जगावे की जगू नये?
हाच खरा प्रश्न आहे
रक्त माझे! श्वास तुझे!
सारखेच उष्ण आहे
का जगू मी? काय माझे?
देवदेखील चोर आहे
कधी येतील घरी बाबा?
मनी मात्र मोर आहे
बालकांचे रक्त सांडे
भयतू! कलीचा घोष आहे
भूक लागे पण तरी
अजब जीवोन्मेष आहे!
पृथ्वी वांझ! पृथ्वी दग्ध!
भविष्य हे घनघोर आहे
तरी फुले जन्मतात
राखेला मोहोर आहे
भ्रांत मन! जाऊ? राहू?
श्वास फक्त अंतर आहे!
आळवितो परमपित्या
सांग काय निरंतर आहे?
ऐकून माझी रुद्ध वाणी
देव बोले! आकाशवाणी!
"अंती सत्या विजय होतो
विजयी जे ते सत्य आहे!
सत्य शाश्वत! सत्य अंतीम
सत्य जीवन! बोध आहे
मृत्यू व्यर्थ! मृत्यू षंढ
जन्म हाच थोर आहे
जन्म ब्रम्ह! जन्म संधी
बाहूत तुझ्या जोर आहे!!"
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 7:49 pm | प्राजु
मृत्यू व्यर्थ! मृत्यू षंढ
जन्म हाच थोर आहे
जन्म ब्रम्ह! जन्म संधी
बाहूत तुझ्या जोर आहे!!"
अतिशय आशावादी कविता... :)
जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2009 - 7:51 pm | मदनबाण
"अंती सत्या विजय होतो
विजयी जे ते सत्य आहे!
सत्य शाश्वत! सत्य अंतीम
सत्य जीवन! बोध आहे
सत्य... :)
कविता वाचुन अंमळ टेन्शन आले !!!
(प्यावी की पिऊ नये ?;) )
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
10 Apr 2009 - 7:00 am | अनिल हटेला
>>>कविता वाचुन अंमळ टेन्शन आले !!!
---> मला पण !!
>>>>(प्यावी की पिऊ नये ? )
--> अर्थातच प्यावे !! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
9 Apr 2009 - 7:54 pm | सँडी
खुपच सुंदर!
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
11 Apr 2009 - 11:07 am | चन्द्रशेखर गोखले
खुप छान कविता !! मनाला भावली!!!
11 Apr 2009 - 11:10 am | दवबिन्दु
पण देवाला चोर म्हनण चागंल नाही. :(
13 Apr 2009 - 8:43 pm | क्रान्ति
माणूस आशेवर जगतो. अशा आशावादी कविता वाचून जगण्याचा अर्थच बदलून जातो. खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com