काही संभाषणे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
10 Sep 2021 - 12:43 pm

मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो.

.....................................मीस्टर नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातले काही म्हणजे आकर्षक व्यक्तीमत्व व छान स्वभाव.मी त्यांच्याशी कधीच मराठीत बोललो नाही,माझ्या डीपार्टमेन्टचे नसल्याने जास्त बोलणे होत नसे,पण थोड्याच दीवसांत चांगले नाते बनले होते.मी त्यांच्याशी बोलताना उच्च प्रतीचे इंग्लिश कसे बोलता येईल ह्याचा प्रयत्न करायचो.ते थोडे अमेरीकन accent मधे बोलत,मराठी क्विचितच पण अगदी शुध्द् बोलत,म्हणुन मी मराठी बोलण्याच्या भानगडीत पडत नसे.
एकदा मी रेसेपशनीस्टला कारण नसताना 'फोन करायला चाललोय' अस सांगुन बाहेर गेलो.खर म्हणजे मी सिगरेट पियायला चाललो होतो.
मीस्टर नेनेंना मी सिगरेट पितो ह्याची कल्पना असेल हे माहीती नव्हतं. माझा कार्यक्रम आटपुन मी गेट उघडुन आत गेलो तसे मीस्टर नेने समोर दीसले. मी 'गुड मॉरनींग सर' बोलत 'मी काल खुप काही शिकलो' असे वगैरे वगैरे परदेशी भाषेत शक्य तेवढ्या नम्रपणे बोललो.पण नेनेंना मी काय करुन आलोय ह्याचा वास लागला होता.
नेने : काय रे शान्या,एक तर गुजरात्यासारखा दीसतोस,वर ईंग्लिशमधे बोलतोस? कुठे फुकायला गेलेलास का?
मी : ???????????????

...................................नारायण,हा साता-याचा,भाषा म्हणजे पक्की साता-याची.त्याचे मराठी म्हणजे 'अरे कुठं होतास, तुला कधीपासुन हुडकतोय" ह्या असल्या श्रेणीत येणारे मराठी. एकदा स्टेशन केमीस्टचा फोन आला.एकाने चुकीच्या टेस्ट करुन लफडा केला होता,"तो मी नव्हेच" हे मी स्टेशन केमीस्टला पटवत होतो.मी खरच त्या टेस्ट्स केल्या नव्हत्या.
मी(फोनवर):OK Sir,I will prove it,bye! थोड्या रागात फोन ठेवला.
नारायण :अरे माझ्याशी पण ईंग्लिशमधे बोल की.
मी: साल्या तुझ्याशी बोलुन माझे मराठी खराब होईल,पण तु ईंग्लिश शिकणार नाहीस.
नारायण :तसं नाय रे,मी पण कधी कधी ईंग्लिश 'स्पीक करतो'.
मी डोकं पकडुन हसत होतो."क्काय!!!!"
नारायण : "मी पण कधी कधी ईंग्लिश स्पीक करतो,आय नो आय नो ईंग्रजी." मी कीतीतरी दीवसांनी एवढं पोटभरुन हसलो.

...................................मोरे,हे मला तसे नवीन.पण ह्यांच्याबद्दल खुप काही ऐकुन होतो,'फार अनुभवी माणुस आहे,प्रॉब्लम लगेच पकडतो' वगैरे वगैरे. माझे ह्यांच्याशी बोलणे कधी झाले नव्हते.एकदा सकाळी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधे बसलो होतो.आद्ल्यारात्री ३-४ वाजेपर्यंत चॅटींग करुन डोकं जड झाल होत.खुप दीवसांनी जागरण झाल्याने थोडा वैतागलो होतो. मोरे माझ्यासमोर येउन बसले.
मोरे : नवीन आहेस ना. सेरव्हीस डीपार्टमेन्ट्चा आहेस?
मी : नाही सर. मी विचारले नसताना आगाउपणा करत माझे शिक्षण अगदी ट्क्क्यांसकट सांगितले,मोरेंना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न. जागरणामुळे मला हसावसे वाटत नव्हते तरी हसरा चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही दोघांनीही मेंदुवड्याची ऑर्डर दीली होती.
मेंदुवड्याची ऑर्डर आली,मला खुप भुक लागली होती,पण मी मोरेंनी सुरवात करावी म्हणुन थांबलो.
मोरे : ह्म्म 'टेस्टेड' आहे.
मी: सॉरी सर्,मला सेरव्हीसमधल काही समजत नाही,मी लॅबमधे आहे
मोरे: अरे नाही, मी मेंदुवड्याचं बोलतोय,'टेस्टेड' आहे.
मी मान डीशमधे घालुन ईतका हसत होतो की घशाखाली काहीच उतरत नव्हत,पराकोटीचे प्रयत्न करुन मी पुढचे संभाषण न हसता संपवले.

नोंद : लेखातली आडनावे ही पुर्णपणे काल्पनिक आहेत,कोणालाही दुखावण्याचा उद्देश नाही.भाषा व प्रांत ह्याचा आदर मलाही आहे.
धन्यवाद.

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

भागो's picture

10 Sep 2021 - 2:48 pm | भागो

छान! आवडले. विशेषतः मिस्टर नेने.

त्याचा राग असेल.

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 4:27 pm | गॉडजिला

पण धाग्यात काहीतरी मिसिंग आहे हे नक्कि…

शानबा५१२'s picture

10 Sep 2021 - 5:28 pm | शानबा५१२

हे तिन्ही कीस्से तीन वेगवेगळ्या कंपनीमधील आहेत, ७ ते ८ वर्षांपेक्षा जास्त झाली आता ह्या गोष्टींना. माझा व नोकरीचा आता काहीच संबंध नाही.