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ५-रोम |

काँबीनात्सिऑन | ]]

हल्ली हे लसान्या ( lasagna) वगैरे इतालिअन पदार्थ लोकप्रिय होत आहेत. थोड्याच वर्षांत समारंभाच्या जेवणातही येतील.
'Easy lasagna recipe' search केल्यास बरीच माहिती मिळते.

तर पाककृती थोडक्यात -

१) टोमाटो,लसुण,कांदा हे मिक्सरमध्ये वाटून नंतर तेलावर थोडा परतून सॉस करणे.
२) तीन रंगांच्या भोपळी मिरचा,मशरुम(असल्यास) चिरून ठेवणे. त्यात उकडलेले मक्याचे दाणे मिसळून थोडेसे परतून ठेवणे.

क्रमांक (१) आणि (२) चार पाच तास अगोदर तयार करून ठेवता येतात.

३)व्हाईट सॉस तयार करणे.

४) पावाच्या स्लाईसेस कडा कापून लाटून घेणे.
बाजारात ज्या तयार लसान्या पट्ट्या मिळतात त्याऐवजी पाव वापरला.
क्रमांक (३) आणि (४) आयत्या वेळी करायचे.

एका मोठ्या पातेल्यात तळाला एक इंच वाळूचा थर घालायचा आणि रिंग ठेवून त्यावर गोल भांडे अथवा चौकोनी ट्रे ठेवल्यावर तो खालच्या वाळूला टेकायला नको. वाळू घालून मोठे पातेले तापवायला ठेवायचे. तोपर्यंत लसान्या भरायला घेणे.
फोटो ३
अवन साहित्य

छोट्या भांड्यात ( अथवा ट्रेमध्ये) तळाला थोडा टोमाटो सॉस पसरून त्यावर ब्रेड स्लाईस ठेवणे.त्यावर भाज्या, व्हाईट सॉस, चीजचे थर मग परत एक स्लाईस,परत थर आणि वर एक स्लाईस आणि चीज पसरायचे. गोल भांड्यात चार रकाने किंवा ट्रेमध्ये दोन बसतात.

इकडे तापलेल्या वाळूचा हाताने धग पाहून लसान्या आत रिंगवर ठेवून पातेले वरतून झाकायचे. मध्यम उष्णता ठेवून वीस मिनिटांत वरचे चीज वितळले की ग्यास बंद करून लसान्या काढून घेणे.

बिना लसान्या पट्ट्या आणि अवनचा पदार्थ तयार.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 7:56 pm | मुक्त विहारि

पुढच्या वेळी केलात की खायला बोलवा

कंजूस's picture

8 Nov 2021 - 7:59 pm | कंजूस

बोलावतो.

भारी आणि नाविन्यपूर्ण पाककृती.
मात्र लसान्या जर म्हणायचे असेल तर पास्ता शीट्स तर अत्यावश्यकच. त्या दृष्टीने ह्याला लसान्या म्हणता येणार नाही मात्र तुम्ही केलेले हे व्हर्जनसुद्धा मस्तच आणि चवीला भारीच लागत असेल यात शंकाच नाही.

मदनबाण's picture

11 Nov 2021 - 8:07 pm | मदनबाण

वेगळाच पदार्थ !

मदनबाण.....

नचिकेत जवखेडकर's picture

15 Nov 2021 - 12:02 pm | नचिकेत जवखेडकर

फोटो दिसत नाहीयेत पण छानच झालं असेल. माझी पत्नी याच्यात रताळ्याचे काप घालते. पास्ता शीट्स ऐवजी. एकदा चिकन घालून करून बघायचा आहे.

कंजूस's picture

16 Nov 2021 - 10:19 am | कंजूस

फोटो १

फोटो २

घरगुती ओव्हन कसा बनवावा यावर जरा आकृती काढून किंवा फोटू काढून लिहा म्हणजे असल्या पाकक्रिया टाकता येतील ( फोटू टाकलाय त्यातून नक्की बोध होत नाही )
६ बाजूने उष्णता लागणे जरुरी असते ...
या पाकक्रियेत पावाऐवजी चक्क मैदा/ कणिक पोळी तयार करून नाही का वपरता येणार, कारण ते मूळ इटालियन पाककृतीचं जास्त जवळचे होईल

कंजूस's picture

16 Nov 2021 - 2:31 pm | कंजूस

फोटो.

अवन म्हणजे की एका बंद ठिकाणी उष्णता धरून राहायला पाहिजे. त्यात पदार्थ ठेवला की पदार्थाचे वाढते आणि भट्टीचे कमी होते. नंतर एक ठराविक तापमान म्हणजे साधारणपणे १८० डिग्री ठेवले वीस मिनिटे की पदार्थ त्यातल्याच पाण्याने शिजतो. नंतर पाणी आटल्यावर भाजून जळू लागतो तेव्हा बाहेर काढला पाहिजे. हात वरती धरून धग किती आहे हा अंदाज येतो.
आंघोळीचे पाणी - 60 अंश
उकळते पाणी - 100
पोळी भाजतो - 150
तेलात तळणे -180
केक भाजणे - 180
शेंगदाणे भाजणे - 220
पदार्थ जळणे - 250 च्यापेक्षा अधिक 300- 350.

इथे मोठ्या पातेल्यात खाली वाळू घालून वर झाकण ठेवून तापवून घ्यायचे. यावेळी Gas मोठा ठेवला तरी चालतो. मग पदार्थ त्या लहान भांड्यात घालून ते आतमध्ये वाळूवर ठेवायचे. एका तिवई/जाळीवर असे ठेवायचे की तळ वाळूला टेकायला नको. मग Gas मध्यम किंवा बारीक ठेवायचा . पंधरा मिनिटांनी आणि नंतर पाच पाच मिनिटांनी केक,पाव वगैरे कच्चा आहे का शिजला हे तपासायचे. दोन तीन प्रयोगांत हे अवन प्रकरण यशस्वी होते.

आपली गरज असेल तसे मोठे पातेले घेतले की काम होते. घरगुती वापरासाठी एवढे पुरेसे आहे.

इतालिअन पदार्थांत चीज वितळले की पदार्थ तयार झाला. प्रथम रवा,मैदा,पीठ यातले पाणी आटते. त्यानंतर तापमान शंभरच्यावर जाऊ लागते. मग चीज वितळते.

दोन चार ट्रायल करावी मग सेट होते. समजा दुप्पट प्रमाणात पदार्थ हवा आहे तर ते सर्व दुप्पट घेऊन केल्यास फसणार. कारण भांडे, त्यातला पदार्थ आणि बाहेरचे अवन म्हणून वापरायचे भांडे हे दुप्पट होत नाही. त्या वेळी दोन batch काढाव्या.

चौकस२१२'s picture

17 Nov 2021 - 4:26 am | चौकस२१२

धन्यवाद .. ज्यांचं कडे ओव्हन नाहीये त्यांना हि माहिती उपयोगी पडेल आणि ते केक व्यतिरिक्त अश्या पाकक्रिया करतील अशी आशा करूयात !
असो

"पाच पाच मिनिटांनी केक,पाव वगैरे कच्चा आहे का शिजला हे तपासायचे. "

असे साधारण करू नये असा माझा अनुभव आहे कारण त्याने आत साचलेली उष्णता निघून जायची शक्यता असते आणि पदार्थ जो फुगत असतो तो एकदम खाली बसायची शक्यता असते ! .. आणि खास करून घरगुती ओव्हन मध्ये अशी शक्यता जास्त.. फॅन फोर्स ओव्हन असेल तर पटकन उष्णता वाढविता येते

इलेक्ट्रीकवाला ठराविक आकारात असतो. त्याप्रमाणे भांडी घ्यावी लागतात. पदार्थ फुगून खाली हीटर कॉईलवर सांडला तर कटकट. सेटिंग्ज हा एक उपयुक्त भाग.
घरगुतीमध्ये लहानमोठा करणे फक्त पातेले बदलले की झाले. तापमानासाठी एक दोन ट्रायल करावी लागतात.

चित्र काढण्याऐवजी विडिओ करून पाहतो.

इलेक्ट्रीकवाला ठराविक आकारात असतो?
आपण बहुतेक वेगवेगळ्या देशातील ओव्हन बद्दल बोलत आहोत
मी मोठ्या इलेकट्रीक किंवा गॅस वाल्या ओव्हन ( भारतात प्रचलित असलेलय बेंच टॉप वाला नाही तर पूर्ण उंचीचा भीतीत बसवेल किंवा बेंच टॉप खालील जो सर्रास बाहेरील देशात वापरता ) त्याबद्दल बोलत होतो
इलेकट्रीक वाल्या मध्ये खाली कोईल नसते आजकाल

कंजूस's picture

17 Nov 2021 - 12:27 pm | कंजूस

आकारात म्हणजे छोटा,मध्यम,मोठा असं असेल ना.
पण ती वस्तू नसेल किंवा खूप वापर.होणार नाही म्हणून कुणी घेणार नसले तर हा साधा पर्याय. पण घेतला तर कुठे तरी मांडून ठेवायला हवा आणि जवळच पंधरा अंपिअरचा इलेक्ट्रिक वॉल सॉकेट लागेल.

धन्यवाद.