तेजस्विनी

Primary tabs

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
7 Jun 2021 - 9:27 pm

"सर तेजू"
सब ठीक है बा?
"हो. तुम्हाला वेळ आहे ना?"
कुछ तो कांड जरुर है, थांब एका ठिकाणी बसुन घेतो.
"दादा आला होता. २५ हजाराचा कॅमेरा देउन गेला. मी पारंपारिक पद्धतीने पाया पडले. खुपच इमोशनल झाला.अगदी कनफेशनल मोड मध्ये. कारण नसताना रायवलरीत वर्षे फुकट गेली, वगैरे वगैरे.
एवढा मोठा बदल? काय जादू केलीस?
"त्याला आई ने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते आणि आईच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. कधी नव्हे तो माझ्याशी बोलला. मी समोरून नकार येइल अशी व्यवस्था केली.
खलनायकी?
" छे, अगदी सोज्वळ संभाषण, मुलीच्या आईकडे "
जरा विस्तृत सांग बरे.
"आई चे घराण्यातील स्थान, तीच्याबद्दल असलेला आदर, तीचा दरारा इत्यादी इत्यादी"
अशक्य आहेस.
"त्याचे समोरच्या बिल्डिंग मधल्या मुलीवर प्रेम बसले आहे. All the boxes tick except for girl's financial situation. ते कसे सावरायचे हा प्रश्न आहे. मी मिटिंग करेन मुलीच्या आई बाबांबरोबर. होऊन जाईल."
सांभाळुन बरे.
" अगदी अगदी.तुमचा सहभाग पण हवा"
चालेल.
"आता प्रकरण नंबर २, आधी bad news
मला २० लाख ctc campus job मिळाला.
Good news I have declined the offer"
आणि आई बाबांची समजूत काढायला मी.
"हो, एकमेव तुम्ही"
काय करणार आहेस आता.
"आय.आय. एम मध्ये पी. एच. डी."
किती शाॅक देणार आहेस तू. काही
तरी दया कर आई बाबांवर.
११वी १२ वी सायन्स, विजेटीआय सोडून एम एस सी, आता एमबीए एच आर, आणि आता पीएचडी ते सुद्धा जाॅब नाकारून?
"बडवे महाराज अजिबात होणार नाही सर"
"त्याच कंपनी ने माझी एक नोट वाचुन वेगळी ऑफर दिली. वेळेचे बंधन नाही, चेक इन नाही. एम. बी. ए चे लोन एका वर्षात संपेल."
प्रोफाईल काय?
"सी एस. आर. फंडा ला वेगळी दिशा."
नोट कशावर आहे?
"Economics of Catalytic Philanthropy. I have forwarded it to you and need your inputs to take it deep."
ठीक.
"सर, माझ्या लग्नाची काळजी करु नका. घराण्याच्या नावाला काळीमा लागेल असे काही करणार नाही असे आईला देवासमोर वचन दिले आहे मी. ३० नंतर लग्न होत नाहीत का?
Anyways I have pathological dislike for men with brains 3 fts. South.
जाउ दे, तुझी आई कधी कधी अतिरेक करते. माझ्या कडुन तुला काय हवे?
सर नोट वाचा, अभिप्राय कळवा. मला कमीत कमी ४ विद्यार्थी हवेत तुमचे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत काय फरक पडला ते प्रामाणिकपणे सांगणारे. येते १५ दिवसांनी आंबाडे चटणी खायला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

9 Jun 2021 - 12:02 pm | गॉडजिला

इतकी लोकसंख्या असुनही असे तेज दाखवणारे फार कमी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2021 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त !

-दिलीप बिरुटे
(प्रभू सरांचा विद्यार्थी) :)