असेच एक महाराज.. औंध संस्थानचे 'पंतप्रतिनीधी' ज्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर त्यांच्या शालेय शिक्षणासाठी होते. ते ही असेच सहृदय राजे होते. ग.दि.मां. नी लिहीलेला औंधाचा राजा हा धडा आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होता.
शाहू महाराजांवर इतर अनेक हृद्य लेखने उपलब्ध आहेत. काही 'आंतरजालावरील' दुवे मिळाले तर अवश्य कळवू.
पुण्याचे पेशवे
आठवते त्या प्रमाणे औंधच्या पंतप्रतिनिधींनी अनेकांना मदत देऊन वर आणले. गदीमां प्रमाणेच दुसरे नाव हे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आहे. मला वाटते किर्लोस्करवाडीची मूळ जागा पंतप्रतिनिधींनी त्यांना दिली ज्यावर किर्लोस्करांचे साम्राज्य तयार झाले.
अवांतरः औंधच्या राजांना ऐतिहासीक वस्तू गोळा करण्याचा छंद होता. तेथे डोंगरावर आणि पायथ्याला यमाई देवीचे मंदीर आहे. डोंगरावर जाताना मधल्या भागात बस्तुसंग्रहालय आहे ते पहाण्यासारखे आहे. आठवते त्या प्रमाणे राअजा रविवर्माची बरीच चित्रे तेथे पहायला मिळतात.
औंधचे एक राजे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: अनेक चित्रे काढली आहेत. ती पण या संग्रहालयात आहेत. त्यांनी स्वतः काढलेले 'तिन संध्या : प्रातःसंध्या,मध्यान्हसंध्या, सायंसंध्या यांची चित्रे' तसेच गायत्री देवीचे चित्र हे ही फार उत्तम आहे.
मी ते संग्रहालय स्वतः बघितले आहे. फार छान आहे ते.
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
10 Jan 2008 - 9:07 pm | सुधीर कांदळकर
आहे. आवडले. धन्यवाद.
10 Jan 2008 - 9:15 pm | सुनील
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे दोन महाराज - एक कोल्हापूरचे शाहू आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव!
लेख आवडला हे सांगणे नलगे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2008 - 9:40 pm | llपुण्याचे पेशवेll
असेच एक महाराज.. औंध संस्थानचे 'पंतप्रतिनीधी' ज्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर त्यांच्या शालेय शिक्षणासाठी होते. ते ही असेच सहृदय राजे होते. ग.दि.मां. नी लिहीलेला औंधाचा राजा हा धडा आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होता.
शाहू महाराजांवर इतर अनेक हृद्य लेखने उपलब्ध आहेत. काही 'आंतरजालावरील' दुवे मिळाले तर अवश्य कळवू.
पुण्याचे पेशवे
19 Feb 2008 - 5:37 pm | विकास
आठवते त्या प्रमाणे औंधच्या पंतप्रतिनिधींनी अनेकांना मदत देऊन वर आणले. गदीमां प्रमाणेच दुसरे नाव हे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आहे. मला वाटते किर्लोस्करवाडीची मूळ जागा पंतप्रतिनिधींनी त्यांना दिली ज्यावर किर्लोस्करांचे साम्राज्य तयार झाले.
अवांतरः औंधच्या राजांना ऐतिहासीक वस्तू गोळा करण्याचा छंद होता. तेथे डोंगरावर आणि पायथ्याला यमाई देवीचे मंदीर आहे. डोंगरावर जाताना मधल्या भागात बस्तुसंग्रहालय आहे ते पहाण्यासारखे आहे. आठवते त्या प्रमाणे राअजा रविवर्माची बरीच चित्रे तेथे पहायला मिळतात.
19 Feb 2008 - 9:07 pm | llपुण्याचे पेशवेll
औंधचे एक राजे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: अनेक चित्रे काढली आहेत. ती पण या संग्रहालयात आहेत. त्यांनी स्वतः काढलेले 'तिन संध्या : प्रातःसंध्या,मध्यान्हसंध्या, सायंसंध्या यांची चित्रे' तसेच गायत्री देवीचे चित्र हे ही फार उत्तम आहे.
मी ते संग्रहालय स्वतः बघितले आहे. फार छान आहे ते.
पुण्याचे पेशवे
1 Feb 2008 - 9:56 pm | प्राजु
आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज...
त्यांच्या खूप गोष्टी ऐकून आहे मी. आपल्या लेखाने लहानपणी वाचलेल्या कथांना उजाळा मिळाला. धन्यवाद.
-(कोल्हापूरी)प्राजु
19 Feb 2008 - 11:51 am | तळेकर
प्रबोधनकार ठाकरे. यांच्याबद्दलही मला फार आदर आहे. त्यांच्यासंबंधात काही ऐकयला / वाचायला मिळाले तर ----- ?