कुटचलनाची बाराखडी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
5 Apr 2021 - 8:11 pm

नमस्कार मंडळी
सध्या मिपावर बाराखडीची चलती आहे. त्यामुळे म्हटले आपणही एक जिलबी टाकूया.
तर "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्या शिकवावे , शहाणे करून सोडावे सकाळ जन" या समर्थांच्या उक्ती प्रमाणे मी हा धागा लिहितोय. कोणाच्या फायद्या तोट्याची जबाबदारी माझ्यावर नाही.अर्थातच प्रत्येकाने लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा किंवा अनुकरण करावा हे सांगणे नलगे.

पुढील माहिती विकीवरून साभार ---
तर १९८३ मध्ये अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी इ-कॅश नावाच्या अज्ञात क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली. नंतर,त्यानेच १९९५ मध्ये डिजीकॅशद्वारे कुटचलनाच्या पेमेंट्सच्या सुरुवातीच्या स्वरूपात याची अंमलबजावणी केली ज्यात एका अशा आज्ञावलीची आवश्यकता होती जी वापरकर्त्याला बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि/किंवा एकादी कूट किल्ली प्राप्तकर्त्याकडे पाठविण्यासाठी कामी येईल . यामुळे जारी करणारी बँक, सरकार किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे या व्यवहाराचा मग काढता येणार नाही.
याच धर्तीवर १९९८ मध्ये वी डाईंने "बी-मनी" चे वर्णन प्रकाशित केले, ज्याचे नाव निनावी, वितरित इलेक्ट्रॉनिक रोख प्रणाली आहे. त्यानंतर लवकरच निक निकोने बिट सोन्याचे वर्णन केले.बिटकॉइन आणि त्याचे अनुसरण करणार्या अन्य कूटचलनाप्रमाणेच बिट गोल्ड चे वर्णन इलेक्ट्रॉनिक चलन प्रणाली म्हणून केले गेले.
परंतु प्रथम विकेंद्रित कुटचलन , बिटकॉइन, २००९ मध्ये सतोशी नाकामोटो यांनी तयार केले होते.हा एक माणूस आहे कि एकत्र काम करणाऱ्या माणसांचा संघ हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याने त्याच्या प्रूफ ऑफ वर्क स्कीममध्ये एसएचए -२५६, एक क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शन वापरला ज्याची फोड करणे अत्यंत कठीण आहे. आजच्या घडीलाही हे सर्वात लोकप्रिय कूटचलन आहे.
एप्रिल २०११ मध्ये, विकेंद्रीकृत डीएनएस बनवण्याच्या प्रयत्नात नेम कॉईन तयार केले गेले होते, जे इंटरनेटची सेन्सॉरशिप खूप कठीण करेल. त्यानंतर लवकरच, ऑक्टोबर २०११ मध्ये, लिटकॉईन सोडण्यात आला.आणखी एक उल्लेखनीय क्रिप्टोकरन्सी, पीअर कॉईनने प्रूफ-ऑफ-वर्क / प्रूफ-ऑफ-स्टेक हायब्रीड वापरले. त्यानंतर अशी अनेक कुटचलने येतच राहिली. साधारण ही सर्व कूट चलने ब्लॉक चेन तंत्र ज्ञानावर आधारित आहेत.
=====================विकी समाप्त================================
सध्या कायद्याने बऱ्याच देशात, ज्यात भारतही आलाच, कूट चलनावर बंदी आहे. कारण बॅंकिंगचे जे मूलभूत नियम आहेत, जसे की कोणत्या देशाने किती नोटा छापायच्या,देश देशातील चलनाचे गुणोत्तर काय असावे, ते कूट चालनास लागू पडत नाहीत. त्यामुळे रुपयाची /चलनाची किंमत घसरूनअर्थ व्यवस्था कोसळण्याची भीती सरकारला वाटते. परंतु तरीहि लोक याकडे आकर्षित होताहेत आणि गम्मत म्हणजे काही कंपन्या तुम्ही पगाराचा काही भाग कूट चलनात घ्याल का? असेही विचारू लागल्या आहेत. तसेच ही चलने खरेतर खरेदी विक्री करण्यासाठी (जसे आपण नोटा वापरतो) बनवली आहेत. पण लोक त्याचा शेअर मार्केट सारखा वापर करून फायदा कमावतात.

यासाठी बरेच ब्रोकिंग किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत, पण ते बरेचदा डॉलर मध्ये व्यवहार करतात त्यामुळे आपल्याला मर्यादा पडते. तरीही वझीर एक्स, बिट बीएनएस, बिनन्स असे काही ब्रोकर ही सेवा भारतीय रुपयात ही देऊ करतात. फक्त तुम्हाला थेट बँक खाते लिंक ना करता त्यांच्या वॉलेटमध्ये गूगल पे ने पैसे टाकावे लागतात आणि खरेदी विक्रीची रक्कम तिथेच जमा होते जी नंतर बँक खात्यात घेता येते.
ही सगळी एक्स्चेंज बारा महिने चोवीस तास चालू असतात आणि खरेदी विक्रीची रक्कम २ मिनिटात वॉलेटमध्ये जमा किंवा वजा होते. या सर्व ब्रोकरचे स्वतःचेही एक कुटचलन असते पण कोणत्याही ब्रोकरकडून तुम्ही कोणतेही कुटचलन घेऊ/विकू शकता. जसे कुठल्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वरून आपण कोणताही शेअर घेऊ शकतो तसेच.

पण सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नका हा नियम अर्थातच इथेही लागू होतोच. चला तर मंडळी - तुकोबा म्हणतात त्या प्रमाणे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, प्रमाणे लागा कामाला.(समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Apr 2021 - 10:34 pm | मुक्त विहारि

नावाच्या पुस्तकांत, बनावट चलन तयार करण्याच्या धंद्याचा उल्लेख आहे...

आभासी चलन, हे माझ्या दृष्टीने असेच एक बनावट चलन आहे..

सतिश गावडे's picture

5 Apr 2021 - 11:53 pm | सतिश गावडे

अजच्या घदीलही हे सर्वात लोकप्रिय कुत चलन आहे.
हे वाक्य मला कुणवीत आहे.

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 3:02 am | मुक्त विहारि

मोकलाया दाहि दिश्या

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 8:18 am | राजेंद्र मेहेंदळे

सं मं ना विनंती करतो की वरील वाक्य सुधारावे

कंजूस's picture

6 Apr 2021 - 7:01 am | कंजूस

खणखणीत.

या बाबतीत, तुर्तास, सरकारपेक्षा माझी समज कमी असल्याने, आय फॉलो भारत सरकार.

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 7:48 am | मुक्त विहारि

आपणच कूट चलन सुरू केले तर?

घरोघरी, टांकसाळ....

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 8:21 am | राजेंद्र मेहेंदळे

त्याचेही काही नियम व अटी आहेत, ते पाळुन आपणही "मायनिंग" म्हणजे चलन निर्मिती करु शकता. काही चलने आत्ताच्या घडीला मायनिंग अवस्थेत आहेत, आणि अजुन एक्स्चेंजवर सुचिबद्ध झाली नाहियेत. त्यात आपण भाग घेउन मायनिंग करु शकतो, आणि लवकरच ते चलन सुचिबद्ध झाले की त्यावेळच्या वाढलेल्या किमतीचा फायदा घेउ शकतो.

त्यामुळे घरगुती मायनिंग तुलनेने कमी फायद्याचे (आतबट्ट्याचे) आहे.

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 9:21 am | मुक्त विहारि

शिवाय, MLM, पद्धत अवलंबली की, आपल्या घरावर, सोन्याची कौले चढण्याची शक्यता जास्त आहे...

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 11:05 am | राजेंद्र मेहेंदळे

मुविकाका तुमचा प्रतिसाद खोचक नाही असे समजतो आहे. पण तुमचे म्हणणे खरेच आहे.

असे बघा---कोंबडे आरवले नाही तरी सुर्य उगवायचा काही थांबत नाही. त्यामुळे यात सहभागी व्हा किवा नको, जागतिक ट्रेंड आणि लोकप्रियता बघुन कूटचलनाला आज ना उद्या भारत सरकारही मान्यता देणारच. आणि आज ज्यांनी यात पैसे गुंतवले आहेत त्यांची अजुनच चांदी होणार आणी त्यांच्या घरावर सोन्याची कौले चढणार हे नक्की.

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 11:23 am | मुक्त विहारि

कारण, माझ्या मित्राने ही स्कीम घेतली आहे

मला पण, 1200-1500 डाॅलर गुंतवायला सांगत होता...

आता, तुम्ही दिलेली माहिती वाचता वाचता, हा विचार मनांत आला..

Not a penny more , Not a penny less, ह्या पुस्तकांत, माणसांच्या लोभीपणाचा फायदा घेणारा, किती विविध प्रकारे लुटू शकतो, हेच सांगीतले आहे...

आभासीचलनाचा जास्तीत जास्त वापर हा गैरधंद्यांसाठीच होत असावा, असा अंदाज आहे ...

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 1:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

तसे काही करु नका. पण असे बघा--

आज तुम्ही स्वतः एक ट्रेडींग खाते काढुन १०० रुपये गुंतवुन एक कूट चलन विकत घेतले. महिन्या दोन महिन्यात त्याचे ४०० रुपये झाले. तुमचे मुद्द्ल तुम्ही काढुन घेतले. आणि उरलेल्या भांडवलावर खेळत राहिलात की तुमची रिस्क काहीच नाही. फायदा झाल्यास उत्तम आणि न झाल्यास डोक्याला ताप करुन घ्यायचा नाही. काय म्हणता?

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 1:30 pm | चौथा कोनाडा

अगदी असेच कन्विन्स करत असतात !
ज्यांनी ४०० रुपयला घेतले त्यांचे काही का होईना !

मराठी_माणूस's picture

6 Apr 2021 - 11:31 am | मराठी_माणूस

हा एक माणूस आहे कि एकत्र काम करणाऱ्या माणसांचा संघ हे अजून गुलदस्त्यात आहे.

हे बर्‍याच लेखात वाचले आहे. हे ओळख लपवणे त्याला/त्यांना कसे काय शक्य झाले आहे आणि ओळख लपवण्याचे कारण काय असेल ?

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 12:16 pm | चौथा कोनाडा

जो पर्यंत कोपर्‍यावरचा भाजीवाले, चांभार, सायकल पंक्चरवाले ई लोक कुटचलनात पैसे घेत नाहीत तो पर्यंत हे काहीतरी(च) आयटी परकरण आहे हे नक्की !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 12:24 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सहमत.
समांतर पण बेभरोशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांनी त्यापासुन लांब रहाणे इष्ट.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 1:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण नोटबंदी होईपर्यंत पे टी एम, गुगल पे सारखी अ‍ॅप कितीजण वापरत होते? आणि त्यानंतर आलेल्या करोनामुळे तर लोक नोट घेणे टाळण्यासाठी आणि सुट्ट्या पैशंची कट्कट टाळण्यासाठी गुगल पे वापरु लागले. आणि आज ते सर्वमान्य आहे. तसेच भविष्यात कूट चलनाच्या बाबत होईल असे वाटते.

शेवटी आपण पैसा म्हणजे काय? या प्रश्नाशी येउन थांबतो. बँकेतल्या खात्यावर दिसणारे किवा पासबुकात दिसणारे आकडे म्हणजे पैसा? उद्या बँकेच्या सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड होउन ती रक्कम ० दिसु लागली तर आयुष्याची कमाई मातीमोल होइल की नाहि?
हातातील नोटा म्हणजे पैसा? जर रात्रीतुन पुन्हा नोटबंदी झाली तर त्या नोटा मातीमोल होतीलच कि नाही? मग कूट चलनानेच काय घोडे मारले आहे असा मुद्दा आहे.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 1:33 pm | चौथा कोनाडा

आणि त्यानंतर आलेल्या करोनामुळे तर लोक नोट घेणे टाळण्यासाठी आणि सुट्ट्या पैशंची कट्कट टाळण्यासाठी गुगल पे वापरु लागले. आणि आज ते सर्वमान्य आहे. तसेच भविष्यात कूट चलनाच्या बाबत होईल असे वाटते.

युक्तिवाद पटण्याजोगा नाही. गुगल पे ई, हे राजमान्य चलनाच्या देवघेवीसाठी (मोड ऑफ ट्रान्सफर) वापरले गेले, राजमान्य नसलेले चलन निर्माण करण्यासाठी नाही !
त्यामुळे आपण म्हणता तसे काही होण्याची सुतराम शक्यता नाही !

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2021 - 2:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

तसे बघायला गेले तर गुगल पे हा व्हिसा किवा मास्टर सारखा गेट वे आहे हे बरोबर. पण भारतात त्यालाही अधिकृत मान्यता नाहीच. कारण तेथे होणार्‍या व्यवहारांवर सरकार ला कमिशन मिळत नाही. पण मुद्दा असा की लोकांना जे वापरायला सोपे वाटते ते बाजारात चालणारच.

क्रिप्टो करंशी म्हणजे कुटचलन काय?

मला याबाबत शून्य ज्ञान असल्याने वाचत आहे.. मागे सहाना च्या धाग्यावर हि चर्चा झाली पण तेथे पहिले काही रिप्लाय डोक्यावरून गेल्याने पुढे वाचले नव्हते..

येथे वाचत आहे.. मी शक्यतो यात गुंतवणूक नाही करणार..
कारण काय काय करेल एक माणुस :-)
पण व्यवस्थित माहिती घ्यायला आवडेल.. तिकडचे काही वाचणीय रिप्लाय येथे पुन्हा दिले तरी आवडतील वाचायला..

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

ही चलने खरेतर खरेदी विक्री करण्यासाठी (जसे आपण नोटा वापरतो) बनवली आहेत. पण लोक त्याचा शेअर मार्केट सारखा वापर करून फायदा कमावतात.

या मुळेच हे कुटचलन कोणाच्या फायद्याचे आहे, कोण ह्याची आग्रहानं शिफारस करणार, कोण वापरणार आहे हे स्पष्ट होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Apr 2021 - 5:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोणी रिलायन्स किवा इन्फोसिस चा कर्मचारी किवा भाग धारक/मालक आहे म्हणुन तो समभाग घ्या अशी आग्रहाची शिफारस केली म्हणुन तो विकत घ्यायचा वेडेपणा कुणी करणार नाही. त्या कंपनीची बाजारातील कामगिरी किवा पत बघुनच आपण तो घेणार्/विकणार. शिवाय पैसे असुनही शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक न करणारे लोक आहेतच. तसेच या बाबतीतही होणारच. एकुणच कूटचलनात पैसे गुंतवावेत की नाही /ते वापरावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल. आग्रह नाही.

कुटचलन सन्खेने मर्यादीत असल्याने त्याचा जितका प्रचार वाढेल तसा प्रसार वाढतो व जितका प्रसार वाढेल तितका वापर व परिणामी भावही वाढतो त्यामुळे सोन्या सोबतच काहि गुन्तवणुक यात केली तर उत्तम परतावा मिळनार हे मात्र नक्कि.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2021 - 12:40 pm | चौथा कोनाडा

कुटचलनाची विश्वासार्हता हा फार मोठा प्रश्न येऊ शकतो. सोन्याबाबतीत तसे म्हणू शकत नाही !

गॉडजिला's picture

14 Apr 2021 - 8:33 pm | गॉडजिला

As of February 2020, Bitcoin was legal in the U.S., Japan, the U.K., and most other developed countries.

एखादी गोष्ट विश्वासार्ह तिथे बनते जिथे ती बेकायदेशिर नाहि आणि मोठे जनमत तिचे समर्थक आहे व ते सुरक्षित आहे.

कुटचलनाची किंमतच तिचा जनाधार विषद करते,
ते सुरक्षित आहे म्हणुन कुटचलन आहे,
ते अनेक देशात कायदेशीरसुध्दा आहे...

म्हणुन विश्वासार्ह अर्थातच ठरते.

खरी अड्चण ही आहे कि कोणीही स्वतःचे कुट्चलन लिलया सुरु करु शकतो त्यामुळे कोणते चलन अधिकृत हे ठरवणे अत्य्ंत मनोरंजक प्रकरण बनेल.

भारताने आधिक्रुत कुटचलन तयार करुन क्रांति सुरु करावी असे माझे मन बोलते

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2021 - 11:51 am | चौथा कोनाडा

भारताने आधिक्रुत कुटचलन तयार करुन क्रांति सुरु करावी असे माझे मन बोलते

+१
... हेच बोलतो.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2021 - 12:15 pm | चौथा कोनाडा

बीटकॉईन / कुटचलन यावर दै. लोकसत्ता मध्ये सुंदर साप्ताहिक सदर होते.
"बीटकॉईन दै. लोकसत्ता" असा गुगलशोध घेतल्यास ते सर्व लेख सापडतील !