- डॉ. सुधीर रा. देवरे
‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती एकवीस वर्षांनंतर चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाली आहे. 1980 ते 2000 पर्यंतच्या पहिल्या आवृत्तीतील 153 (पहिली आवृत्ती डॉ. गणेश देवी यांनी बडोद्याच्या ‘भाषा केंद्रा’तून प्रकाशित केली होती.) आणि 2001 ते 2020 पर्यंतच्या 82 अशा एकूण 40 वर्षांतील 235 कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. या संग्रहाची मराठी व इंग्रजी भाषांतरंही प्रकाशित झाली असून मराठी भाषांतर स्वत: कवीने तर इंग्रजी भाषांतर प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. दुसर्या आवृत्तीला (डॉ. गणेश देवी यांनी लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेसह) अमेरिकेतील डॉ. अरुण प्रभुणे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे.
अहिराणी ‘आदिम...’ सोबत “Melodies with a Primitive Rhythm” या नावानं इंग्रजी तर ‘आदिम तालाचं संगीत’ या नावानं मराठी अशी ही तीन पुस्तकं नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
या तीन पुस्तकांसोबत ‘डंख व्यालेलं अवकाश’ या माझ्या मराठी कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनी (पहिली आवृत्ती 1999) प्रकाशित होत आहे. अशा चार पुस्तकांचं ऑन लाईन प्रकाशन विख्यात भाषातज्ज्ञ व साहित्यिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नुकतंच बँगलोरहून करण्यात आलं असून ही पुस्तकं चेन्नई येथील ‘नोशन प्रेस प्रकाशना’तर्फे प्रसिध्द झाली आहेत. या चार पुस्तकांसह आतापर्यंत बावीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
डॉ. गणेश देवी पुस्तक प्रकाशन करत ई मेलनं कळवतात:
Ganesh_devy
Thu, Jul 8, 3:18 PM (17 hours ago)
to me
Dear Dr. Sudhir Deore,
It is an extraordinary delight to know that the four titles are now ready. I am pleased to have the honour of declaring them published and receiving them in soft copy.
‘Aadim Talana Sangeet’, the larger 2nd edition of Ahirani ‘Aadima Talana Sangeet’, with additions to it, its English, Marathi translation and ‘Dankh Vyalele Avakash’ four books of such sensitively written poems by you form your life time's work.
They are a significant contribution to Indian poetic literature. I am sure the volumes will receive the response they so richly deserves.
All very best wishes and heart-felt thanks for your kindness in thinking so affectionately of me over the long decades of our friendship.
Regards,
G N Devy
(Dr. Ganesh Devy)
दुसर्या आवृत्तीच्या निवडक चार मूळ अहिराणी कवितांसहीत त्यांची मराठी आणि इंग्रजी रुपं :
मूळ अहिराणी कविता:
उबदार ढग म्हनस...
मी मन्हा
उबदार ढगमा र्हास कायम...
मन्हा गरम सूर्य पांघरीसन,
कोन्ही घर बांधस...
कोन्ही बंगला...
कोन्ही महाल...
- मी मन्ही कविताले
उबदार ढग म्हनस!...
0
हिशेब ठिऊ नही...
हिशेब
ठिऊ नही
लोकस्ना...
जशे आपू
मोजतं नहीत
आजपावत आपुले
कितला
चाई गयात
डास!...
0
किरकोडास्नी वळवळ...
किरकोडास्नी वळवळ
तशी
हरेक गाव मझारली वरदळ
दखास
गाडीनी धावती
खिडकी मझारथून...
भायेर
कोनताबी गावमा...
0
घर पोचनूत का मंग
हरेक झनले वाटंस
भयान पानी
पडाले पायजे,
आपू सोता
घर पोचनूत का,
मंग...
0
अहिराणीतून मराठी भाषांतर :
उबदार ढग म्हणतो...
मी माझ्या
उबदार ढगात असतो कायम...
माझा गरम सूर्य पांघरुन,
कोणी घर बांधतो...
कोणी बंगला...
कोणी महाल...
- मी माझ्या कवितेला
उबदार ढग म्हणतो!...
0
हिशोब ठेऊ नये...
हिशोब
ठेऊ नये
लोकांचा...
जसं आपण
मोजत नाहीत
आजपर्यंत
किती
चाऊन गेले
डास!...
0
किरकोड्यांची वळवळ...
किरकोड्यांची वळवळ
तशी
प्रत्येक गावातली वर्दळ
दिसते
गाडीतल्या धावत्या
खिडकीतून...
बाहेर
कोणत्याही गावात!...
0
घरी पोचलोत की मग
प्रत्येकाला वाटतं
खूप पाऊस
यायला हवा,
आपण घरी पोचलोत की,
मग...
0
अहिराणीतून इंग्रजी भाषांतर : (राजीव कुलकर्णी)
Warmer Cloud
Wrapping the hot sun around,
I always cozy myself
in my warmer cloud.
One may prefer an abode,
the other a mansion proud,
a palace might shelter a few,
but, my poetry is my
cozier cloud.
0
Keep No Count
Keep no count
of people's stings and bites...
As we hardly keep count
of mosquito bites...!
0
Worms
Through the window
of the bus rushing,
one happens to see
multitudes in towns
heaving and pushing.
The hubbub
is no different
from a hoard of worms
twisting and twitching.
0
On Reaching Home
Everyone wants it
to rain heavily,
but, only when
one's reached home safely.
पुस्तकांच्या लिंक्स:
Melodies With A primitive Rhythm, English : Notion Press:
https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm
0
आदिम तालाचं संगीत, मराठी : Notion Press:
https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet
0
आदिम तालनं संगीत, अहिराणी : Notion Press :
https://notionpress.com/read/aadim-talna-sangeet
0
डंख व्यालेलं अवकाश, मराठी : Notion Press :
https://notionpress.com/read/dankh-vyalele-avkash
(लेखातल्या कवितांचा इतरत्र वापर करताना कवीच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/
प्रतिक्रिया
15 Jul 2021 - 2:24 pm | गुल्लू दादा
कालच पाटील यांच्या लेखात तुमच्या नावाचा उल्लेख वाचला. धन्यवाद.
15 Jul 2021 - 4:38 pm | विजुभाऊ
अभिनंदन देवरे साहेब.
15 Jul 2021 - 5:29 pm | Bhakti
अभिनंदन!
15 Jul 2021 - 6:22 pm | चौथा कोनाडा
मनापासून अभिनंदन देवरे साहेब !
🏆
15 Jul 2021 - 6:41 pm | गॉडजिला
मनःपूर्वक अभिन्नदन...
15 Jul 2021 - 6:50 pm | पाटिल
देवरे सर, तुमचं 'मी गोष्टीत मावत नाही' वाचण्यात आलं काही दिवसांपूर्वी.. आवडलं मला ते.. लिहित रहा. धन्यवाद.