ही कविता मला एकाद्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटली. म्हणजे 'कळले' काहीच नाही, तरी काहीतरी भावले आणि आवडले.
नक्षत्र - पात्र - रात्र - पात्र - मंत्र ... असे यमक जुळून आल्याने निर्माण झालेला आकृतिबंध हाच या कवितेचा आत्मा म्हणावे काय ?
कवितेचा आशय काय आहे, हे उलगडून सांगितल्यास मजसारख्या अनभिज्ञाला मदत होईल.
साधारण ३ वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीबाहेरच्या रस्त्यावर अनेक धडपडणारे चित्रकार स्वत:ची चित्रे मांडून बसतात त्यातील एकाचे- साल्वादोर दाली (surrealist?) शैलीचे-चित्र बघताक्षणी भिडले होते. एका धूसर, काळपट, मनावर दडपण आणेल अशा अवकाशातल्या, एकमेकांशी सकृत् दर्शनी संबंध नसलेल्या चित्राकृतींचे (लाल पिवळ्या तार्यांनी गजबजलेले वितळते आकाश, ana-digi hour glass, सांडव्यावरून पाणी जाणारा धरणडोह, perpetual motion machine, अणुस्फोटानंतरचा मश्रूम ढग इ.) ते एक वेधक चित्रण होते.
त्या चित्राचा शब्दानुवाद करण्याचा ओबडधोबड प्रयत्न म्हणजे ही कविता(?).
चित्राच्या चौकटीच्या जागी कवितेत त्रान्त यमक आहे, मात्र त्याने निर्माण झालेला आकृतिबंध या शब्दानुवादाचा आत्मा अजिबात नाही.
रच्याकने, विविध चित्रशैलींबद्दल माझ्यासारख्या अनभिज्ञांना माहिती देणारे सुगम मराठी लेखन आपण वा इतर कोणी केले असल्यास कृपया तपशील द्यावे .
चित्रगुप्त काका आणि तुमचा संवाद वाचे पर्यंत "ही अपूर्ण कविता पूर्ण करा" असा काही चॅलेंज आहे का असे वाटत होते.
पण तो संवाद वाचून मनाचा अधिकच गोंधळ उडाला. त्यानंतर कविता साधारण आठ ते दहा वेळा वाचली. पण...
३डी सिनेमात कशी एखादी वस्तु आपल्या जवळ येते पण तिला हात लावता येत नाही. तशी काहीशी भावना कविता वाचताना झाली होती आणि संवाद वाचताना तर आपण ७डी सिनेमा मधल्या रोलर कोस्टर राईड मधे बसलो आहे असेच वाटत रहाते.
तिथे पण नाही का चश्मा काढला की आपल्याला बाकीचे प्रेक्षक सिनेमा एनजॉय करताना दिसतात आणि मग आपण पुन्हा ती राईड अनुभवण्यासाठी चश्मा लावतो.
सध्या तसाच मी सारखा चश्मा काढतो आहे आणि परत परत लावतो आहे.
आता संपूर्ण दिवस ते किनखापी आभाळ डोळ्यासमोरुन हटणार नाही.
चित्रगुप्त काकांच्या पोतडीत जर अशा प्रकारचे एखादे चित्र असेल तर ते त्यांनी दाखवावे. म्हणजे काही कल्पना करता येतिल.
रच्याकने :- मी ही कविता "हे भलते अवघड असते" च्या चालीवर गुणगुणतो आहे
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
..वाह रचना आवडली
भरजरीपणात साधं सुध नक्षत्र लपून राहते.पुढे प्रत्येक कडव्यात पहिल्यांदा वरवर सुंदरता आहे पण दुसऱ्या ओळीत साधेपणाच अस्तर भासतेय.
किनखापी शब्द मस्त :)
याच करता कवीने (किंवा लेखकाने) आपल्या कवितेचे (लेखाचे / गोष्टीचे) कधिही स्पष्टीकरण देउ नये. जे लिहिले आहे ते समजले तर ठिक, नाही समजले तरी ठिकच.
काही अंशी सहमत आहे. चित्रकलेच्या बाबतीत तर हे आणखीनच खरे आहे. परंतु माझ्याच बाबतीत घडलेले बघा: यंदाच्या दिवाळी अंकातील माझ्या लेखात दिलेले अंध मुलीचे चित्र गेल्या पंचावन वर्षांत मी आवडीने अनेकदा बघितले असूनही त्यातले बरेचसे बारकावे आपल्या लक्षात आलेले नव्हते, हे मला तेंव्हा कळले जेंव्हा मी लेख लिहीताना त्याविषयी पूर्ण महिती मिळावी म्हणून मुद्दाम हुडकून वाचन केले. त्यामुळे एकाद्या कलाकृतीविषयी खुद्द कलावंताने वा अन्य रसिकांनी, समिक्षकांनी काय म्हटले/लिहीले आहे हे जाणून घेण्यात काहीच गैर नाही. अर्थातच आपापले मत वेगळे असू शकते. हुसेन, पिकासो वा दा विंची बद्दल अमूक एका प्राख्यात व्यक्तीने सांगितलेले आपल्याला पटेलच असे नाही. तरी विचारांना चालना ही मिळतेच. असो.
प्रतिक्रिया
14 Nov 2021 - 2:17 am | चित्रगुप्त
ही कविता मला एकाद्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटली. म्हणजे 'कळले' काहीच नाही, तरी काहीतरी भावले आणि आवडले.
नक्षत्र - पात्र - रात्र - पात्र - मंत्र ... असे यमक जुळून आल्याने निर्माण झालेला आकृतिबंध हाच या कवितेचा आत्मा म्हणावे काय ?
कवितेचा आशय काय आहे, हे उलगडून सांगितल्यास मजसारख्या अनभिज्ञाला मदत होईल.
15 Nov 2021 - 8:35 am | प्राची अश्विनी
वाह!
बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात, नाहीतर इतक्या सुंदर अर्थाला मुकलो असतो.
14 Nov 2021 - 4:26 pm | अनन्त्_यात्री
साधारण ३ वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीबाहेरच्या रस्त्यावर अनेक धडपडणारे चित्रकार स्वत:ची चित्रे मांडून बसतात त्यातील एकाचे- साल्वादोर दाली (surrealist?) शैलीचे-चित्र बघताक्षणी भिडले होते. एका धूसर, काळपट, मनावर दडपण आणेल अशा अवकाशातल्या, एकमेकांशी सकृत् दर्शनी संबंध नसलेल्या चित्राकृतींचे (लाल पिवळ्या तार्यांनी गजबजलेले वितळते आकाश, ana-digi hour glass, सांडव्यावरून पाणी जाणारा धरणडोह, perpetual motion machine, अणुस्फोटानंतरचा मश्रूम ढग इ.) ते एक वेधक चित्रण होते.
त्या चित्राचा शब्दानुवाद करण्याचा ओबडधोबड प्रयत्न म्हणजे ही कविता(?).
चित्राच्या चौकटीच्या जागी कवितेत त्रान्त यमक आहे, मात्र त्याने निर्माण झालेला आकृतिबंध या शब्दानुवादाचा आत्मा अजिबात नाही.
रच्याकने, विविध चित्रशैलींबद्दल माझ्यासारख्या अनभिज्ञांना माहिती देणारे सुगम मराठी लेखन आपण वा इतर कोणी केले असल्यास कृपया तपशील द्यावे .
14 Nov 2021 - 6:28 pm | चित्रगुप्त
या प्रकारचे काही लेखन मिपावर मी केलेले आहे. यंदाच्या दिवाळीअंकातील माझ्या या लेखात त्यांचे दुवे दिलेले आहेत.
14 Nov 2021 - 6:41 pm | तुषार काळभोर
खरोखरच एक चित्र पाहून त्या प्रेरणेने तुम्ही या ओळी लिहिल्या आणि त्या ओळी वाचून दिग्गज चित्रकाराने चित्राची उपमा द्यावी..!
15 Nov 2021 - 8:36 am | प्राची अश्विनी
क्या बात!
14 Nov 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि
आवडले
14 Nov 2021 - 6:48 pm | तुषार काळभोर
किनखापी या शब्दाचा अर्थ काय आहे?
माझा अंदाज आहे जरीकाम, बुट्टी, कलाकुसर केलेले.
14 Nov 2021 - 7:07 pm | अनन्त्_यात्री
किन्खाप
(पु.) [फा. किन्खाब्] बहुरङ्गी ज़र्तारी कापड.
(फारसी-मराठी शब्दकोश)
15 Nov 2021 - 8:54 am | ज्ञानोबाचे पैजार
चित्रगुप्त काका आणि तुमचा संवाद वाचे पर्यंत "ही अपूर्ण कविता पूर्ण करा" असा काही चॅलेंज आहे का असे वाटत होते.
पण तो संवाद वाचून मनाचा अधिकच गोंधळ उडाला. त्यानंतर कविता साधारण आठ ते दहा वेळा वाचली. पण...
३डी सिनेमात कशी एखादी वस्तु आपल्या जवळ येते पण तिला हात लावता येत नाही. तशी काहीशी भावना कविता वाचताना झाली होती आणि संवाद वाचताना तर आपण ७डी सिनेमा मधल्या रोलर कोस्टर राईड मधे बसलो आहे असेच वाटत रहाते.
तिथे पण नाही का चश्मा काढला की आपल्याला बाकीचे प्रेक्षक सिनेमा एनजॉय करताना दिसतात आणि मग आपण पुन्हा ती राईड अनुभवण्यासाठी चश्मा लावतो.
सध्या तसाच मी सारखा चश्मा काढतो आहे आणि परत परत लावतो आहे.
आता संपूर्ण दिवस ते किनखापी आभाळ डोळ्यासमोरुन हटणार नाही.
चित्रगुप्त काकांच्या पोतडीत जर अशा प्रकारचे एखादे चित्र असेल तर ते त्यांनी दाखवावे. म्हणजे काही कल्पना करता येतिल.
रच्याकने :- मी ही कविता "हे भलते अवघड असते" च्या चालीवर गुणगुणतो आहे
पैजारबुवा,
15 Nov 2021 - 9:25 am | Bhakti
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
..वाह रचना आवडली
भरजरीपणात साधं सुध नक्षत्र लपून राहते.पुढे प्रत्येक कडव्यात पहिल्यांदा वरवर सुंदरता आहे पण दुसऱ्या ओळीत साधेपणाच अस्तर भासतेय.
किनखापी शब्द मस्त :)
15 Nov 2021 - 1:30 pm | अनन्त्_यात्री
I ask them to take a poem
and hold it up to the light
like a color slide
or press an ear against its hive.
I say drop a mouse into a poem
and watch him probe his way out,
or walk inside the poem's room
and feel the walls for a light switch.
I want them to waterski
across the surface of a poem
waving at the author's name on the shore.
But all they want to do
is tie the poem to a chair with rope
and torture a confession out of it.
They begin beating it with a hose
to find out what it really means.
—Billy Collins
15 Nov 2021 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
याच करता कवीने (किंवा लेखकाने) आपल्या कवितेचे (लेखाचे / गोष्टीचे) कधिही स्पष्टीकरण देउ नये. जे लिहिले आहे ते समजले तर ठिक, नाही समजले तरी ठिकच.
पैजारबुवा,
15 Nov 2021 - 5:06 pm | Bhakti
+१
15 Nov 2021 - 5:09 pm | चित्रगुप्त
काही अंशी सहमत आहे. चित्रकलेच्या बाबतीत तर हे आणखीनच खरे आहे. परंतु माझ्याच बाबतीत घडलेले बघा: यंदाच्या दिवाळी अंकातील माझ्या लेखात दिलेले अंध मुलीचे चित्र गेल्या पंचावन वर्षांत मी आवडीने अनेकदा बघितले असूनही त्यातले बरेचसे बारकावे आपल्या लक्षात आलेले नव्हते, हे मला तेंव्हा कळले जेंव्हा मी लेख लिहीताना त्याविषयी पूर्ण महिती मिळावी म्हणून मुद्दाम हुडकून वाचन केले. त्यामुळे एकाद्या कलाकृतीविषयी खुद्द कलावंताने वा अन्य रसिकांनी, समिक्षकांनी काय म्हटले/लिहीले आहे हे जाणून घेण्यात काहीच गैर नाही. अर्थातच आपापले मत वेगळे असू शकते. हुसेन, पिकासो वा दा विंची बद्दल अमूक एका प्राख्यात व्यक्तीने सांगितलेले आपल्याला पटेलच असे नाही. तरी विचारांना चालना ही मिळतेच. असो.
15 Nov 2021 - 4:45 pm | प्राची अश्विनी
वाह!