काँबीनात्सिऑन

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
16 Apr 2008 - 7:01 pm

काँबीनात्सिऑन म्हणजे काँबीनेशन.जर्मन मंडळी सोप्या शब्दाला कठीण करतात नाही?
पण हा पदार्थ आहे इटालियन,पास्त्यांच्या वेगवेगळे प्रकार एकत्र मिसळून केलेले हे काँबीनेशनअसल्याने दिनेश ह्या प्रकाराला 'बहुच्या देशातील मिसळ' म्हणतो.अर्थात आपल्या मर्‍हाटमोळ्या मिसळीसारखा झणझणीत हा पदार्थ नव्हेच,पण तरीही एका वेगळ्या चवीचा रुचकर पदार्थ चीजप्रेमींसाठी !
वि.सू.-कॅलरीबिलरींचा विचार न करता खायचा हा पदार्थ आहे.
साहित्य-
पाऊण वाटी चपटा पास्ता,पाऊण वाटी नळकांड्यांच्या आकाराचा पास्ता
४०,५० स्पॅगेटी काड्या,१ छोटा खोका २०० ग्रामचा अनव्हिप्ड क्रीम(श्लागझानं),पाव कप दूध
२५०ग्रामचा पिझ्झा टोमॅटोचा डबा किंवा ४,५ टोमॅटो उकडून,साल काढून,कुस्करुन.पण प्युरी करु नका.
१ते १.५ मोठी वाटी भरून किसलेले चीज(शक्यतो गौडाचीज),मीठ,तेल
कृती-
बाजारात बर्‍याच प्रकारच्या स्पॅगेटी व पास्ता मिळतात त्यातील चपटा,नळकांड्याच्या आकाराचा,सर्पिल(twisted) इ.पैकी कोणतेही २ प्रकार निवडा.पातळ काड्यांची स्पॅगेटी घ्या. पास्ताप्रकार वेगवेगळे शिजवून घ्या, स्पॅगेटीही वेगळी शिजवून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा,त्यात १ चमचा मीठ व १ चमचा तेल घाला व एक प्रकारचा पास्ता घाला आणि शिजवा.शिजल्यावर चाळणीवर घालून पाणी पूर्ण निथळू द्या.दुसरा पास्ता शिजला की पहिला प्रकार चाळणीतून ताटलीत काढा,म्हणजे तेवढ्या वेळात पाणी पूर्णपणे निथळेल.याच प्रकारे स्पॅगेटीही शिजवा.

दोन बेकिंग डिश मध्ये(लहान,साधारण ६'' ची)थोडे दूध घाला,त्यावर अनव्हिप्ड क्रीम घाला,थोडे टोमॅटो घाला.मीठ टोमॅटोमध्ये मिसळून घ्या म्हणजे सगळीकडे चांगले लागेल. त्यावर हे शिजवलेले पास्ताप्रकार पसरा.

पुन्हा टोमॅटो व क्रीम घाला.किसलेले चीज घालून पूर्ण डिश झाका.ओळखीचा भारतीय स्वाद हवा असेल तर आलेलसूण मिरचीचे वाटण टोमॅटोत मिसळा.१८० ते २०० अंश सेंटिग्रेडवर २५ ते ३० मिनिटे बेक करा.

गोल्डन ब्राऊन काँबीनात्सिऑन खाण्यासाठी तयार!

त्याच बेकिंग डिशमधून गरमगरम खा.हवे असल्यास वरून मीठ व मिरपूड घाला.
बेकिंग डिश मधून ताटलीत/वाडग्यात वाढणे जिकिरीचे होते म्हणून लहान बेकिंग डिश वापरा.त्याच बेकिंग डिशमधून खाणे सोयीचे होते.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

सहज's picture

16 Apr 2008 - 7:20 pm | सहज

स्वाती सान
बनवी छान
काँबीनात्सिऑन

मस्तच दिसतोय. दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना? जोडीला एक चील्ड वन!!

स्वाती दिनेश's picture

16 Apr 2008 - 7:37 pm | स्वाती दिनेश

दोन तीन वेगळ्या प्रकारचे चीज घातले तर चालेल ना?
चालेल ना,गौडा,एमेंटालर,आपेन्त्झेलर,चेडर असे चीजचे काँबीनात्सिऑन केले तरी चालेल.
जोडीला एक चील्ड वन!!
'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल.
एकूण काय सगळा काँबो मेन्यु!
:-)
स्वाती

एकंदरित लागणार्‍या सगळे रॉ मटेरिअल व आवश्यक असलेला पेशन्स आमच्याकडे नसल्याने माझ्यासारख्या "हौशी शेफ " हे जमणे कठिण आहे.
पण फोटॉ बघून मस्त वाटले.... काहितरी भारी चीज आहे.

बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले.
हा हा हा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2008 - 12:26 am | स्वाती दिनेश

बाकी तुमच्या देशी आल्यावर आम्हाला "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन " खिलवा म्हणजे झाले.
या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-)
स्वाती

छोटा डॉन's picture

17 Apr 2008 - 10:13 pm | छोटा डॉन

"या तर .. आलात की हवे ते खिलवू,पिलवू.:-)"
वा, तुम्ही असे म्हणालात, आनंद वाटला.
आत्ताच "'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन "खाल्ल्याचे सुख मिळाले.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

16 Apr 2008 - 8:32 pm | विजुभाऊ

'चील्ड वन' मध्ये पण राडलर म्हणजेच बीअर+स्प्राईट चे काँबीनात्सिऑन चालेल.
एकूण काय सगळा काँबो मेन्यु!

:-) ग्रेट्च

वरदा's picture

16 Apr 2008 - 10:15 pm | वरदा

पाहिला मगाशी पण आरामात वाचला नव्हता....ह्यात बाकीच्या भाज्या पण मिक्स केल्या तर? आणि फॅट फ्री चिझ वापरु का म्हणजे जराशा कॅलरीज कमी जातील्...मी हे सगळे पास्ता वेगवेगळे बनवते आता एकत्र करुन पाहेन्..गौडा चीझ नाही खाल्लं नेहेमी चेडार आणलं जातं आता ते आणून आहाते...सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू? साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस?

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2008 - 11:08 am | स्वाती दिनेश

सगळे पास्ता चे प्रकार एकढ्याच वेळ बेक करतेस का तू?
सगळे पास्ताचे प्रकार बेक नाही करत. ज्यांच्यावर चीज घालून खायचे आहे असेच पास्ता बेक करते.उदा- लसानिया,काँबीनात्सिऑन. बाकी चे पास्ता पॅनवर टॉस करते.
साधा मरायनरा घालून स्पघेटी केली तर किती वेळ बेक करतेस?
मरायनरा घालून स्पॅगेटी केली तर बेक नाही करत. स्पॅगेटी शिजवून घेते,मरायनरा सॉस,थोडे व्हाईट सॉस घालते,मीठ,मिरपूड इ.घालते आणि पॅनवर टॉस करते.
स्वाती

नंदन's picture

16 Apr 2008 - 11:24 pm | नंदन

पाककृती आणि फोटो छानच. ह्याला लसान्याचा धाकटा चुलतभाऊ म्हणता येईल :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

16 Apr 2008 - 11:51 pm | चित्रा

पाककृती, आणि फोटोही छानच.

तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले!

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2008 - 12:27 am | स्वाती दिनेश

चित्रा,मस्त!

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2008 - 12:20 am | भडकमकर मास्तर

छान डिश
तिथल्या बायका आपण शिळा भात उरला की जशी त्याला कांदा वगैरे घालून फोडणी घालतो तसे रोज केलेला थोडा थोडा प्रत्येक पद्धतीचा पास्ता उरल्यावर त्यावर आहे नाही त्या वस्तू घालून "काँबीनात्सिऑन" करत असाव्यात असे वाटले!
आणि हे अर्थघटन तर फ़ारच आवडले...

स्वाती राजेश's picture

17 Apr 2008 - 1:08 am | स्वाती राजेश

वरच्या प्रतिक्रियेप्रमाणे हा लसाने चा भाऊ वाटतो, पण छान आहे.
फोटो सुंदर आला, विशेषता चीजला गोल्डन ब्राऊन रंग आला कि सुंदर दिसते, चवीला लागते पण छान.......

मैत्र's picture

17 Apr 2008 - 9:32 pm | मैत्र

याचा मोठा भाऊ लसान्याची पण कृती कोणी सांगेल काय... बाहेर फार छान मिळतो हॉटेल मध्ये किंवा ऑफिस कॅन्टीन मध्ये...

ऋषिकेश's picture

17 Apr 2008 - 10:33 pm | ऋषिकेश

तोंडाला पाणी सुटले. कष्टाचं "चिझ" करणारा हा पदार्थ भारतात कधी आणि कुठे मिळतोय याची वाट पाहतोय

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा's picture

17 Apr 2008 - 10:44 pm | वरदा

कुठे आहात भारतात? ठाण्यात इटालियन फूडचं सगळं सामान मिळतं आणि अगदी इथले ब्रँड्स मिळतात. घरी बनवून पाहू शकता.

स्नेहश्री's picture

10 Aug 2008 - 8:47 pm | स्नेहश्री

पुण्र पत्ता दे ना प्लीज.........
दुकानाच नाव...अथवा जवळची खुण.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

वरदा's picture

17 Apr 2008 - 10:46 pm | वरदा

लसाने ची क्रुती दुसर्‍या स्वाती ने दिलेय पहा

विसोबा खेचर's picture

18 Apr 2008 - 2:54 pm | विसोबा खेचर

स्वाती,

तू दिलेला हा प्रकार मी एकदा फोर्टातल्या एका हाटेलात खाल्ल्याचं पुसटसं आठवतंय! तेव्हा एवढा आवडला नव्हता..

तात्या.

केशवसुमार's picture

10 Aug 2008 - 1:14 pm | केशवसुमार

तात्या..
तुम्ही चुकीच्या ठिकाणी खालात...
कालच मी तो प्रत्यक्ष स्वाती आणि दिनेश यांनी बनवलेला खल्ला... टूक टूक... :P
एकदम अफलातून.. आणि नंतर वॉलनट आईस्क्रिम... पुन्हा टूक टूक... :P
(स्वातीदिनेश च्या हातच्या काँबीनात्सिऑन खाल्लेला)केशवसुमार
दिनेश ने याचे नाव इटालियन भेळ असं ठेवलय..काँबीनात्सिऑन किती आवघड आहे.. काय खाल्ले हे सांगणे..इथे लिहिताना कॉपी पेस्ट आहे म्हणून बर!!

लिखाळ's picture

12 Aug 2008 - 8:12 pm | लिखाळ

हे टूकटूक जरा जास्तच झोंबलं :(
-- लिखाळ.
केसु ष्टाईल स्वगत : आता स्वातीताईला इकडे येताना काय काय बनवून आणायला सागावे ?! तवसाळं आणी काँबि... तर नक्कीच !!

विसोबा खेचर's picture

14 Aug 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

कालच मी तो प्रत्यक्ष स्वाती आणि दिनेश यांनी बनवलेला खल्ला... टूक टूक...

:)

वरदा's picture

18 Apr 2008 - 5:49 pm | वरदा

तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं....

विसोबा खेचर's picture

19 Apr 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

काही कल्पना नाही बॉ!

खाण्याच्या आणि गाण्याच्या बाबतीत मी पक्का देसी माणूस आहे. मला विदेशी खाण्याचं मुळीच कौतुक नाही. मुंबई आणि दिल्लीच्या काही हाटेलात मी काही इटालियन, मेक्सिकन आदी विदेशी खाद्यप्रकार चाखून पाहिले आहेत, परंतु ते मला मुळीच आवडले नाहीत. भारत-पाकिस्तानाइतकं इतकं चविष्ट आणि जायकेदार जेवण कुठेही मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे!

अगं वरदा, आमच्या जाफरभाईच्या किंवा लखनवी हनीफभीईच्या बिर्याणीपुढे, समर्थ भोजनालयातील माशाच्या आमटीपुढे, इंदौर उज्जैनच्या आटीव दूध, जिलेबी, रबडीपुढे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिळणार्‍या मिसळ, साबुदाणा खिचडी आदी अल्पोपहाराच्या खाद्यपदार्थापुढे, तुमचे ते इटालियन आणि मेक्सिकन पदार्थ अगदीच बेचव अन् फिके लागतात असंही माझ व्यक्तिगत मत आहे!

तेव्हा,

तुम्हाला माहितेय का ठाण्यातलं दुकान जिथे इटालियन, मेक्सिकन सगळे पदार्थ बनवण्याचं सामान मिळतं? पाच्पाखाडीत आहे आणि तीन हात नाक्याला जाताना लागतं....

हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;)

असो, बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;)

आपला,
(देसी दुधा-तुपातला)!) तात्या.

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2008 - 5:28 pm | स्वाती दिनेश

बाकी पसंद अपनी अपनी हेही शेवटी खरंच! त्यामुळे इटालियन, मेक्सिकन आणि कुठले कुठले खाद्यपदार्थ काही मंडळींना आवडतात, त्यांच्या आवडीचाही मी आदरच करतो..!;)
खरं आहे तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो.
तसेच आशियामधील सुध्दा चायनीज पदार्थातील सोया सॉस.तोफूचे थायी,चिनी,जपानी,कोरियन इ. पदार्थ ह्यांच्याशी जिभेला रुळवून घ्यायलाही वेळ लागतो.पण एकदा ही टेस्ट डेवलप झाली की त्यांचीही मजा घेता येते.
सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद,
स्वाती

मदनबाण's picture

19 Apr 2008 - 5:54 pm | मदनबाण

आपला लेख खरेच फार सुंदर आहे !!!!!

तात्या,इटालियन आणि एकूणच युरोपिय पदार्थ कमी मसालेदार असतात, फ्लॅट असतात.त्यामुळे जिभेला त्यांची सवय व्हायला जरा वेळ लागतो.
हे मात्र खरे आहे.....मी युरोपात असताना माझी झालेली हालत आठवते,,,,,
चा मारी इथे घरी असताना आई जेव्हा उपमा किंवा पोहे करायची ते मी कधी सरळ खात नसे.....तिथे गेल्यावर मात्र माझी सगळी मस्ती जिरली.
भारतीय खाण्याला जगात तोड नाही.
केळीच्या पानावर जेव्यण्याची मजा काही औरच.....पंगतीत बसुन जेवण्याची जी मजा आहे ती टेबलावर बसुन जेवण्यात नहीच.
जेवण बनवण्याची आपली संस्कृति आहे.....

(रबडी आणि खर्वस प्रेमी.....)
मदनबाण

वरदा's picture

21 Apr 2008 - 9:23 pm | वरदा

हे तू विचारते आहेस हे ठीकच आहे, परंतु एकतर मला ठाण्यात हे सामान कुठे मिळतं ते ठाऊक नाही आणि माझी देसी खवैय्येगिरी अबाधित राहून अशी दुकानं शोधण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं वाटतं! ;)


अहो तुम्हाला असच चमचमीत जेवण मिळत राहो आणि दुकान शोधायला न लागो...कधी कधी कुणीतरी सांगतं, किंवा कुणाच्यातरी बरोबर जाणं होतं आणि माहित होतं म्हणून विचारलं....आणि भारतीय खाणं म्हणाल तर आम्हालाही आवडतं अगदी साधा वरण भात खाण्यातही खूप समाधान आहे ह्यात वादच नाही पण कधीतरी चें ज म्हणून हेही खायला मजा येते. आणि भारतात जे मेक्सिकन इटालियन तयात मिळतं ना ते खरं ऑथेंटीक नसतं म्हणूनही तुम्हाला ते आवडलं नसेल, इथे खाऊन पाहिलत तर आवडेलही कदाचित्....बरं असो आता नाहि विचारणार....

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर

आजच करणार होतो पण....

(लहान,साधारण ६' ची)

सहा फुटांची लहान (?) डिश कुठेच मिळत नाहिए.

स्वाती दिनेश's picture

24 Apr 2008 - 8:27 pm | स्वाती दिनेश

६" हो... टंकमिष्टेक समजून घ्या.नंतर संपादन करता येत नाही आणि इतक्याजणांपैकी कोणाच्याच लक्षात आले नाही?:)त्यामुळे मी ही तसेच ठेवले,:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाककृती मस्त आहे ... आणि चीज घातल्यावर पास्ता काय भारी लागतो!
पण गौडाचीज म्हणजे gouda का? ते डच चीज का? ते असेल तर त्याचा उच्चार (खाकरल्यासारखा) खौडा असा काहीसा करतात ... त्यामुळे डोक्यात गोंधळ जाहला.

स्वाती दिनेश's picture

10 Aug 2008 - 6:19 pm | स्वाती दिनेश

तेच ते! आमच्याकडे जर्मनीत गौडाच म्हणतात.
अर्थात गौडा नसेल तर चेडर किवा एमेंटालरही घालू शकता.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 6:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही ना ... आता कुठे खौडा (/गौडा), छेडर आणि एमेंटाल ... टू लेट ... आमच्या भारतात हे असलं काहिही नाही ना मिळत! मिळतं ते अमूलचं प्लास्टीक चीज! :-(

स्वाती दिनेश's picture

10 Aug 2008 - 6:29 pm | स्वाती दिनेश

बिग बझार सारख्या मॉलमध्ये ह्यापैकी काही चीजे मिळतात. आणि नाहीच मिळाले तर अमूल प्लास्टीक चीज जिंदाबाद! ते ही चालेल कारण शेवटी बेकच तर करायचे आहे.
स्वाती

श्रीयुत संतोष जोशी's picture

10 Aug 2008 - 6:26 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
स्वाती ताई , मस्तच रेसिपी आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 10:42 pm | यशोधरा

स्वातीताई, मस्तच आहे गं रेसिपी!!

विश्वजीत's picture

14 Aug 2008 - 7:35 pm | विश्वजीत

यमी,
पुण्याला दोराबजीमधे बरीच 'चीजे' मिळतात ती पहावीत.