तू कितीसा उजेड पाडलास?

उपयोजक's picture
उपयोजक in जे न देखे रवी...
5 Mar 2021 - 8:30 am

सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा
बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला.
सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का?

आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची
म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?"
गरज काय दुसर्‍याच्या खाजगी जीवनात डोकावायची?

४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला?
की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला?
बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला?

आहेस का तू जागतिक किर्तीचा तज्ज्ञ किंवा प्रतिभावंत?
नसशील तर का होतात तुला असे अस्वस्थतेचे जंत?
असेल वेळ एखाद्याला त्याची तुला का रे इतकी खंत?

ऑनलाईन दिसतो; म्हणजे रिकामटेकडा समजलास?
तू ऑफलाईन राहून कोणता हॅलोजनचा दिवा लावलास?
सतत ऑफलाईन राहून तू कितीसा उजेड पाडलास?

:) :) :)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:52 am | मुक्त विहारि

सहमत आहे

सॅगी's picture

5 Mar 2021 - 9:01 am | सॅगी

मस्तच..

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Mar 2021 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

पण प्रत्येक गोष्टीचे श्रेष्ठत्व ईंग्रजांनी मान्य केले तरच आहे असे मानणार्‍या वर्गाची सुध्दा कीव येते.

पैजारबुवा,

उपयोजक's picture

5 Mar 2021 - 11:25 am | उपयोजक

कीव का म्हणे?

मराठी_माणूस's picture

5 Mar 2021 - 11:48 am | मराठी_माणूस

बरोबर. "लॅन्सेट" मधे आले तरच विश्वास ठेवणार.

टर्मीनेटर's picture

5 Mar 2021 - 11:57 am | टर्मीनेटर

भारी!
😀 😀 😀

कीव का म्हणे?

उपयोजक काल कि आजचे काही प्रतिसाद वाचलेत तर उत्तर मिळेल! बरोबर ना पैजारबुवा? 😀