सागर किनारी
दोघेच असावे
बोलता बोलता
मिठीत शिरावे
मिठीत शिरून
लटके रुसावे
प्रेमाच्या आर्जवी
खुदकन हसावे
खुदकन हसूनी
भुलावे झुलावे
रुपेरी वाळूत
पाउल नाचावे
नाचत हळूच
हात हे गुंफावे
स्पंदन प्रेमाचे
हृदयी ऐकावे
हृदयी ऐकावे
डोळ्यांत बघावे
निळुल्या पाण्यात
डुंबुनी यावे
डुंबता डुंबता
श्वास हे दुणावे
ओठांचे अमृत
ओठांत शिरावे
ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!
प्रतिक्रिया
13 Apr 2009 - 6:06 am | प्राजु
हलकी आणि.. सुंदर.
खुदकन हसूनी
भुलावे झुलावे
रुपेरी वाळूत
मन नाचवावे
या ओळीत.. नाचवावे ऐवजी
रूपेरी वाळूत
पाऊल रूतावे...
हे कसे वाटते??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Apr 2009 - 6:19 am | उमेश कोठीकर
वा! सर्वव्यापी प्राजू;आपण सुचविलेला बदल शिरोधार्य मानून धारण केला आहे. धन्यवाद.
13 Apr 2009 - 6:21 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Apr 2009 - 7:24 am | मदनबाण
नाचत हळूच
हात हे गुंफावे
स्पंदन प्रेमाचे
हृदयी ऐकावे
मस्त... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
13 Apr 2009 - 3:41 pm | सँडी
हृदयी ऐकावे
डोळ्यांत बघावे
निळुल्या पाण्यात
डुंबुनी यावे
डुंबता डुंबता
श्वास हे दुणावे
ओठांचे अमृत
ओठांत शिरावे
ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!
वाह वाह!!
मस्त लिहिलयं.
लिहित रहा.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
13 Apr 2009 - 5:08 pm | अविनाशकुलकर्णी
ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!...........खुप छान
13 Apr 2009 - 6:42 pm | शितल
कविता आवडली. :)
13 Apr 2009 - 7:14 pm | उमेश कोठीकर
सगळ्यांचे खूप आभार.
13 Apr 2009 - 8:04 pm | क्रान्ति
नाजूक, सुन्दर कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
14 Apr 2009 - 7:16 am | आनंदयात्री
उमेशराव कविता एक नंबर !! आवडली !!
:)