हॅमिल्टन-संगीत नाटक (म्युजिकल)

कॉमी's picture
कॉमी in जनातलं, मनातलं
25 Aug 2021 - 11:12 pm

काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही.

अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन म्हणजे अमेरिकेच्या फाऊंडिंग फादर्स पैकी एक. त्याने ब्रिटन विरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला, तो जॉर्ज वॉशिंग्टनचा (म्हणजे कॉलोनीजच्या सैन्याचा सेनापती, आणि पुढे अमेरिकेचा पहीला राष्ट्राध्यक्ष) अतिशय विश्वासाचा माणूस होता, त्याने अमेरिकन संविधानाच्या समर्थनार्थ ५१ निबंध लिहिले, जे फेडरलिस्ट पेपर्स म्हणून प्रसिद्ध आहेत, तो अमेरिकेचा पहिला कोषाध्यक्ष होता, त्याने अमेरिकेच्या फेडरल बँकेची स्थापना केली. त्याच्या आयुष्यावर हे नाटक आधारीत आहे.

संगीत नाटकांशी संबंध तसा नुकताच आला. दोन-तीन वर्षांपूर्वी आमच्या गावात भरलेल्या एका स्पर्धेच्या निमित्ताने एकामागून एक बरीच संगीत नाटकं पाहता आली होती. (मत्स्यगंधा, ययाती देवयानी, संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली) आणि भरपूर मजा आली होती. आणि पेपर मध्ये बर्याचदा ब्रॉडवे शोजचा उल्लेख वाचला होताच. आणि काही दिवसांपूर्वी 'वेट फॉर इट' नावाचे एक गाणे ऐकले, जे खुप आवडले. आणि, पाहीले तर ते गाणे हॅमिल्टन नावाच्या ब्रॉडवे म्युजिकल मधले आहे असे समजले, आणि कथाविषय पाहिल्यावर उत्सुकता वाढली. युट्युबवर सर्व गाण्यांच्या अनेक एकत्रित चित्रफीती आणि प्लेलिस्ट उपलब्ध दिसल्या, सुरुवातीची काही गाणी त्यातून ऐकली (संपूर्ण कथा गाण्यांमध्येच आहे, वेगळे संवाद नाहीत.), आणि एकंदर प्रकार जबरदस्त आहे समजले, आणि खास दृश्य अनुभव मिळवावा म्हणून गेल्याच वर्षी डिस्नीने काढलेल्या म्युजिकलच्या चित्रीकरणाकडे वळलो. (डिस्नी+ हॉटस्टार वर उपलब्ध आहे.) आणि सुरेख कविता-संगीतासोबत अतिशय सुंदर अभिनय आणि कोरिओग्राफी सुद्धा पाहायला मिळाली. आणि, केवळ गाणी ऐकताना येणारी मजा ही दृकश्राव्य मजेच्या तुलनेत काहीच नाहे असे वाटले.

हॅमिल्टन- ट्रेलर

विषय ऐतिहासिक असला तरी गीतांमधले शब्द जुन्या-नव्या भाषेचे मिश्रण आहे. आणि बरीचशी गाणी हिप-हॉप प्रकारातली असल्याने गाण्यांमध्ये सुरेख ह्रिदम आहे. उदाहरणार्थ-
How does a bastard, orphan, son of a whore and a Scotsman,
dropped in the middle of a forgotten spot in the Caribbean,
By providence impoverished in squalor, grow up to be a hero and a scholar
The 10 Dollar, founding father without a father got a lot farther
by working a lot harder by being a lot smarter by being a self starter

किंवा,

I am not throwing away MY SHOT
I am not throwing away MY SHOT,
Hey yo I am just like my country young scrappy and hungry
and I am not throwing away MY SHOT !

लिन मॅन्युएल मिरांडानी अर्थातच हॅमिल्टन म्हणून प्रमुख भुमिका साकराली आहे. त्याच्या गाण्यांमध्ये पात्रांच्या तोंडात सतत येणारी अनेक वाक्ये आहेत, जी त्या पात्राचे अंतरंग बखुबीने दाखवतात. आणि ही वाक्ये निरनिराळ्या प्रसंगात खुप काही सांगून जातात. उदाहरणार्थ- हॅमिल्टनचा उत्साही स्वभाव त्याच्या "And there's a million things I haven't done, but just you wait ! But just you wait !" मधून दिसतो. एरॉन बर, हॅमिल्टनचा एक सहकारी, त्याची निर्णय्प्रक्रियेच्या केंद्रस्थानी येण्याची महत्वकांक्षा "I want to be in the room where it happens" मधून दिसते.

आत्तापर्यंतचा भाग सगळा स्पॉइलर फ्री होता. यापुढे मला खुप आवडलेल्या एका गाण्यांबद्दल बद्दल लिहिले आहे. ह्या गाण्यांमधून अर्थातच कथेतल्या महत्वाच्या घडामोडी समजतील. त्यामुळे, ज्यांना ही म्युजिकल पाहायची आहे, आणि कथा आधीच समजल्याने पाहाण्यातली मजा कमी होइल असे वाटत असेल तर त्यांनी इथेच थांबावे.

तशी तर सर्वच गीते अत्यंत लक्षवेधी आहेत. पण तरी खालील गाणी खुपच आवडली.

१. द स्कायलर सिस्टर्स-
अ‍ॅन्जेलिका, एलायझा आणि पेगी या स्कायलर बहिणींशी या गाण्यातून ओळख होते. गाणे मस्तच आहे.

२. हेल्पलेस आणि सॅटिसफायड्-
एका विंटर बॉल मध्ये एलायझाला अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन दिसतो, आणि पाहिल्याक्षणी तिचे मन त्याच्यावर बसते. आणि, फिलिप स्कायलर या बड्या आणि श्रीमंत प्रस्थाच्या एखाद्या मुलीशी (अ‍ॅन्जेलिका किंवा एलायझा) लग्न करायचे अश्या उद्देश्यानेच हॅमिल्टन तिथे आला असतो. वरील दोन्ही गाण्यान्मध्ये बॉल (नृत्यसमारंभ) मधल्या घटना अ‍ॅन्जेलिका आणि एलायझाच्या दृष्टिकोनातून दिसतात. एलायझा अ‍ॅलेक्सचे डोळे पाहून हाच माझा माणूस अशी खूणगाठ बांधते. आणि मोठी बहीण अ‍ॅन्जेलिकाला ही गोष्ट सांगते आणि अ‍ॅन्जेलिका त्या दोघांची ओळख करुन देते. आणि त्या गाण्याच्या मॉन्टाज (दृश्यमालिका म्हणता येईल का ?) दोघांची ओळख, जवळीक आणि लग्न सुद्धा दिसते. त्यानंतर पुढचे गाणे आहे- सॅटिसफायड्. या गाण्यात अ‍ॅन्जेलिका एलायझा आणि अ‍ॅलेक्सच्या लग्नात वधूवरांसाठी टोस्ट करत असते. त्या गाण्यात अ‍ॅन्जेलिकाच्या अ‍ॅलेक्झॅन्डर बद्दलच्या भावना समजतात. खरंतर एलायझाच्या आधी तिने अ‍ॅलेक्सला पाहिले असते आणि तिला तो आवडला पण असतो, पण चाणाक्ष अ‍ॅन्जेलिकाला हे पण समजते की तिच्या बहिणीलासुद्धा अ‍ॅलेक्स आवडतो आणि अ‍ॅलेक्स त्यावेळेस गरीब असल्याने, तिघी बहिणींपैकी कोणी एकीने तरी सुरक्षितता म्हणून श्रीमंत नवरा मिळवणे गरजेचे असते. त्यामुळे अ‍ॅन्जेलिका स्वतःच्या भावना विसरुन एलायझा आणि अ‍ॅलेक्सची ओळख करुन देते. अ‍ॅन्जेलिकाचे वेगवान रॅप अफलातून आहे.

३. राईट हॅन्ड मॅन -
कुस्तीच्या रिंगणात येण्याआधी फायटर्सची हवा केली जाते तसे वातावरण असलेले हे गाणे आहे. अ‍ॅरॉन बर उत्सुकता ताणवत आणि स्तुतीसुमने उधळत जॉर्ज वॉशिन्गटनच्या आगमानाची घोषणा करतो, आणि "We are OUT-GUNNED ! OUT-MANNED ! OUT-NUMBERED, OUT-PLANNED ! We gotta make an all out stand !" अशी आरोळी करत जनरल वॉशिन्गटन रोमांचक प्रवेश करतात.

४. यु विल बी बॅक-
कॉलनीजच्या स्वातंत्र्यलढ्यावर किंग जॉर्ज (तिसरा) ची खवचट टिप्पणी ! जोनाथन गॉफ्फ नावाच्या कलाकाराने एकाच जागेवर उभारुन च चेहेर्यावरच्या हावभावांनी जे फटकारे मारलेत त्याला तोड नाही. किंग जॉर्ज म्हणतो-
"You'll be back, soon you'll see
You'll remember you belong to me
You'll be back, time will tell
You'll remember that I served you well
Oceans rise, empires fall
We have seen each other through it all
And when push comes to shove
I will send a fully armed battalion to remind you of my love!'

५. कॅबिनेट बॅटल-
ही म्हणजे थॉमस जेफर्सन, जेम्स मॅडिसन वि. हॅमिल्टन अशी रॅप बॅटल आहे. फेडरल बँकेच्या कल्पनेला कडाडून विरोध करणार्‍या जेफर्सन-मॅडिसन जोडगोळीला हॅमिल्टनचे उत्तर !

६. [यापुढे खरोखरीच मोठा स्पॉयलर.]
हॅमिल्टन एलायझावर मनापासून प्रेम करत असतो, पण ती आणि अ‍ॅन्जेलिका सुट्टीसाठी काही महीने बाहेर गेल्या असतात, तेव्हा हॅमिल्टन स्वतःला न आवरता आल्याने एका दुसर्‍या स्त्रीशी संबंध ठेवतो, आणि नंतर समजते की हा प्रकार त्याला फसवण्यासाठी त्या बाईच्या नवर्‍यानेच पैसे उकळण्यासाठी घडवून आणला असतो. आणि हे प्रकरण त्याच्या राजकिय विरोधकांच्या हातात लागण्याची चाहूल लागल्यावर हॅमिल्टन स्वतःच सर्व सत्य लोकांसमोर ठेवतो. ह्यात एलायझा खुप दुखावली जाते, आणि त्याची सर्व प्रेमपत्र जाळून त्याला आपल्या आयुष्यातून दूर करते.

त्यानंतर, काही वर्षांनंतर, हॅमिल्टन-एलायझा चा १९ वर्षांचा तरुण मुलगा फिलीप आपल्याला भेटतो. फिलीप वडिलांसारखाच हुशार असतो, कवी असतो, देखणा असतो. त्याच्या कॉलेज मध्ये एक दुसरा मुलगा हॅमिल्टन बद्दल काही अपशब्द वापरतो. हे फिलीपला आजिबात आवडत नाही, आणि तो त्या मुलाला माफी मागण्यास सांगतो, जो तो मुलगा नाकारतो. त्यावर त्याकाळातल्या प्रथेनुसार फिलीप त्या मुलाला ड्युएलचे (द्वन्दाचे) आव्हान देतो. हे द्वन्द्व बंदुकांनी करायचे असते. त्यात एकमेकांपासून काही अंतर राखून, एकमेकांकडे पाठ करुन उभारायचे, आणि १० पर्यन्त मोजल्यानन्तर मागे वळून गोळी झाडायची- असे असे.
फिलीप अ‍ॅलेक्सला सल्ला विचारतो, तेव्हा अ‍ॅलेक्स त्याला सांगतो, की तू त्या मुलाला तुझ्या हालचालीतून सुचव, की तू फक्त निषेध म्हणून आकाशात गोळी झाडणार आहेस, आणि तसेच कर. कारण, तसेही बरेचसे ड्युएल अशीच, आकाशात गोळी मारुन होत असतात. आणि, दुसर्‍या व्यक्तीला ठार करणे ही गोष्ट तुझ्याइतक्या कोवळ्या वयात खान्द्यावर घेणे बरे नव्हे.
आणि त्या ड्युएल मध्ये फिलीप आकाशात गोळी झाडत असताना तो मुलगा फिलीपवर गोळी झाडतो, आणि काहे तासांनी फिलीप हॅमिल्टन आणि एलायझाच्या कुशीत प्राण सोडतो.
ह्या पॉइंटला उडती चाल असणारे आणि जल्लोशपूर्ण असणारे नाटक शोकमग्न होते. त्यानन्तर जे गाणे आहे, ते दगडाचे सुद्धा हृद्य द्रवेल असे आहे. अतिशय सुंदर कविता आणि गाणे आहे. आणि हेच मला सर्वात जास्त आवडलेले गाणे आहे.
अ‍ॅन्जेलिकाच्या आवाजात-
दुःखाशी झगडण्यासाठी हॅमिल्टन परिवार शहरापासून दूर शांत भागात जातो.

'There are moments that the words don't reach
There is suffering too terrible to name
You hold your child as tight as you can
And push away the unimaginable

The moments when you're in so deep
It feels easier to just swim down
The Hamiltons move uptown
And learn to live with the unimaginable'

आपल्या आपत्याला गमावणं हे कल्पनातित दुःख आहे.
हॅमिल्टनचे वर्णन-
"If you see him in the street
Walking by himself, talking to himself, have pity
(Philip, you would like it uptown, it's quiet uptown)
He is working through the unimaginable"

हॅमिल्टनच्या हारलेल्या स्तिथीचे वर्णन करुन निवेदकच अचंबा दाखवतो- "Can you imagine?" हॅमिल्टन विखरुन पडलाय- हे सुद्धा कल्पनातीतच आहे.

त्यानंतर हॅमिल्टन एलायझाला म्हणतो-
"Look at where we are
Look at where we started
I know I don't deserve you, Eliza
But hear me out
That would be enough,
If I could spare his life
If I could trade his life for mine
He'd be standing here right now
And you would smile, and that would be enough"

आणि आणखी एक कल्पनातित आणि (निवेदकाच्याच शब्दात) त्याला न समजणारी गोष्ट घडते- एलायझा त्याचा हात हातात घेते- "Forgiveness, can you imagine?"

आणि त्यानंतर-
"If you see him in the street
Walking by her side, talking by her side, have pity
(Eliza, do you like it uptown? It's quiet uptown)
He is trying to do the unimaginable"

It's Quiet Uptown (from Hamilton)

७. वेट फॉर इट-
हॅमिल्टनच्या छायेत मागे राहिलेला हॅमिल्टनचा सहकारी अ‍ॅरॉन बर विचार करत असतो- आपले सगळे आप्तेष्ट गेले असताना मी का शिल्लक आहे ? हॅमिल्टन इतक्या जोरात घोडदौड करत पुढे गेला तर आपण का मागे राहिलो ? काही का असेना, ज्या कारणासाठी मी राहिलो- "I'm willing to wait for it."

जरुर पाहा !

इथे पूर्ण नाटक ऐकता येईल.

संगीतइतिहासकविताआस्वाद

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

25 Aug 2021 - 11:42 pm | सिरुसेरि

छान ओळख . पुर्वी ब्रॉडवे मधील थिएटर्समधे अनेक वर्षे सलग चालत असलेल्या लायनकिंग , द विकेड या म्युजिकल ऑपेरा / संगीत नाटकांबद्दल ऐकले आहे .

हॅमिल्टन ह्यांनी एकूण ५१ फेडरॅलिस्ट पेपर्स लिहिले (एकूण ८५ आहेत). फेडरॅलिस्ट पेपर्स म्हणजे अमेरिकन रिपब्लिक आणि त्यांची घटना ह्यावरील चर्चा जाहीर पणे वर्तमानपत्रातून मांडली गेली.

हॅमिल्टन हे त्यातल्या त्यांत डाव्या विचारसरणीचे होते म्हणजे सरकारने खूप काही करावे असे त्यांचे विचार होते तर जेफरसन हे अगदी विरुद्ध म्हणजे सरकार शक्य तितके छोटे असावे अश्या विचारसरणीचे होते. दोघांच्या ह्या भूमिकेवरून शेवटी आजचे दावे आणि उजवे पक्ष निर्माण झाले असे आम्ही म्हणू शकतो. सुदैवाने १९३० पर्यंत अमेरिकन सरकार अत्यंत छोटे होते आणि ह्याच काळांत ह्या देशाने न भूतो ना भविष्यती अशी प्रगती केली.

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 5:32 am | कुमार१

छान ओळख

गॉडजिला's picture

27 Aug 2021 - 3:54 am | गॉडजिला

नाटक अफलातूनच आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संगीतनाट्य ते ही ऐतिहासिक पार्श्वभूमीचे असून देखील rap व hip-hop वापरून ते उभे केले असल्याने आजही ते पाहताना तितकेच रोचक वाटते.

रेवोल्युशन पूर्वीचा हॅमिल्टन, स्त्रियांना समान अधिकार यातून मिळू शकतात याची जाणीव असल्याने त्यांचा क्रांतीकडे कल व विचार आणि संकल्पना यांची मुक्त देवाण घेवाण आशा अनेक बाबी बघणे फार सुरेख वाटते यात डावे उजवे असे काहिच ठरवूनही ठरवता येत नाही. (भलेही मुक्त विचार स्वातंत्र्य सर्वात जास्त डावी बाजू प्रखरतेने व कधीकधी दुरुपयोग वाटावा अशी वापरते)

हॅमिल्टन बाबत मला प्रथमच आणि ते ही या संगितिकेमुळे समजलें व त्याच्याबाबत माझे ब्रेन वॉशिंग अजून कोणा डाटासायंटिस्ट फौजेकडून झालेले नाही त्यामुळे डाव्यांचा पृथ्वीवर उदय होण्यापूर्वीच्या अथवा अगदी फ्रेंचराज्यक्रांति पूर्वीच्या काळात सुरू झालेल्या घटनावर आधारीत ही संगितिका मी मनमुराद एन्जॉय केली.

यात जॉर्ज वॉशिंगटन एक प्रकारे स्वेच्छा निवृत्ती घेतो कारण त्याला तो नसताना देश चालु रहावा व अमेरिकेचे अध्यक्षपद ही लाईफ टाईम बाब आहे असा पायंडा पडू नये असे वाटते व त्यासाठी स्वताच्या मृत्यूची अथवा एखाद्या कारस्थानाची तो सत्ताधीश असूनही वाट बघत नाही ही बाब मला सर्वात रोचक वाटत राहिली.

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2021 - 1:16 pm | चौथा कोनाडा

मस्त लिहिलंय !
भव्य आणि रोचक आहे संगीतनाट्य !

फारएन्ड's picture

31 Aug 2021 - 7:12 am | फारएन्ड

मस्त माहिती!

आपल्याकडे असे काही करायला गेले तर शंभरएक महापुरूषांचे अपमान होउन, विविध लेव्हलला निषेध ते सभागृहाची तोडफोड वगैरे होईल :)

फारएन्ड's picture

31 Aug 2021 - 7:13 am | फारएन्ड

छान ओळख करून दिली आहे. मी तुकड्यांत पाहिलेले आहे पण सलग नाही.

कॉमी's picture

4 Mar 2022 - 11:11 pm | कॉमी

हॅमिल्टन कर्त्या लिन मॅन्युअल मिरांडाचा नवा चित्रपट गेल्या वर्षी येऊन गेला- टिक... टिक... बूम! गंमत म्हणजे हा सिनेमा एका संगीत नाटककर्त्यावरच बेतला आहे, आणि सिनेमा असूनही संगीत नाटकासारखाच आहे.

जोनाथन लार्सन या व्यक्तीवर हा सिनेमा आहे. जोनाथनने टिक टिक बूम, सुपर्बिया आणि सर्वात प्रसिद्ध- रेंट या संगीतिका बसवल्या. (त्यापैकी रेंट वर एकापेक्षा जास्त वेळा चित्रपट आला आहे.) ह्या सिनेमात वयाची तिशी आल्याने आलेला दबाव, मैत्रिणी सोबतचे नाते, सुपर्बिया ह्या त्याच्या पहिल्या संगीतिकेला निर्माता मिळवण्यासाठी त्याला काय काय करावे लागते- अश्या गोष्टींतून जोनाथनच्या आयुष्यातला काही काळ रंगवला आहे. भरपूर गाणी अर्थातच आहेत.

अगदी वेगळा अनुभव आहे हा सिनेमा. जोनाथनची भूमिका अँड्र्यू गारफील्डने केली आहे- अतिशय उत्तम अभिनेता. अँड्र्यूने गाणी स्वतः गायली आहेत. जोनाथनचे खरेखुरे व्हिडीओ पाहिल्यावर अँड्र्यूने किती छान अभिनय केलाय हे समजते.

गाण्यांची झलक-
बोहो डेज-

थेरपी- हे गाणे प्रेमसंबंधातल्या अडचणींवर आहे.
(यातले खूप हसायला लावणारे एक वाक्य-
I was afraid that you'd be afraid if I told you that I was afraid of Intimacy !
If you don't have a problem with my problem maybe the problem's simply codependency !)

नेटफ्लिक्स वर आहे.