करोनाचा इशारा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Apr 2021 - 1:27 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. ‘करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव.
करोनाने माणसाला इशारा दिलाय, की त्याच्या आगमनाने माणसांच्या श्रध्दास्थानांचे - मंदिरांचे दरवाजेही बंद करावे लागले. यावर काही हुशार लोकांनी युक्तीवादही शोधून काढले, ‘देव आता मंदिरात नाही तर दवाखान्यात रुग्णांची सेवा करतोय.’ या युक्तीवादाला अनुसरुन पुढं असं म्हणता येईल, की देवाला ‘रंजलेल्या गांजलेल्या’ रुग्णांची सेवा करणंच अधिक आवडतं! असं असेल तर गावोगावी आता नवीन मंदिरं बांधण्याऐवजी ‘मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स’ बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक देवालयाने तर हे केलंच पाहिजे. मंदिरांत दानपेट्या ठेवण्याऐवजी अशा इस्पितळांत दानपेट्या ठेवायला हव्यात. (मंदिरं म्हणजे सगळ्याच धर्मांची प्रार्थनागृहे अभिप्रेत.)
ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करतात, त्यांनी लोकाभिमुख होऊन अशी इस्पितळे निर्माण केली पाहिजेत. (काही नगरपालिका सामान्य नागरिकांकडून मनमानी घरपट्टी दुप्पट तिपटीने वसूल करतात. लोडबेअरिंग घरावर आरसीसी रूम दाखवण्याचा चमत्कार करून अतिरिक्त घरपट्टी लावतात. नागरिकांची क्षमायाचना करून ही गंभीर चूक दुरुस्त करण्याऐवजी नागरिकांनाच उलट ब्लॅकमेलींग केलं जातं. कोणतंही शैक्षणिक कार्य करीत नसताना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विशेष शिक्षण करही (दुहेरी) वसूल करतात. वृक्ष लागवड वा वृक्षसंवर्धन न करताही वृक्ष कर वसूल करतात.) अशा स्वराज्य संस्थांनी आता जास्तीचा आरोग्य कर लावून नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवायला हव्यात. पण लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा घेत स्वस्त प्रसिध्दीसाठी केवळ नवनवीन खर्चिक समारंभाचा घाट घातला जातो. गल्ली, बोळ, गाव, शहरं आदींची नावं बदलून, जिर्णोध्दार करत नागरिकांच्या भावनिक श्रध्देशी खेळत मूळ प्रश्न तसेच टांगणीला ठेवली जातात.
नैतिकतेची चाड असती आणि भारतीय सरकारी ‘व्यवस्था’ ही अव्यवस्था नसती तर गावोगावी सुरु झालेली सरकारी हॉस्पिटल्स आज खरोखरची आरोग्य मंदिरं झाली असती. पण दुर्दैवाने ही हॉस्पिटल्स फक्त शोभेच्या टोलेजंग इमारती ठरतात. करोनाच्या या तडाख्याने अजूनही आपण खडबडून जागे झालो आणि इच्‍छाशक्ती दाखवली तर सरकारी पैशांची प्रचंड उलाढाल होत असलेली ही हॉस्पिटल्स सामान्य लोकांसाठी संजीवनी ठरु शकतील. यात काही चांगली आशेची किरणंही आज दिसून येतात. ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी या करोना काळात नागरिकांसाठी सहसंवेदनशील व सहकार्य करणारे आहेत. सरकारी असूनही असे अपवाद आढळले तर त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल.
प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय सेवा देऊ शकत नाहीत. ते केवळ व्यवसाय (धंदा) करीत असतात. म्हणून शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचारासह सार्वजनिक प्रत्येक क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. तो बंद झाला की ‘व्यवस्था’ ही अव्यवस्था होणार नाही. सगळेच डॉक्टर भ्रष्ट नसतात, पण चांगले डॉक्टर कमी असतात. (असं प्रत्येक क्षेत्रात असतं.)
एका वर्षापासून रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार सर्वांनीच जवळून अनुभवला. मूळ औषध काळाबाजाराला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, म्हणून डुप्लीकेट औषधाचा धंदा करुन काहींनी प्रचंड पैसा कमवला. (या औषधाचा करोना रुग्णांवर विशेष चांगला प्रभाव पडत नाही हे डब्ल्यूएचओने तीन चार महिण्यांपूर्वीच जाहीर करुनही असे प्रकार आज मोठ्या प्रमाणात होत आहेत.) सहा हजाराची औषधे कोणी सव्वीस हजाराला विकली, तर महात्मा फुले आरोग्य सेवा अंतर्गत उपचार करुनही कोणी अव्वाच्या सव्वा बीलं आकारली. अशा प्रकारालाच ‘माणसाला माणसाने खाणं’ वा ‘प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं’ म्हणतात. असा उद्योग करणार्‍यांना माणूस का म्हणावं? आज जे लोक मरताहेत त्या रांगेत स्वत: आपणही उभे असून अशा मरणात आपलाही उद्या नंबर लागू शकतो, अशी परिस्थिती असूनही लोक अनैतिक मार्गाने पैसे कमवताहेत.
आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा एकमेकांना खाली खेचण्याचा खेळ खेळला जातो. (फक्त मार्जिन मिळणारी सार्वजनिक विकासकामं निष्कृष्टतेनं केली जातात. बाकी निधी परत गेला तरी हरकत नसते.) रोज निवडणुकीचा प्रचार करीत असल्यासारखं भाष्य करणारे राजकारणी लोक पाहिले, की हे लोक कसे निवडून येतात हा प्रश्न सतावतो. आपल्या पात्रतेनुसारच आपल्याला लोकप्रतिनिधी आणि सरकार मिळत असतं. म्हणून पाच वर्षांनी मतदान करतांना आपणच जागरुक असलं पाहीजे. पाचशे- हजार रुपये घेऊन वा मटणाच्या पार्ट्या घेऊन आपण मतदान करणार असाल तर नोकरशहा आणि सरकार हातात हात घालून ही ‘व्यवस्था’ अजून अशीच बिघडवत राहतील. (अर्थात नोकरशहात आणि लोकप्रतिनिधीतही अपवाद आहेतच.)
सारांश, हा करोनाचा इशारा प्रत्येकाने मनावर घ्यायला हवा! (बाकी मास्क, शारीरिक अंतर, हात धुणे आदी गोष्टींचं पालन करावं, हे सांगणं आता नवीन राहीलं नाही.)
(अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

राजकारणलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Apr 2021 - 1:36 pm | मुक्त विहारि

सध्या तरी मी खालील गोष्टी ठरवल्या आहेत...

1. लस मिळे पर्यंत घरीच राहणे किंवा जनसंपर्क कमीत कमी ठेवणे

2. लस मिळाली तरी, हलगर्जी पणा न करता, इतर लोकांपैकी किमान 70-75% लोकांना लस मिळे पर्यंत, जनसंपर्क टाळायचा

3. 100% लोकांना लस मिळाली की, हळूहळू घराबाहेर पडायचे...

थोडक्यात, जास्तीत जास्त वेळ, घरीच थांबायचे....

गॉडजिला's picture

15 Apr 2021 - 2:04 pm | गॉडजिला

पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ?

मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

मुक्त विहारि's picture

15 Apr 2021 - 2:28 pm | मुक्त विहारि

भाजीवाला, व्यवस्थित धंदा करतो

दुध आणि किराणावाले पण धंदा करत आहेत...

Transport वाले धंदा करत आहेत.

रिक्षा सुरू आहे

जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणारे धंदा करत आहेत...

गावांत, सगळे कामगार बिझी आहेत, गेल्या वर्षभरांत आमच्या पंचक्रोशीतील साधारण 5-6 हजार माणसांपैकी कुणीही करोना मुळे दगावले नाही...आणि कामसू माणसांपैकी, कुणीही बेरोजगार पण नाही

कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली.

आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

सहमत आहे...

नविन ठिकाणी धंदा आणि लगेच आलेली आपत्ती, हे खरंच दुर्दैव...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:09 am | डॉ. सुधीर राजार...

काळजी घ्यावी

कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली.

आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

बापूसाहेब's picture

15 Apr 2021 - 6:28 pm | बापूसाहेब

सत्य आहे. आमचेही असेच काहीसे दुकान आहे.
दोन वर्ष झालं बंद ठेवावं लागले. अर्थातच आम्हीं पूर्णपणे त्यावर अवलंबून नसल्याने इतका जास्त फरक पडला नाही.
पण दुकानातील कामगार बेरोजगार झाले आणि आता गावी शेती करतात.

दोन वर्ष दुकान बंद आहे पण लाईट बिल, पाणी बिल आणि मालमत्ता कर काही चुकला नाही.
करोना सुरवातीच्या वेळी २_३ महिने कामगारांना फुकट पगार द्यावा लागला पण नंतर काम च नसल्याने ते बंद केले.
या सर्वाचा काही प्रमाणात का होईना आर्थिक फटका आम्हाला बसला.
उत्पन्न मिळाले नाहीच पण सरकार चे खिसेभरावे लागले.

बापूसाहेब's picture

15 Apr 2021 - 6:29 pm | बापूसाहेब

दोन वर्ष झालं बंद ठेवावं लागले
एक वर्ष असे वाचावे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:10 am | डॉ. सुधीर राजार...

लोकप्रतिनिधी निवडणुकीत मश्गुल

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:07 am | डॉ. सुधीर राजार...

आशादायी चित्र आहे. काळजी घेत आपले काम सुरू ठेवावे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:06 am | डॉ. सुधीर राजार...

हातात पैसे नसतील तर काहीच करता येत नाही. शक्य तेवढा रोजगार केला पाहिजे. काळजी घेत.

गॉडजिला's picture

15 Apr 2021 - 2:04 pm | गॉडजिला

पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ?

मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

गॉडजिला's picture

15 Apr 2021 - 2:04 pm | गॉडजिला

पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ?

मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

गॉडजिला's picture

15 Apr 2021 - 2:04 pm | गॉडजिला

पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ?

मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:04 am | डॉ. सुधीर राजार...

पंजाब,हरियाणा आणि दिल्ली हे तीन प्रदेश जाट,शीख या गरम डोक्याच्या लोकांचे प्राबल्य असलेल्यांनीच भरलेले आहेत. या भांडण उकरुन काढण्यास कोणतेही कारण पुरते.

दिल्लीतही अनेक मराठी लोक वर्षानुवर्षापासून राहात आले आहेत. आमच्याच दूरच्या नात्यात (काकूचे मामेमामा अशाप्रकारे दूरचे नाते) दोन आहेत. मिपावरील काही सदस्यही दिल्लीचे आहेत. दिल्लीत महाराष्ट्र मंडळाचे कामही व्यवस्थित चालते. पंजाबविषयी बोलाल तर माझा चुलतभाऊ लुधियानामध्ये जवळपास १५ वर्षे राहायला होता.

अशा ठिकाणी राहिल्यास लगेच त्रास होतो आणि घराबाहेर पडल्यास लगेच कोणीतरी मारायला उठते असा प्रकार नसतो.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:11 am | डॉ. सुधीर राजार...

नक्की काय म्हणायचं?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2021 - 10:05 am | डॉ. सुधीर राजार...

बरोबर. असंच करायला हवं.

च्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. ‘करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव. >>> +१११

पण लेखात इशारा काही दिसला नाही.
प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक>>>>>>>>>
आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. >>>>>
हाच सुर लेखाचा दिसतोया.

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Apr 2021 - 2:43 pm | अनिरुद्ध.वैद्य

हिंदुंनी आता त्यांच्या मोठ्या मोठ्या मंदिरांना इस्पितळे बांधायला उद्युक्त केले पाहिजे.

आम्चे आराध्य गजानन महाराज शेगावचे संस्थान हे चालवते, पण गावाच्या लोकसंख्येनुसार त्याची व्याप्ति फार लहान आहे. त्यांनी ५०० ५०० बेडचे आयसोलेशन सेंटर अन भोजन व्यवस्था कोव्हीड काळात चालवली.

ईतरही मोठी देवळे चाल्वत अस्तिलच पण पॅनडेमीक लेव्हल नसावीत.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Apr 2021 - 9:42 am | डॉ. सुधीर राजार...

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

सुबोध खरे's picture

16 Apr 2021 - 7:51 pm | सुबोध खरे

नवीन मंदिरं बांधण्याऐवजी ‘मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स’ बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे.

सभेत टाळ्या घेण्यासाठी उत्तम वाक्य आहे.

हिंदू मंदिरांना कुठेही पैसे खर्च करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. हे आपल्याला माहिती आहे का? त्यामुळे इच्छा असूनही मंदिरांच्या विश्वस्तांना असे पैसे रुग्णालयाला देता येत नाही. अशा परवानगी घेण्यासाठी सरकार दरबारी खेटे किती घालावे लागतात आणि किती लोकांची दाढी धारावी लागते आणि कुठे हात ओले करावे लागत हे आपल्याला माहिती आहे का?

हे नियम केवळ हिंदू मंदिरांना लागू असून अल्पसंख्य संस्थांना लागू नाहीत ( कारण आपला सर्मधर्म समभाव)

अशा अनेक परवानग्या घेण्यासाठी बरेच साटे लोटे करावे लागतात उदा. डॉक्टर हे आमचे भावजी आहेत ते रुग्णालयासाठी अबक उपकरण बनवतात बघा त्यांनाही काही मदत होईल का?

५० बेड्चे रुग्णालय नुसते उभारण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येतो यात जमिनीचा भाव गृहीत नाही. यानंतर ते नुसते चालवण्यासाठी दरमहा २० लाखाच्या वर खर्च येतो. हा खर्च दुसरे उत्पन्न असेल तरच शक्य होते अन्यथा केवळ सेवाभावी रुग्णालयांना उत्तम सेवा देणे अशक्य आहे.

रुग्णालयांच्या नुसत्या विजेची बिले लाखात जातात. त्याला लागणारे केंद्रीभूत वातानुकूलन यंत्र, UPS, जनरेटर, त्याला लागणारे डिझेल तो चालवणारा तंत्रज्ञ यांचे खर्च आपोआप होत नाहीत.

आपण काही काळ डॉक्टरांकडून नाममात्र शुल्कात सेवा घेऊ शकता. परंतु बाकी सर्व सेवक वर्ग याना पहिल्या दिवसापासून बाजारभावाने पगार द्यावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे का? रुग्णालय म्हटल्यावर तीन पाळ्यात सेवकवर्ग ठेवावा लागतो.

त्यासाठी त्यांचे भविष्य निर्वाह निधी पासून कर कपात/ कर संकलन अशा असंख्य गोष्टींसाठी सरकार दरबारी खेटे मारावे लागतात शिवाय रुग्णालयात एकदाच उपकरणे खाटा इ आणि वारंवार लागणाऱ्या/संपणाऱ्या (CONSUMABLE) उदा इंजेक्शन औषधे प्रत्येक वस्तूचा हिशेब ठेवण्यासाठी प्रशिक्षित सेवक वर्ग लागतो. यात एक्सपायरी झालेली औषधे उपकरणे परत परत तपासावी लागतात. प्रत्येक उपकरणाचे वार्षिक देखभालीचे कंत्राट त्यासाठी लागणार निधी इ सर्व येते.

तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना फार सांभाळून घ्यावे लागते कारण पाऊस पडला ऊन पडले सारख्या कारणांनी दांड्या मारणे हा स्थायीभाव आहे. इ सी जी काढणारा तंत्रज्ञ आला नाही म्हणून तुमचा इ सी जी उद्या काढू असे डॉक्टरांनी सांगितले तर त्यांना मार खावा लागतो.

उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणे दुरुस्त करणारे तंत्रज्ञ तालुक्यालाच काय जिल्ह्यात सुद्धा उपलब्ध नसतात.

महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी डॉक्टर मिळत नाहीत त्यामुळे निवासी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना वेठीस धरून सरकारचे काम चाललेले आहे हे आपल्याला माहिती आहे का?

यामुळेच सरकार आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टराना नेमण्याची तयारी करत आहे याची आपल्याला कल्पना आहे का?

आणि हे डॉक्टर सुद्धा किती काळ तेथे राहतील याची खात्री आहे का?

येत जाता ऑक्सिजन नाही औषधे नाहीत म्हणून स्थानिक राजकारण्यांकडून बोलणी आणि प्रसंगी मार खाण्यापेक्षा कितीतरी डॉक्टर डॉक्टरी सोडून इतर व्यवसायात शिरत आहेत. छोट्या शहरात जिल्हा तालुका पातळीवर हा प्रश्न फार मोठा आहे.

तेथे उच्च शिक्षित डॉक्टर सरकारी नोकरीत टिकत नाहीत तर धर्मादाय रुग्णालयात टिकतील हि अपेक्षा अत्यंत बाळबोध आहे

माझ्या माहितीतील दोन डॉक्टर - एक MD मेडिसिन झाल्यावर IIM कलकत्त्यात जाऊन उच्च पगाराच्या नोकरीत स्थिर झाला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ आता MBBS करून IIM अहमदाबाद मध्ये शिकत आहे.

मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे.

त्यात येणाऱ्या अनंत अडचणी आणि सत्ता हातात आहे किंवा चार पैसे खिशात आहेत म्हणून उंटावरून शेळ्या हाकणारे सल्लागार या दोन आघाड्यांवर लढावे लागते.

ठाण्याचे धर्मादाय रुग्णालय जाळून टाकल्यानंतर रेमंड्स उद्योग समूहाने ते परत बांधण्याचा विचार का केला नाही याचे उत्तर शोधा.

हा विषय इतका प्रचंड आहे कि चार लेख लिहिले तरी पुरणार नाहीत.


बाकी सभेत टाळ्या घेण्यासाठी आपला लेख छान आहे.

सॅगी's picture

17 Apr 2021 - 9:51 am | सॅगी

हा स्ट्रेट ड्राईव्ह आवडला!!!

टाळ्या वाजवणारे प्रेक्षक इतकंच करू शकतात

सॅगी's picture

18 Apr 2021 - 8:22 pm | सॅगी

इतकं करू शकतो तर करू द्याच..

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2021 - 10:17 am | डॉ. सुधीर राजार...

ज्यांना नवीन काही मांडता येत नाही ते हेच करतात आयुष्यभर

सॅगी's picture

19 Apr 2021 - 2:29 pm | सॅगी

माझ्या टाळ्या वाजवण्यानेही तुम्हाला त्रास झालेला दिसतोय बहुदा..

ठीक आहे...क्षमा करा..

बापूसाहेब's picture

17 Apr 2021 - 10:16 am | बापूसाहेब

छान उत्तर... मस्त खोपच्यात घेतलेत.!!!

आता खोपच्यात गुपचूप बसा. विचार करणं तुम्हाला सोसणार नाही.

अनुप ढेरे's picture

17 Apr 2021 - 10:34 am | अनुप ढेरे

मस्तं प्रतिसाद!

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Apr 2021 - 9:49 am | डॉ. सुधीर राजार...

आपण सांगितलेलं सत्य काही प्रमाणात माहीत असल्यानेच हा प्रहार व्यवस्थेवर आहे. डॉक्टरांवर नाही. व्यवस्था अशी असल्याने आपण सांगीतलेले प्रश्न हे गहन प्रश्न होतात. अशा अडचणी येऊनही चांगले दवाखाने सुरू आहेत, हे महत्वाचे. गैरप्रकारचे उदाहरणे सोडून. देवालये उभारुन मग रुग्णालये बांधा असे नाही, तर ऐवजी बांधावीत. तिथं दानपेट्या ठेवाव्यात. आपण उपस्थित केलेले प्रश्न सुटलेत तर सर्व आलबेल होईल अशी आशाच केली आहे लेखात. सभेत टाळ्या मिळवणारा मी नेता नाही की पुढे होण्याचा विचार नाही. धन्यवाद.

देवालय ही धार्मिक बाब आहे लोकांचे श्रद्धा स्थान आहेत.
लोकांसाठी पवित्र जागा आहेतं
त्यांचा आणि hospital च काय संबंध .
दवाखाने आहेत ही गोष्ट खरीच आहे पण त्याचे आणि मंदिरातील देणगी चा काय संबंध.
हॉस्पिटल बांधायचे आहे लोकांनी मदत करावी असे आव्हान कोणी केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही.
कोणत्या संस्थे नी समाजाच्या हितासाठी दवाखाने उघडायचे काम हाती घ्यावे.
आणि देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील.
ज्यांना काहीच करायचे नाही फक्त टीका करायची आहे ती लोक च मंदिर बांधण्या साठी प्रयत्न करण्या पेक्षा दवाखाने बांधावेत असे वांझोट आव्हान करत असतात.
पण पुढाकार मात्र घेत नाहीत.
मंदिर ही मन स्वस्थ साठी गरजेची आहेत.
त्यांचे महत्व बिलकुल कमी नाही.
दवाखाने पण गरजेचे आहेत पुढाकार तर घ्या बघा लोक काय करतात ते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Apr 2021 - 10:33 am | डॉ. सुधीर राजार...

तसं व्हावं म्हणून तर लिहावं लागतं राव.

सुबोध खरे's picture

20 Apr 2021 - 1:37 pm | सुबोध खरे

देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील.

मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे.
हे मी वर लिहिलेलेच आहे.

रुग्णालयाच्या बांधकामासाठी देणगी देणारे बरेच मिळतात ( तेथील बाकावर/ विभागाच्या प्रवेशद्वारावर आमच्या आईचे नाव लिहून द्यायच्या अटीवर का होईना)

पण रुग्णालयाच्या रोजच्या खर्चासाठी देणगी मिळवणे हि कर्म कठीण गोष्ट आहे आणि यासाठी समाजसेवा करणार्यांना त्याची कल्पना आहे.

यामुळे तिरुपती किंवा पुट्टपार्थि सारखी मोठी देवालये सोडल्यास मोठ्या प्रमाणावर सेवा देणारे धर्मार्थ दवाखाने उघडणे हि प्रचंड कठीण बाब आहे.

बाकी यंव करायला पाहिजे त्यंव करायला पाहिजे हे कळफलक बडवायला फार कष्ट लागत नाहीत.

की लोक मंदिरात दान करतात तसेच लोक हॉस्पिटल किंवा गरीब लोकांच्या मदतीसाठी दान करतात.
फक्त कोणी तरी पुढाकार घेवून करणारा हवा.
हॉस्पिटल बांधण्यासाठी देणग्या जमा होतील पण ते चालवणे मुश्किल आहे हे खरे च आहे.
अक्कल कोट च्या स्वामी च्या मठात रोज दोन वेळचे जेवण दिले जाते.अगदी फुकट आणि उत्तम दर्जा चे .
मी ते अनुभवले आहे.
किती तरी शे लोक रोज जेवण करतात.
म्हणजे मंदिर काहीच करत नाहीत हे काही पटण्यासारखे नाही.
अन्न छत्र खूप मंदिर चालवतात.
शीख लोकांचे लंगर हा प्रकार पण धर्माच्या छत्र छायेत च चालू असतो.
कोणी च उपाशी राहत नाही त्या मुळे.
अन्न दान हे श्रेष्ठ दान समजले जाते.
मंदिर बांधू नका हॉस्पिटल बांधा हा सल्ला काही पटत नाही.
हॉस्पिटल बांधाच पण त्या साठी मंदिर नको हे काय ?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2021 - 10:20 am | डॉ. सुधीर राजार...

आपल्याला बर्‍याच गोष्टी माहीत आहेत हे खरं आहे. पण आपण अनेक कायदे करतो, बदलतो हे पण आपल्याला माहीत असेल. असाच हा कायदा बदलून देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात.

सुबोध खरे's picture

19 Apr 2021 - 8:18 pm | सुबोध खरे

देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात.

हिंदू देवालयांवर सरकारी नियंत्रण आहे तसे इतर धर्माच्या देवालयांवर नाही. त्यांना प्रथम विचारा कि आपण येत असलेल्या पैशाचा विनियोग धर्मप्रसार सोडून इतर चांगल्या कामासाठी का करत नाही?

तसेच सरकारला हे विचारा कि हिंदू देवालयांकडे पैशाचे आपण काय केले? आणि त्या पैशाचा सुविनियोग करता येत नसेल तर हिंदू देवालयांवरील सरकारचे नियंत्रण तरी हटवा

हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?

बापूसाहेब's picture

19 Apr 2021 - 8:54 pm | बापूसाहेब

हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?

निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक लोकांसाठी स्क्रिप्ट लिहितायेत

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

20 Apr 2021 - 10:31 am | डॉ. सुधीर राजार...

बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो. आपणही शेवटी तेच केलं. अशा गोष्टीतून बाहेर पडून माणूस म्हणून विचार करू. कोणी मागासलेले असेल तर तो का मागासलेला? मला पण मागासलेला असू द्या, असं आपण म्हणाल का? आपण माणूस म्हणून जगू या. ज्याला मागासलेले रहायचे असेल तिथं आपला इलाज नाही.

सुबोध खरे's picture

20 Apr 2021 - 1:40 pm | सुबोध खरे

बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो.

बोलण्यासारखं/ लिहिण्यासारखं भरपूर काही आहे.

तुमच्या प्रत्येक विधानाच्या चिंध्या उडवता येतील इतका भंपक लेख आहे.

सध्या मी केवळ त्यातील एक भाग घेऊन लिहिलंय

हौसच असेल थोडा धीर धरा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

21 Apr 2021 - 11:58 am | डॉ. सुधीर राजार...

बोला. स्वागत आहे. पण मुद्दयाचं बोला. हिंदु मुसलमान वर येऊन चर्चा थांबवू नये. तुमची पहिली प्रतिक्रिया चांगली होती. वैचारिकही होती. नंतर तुम्ही मुद्दे सोडून शेवटी धर्मावर आलात. असो.

गुल्लू दादा's picture

22 Apr 2021 - 7:35 pm | गुल्लू दादा

प्रतिसाद आवडला.

मदनबाण's picture

18 Apr 2021 - 7:26 pm | मदनबाण

ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं.

ठाणेकरांसाठी असलेले जम्बो कोविड सेंटर धूळखात, ठाणेकरांची मात्र बेडसाठी वणवण :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Mogudu

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2021 - 10:21 am | डॉ. सुधीर राजार...

मला माहिती मिळाली ते दुसरे सेंटर असू शकते.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळातच, रेल्वेने आपल्या काही कंपार्टमेंट्सचे रुपांतरण हॉस्पीटलच्या वॉर्डमध्ये केले होते.
सध्याच्या काळात, बेड्सची कमतरता असताना या कंपार्टमेंट्सचा उपयोग करून घेतला गेला का? न्युज मध्ये कुठेच दिसले नाही.

सतिश गावडे's picture

18 Apr 2021 - 8:37 pm | सतिश गावडे

सरांचे विचार छान आहेत. मात्र ते व्यवहारात उतरण्याची शक्यता शुन्य आहे. त्यामुळे एक छान निबंध यापलीकडे या विचारांचा उपयोग नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2021 - 10:22 am | डॉ. सुधीर राजार...

आपली आजची व्यवस्था पाहता तुमचं म्हणणं सत्य आहे.