वार्‍याने पेटते रान आता हे ..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
21 Feb 2021 - 2:50 pm

घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला
ठिगळे अनेक रंगबेरंगी..
पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली
बेसुमार झीज पायाची ..

वार्‍याने पेटते रान आता हे
कशास विचार फुका..
होरपळले शेत जरी हे
ढेकळाचा रंग काळा तो काळाच..

ठिंणगी बनलेला विचार तुझा
तू दूर आकाशातील तारा ..
ओसाड ह्या जगण्यावरती
उगा बुजगावण्यांचा पहारा..

दगडाला कुठे फुटतो पाझर ?
कुठे शोधु देवपण त्याच्यात ?
जन्मलो मातीत या
पुन्हा मातीत मिटण्यासाठी...

-- शब्दमेघ
(शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Feb 2021 - 4:34 pm | प्रचेतस

खूप दिवसांनी लिहिलंस, एकदम मस्त

Vichar Manus's picture

21 Feb 2021 - 4:53 pm | Vichar Manus

खूपच छान

सतिश गावडे's picture

21 Feb 2021 - 5:19 pm | सतिश गावडे

छान आहे कविता. आवडली, निराशेचा सूर असला तरीही :)

तुषार काळभोर's picture

22 Feb 2021 - 2:49 pm | तुषार काळभोर

निराशेचा सूर असलेले वाचायला आवडत नाही. पण कविता आवडली, मस्त आहे.

अवांतर - इतका संवेदनशील माणूस धुळवडीच्या धाग्यांवर कशाला फिरकतो काय माहिती!

गोंधळी's picture

21 Feb 2021 - 8:52 pm | गोंधळी

होरपळले शेत जरी हे पण ह्या वर्षी तरी पाऊस चांगला झाला त्यामुळे सगळीकडे पिक चांगली आलीयेत.

गणेशा's picture

21 Feb 2021 - 11:28 pm | गणेशा

कविता शेती वर नाहीये...

वार्‍याने पेटते रान आता हे
कशास विचार फुका..
होरपळले शेत जरी हे
ढेकळाचा रंग काळा तो काळाच..

आज काल लोक स्वतःचे डोके न वापरता
कोणाचे ही ऐकून उगाच पेटतात.. कोणासाठी हि..अतिरेकी जणू..
कसलाच विचार करत नाही.. ( फुका म्हणजे विनाकारण )
आणि ती जी माणसे आहेत त्यांना काही भावना असतात का नाही?
आणि जरी त्यांना मन असले जणू हिरव्या शेता सारखे पण असल्या बुद्धिहीन वागण्याने ते होरपळले तरी काय?
हि पेटलेली माणसे कुठे कोणत्या जाती धर्माची असतात.. ती असतात माणुसकिला काळिमा फासणारी..माणुस असतात पण काळी ठीककूर.. मानवता हिन

वाऱ्याने पेटते रान आता हे.. म्हणजे कसलीही कोणाची हि हाक आली की माणसे पेटून उठतात...

गोंधळी's picture

22 Feb 2021 - 2:42 pm | गोंधळी

विस्कटुन सांगितल्याबद्द्ल धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Feb 2021 - 8:16 am | ज्ञानोबाचे पैजार

कुठे कुठे थोडी गंडल्यासारखी वाटली.
बहूतेक परत एकदा शांतपणे वाचावी लागेल.
पैजारबुवा,

यमक आणि लय यांचा कुठे हि वापर नाही.. जसे विचार तसे फास्ट लिहिलेले आहे..त्यामुळे नसेलच आवडली.

लय बद्ध किंवा आखीव कविता नाहीये.. त्यात खूप दिवसांनी लिहिलं आणि जसे वाटेल ते, शब्द हि फिरवले नाही..
शब्द फिरवून लिहिण्यात मज्जा येत नाही

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Feb 2021 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

कोणातेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही... किंवा त्यावर जास्त विचार करण्याचीही गरज नाही...
जसे वाटले जसे सुचले तसे तु लिहिलेस.. त्याचे कौतुक आहे म्हणून प्रतिक्रीया लिहिली...नाहीतर वाचुन तसाच पुढे गेलो असतो..
तूला जे काही सांगायचे आहे ते माझ्या पर्यंत पोचले की कदाचित आवडेल.. तो पर्यंत धीर धरणे इष्ट...
पैजारबुवा,