सोसायटीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर मिष्टर गोडबोले राहतात हे बर्याच मेंबर लोकांना पण माहीती नाही.
हे पेंट हाउससुध्दा त्यांचं नाही .दुबईला असलेल्या जावयाचं आहे.
मिष्टर गोडबोल्यांनी गेल्या चाळीस वर्षात केलेला लांबचा प्रवास म्हणजे पिकेटरोडचं हनुमान मंदीर.
थोडक्यात गोडबोल्यांचं काही सांगायचं म्हणजे सगळं काही बेताबेताचं.
निकडवरी लेनमधे जन्म
आर्यन स्कूलमध्ये शिक्षण
काका लग्नात मध्यस्थी.
सासुरवाडी झावबाच्या राममंदीराजवळ .
शाखावाल्यांच्या ओळखीने बॅकेत नोकरी .
गिरगाव ब्राह्मण सभेच्या तळमजल्यावर बँकेचं ऑफीस.
सगळ्या गरजा गिरगावातच भागल्या.
अध्यात नाही आणि मध्यात नाही असं हुबेहुब म्हणावं असा यांचा स्वभाव.
लग्नानंतरही बायकोच्या फारशा अध्यात आणि मध्यात न गेल्यामुळे एकच अपत्य ,मुलगी झाली.
सौ. गोडबोले जरा लग्नाआधीपासून काहीतरी जुनाट दुखण्याने आजारी होत्या पण गोरेगावकर चाळीतल्या काकांनी हे यशस्वीरीत्या लपवल्यामुळे लग्न पार पडले होते. गोडबोले समंजस .त्यांनी बायकोची सेवा केली.बेबीताई चौथीत असतानाच सौ. गोडबोले गेल्या.
बेबीताईंची रवानगी आठवी यत्तेपर्यंत गोरेगावकर चाळीत झाली .
काकांनी परत स्थळ आणण्याचा सपाटा लावला पण या वेळी गोडबोल्यांनी नकार देऊन पुढचा पेचप्रसंग टाळला.
एकाच माणसाकडून लागोपाठ दोनदा फसण्याइतके भोळसट नक्कीच नव्हते.
***************************************************************
जसं घरचं तसं नोकरीचं .काही खास नाही
मूळात त्यांचं खातं दहा बारा जणांच. बँकेचं ऑफीस .पण बँक गोडबोल्यांनी कधीच पाहीली नाही .त्यांचं खातं स्टेशनरी खातं होतं . निवृत्तीच्या काठावर आलेल्या अधिकार्यांचा पार्कींग लॉट म्हणून हे खातं फेमस होतं .त्यामुळे प्रत्येक मॅनेजरची शेवटची सहा सात महीन्याची नोकरी त्यांनी बघीतली. बॅकेच्या खर्या व्यवहाराशी त्यांचा संबंध कधीच न आल्यामुळे म्हणा किंवा कसंही म्हणा परीक्षा द्याव्या,बढती मिळवावी ,असं त्यांना बहुतेक कधीच वाटलं नसावं. हा आपला एक अंदाज. अगदी संथ गतीनी चालणारं खातं .
एरवी कामाचा बोजा असलेली एखादी हेवी शाखा टाळणार्या बायका सुध्दा या स्टेशनरी (गोडबोले या खात्यात कामाला लागले तेव्हा या खात्याचं नाव सादीलवार होतं)विभागात काम करण्यासाठी नाखूष असायच्या.
नाही म्हणायला सर्वायकल स्पाँडीलायसीसनी त्रस्त असलेल्या किंवा टोटल नी किंवा हीप रीप्लेसमेंट साठी योग्य अशा चारपाच बायका खात्यात होत्या.
बाकी बॅकेत हमखास आढळणारे फुलांचे ताटवे इकडे नव्हतेच.
नेहेमीप्रमाणे गोडबोल्यांची काहीच हरकत नव्हती.हट्ट नव्हता. राग नव्हता. रुसवा नव्हता.आकस नव्हता..........
............आणि गोडबोले अगदीच अरसीक होते अशातला भाग नव्हता.
मार्गशिर्षाच्या प्रत्येक गुरुवारी ते पाण्याची बाटली भरायला चार जिने उतरून ब्रॅंच ऑफीसच्या कूलरवर जायचे. हा हळूवार आंबटपणा फार म्हणजे फार मोठ्ठा अगाऊपणा वाटून ते स्वतःलाच शिक्षा म्हणून ते संक्रांती शिवाय परत ब्रँचमध्ये जायचे नाहीत....
****************************************************
सेवानिवॄत्तीच्या दिवशी मॅनेजरांचा मुलगा अमेरीकेतून यायचा होता म्हणून ते नव्हते.कुठल्यातरी टूर्नामेंट चालू असल्याने तरुण मंडळी सकाळपासून गायब होती .बाया बापड्या तर सेंड ऑफ वगैरेला कधीच थांबत नसतात.गोडबोल्यांचा हिशोब घेऊन अकाउंट्स आणि एस्टॅब्लीशमेंटचा ऑफीसर कधीच त्यांच्या डिपार्टमेंटला येऊन बसला होता.कँटीनवाला त्याचा हिशोब घेऊन गेला .गोडबोल्यांनी तयारी असावी म्हणून आदल्या दिवशी रात्री भाषण पाठ केले होते .बसल्या बसल्या ते त्या भाषणाची तयारी करत होते.साडेपाच वाजता कोणीच दिसेना तेव्हा अकाउंट्सवाल्यानी फोन फिरवायला सुरुवात केली.गोडबोल्यांना निरोप देण्यासाठी ऑफीसात कोणी म्हणून नव्हतं. ज्या डिपार्टमेंटचं ऑडीट रेटींग कमी होऊ नये म्हणून गोडबोल्यांनी पंचवीस वर्षं नोकरी केली त्या डिपार्टमेंटकडे एकदा शेवटची नजर टाकून गोडबोले जागचे उभे राहीले.ऑफीसरनी त्यांना हातात एक लखोटा दिला. फुलांचा गुच्छ दिला .ऑल द बेस्ट म्हणाला. आधीची काहीच ओळख नसल्यामुळे काय बोलावे हे त्याला पण कळेना.त्यांना ओळखणार्यांना ते असले नसलेचा काही फरक नव्हता .ऑफीस त्यांच्या सारख्या साध्या माणसांच नव्हतं.
गोडबोल्यांचे डोळे भरून आले.ऑफीसात वाटण्यासाठी आणलेले पेढे तसेच शिल्लक राहीले होते.
गोडबोल्यांनी सेंड ऑफचे टाईप केलेले भाषण एका पाकीटात ठेवले.पेढ्यांचा खोका आणि भाषणाचे पाकीट साहेबांच्या टेबलावर ठेवून गोडबोले निघाले. टेबलाला हात लावून शेवटचा नमस्कार केला.हातातला फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवला.
गोडबोले निवृत्त झाले.
***************************************
सोसायटीत दोनच पेंटहाऊस फ्लॅट आहेत आणि त्यापैकी एकात गोडबोल्यांसारखा दिसणारा माणूस रहात असेल असा विचार सहजासहजी कोणाच्याही मनात येणार नाही .त्यांची मेंबरांशी ओळख नावापुरतीच.ओळख होती पण सलगी नव्हती.सलगी नव्हती पण दुस्वासही नव्ह्ता.भिडस्त भाबडा स्वभाव. भोळसट पण मठ्ठ नक्की नाही.व्यक्तीमत पण फारसं छाप पडेल असं नाही .बेताचाच रंग बेताचाच अंग.सगळं काही बेताबेताचं.भाबडे भोळसट . पण मठ्ठ नक्कीच नाहीत.आपलं अ-दखलपात्र आयुष्य कसं व्यतीत करायचं हे त्यांनी फार पूर्वीच ठरवलं होतं.
दिसायला मि.गोडबोले हे कोणाचेही काका शोभावेत असे दिसतात.
सावंतांना वाटतं ते खाडीलकरांचे मामा आहेत. तिसर्या मजल्यावरच्या कराळ्यांना ते अय्यरचे काका वाटतात.
अय्यरना वाटतं की ते खाडीलकरांचे बंधू आहेत.
सकाळी आया बाया ढगळ अघळपघळ गाऊन घालून गेटवर मुलांना सोडायला येतात तेव्हा गोडबोले घरात असतात त्यामुळे सोसायटीतल्या आंट्या पण गोडबोल्यांना ओळखत नाहीत.
सगळ्यात महत्वाचं कारण नंबर तीन : मिष्टर गोडबोल्यांकडे काम करणार्या सुधाबाई फक्त त्यांच्या कडेच काम करतात.
लुक्रेटीव्ह पॅकेजची ऑफर मिळून सुध्दा त्यांची मिष्टर गोडबोल्यांशी निष्ठा अढळ आहे.
सोसायटीचा वॉचमन आणि सुधाबाई यांनाच मिष्टर गोडबोले एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून माहीती आहेत.
सुधाबाईंचं ठीकच आहे त्या काम करतात त्यांच्याकडे .वॉचमनला खास राग आहे मिष्टर गोडबोल्यांवर .त्याला वाटतं की सुधाबाईंना गोडबोल्यांकडे कामाच्या मानाने जास्तच वेळ काढतात.
आक्षेपाचं कारण ते ही नाही .वॉचमनला संशय आहे की गोडबोले सुधाबाईंचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यामुळे सुधाबाई त्याच्याकडे नजर वळवून बघत पण नाहीत.
सुधाबाईंना वॉचमन काय म्हणतो याची काही पडली नाहीय्ये.
त्यांना गोडबोले आवडतात.आवडतात म्हणजे अगदी 'तस्से 'आवडतात.त्यांनी काहीतरी आगळीक करावी असं त्यांना रोज वाटतं .
पण त्या हॉलमध्ये आल्या की मि.गोडबोले बाल्कनीत उभे राहतात आणि त्या बेडरुममध्ये आल्या की ते टेरेस मध्ये जाउन उभे राहतात.
टेरेस हा सुधाबाईंचा एक चिंतेचा विषय आहे. मि.गोडबोले आजकाल जास्तच टेरेसमध्ये उभे राहतात.
गेल्या तीन महिन्यात जास्तच. समोरची ढमाली राह्यला आल्यापासून गोडबोल्यांच्या टेरेस वार्या फार वाढल्या आहेत. सुधाबाईंचा असूयेनी जळफळाट वाढतच चालला आहे.बेबीताईंना त्यांनी वचन दिलं आहे की त्या काकांकडे लक्ष देतील .दर शुक्रवारी त्या बेबीताईंना फोन पण करतात.
पण आता या ढमालीचं काय करायचं हा मोठ्ठा प्रश्न सुधाबाईंसमोर होता.
मिष्टर गोडबोल्यांना हे काही समजत नव्हतं अशातला भाग नव्हता पण त्यांच्या फँटसीत सुधाबाईंना काही रोल नव्हता.
मागे एकदा काही दिवसापूर्वी गोडबोले आजारी होते तेव्हा सुधाबाईंनी गोडबोल्यांची खूप सेवा केली होती.
एकदा तर मिष्टर गोडबोल्यांना भरवताना भारीच जोराचा ठसका लागला .सुधाबाईंनी आपल्या हाताच्या आधारावर गोडबोल्यांना बसतं केलं आणि पाणी पाजलं.
या गडबडीत काही चुटपुटते उबदार मांसल स्पर्श गोडबोल्यांना झाले आणि ठसका थांबला पण श्वास काही क्षण वरच्यावरच थांबून जीव गुदमरला.
संध्याकाळी बेबीताईंना त्यांनी ठसक्याची गोष्ट सांगून वर बजावलं की "बेबीताई फार आठवन करू नका इकडे ठसका जोरात लागतो."
(खूष होऊन बेबीताईंनी त्यांच्यासाठी दुबईहून खास फूड प्रोसेसर पाठवला होता .)
सुधाबाईंना फूडप्रोसेसर नकोच होता .
त्यांच्या स्वप्नात त्या गोडबोल्यांबरोबर दुबई बघायच्या.
पण आता या ढमालीमुळे त्या गोड स्वप्नात थोडीशी खरखर यायला लागली होती .
काय करावं बरं ?
असा विचार करता करता त्यांना एक आयडीया सुचली.मनाशी विचार पक्का करून त्यांनी ढमालीच्या फ्लॅटची बेल वाजवली.
पंधरा मिनीटात ढमालीची चार कामं पक्की करून सुधाबाई बाहेर पडल्या तेव्हा त्या मनाशीच हसत होत्या .
मिष्टर गोडबोल्यांवर नजर ठेवणं आता फार सोपं झालं होतं.
*************************************************************
अपूर्ण....
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 4:50 pm | मेघना भुस्कुटे
काका, कुठून आणता तुम्ही हे सगळं? (तेंडुलकरांच्या 'हे सर्व येते कुठून'च्या चालीवर)
आणि त्याहून महत्त्वाचं -
हे तरी पुरं करणारात का?
14 Apr 2009 - 5:05 pm | आनंदयात्री
अगदी असेच म्हणतो. मस्त कथा .. पण पुर्ण मात्र नक्की करा.
14 Apr 2009 - 5:14 pm | श्रावण मोडक
पूर्ण करा.
14 Apr 2009 - 5:35 pm | धमाल मुलगा
सहमत!!!!!
रामदासकाका,
मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही नक्की कोणत्या विषयावर असं फर्मास लिहू शकत नाही? :)
काय तिच्यायला, तो देव तरी की नाही, एकेकाला काय भरभरुन प्रतिभा वाटतो, हातात लेखणी घेतली अश्या माणसांनी की झरझर नुसतं एक से एक प्रकारचं लेखन होऊन जातं. नाहीतर आम्ही....हातात लेखणी घेतलीच चुकुन कधी तर ती धरली जाते विडीसारखी...आणि लिहिण्यापेक्षा ती जळतेच जास्त विडीसारखीच :)
काका, वेलकम ब्याक !!!!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
14 Apr 2009 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार
धम्मुशी सहमत. अतिशय मस्त सुरुवात केली आहेत.
आता ही कथा आणी मागच्या क्रमश: पण लवकर संपवा हि विनंती.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
18 May 2012 - 3:40 pm | किचेन
तुम्हि हेच प्रतिसाद स्व्तःला आहेत अस समजुन आधिच्या कथा पुर्ण करा.
14 Apr 2009 - 5:51 pm | रामदास
जिगरमा बडी आग है....
15 Apr 2009 - 9:53 am | दशानन
थोडी आग इकडे पण द्या ;)
धम्याशी सहमत.
14 Apr 2009 - 4:50 pm | अवलिया
लै भारी....लवकर पूर्ण करा !!! :)
-- अवलिया
14 Apr 2009 - 4:58 pm | शितल
सहमत. .:)
15 Apr 2009 - 6:30 am | अनिल हटेला
सहमत !!
पू भा प्र..... :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
14 Apr 2009 - 4:56 pm | बाकरवडी
अजब कथा .
उत्सुकता ताणू नका,पुढचे भाग टाका लवकर !
३ रा भाग (सेवानिवॄत्तीचा ) मस्तच !
14 Apr 2009 - 4:58 pm | स्वाती दिनेश
ढमालीकडची कामं लवकर येऊ देत.. ह्या वेळी जरा भराभर लिवा..
सुरूवात जोरदार झालेली आहे हेवेसांनल.
स्वाती
14 Apr 2009 - 5:01 pm | मुक्तसुनीत
कथा वाचताना जयवंत दळवींच्या लिखाणाची थोडी आठवण झाली. मात्र, दळवींच्या लिखाणातल्या झपाटलेपण , विकृती या गोष्टींच्या चित्रणाचा (आतापावेतो) मागमूस दिसत नाही आहे.
लिखाणात एकाच वेळी खुसखुशीतपणा आहे पण त्यामागे कारुण्य दडल्यासारखे मला वाटले. "गारंबीच्या बापू" मधल्या विठोबा सामलासारखा तर गङबोल्यांचा शेवट होत नाही ना , अशी एक भीती चाटून गेली. पण नाही ; कथेत बहुदा गडबोल्यांसारख्या कलरलेस-टेस्ट्लेस्-ओडरलेस माणसाला पेंटहाउस मधे टाकून गरागरा फिरवायचा लेखकाचा विचार दिसतोय :-)
पुढे वाचायला उत्सुक आहे.
15 Apr 2009 - 6:13 am | विंजिनेर
थोडे काही दळवी, बरेचसे शन्ना...
खुसखुशीतपणा उतरलाय छान..
---
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
14 Apr 2009 - 5:03 pm | निखिल देशपांडे
सुरवात मस्त झालीये....मिस्टर गोडबोले चे चित्र मसत्च उभे केले आहे!!! आता पुढचा भाग लवकर टाका
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
14 Apr 2009 - 5:12 pm | पहाटवारा
प्रतिभावान माणसे मूडी असतात असे म्हणतात. तेव्हा तुमचा मूड जास्तीत जास्त टिकुन राहो अन हे लिखाण अन बाकिचे जुनेहि लवकरच पूर्ण होवो हि आशा करतो.
14 Apr 2009 - 5:18 pm | चतुरंग
प्रातिनिधिक 'गोडबोले' आवडले. सरळ, साधं, जवळजवळ रंगहीन आयुष्य जगतानाच त्या माणसालाही भावना असतात हे आजूबाजूचे विसरुन जातात.
गोडबोले-सुधाबाई-ढमाली हा त्रीकोण कसा रंग दाखवतो हे आता बघायचे.
मानवी स्वभावातल्या वैचित्र्यांना पुन्हा एकदा रिंगणात आणून रिंगमास्टर रामदास त्यांच्याकडून कशी आणी कोणती कामं करुन घेताहेत हे पहाण्याची उत्सुकता लागली आहे! :)
(अवांतर - गोडबोल्यांचा हात मधेच सोडू नका! ;) )
चतुरंग
14 Apr 2009 - 5:35 pm | नितिन थत्ते
सुंदर प्लॉट. पुढचे भाग लवकर येउद्या.
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 Apr 2009 - 5:36 pm | चकली
मस्त सुरुवात.
चकली
http://chakali.blogspot.com
14 Apr 2009 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
गोडबोल्यांच्या प्रसंगावरुन एका सेवानिवृत होणार्या माणसाचा प्रसंग आठवला. अशीच त्यानेही भाषणाची तयारी वगैरे केली आणि दुसर्या दिवशी दोघा-चौघांनी निरोप दिला पण अतिशय औपचारिकता म्हणून, इतक्या वर्षाच्या सहवासानंतर सहकार्यांनी आपल्याविषयी काही भावना प्रगट कराव्यात असा साधा विचार या प्रसंगी असतो, चुकल्या-माकल्याबद्दल काही बोलता येते. पण तसे काहीच नसेल तर, असा प्रसंग कोणावरच नको इतकेच. असो,
लवकर टाका बॉ ! दुसरा भाग.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2009 - 6:07 pm | ठकू
एकदम खुसखुशीत लिहिलं आहे. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
14 Apr 2009 - 6:33 pm | विनायक प्रभू
प्लॉट नुसतेस सुरुवातीची डेवलपमेंट करुन सोडुन दीलेत.
आता हा एक नविन
14 Apr 2009 - 7:39 pm | संजय अभ्यंकर
सहमत!
रिंगमास्टर रामदास! थोड मनावर घ्या!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Apr 2009 - 6:38 pm | मदनबाण
मस्तचं... लवकर टंका बरं पुढचा भाग.
(स्वीटबोले):)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 6:46 pm | प्राजु
लेखन शैलीचे तर आम्ही फॅनच आहोत.
आत हे लवकर पूर्ण करा. मध्येच गाडी थांबवू नका.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Apr 2009 - 7:26 pm | संदीप चित्रे
लवकर पूर्ण करा ... वाट बघतोय.
14 Apr 2009 - 10:54 pm | नंदन
आहे. सुरूवात झकास झालीय. पुढच्या भागांची वाट पाहतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Apr 2009 - 7:20 pm | शाल्मली
पहिला भाग छानच!
आता पुढचा भाग लवकर टाकाच. पुढे काय होईल याची उत्सुकता आहे..
--शाल्मली.
14 Apr 2009 - 7:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच, आवडली ही पण गोष्ट! पण इब्लिस चाचा-चाचीची गोष्टही काहीशी अर्धवट सोडलीत ... म्हणून ही अर्धवट वाक्यांची प्रतिक्रिया...
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
14 Apr 2009 - 7:35 pm | लिखाळ
लै भारी .. जोरात सुरुवात..
-- लिखाळ.
14 Apr 2009 - 7:40 pm | मराठमोळा
सुंदर लेख आहे.
एक छान लघुपट तयार होईल यावर.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
14 Apr 2009 - 8:11 pm | baba
काका, सुरवात तर भन्नाट झालिये.... आता पुढचा भाग लवकर टाका..
16 Apr 2009 - 10:42 pm | विसोबा खेचर
काका, सुरवात तर भन्नाट झालिये.... आता पुढचा भाग लवकर टाका..
हेच बोल्तो..
तात्या.
14 Apr 2009 - 10:35 pm | पिवळा डांबिस
सुरवात नेहमीप्रमाणेच छान झालीये....
पुढील कथानकाची कल्पना करत बसत नाही कारण मग तुम्ही एक जोरात बुक्का मारता. तो सहन होत नाही...
फक्त वाट पहाणे आमच्या हातात आहे, तेच करतो!!:)
(अवांतरः इथे आमच्या मागच्या कंपनीमध्ये एक गोडबोले नांवाची किंचित स्थूल स्त्री होती. तिला सगळे जण "गॉड-बॉल" म्हणायचे!!:))
17 Apr 2009 - 11:01 am | विनायक प्रभू
पिडां ना समाकाराची मंडळी लगेच दिसतात.
काय की बॉ?
14 Apr 2009 - 10:36 pm | अंतु बर्वा
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत आहे......
15 Apr 2009 - 12:23 am | रेवती
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
आत्तापर्यंतची ष्टोरी ग्रेट!
रेवती
15 Apr 2009 - 3:33 am | घाटावरचे भट
मस्तच!!! पण ही तरी ष्टोरी पूर्ण करा बरं का काका...
15 Apr 2009 - 11:15 am | visshukaka
एक्द्म झक्कास
15 Apr 2009 - 2:41 pm | वाहीदा
काका तुम्ही सिध्दहस्त लेखक आहात ह्यात वाद नाही पण परत एकदा 'अपूर्ण....' रहाणार का ही कथा देखील ?? लेखक मुडी असतात यावर हि वाद नाही...पण मुड आणा हो कुठून तरी अन करा ना पूर्ण !! :-)
बाकी मुक्तसुनीत च्या विचारांशी आम्हीही सहमत -- कथेत बहुदा गडबोल्यांसारख्या कलरलेस-टेस्ट्लेस्-ओडरलेस माणसाला पेंटहाउस मधे टाकून गरागरा फिरवायचा तुमचा विचार दिसतोय :-)
सेवानिवॄत्तीचा भाग अतिशय सुंदर !!
~ वाहीदा
6 Nov 2010 - 12:33 am | सुनील
कथा पूर्ण कधी करणार?
सदर कथा दीपलक्ष्मीच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे, असे कळते.
8 Apr 2011 - 7:03 pm | असुर
गोडबोले आणि सुधाताई
किंवा
गोडबोले आणि ढमाली
रामदासकाका, आगे क्या हुआ? गोडबोले को रिकामा छोडकर काका मटका खेलने निकल गयेले है! इस गोडबोले का कुछ तो होने को मंगताय!!!
ही गोष्ट खंप्लिट वाचायला मिळणार का?
-- (प्रतिक्षाग्रस्त) असुर
15 May 2012 - 5:19 pm | बॅटमॅन
लै जबरा. ऑस्सम :)
15 May 2012 - 7:05 pm | तिमा
लेखन व सर्व प्रतिक्रिया छान आहेत. न लिहिलेल्या सुद्धा! कारण त्यातच मिपाकरांची बौद्धिक प्रगल्भता दिसून येते.
15 May 2012 - 9:48 pm | चिगो
काका, जबरा झालाय कथा-आरंभ.. पुढे?
(पुढचा भागाच्या प्रतिक्षेत / शोधात) चिगो
24 Apr 2016 - 1:39 pm | संजय पाटिल
लग्नानंतरही बायकोच्या फारशा अध्यात आणि मध्यात न गेल्यामुळे एकच अपत्य ,मुलगी झाली. ???
काका, काय हे ?? LOL
25 Apr 2016 - 10:40 am | हेमंत लाटकर
रामदास, मस्त लेख. पुढचा भाग लवकर टाका!
25 Apr 2016 - 10:42 am | हेमंत लाटकर
रामदास, मस्त लेख. पुढचा भाग लवकर टाका!
25 Apr 2016 - 10:44 am | सुनील
दुसरा भाग टाकूनही ७ वर्षे झालेली आहेत!!! शोधा म्हणजे सापडेल!!
25 Apr 2016 - 11:51 am | हेमंत लाटकर
काय रामदास, दुसरा भाग तर लैच भारी बुवा !
25 Apr 2016 - 12:24 pm | मनिम्याऊ
http://www.misalpav.com/node/7723
25 Apr 2016 - 5:30 pm | पुंबा
लई भारी हो.. पुभाप्र.. लवकर येऊ द्या..