मराठी रेडिओ

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
18 Jan 2021 - 12:50 am

माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा:

रूपा धारप
देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
असेच कधीतरी ट्यून इन रेडिओ वगैरे सारख्या गोष्टी सापडल्या जिथे मुंबई अस्मिता वाहिनी ऐकता येत होती. मग प्रॉपर रेडिओ ऐकणं सुरू झालं. काही काळाने प्रसारभारतीवर देशभरातल्या रेडिओ चॅनल्सचा खजिना सापडला आणि लॉटरी लागल्यासारखंच वाटलं. महाराष्ट्रातल्या इतक्या शहरांमधून आकाशवाणी ऑनलाईन ऐकता येते हा नवीनच शोध लागला. मग काय, चॅनल सर्फींग करत करत भरपूर मराठी गाणी, कार्यक्रम ऐकणं सुरू झालं.
पण नुकतेच प्रसारभारतीने हे रेडिओचे पेज काढून टाकले आणि अ‍ॅप सुरू केले. आणि मला अ‍ॅप नको होते. मग अजून शोधाशोध करत बसण्यापेक्षा आपणच एक पेज बनवून आपल्या ब्लॉगवर का टाकू नये असा विचार मनात आला. आणि त्याप्रमाणे onlineradiofm.in वरच्या लिंक्स जमा करून महाराष्ट्रातल्या विविध शहरातली आकाशवाणी एका पेजवर मिळेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे अ‍ॅपशिवाय मराठी रेडिओ ऐकणं आता खूप सोपं झालं.
माझ्यासारखेच आकाशवाणीचे चाहते इथे मायबोलीवर खूप असतील असं वाटलं आणि म्हणूनच सर्व मायबोलीकरांसाठी ही लिंक इथे देते आहे.

https://marathiradiostations.blogspot.com/p/marathi-radio.html

संगीतचित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2021 - 9:11 am | श्रीगुरुजी

चांगली माहिती. मी नियमित आकाशवाणी ऐकतो.

विविधभारती बंद होणार असल्याचे कायप्पावर वाचले. हे कितपत खरे असावे?

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 9:22 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

कंजूस's picture

19 Jan 2021 - 1:48 pm | कंजूस

पूर्विचा रेडिओ am ट्रान्समिशनवर होता, fm नव्हता. तंत्रज्ञान सुधारले. काही नवीन स्वस्त उपलब्ध झाले जुने जाणार.
डेटा स्वस्त झाल्याने ओनलाईन रेडिओ ऐकणे परवडू लागले आणि दूरवरही आपल्या गावाचे कार्यक्रम ऐकता येऊ लागले.
मोबाइलच्या प्रसेसरवर fm receiving चिप बसवता आल्याने ते काम सोपे झाले. स्थानिक fm कार्यक्रम डेटा न वापरता ऐकता येतात. पण दूरच्यासाठी सर्विस प्रवाइडरमार्फत कार्यक्रम ऐकू शकतो.
जुनी विविधभारती आता हळूहळू fm वर नेत आहेत.

तुमची साइट उघडून पाहिली. आइडिया आवडली.

-----------------------
पण असे एक app आहे android वर.

Indian Radios HD Recorder All in One app by Permasoft inc.
Android app link.( https://play.google.com/store/apps/details?id=in.parmsoft.a1radio. )

हे app पाहा. मराठी, हिंदी वगैरे रेडिओ स्टेशन्स अगोदरच वेगळी केलेली आहेत. रेकॉर्डिंग करून ती mp3 फाइल पाठवता येते.

गोंधळी's picture

19 Jan 2021 - 3:33 pm | गोंधळी

माझ्या फोन मध्ये रेडिओ नाही. त्यामुळे लिंक साठी धन्यवाद.

Bhakti's picture

19 Jan 2021 - 5:36 pm | Bhakti

स्तुत्य!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फार छान...आता या लिंकांचं App मधे रुपांतर झालं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2021 - 10:31 pm | चौथा कोनाडा

मस्तच आहे !
अतिशय उपयोगी !
+१

स्क्रीन ओन ठेवावा लागतो.
पण मी दिलेल्या app मधला रेडिओ under lock screen चालू राहातो.

निमिष ध.'s picture

21 Jan 2021 - 1:00 am | निमिष ध.

क्रोम मध्ये लॉक स्क्रीन वर पण चालू राहतो हा. तुम्ही दुसरे अ‍ॅप पण वापरू शकता.

कंजूस's picture

20 Jan 2021 - 9:17 am | कंजूस

साइट
All India Radio Prasar Bharati Live Radio या साइटवर सर्व All India Radio चे कार्यक्रम ऐकता येतात. लॉक स्क्रीनवर रेडिओ चालू राहातो.

(( Microsoft Edge browserवर tab minimise/चेंज केली तर रेडिओ बंद होतो.

फायरफॉक्स आणि क्रोमवर मात्र backgroundला रेडिओ चालू राहातो.))

निमिष ध.'s picture

21 Jan 2021 - 12:52 am | निमिष ध.

सगळ्या प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद.

बिरूटे साहेब - वेळ मिळाला तर अ‍ॅपही तयार करता येईल. सल्ल्याबद्दल धन्यवाद.

कंजूस साहेब तुमची लिंक सुद्धा चांगली आहे.

रेकॉर्डिंगवालं app उपयोगी पडतं. म्हणजे त्याच वेळी दुसरं काम निघालं तर.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2021 - 2:08 am | श्रीरंग_जोशी

उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद

बादवे लेखाच्या शेवटी 'मायबोलीकरांसाठी ही लिंक' असा उल्लेख आहे. मिपावर प्रकाशित करताना नजरचुकीने 'मिपाकरांसाठी' असा बदल करणे राहून गेले असावे.

निमिष ध.'s picture

21 Jan 2021 - 8:19 pm | निमिष ध.

श्रीरंगसाहेब, हे सुचवल्याबद्दल धन्यवाद. हे मी तिच्या शब्दांत लिहीले होते त्यामुळे ते राहून गेले.

संपादकमंडळ सदस्य कृपया हा बदल कराल काय?

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2021 - 3:42 pm | चौथा कोनाडा

या वेबसाईट वर मी बऱ्याच वेळा मराठी रेडिओ स्टेशन्स ऐकतो.
गेले काही दिवस झाले ही साईट आणि यातल्या लिंक चालत नाहीयेत.

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2021 - 3:43 pm | चौथा कोनाडा

या वेबसाईट वर मी बऱ्याच वेळा मराठी रेडिओ स्टेशन्स ऐकतो.
गेले काही दिवस झाले ही साईट आणि यातल्या लिंक चालत नाहीयेत.

कंजूस's picture

14 Aug 2021 - 7:57 pm | कंजूस

हो ती साइट चालत नाही. मागच्या आठवड्यात चालू होती.

१) या साईटवर आहेत मराठी एएम MW स्टेशनं
https://onlineradiofm.in/stations/all-india-air-akashvani

https://onlineradiofm.in/maharashtra/jalgaon/all-india-air-akashvani

२) हे एक जुने app आहे. चालू आहे. पण साइट नाही.
All hindi radios
( https://play.google.com/store/apps/details?id=in.parmsoft.allhindiradios. )

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2021 - 9:46 pm | चौथा कोनाडा

छान आहेत साइट्स आणि अ‍ॅप्प !
धन्यू, कंजुसजी !

कंजूस मामा... तुमच्यामुळे मला खालील २ रेडियो ऐकता आले.
Kishore Kumar Radio
Mohammed Rafi Radio

याच बरोबर किशोर कुमार यांनी गायलेले एक गाणं ऐकुन मला मी खूप आधी ऐकलेले गाणं आठवल, कारण दोन्ही सारखीच आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vijanasurabhi | Bachelor Party |

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2021 - 9:48 pm | चौथा कोनाडा

+१ मदनबाण.

कंजूस's picture

20 Aug 2021 - 8:38 am | कंजूस

पुन्हा चालू झाली. मध्यंतरी बंद होती. ही फास्ट साईट आहे.

https://www.radioindialive.com/all-india-radio-prasar-bharati-live-radio

फक्त साईट उघडून तीन-लाईन मेनूमधून all India radio select करा. सर्व AM stations दिसतील राज्यांप्रमाणे. तिथून पुणे/ जळगाव/ रत्नागिरी/ सांगली/ वर्धा/अमरावती..... वगैरे उघडून तेच पेज बुकमार्क करणे. म्हणजे थेट तेच के़द्र लागेल.

ओनलाईन रेडिओ असल्याने वायरलेस ब्लूटूथ हेडफोननेही ऐकता येईल, डिवाईस खिडकीत ठेवून.

App आहे .
All India Radio Live
https://play.google.com/store/apps/details?id=com.allindiaradio.akashvan...

Android app आहे साईट नाही. Alarm लावता येतो. करून पाहा.