तुम्हे अल्फाजों मे..... २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Jan 2021 - 7:52 am

मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला....

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........
..................... चकोर शाह.

मागील दुवा http://misalpav.com/node/48162
माझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस.
तू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस. आणि हसता हसता रडायला लागतेस.
एक बोट नाचवत "पुन्हा असं करू नकोस माझ्याशी . शप्पथ आहे तुला माझी.असं म्हणत बिनदिक्कत माझ्या शर्टच्या बाहीने डोळे पुसतेस.
एरवी शर्टची इस्त्री जपणरा मी तुला ते खुशाल करू देतो.
तुझं ते हाताचं बोट नाचवत शप्पथ आह माझी म्हणताना मला तू एकदम छोटी शाळकरी मुलगी वाटतेस. अगदी . दुसरी ब मधली.
अशीच असशील ना तेंव्हा. भावंडांशी , वर्गातल्या मित्रमैत्रीणींशी अशीच भांडत असशील. स्वतः होऊन धरलेला अबोला मोडत असशील.
चिमणीच्या दातांनी गोळ्या चॉकलेट तोडून एकमेकांना देत असशील.
तुझं ते निरागस रूपडं पाहून मला आतून काहितरी एकदम गलबलून येतं .

सलौना सा सजन है और मै हु.
जिया मे इक अगन है और मै हु.
तुम्हारे रूप की छाया मे
सजन बडी ठंडी है और मै हु.

येताना चौकात गजरे विकणारी ती छोटी मुलगी पुन्हा दिसते. तिच्याकडचे सगळे गजरे विकत घेतेस. या वेळेस कोणतीही घासगीस न करता.
मला विचारायचं असतं काय करणार आहे इतक्या गजर्‍यांचं? मी मुकाट ,पैसे देतो.
नुकत्याच घेतलेल्या माळेतून एक गजरा सोडवतेस आणि त्या गजरेवाल्या मुलीच्या डोक्यात अडकवतेस.
त्या मुलीच्या चेहेर्‍यावर मघा तुझ्या चेहेर्‍यावर होतं तसं हसू पसरत जातं.
हे हसू डबीत जपून ठेवता यायला पाहिजे.
मोगर्‍याचा गजरा डो़क्यात माळायचा आनंद विकणार्‍या मुलीला तू तो आनंद घेऊ दिलास.
आपण जे विकतो ते आपल्याला कधीच मिळत नाही.
जे वाटतो ते मात्र आपल्याला भरभरून पुन्हा पुन्हा मिळत जातं.

युं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है
हम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है.
अपनी झोली खाली कर आते है.
....*चकोर शाह*

मुक्तकप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

27 Jan 2021 - 8:31 am | प्राची अश्विनी

वाह!

असा मी असामी's picture

23 Feb 2021 - 7:20 pm | असा मी असामी

मस्त

युं तो हम सबकी झोली ख्वाबों से भरी होती है
हम गैरो के दिखाये ख्वाब खरीदने जाते है.

वाह.. निव्वळ अप्रतिम..