वर्णद्वेष/ वर्णभेद
अलक 1
ती अगदी आडनावाप्रमाणे कोकणस्थ. दिसायला गोरीपान आणि घारी. परदेशात आल्यावर अगदी त्यांच्यातली नाही वाटली तरी इतर देशी लोकांच्यात उठुनच दिसायची. तिचा लेकपण तिच्यावर गेलेला. घारा नि गोरा. हळूहळू शेजारी पाजारी ओळख वाढल्यावर एका शेजारच्या गोऱ्या म्हातारीने एकदा हटकलच. "तू गोऱ्या माणसाशी लग्न केलं आहेस का?"
तिला कळेचना असं का म्हणते ही बाई. मग सावकाशपणे आपण भारतीय आहोत, तिकडून इकडे आलो वगैरे सांगितलं. यावर त्या बाईचा विश्वास बसेना. फक्त युरोपियन लोक गोरी असताना ही बाई नि तीच मूल एवढं गोरे नि घारे कसे असू शकतात असा तिचा प्रश्न हिला बुचकळ्यात टाकून गेला. आणि कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरीही काळं गोरं हा फरक भारतातच नाही तर सगळीकडे केला जातो हे तिला दिसून आलं.
अलक 2
ती दोघ जण मस्त ब्लॅक फॉरेस्ट ची ट्रिप संपवून परत येत होते. दोघेही मस्त आनंदी मूड मध्ये होते. फ्रायबर्ग वरून त्यांची ट्रेन होती. यांचं फर्स्ट क्लास च रिझर्वेशन होत. ट्रेन आली आणि हे डब्यात चढले मात्र डब्यातल्या सगळ्यांच्या माना वळल्या. हे सावळे, एशियन या डब्यात कसे चढले असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांना वाचायला मिळाले. त्यांनी तरीही दुर्लक्ष करून आपली जागा शोधली आणि जागेवर जाऊन बसले. टीसी आला तोही काही न बोलता पण एक विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे बघत होता. गाडीत फर्स्ट कलास मध्ये असलेल्या सुविधांमध्ये फुकट पेपर होता. पण पेपर वाला मात्र यांच्याशी न थांबता सरळ पुढे निघाला. आता मात्र तिचा संयम संपला. अस्खलित जर्मन मध्ये तिने त्याला पेपर न देण्याच कारण विचारलं. आणि हा भेदभाव करणं कसं अयोग्य आहे तेही सुनावलं. आता बाकीचे चेहरे तिच्याकडे कौतुकाने बघत होते.पण या दोघांच्या ट्रिपचा शेवट मात्र कडवटच झाला.
प्रतिक्रिया
21 Oct 2021 - 3:06 pm | तुषार काळभोर
१. भारतीय - अगदी कोब्रासुद्धा - कितीही गोरे असले तरी पाश्चिमात्यांचा गोरा रंग वेगळाच असतो. शिवाय चेहरेपट्टी. गोरी शेजारीण कदाचित कडवी ट्रम्पियन असू शकेल :प
त्यांना जगात इतर लोक असतात, हे जाऊद्या, मुळात जग गोल आहे हेच माहिती नसते.
२. (युरोपात घडलंय असं गृहित धरतो), जर सत्याधारित असेल तर अजूनही अशी परिस्थिती असणे धक्कादायक आहे. एखाद्याने तसं वागणं समजू शकतो. पण युरोपात भारतीय उपखंडातील लोक बर्यापैकी आहेत. शिवाय कृष्णवर्णीय आफ्रिकी लोक त्याहून जास्त आहेत. त्यामुळे सावळे आशियाईच काय, कृष्णवर्णीय आफ्रिकी जरी असे प्रथम वर्गात आले तरी कोणी ढुंकून बघणार नाही असं वाटतं.
(अवांतर : एखादा पूर्व आशियाई, युरोपियन, अमेरिकन, लॅटिन अमेरिकन, कृष्णवर्णीय जर भारतीय रेल्वेत आला तर, अनुक्रमे अनारक्षित जनरल वर्ग, स्लीपर आणि प्रथम वर्गात 'आपल्या' प्रवाश्यांची प्रतिक्रिया कशी असेल?)
21 Oct 2021 - 5:08 pm | श्वेता व्यास
एखादी गोष्ट स्वत:कडे असण्यामागे स्वत:चे काहीही योगदान नसताना त्यासाठी कोणी व्यक्ती इतरांचा द्वेष कसा करू शकते, पण इतकं साधं लॉजिक प्रत्येकाकडे असतं तर जग खूप सुंदर झालं असतं.
21 Oct 2021 - 10:46 pm | Trump
वर्णद्वेष/ वर्णभेद
>> तुम्हीही कितीही भांडा, काही सुधारणा होत नाही.
22 Oct 2021 - 1:57 am | बाजीगर
को ब्रा लखलखीत गोरा रंग
जर्मन भाषेवर असखलीत प्रभुत्व
फर्स्ट क्लास मध्ये प्रवास करण्या इतकी श्रीमंती असून
तोंड व मन कडवट झालं...
कारण तिथे ही,
"आई बी काळी नि बापूस बी काला,
ही गोरी पोरी कोणाची ?!!"
हाच प्रश्न उपस्थित झाला
हा मत्सर आहे
विरोधभक्ती आहे
भारतीय एवढे चांगले कसे हा धक्का पचल्या नन्तर हीच लोक्स मैत्रीपूर्ण होतील.
धीर धरी,
धीर धरी.
22 Oct 2021 - 5:24 pm | Trump
>> भारतीय एवढे चांगले कसे हा धक्का पचल्या नन्तर हीच लोक्स मैत्रीपूर्ण होतील.
अच्छा. गोरा वर्ण म्हणजे चांगले का?
23 Oct 2021 - 9:14 am | रावसाहेब चिंगभूतकर
ते भारतीयांच्या वर्तनाबद्दल बोलत आहेत. जर ते भारतीयांच्या वर्णाबद्दल बद्दल बोलत असतील, तर धक्का कसला त्यात? तसेही परदेशात रहाणारे बरेच भारतीय गोऱ्या श्रेणीतच मोडतात. शिवाय भारतीय परदेशात बरेच वर्ष रहात आहेत. तेव्हा दोन्ही अर्थानी हा धक्का असेल असे मला वाटत नाही. पण पोस्ट टाकणार्यांना वर्णद्वेष अपेक्षित नसावा*.
* मला मात्र आहे. "काळपट मत्सरी गृहस्था!**"
** हे माझ्या आल्टर इगो २ ने म्हटले असल्यामुळे फारसे मनावर घेऊ नये - इति आल्टर इगो १***
*** आणि मनावर घेतले तरी काय उखडणार आहात? - इति आल्टर इगो २.
23 Oct 2021 - 12:08 pm | बाजीगर
हेच म्हणायचं होते.
धन्यवाद रावसाहेब
25 Oct 2021 - 12:35 pm | चौथा कोनाडा
धक्कादायक आहे पण .... वस्तूस्थिती मान्य करावीच लागेल.
छान लिहिलं आहे ! +१
25 Oct 2021 - 8:08 pm | तर्कवादी
कदाचित एशियन प्रवाशांना जर्मन येत नसावे असा विचार करुन पेपर वाल्याने पेपर दिला नसावा.
उद्या आपल्या ट्रेनमध्ये मराठी पेपर वाटला जात असेल आणि एखादा विदेशी प्रवासी डब्यात असेल तर आपल्याकडचा पेपरवालाही विचार करेल "याला थोडंच मराठी येत असेल ?"