सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो. मध्येच कुठली ही सूचना न देता येणाऱ्या स्पीड ब्रेकर मुळे दोन वेळा गाडी ला दणके बसले, रफड्रायव्हिंग करतो म्हनुन वडील ओरडायला लागले आणि भावाने मला स्टेरिंग वरून उतरवून स्वत गाडीचा ताबा घेतला. गाडीची वेगवान 80 ते 100 च्या स्पीड वाली घोडदौड थांबली आणी 40 ते 70 च्या मध्ये गाडी चालू लागली. पिंपळनेर सटाणा रस्त्याचे ही काम चालू असल्याने हळुहळु साडे 9 च्या आसपास उजव्या बाजूला turn घेऊन मांगीतुंगी पोहोचलो. इतक्या लवकर कुठल्याही हॉटेलात काहीच नाश्त्यासाठी तयार झालेले नसल्यामुळें parle g चा पुडा पाण्यात बुडवून खाऊन मांगी तुंगी च्या पायथ्याशी पोहोचलो.
मांगीतुंगी हे दिंगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी वर डोंगरावर बऱ्याच जुन्या जैन लेण्या कोरल्या आहेत, जगातील सर्वात उंच 108 फुटी ऋषभदेव ह्यांचा पुतळा मांगी तुंगी वर बऱ्याच वर डोंगर फोडून( की बाहेरून दगड आणून?) बनवलाय. खाली भक्तांची रहाण्याची सोय देखील आहे. अनेक जैन धर्मिय दुरवरून ईथे भेट देण्यासाठी येतात. १९५६ साली शाळेची सहल आली होती तात मी येऊन गेलोय असं आजोबानी मागे सांगीतलं होतं ह्यावरून हे बरेच जुने प्रसिध्द स्स्थळ आहे हे लक्षात आले. पायथ्याला भिलवाडी म्हणून गाव आहे. सर्व सुचना फलक हिंदीत होते. (मराठी ईथेही डावललेली होती) 2016 पासून थेट पुतळ्या पर्यंत 100 रूपये तिकिटात गाडी सोडते. ( हे आधी माहीत नव्हतं 2018 ला खालून पायी चढत गेलो होतो) बोलता बोलता ड्रायवर कडून कळले की गाडी 4 व्हील ड्राइव्ह आहे. प्रायव्हेट गाडी इतका तीव्र चढ चढेल ह्याची शक्यता कमी आहे. खाली अल्टो पार्क करून 100 रुपये प्रत्येकी तिकीट घेऊन (ज्यात वर लिफ्ट लावलीय पुतळ्याजवळ त्याचेही तिकीट असते) गाडीत जाऊन बसलो. एक आठ लोकांच जैन कुटुंब विजापूर (कर्नाटक) वरून आलं होतं. ते आणि आम्ही निघालो 20 मिनिटांत गाडी वर पोहोचली. लिफ्ट चालू करायला वेळ लागत होता म्हणून आम्ही जिन्याने चढू लागलो तर माकडांनी प्रचंड त्रास देणं सुरू केलं. ते माकड माणसांची सवय झाल्याने आजिबात घाबरत नव्हते. माझ्या बॅग मधून एकाने बिसलेरी ओढली पण वजन न पेलल्याने सोडून दिली. मग बॉटल आत बॅग मध्ये घातल्या. तरी बॅगची ओढाताण चालूच होती. शेवटी एक पार्ले जी दूर फेकला सगळे तिकडे पळाले आणी आम्ही मोकळे झालो.
पुतळा पाहिला. तिथल्या एका कर्मचाऱ्याने आत (तिथल्या शेड च्या ऑफिस मध्ये ) मुर्त्या आहेत त्यांचं दर्शन घ्या म्हणून सांगितले. पण आत कुठुन आलात वगैरे कोणता समाज, काय करतात वगैरे चौकश्या सुरू झाल्या त्या देणगी देणार की नाही देतील तर कीती निघेल ह्या साठी होत्या हे लक्षात आल्याने आत गेलो नाही. मंग मांगी आणि तुंगी ह्या सुळक्याकडे जायचे ठरले. भाऊ आणि वडील पायर्या असूनही ती उभी चढ पाहून येण्यास नकार देऊ लागले. मग व एकटा निघालो. वर एक माकड पिच्छा करू लागल. मग बरोबर आणलेल्या छत्रीची ढाल करून त्याच्या पासून सुटका करून मांगी ह्या सुळक्यावर पोहोचलो. तिथे एक परभणी आणी एक नाशिक हुन आलेला ग्रुप होता दोन्ही ग्रुप माकडांच्या भीतीने बरोबर फिरत होते. मग मीही त्यांना जॉईन होऊन निघालो. पायथ्याहून एका कुत्र्याने त्यांची सोबत केली होती. त्याला घाबरून माकडे येत नव्हती. पाठीवर माकडानी केलेल्या असंख्य जखमा घेऊन ते कुत्र वावरत होतं.
मांगी आणी तुंगी दोन्ही सुळक्यांवर लेण्या कोरलेल्या आहेत. मांगी च्या बाजूलाच एक किल्ला आहे. वर चढलेल्या मधील कुणीतरी त्याला मुल्हेर घोषीत केले आणी इतरांनी ही त्यात होकार भरला. पण आपल्या समूहातील जिरगे सरानी सांगितल्यावर तो न्हाविगड उर्फ तांबोळ्या आहे हे कळाले. तिथून मग तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा घालून खाली उतरलो. गाडीने खाली ड्रॉप केले. तो पर्यन्त दुपारचा एक वाजला होता. वर लिंबू सरबत विकनारे स्थानीक बसलेले होते. २० रूपयात ग्लास. फिरताना वेळ लक्षात आला नाही. मग तिथून निघालो रस्त्यात खालप गाव लागतं तिथे आपला समुह सदस्य शशीराज राहतो. त्याला फोन केला. पण त्या बहीर्याला माझा आवाज आला नाही. त्या दिवशी ग्रामपंचायत ईलेक्शन चा रिजल्ट असल्याने रस्त्यात भेटनारी गावेच्या
गावे गुलालाने ओसंडून वाहत होती. मग मांगीतुंगी~ सटाणा~देवळा~ चांदवड~लासलगाव~विंचूर~येवला~कोपरंगाव~नगर करत पुण्यात रात्री दहा ला पोहोचलो.
प्रतिक्रिया
20 Jan 2021 - 6:29 pm | दुर्गविहारी
मस्तच ! फोटो टाकायला विसरलात वाटते. :-)
20 Jan 2021 - 6:35 pm | कंजूस
फोटो बिटो आहेत का?
यष्टीने जायचे झाल्यास कोणते गाव जवळ पडेल?
20 Jan 2021 - 7:43 pm | अमरेंद्र बाहुबली
सटाणा, तहाराबाद, पिंपळनेर ही जवळची गावे. फोटो कंमेंट मध्ये पोस्टवतो.
20 Jan 2021 - 7:58 pm | तिमा
आम्ही अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो, तेंव्हा चढूनच जावे लागे. तेंव्हा माकडे नव्हती. मांगी-तुंगी केल्यावर आम्ही संध्याकाळी मुल्हेर गडाच्या पायथ्याशी गेलो. सकाळी उठून मुल्हेर केला आणि संध्याकाळला साल्हेरच्या पायथ्याशी पोचलो. रात्री पाटलाकडे मुक्काम करुन सकाळी साल्हेर केला आणि संध्याकाळी सटाण्याला पोचलो. रात्री ८ च्या रातराणीने पहाटे ठाण्याला उतरुन थेट कंपनीत गेलो.
20 Jan 2021 - 8:39 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्तच. साल्हेर मुल्हेर करायचेत.
20 Jan 2021 - 9:38 pm | Bhakti
आम्ही फक्त पायथ्याशी असेलेले जैन मंदिर पाहिलंय ...पुन्हा हे ठिकाण पाहण्याची इच्छा आहे.पण इथे जाताना प्रवासात मी पहिल्यांदा गीर गायी त्यांचा हा मोठा कळप पाहिला होता...पुढे नवापूर ...हे सीमारेषेवरचे गावं मस्त असतात..मिश्रण भाषा,कपडे,पदार्थ,संस्कृती.:)
20 Jan 2021 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली
हो. तो भाग एकंदरीत निसर्गसौंदर्य आणी संस्कृतीच्या बाबतीत संपन्न आहे.
21 Jan 2021 - 9:17 am | प्रचेतस
फोटो हवे होते.
ही लाल तोंडाच्या र्हिसस माकडांची जात भलतीच आक्रमक असते. छत्री किंवा काठीशिवाय घाबरत नाहीत कशालाच.
21 Jan 2021 - 10:16 am | कंजूस
पाठीवरच्या स्याक ओढायला माकडे येत नाहीत असा माझा समज आहे. लोंबकळणारी हातातली पिशवी,पर्स, खेचायला अंगावर धावून येतात. हातात काठी घ्या असं गाववाले सांगतात पण काठी घेतलेला कुणी दिसला की फारच चेकाळतात. छत्रीला उघडून खाद्यावर ठेवणे उत्तम. ऊनही लागत नाही आणि माकडे वचकून दूर राहतात.
बदामि, हाजीमलंग,माथेरानचा अनुभव आहे.
21 Jan 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
23 Jan 2021 - 10:19 pm | चौथा कोनाडा
सुरेख वॄतांत !
+१
असं काही वाचलं की काय काय बघायचं राहिलं हा विचार करून कॉम्प्लेक्स येतो.
25 Jan 2021 - 5:56 pm | गोरगावलेकर
माहितीबद्दल धन्यवाद
18 Feb 2021 - 12:15 am | Rajesh188
लिखाणाची प्रतिभा उच्च असल्या मुळे वाचताना प्रसंग डोळ्या समोर उभे राहतात.
लिहीत जा तुमचे लिखाण मी पा ला समृध्द बनवत आहे