शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली !
तैमूरलंग जातीने तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होते. पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला. आपल्या जीवितांत याने एकंदर पस्तीस स्वाऱ्या केल्या. सर्व जगावर स्वामित्व असावें ही याची जबर इच्छा. अफगाणिस्तान ताब्यात आल्याबरोबर याची दृष्टि 'सुवर्णमय भारता' कडे वळली. तैमूरच्या सहका-यांत मतभेद झाले तरी त्याने स्वारी निश्चित केली. तो आत्मचरित्रांत लिहितो, “हिंदुस्थानच्या काफर लोकांवर स्वारी करून त्यांस इस्लामी धर्मात आणावें, त्यांची मंदिरे व मूर्ति नाहीशा कराव्या, आणि 'गाझी' हे सन्मान्य नांव मिळवावे, अशी माझी फार इच्छा आहे." याप्रमाणे शके १२७० मध्ये तैमूर समरकंदहून हिंदुस्थानांत येण्यास निघाला. चिनाब व रावी यांच्या संगमावरील सर्व लोकांना याने कापून काढिले. अनेक ठिकाणी त्याने भयंकर कत्तली केल्या आणि थोड्याच अवधीत याची धाड पानपतावरून दिल्लीवर आली. दिल्लीचा सुलतान महमूदशहा व त्याचा वजीर मल्लू इक्बालावान यांनीहि तयारी केली. अल्लाची प्रार्थना करून तैमूरने युद्धास सुरुवात केली. यांत महमूदचा पराभव झाला. तैमूरकडे दिलीचे बादशाही तख्त आले. तैमूरच्या लोकांनी या वेळी केलेली लूट व कत्तल यास इतिहासांत तोड नाही. “ रस्त्यांतून जाण्यास मार्ग नाही इतक्या प्रेतांच्या राशी शहरभर पसरल्या. हिरे, माणकें, मोत्यें, सोने, चांदी, वगैरे लूट किती जमा झाली याची गणति नाही. पकड, लूट, हाणमार यांशिवाय कोणासच काही सुचत नव्हते." तैमूरला या प्रकाराबद्दल वाईट वाटले नाही. त्याने ईश्वराप्त प्रार्थना केली, “ देवा ! हिंदुस्थानांतील माझी कामगिरी त्वां सिद्धीस नेलीस. काफर लोकांशी लढून परलोकसाधन करावे, आणि संपत्ति लुटावी ही दोनहि कार्य पूर्ण झाली. धर्माकरितां लूट करणे हे आमचे बाळकडूच आहे."
१४ डिसेंबर १३४८.
प्रतिक्रिया
18 Jan 2021 - 7:30 pm | मदनबाण
आपले लिखाण वाचत आहे, असेच लिहीत रहावे.
जाता जाता :- सध्या हिंदूस्थानात मिडियातला तैमूर डोइजड झाला आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 8:00 pm | कानडाऊ योगेशु
तैमुरबद्दल अजुन विस्तृत वाचायला आवडले असते. विशेषतः त्याचे नाव तैमुरलंग कसे पडले ह्याबद्दल.
18 Jan 2021 - 8:25 pm | चौथा कोनाडा
रोचक लेक.
तैमुरलंग हा भारतवर्षाच्या इतिहासातील एक मोठा काळा कालखंड आहे.
18 Jan 2021 - 8:27 pm | बोका
कृपया रोज नवा धागा काढु नका. महिन्याचा एक धागा काढा आणि आपली रोजनिशी त्यात लिहा.
18 Jan 2021 - 9:39 pm | कानडाऊ योगेशु
मला तर रोज असा धागा वाचण्यात काही समस्या येत नाही.
अगोदर ही तात्या असताना आजची खादाडी असे एक सदर असायचे.सोबत एका ललनेचा फोटो असायचा व तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट " ही आमची अमुकतमुक हिच्यावर आमचा फार जीव" ही असायची. हाहीतसाच एक प्रकार समजा.
18 Jan 2021 - 9:44 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्त आठवण !
गेले ते दिन गेले !
मला ही नाही.
18 Jan 2021 - 9:53 pm | खेडूत
ते ठीक, पण असे आगा पीछा नसलेले वाचायला बोर होते.
किमान काही तरी पुस्तकांचा किंवा असे कुठं वाचलं वगैरे संदर्भ द्यावा. मधेच महाभारत, मग एकदम मुघल मग रामायण ..पण असो. मला समस्या बिलकुल नाही. :))
बाकी आपल्याला हवी असल्यास ताईमुरची अधिक माहिती उपलब्ध आहे.
18 Jan 2021 - 10:19 pm | बोका
मिपाच्या पहिल्या पानाला महत्व आहे. पहिल्या पानावरच्या धाग्यांना जास्त वाचक मिळतात. सध्या या डायरीने दहा जागा अडवल्या आहेत. इतर धाग्यांची जागा अडवू नये हा हेतु या सुचनेमागे आहे.
20 Jan 2021 - 2:50 pm | दुर्गविहारी
सहमत आहे. बरेच वाचनीय धागे विनाकारण खाली जातात. आधीच मोजून सहा धागे दिसतात. त्यापेक्षा एकत्र धागा आला तर माहिती एकत्र राहील.
18 Jan 2021 - 11:18 pm | गामा पैलवान
रामप्यारी गुर्जर नावाच्या सेनानायकिणीने खरंच तैमुरास मेरठ/हस्तिनापूर प्रांतातनं पळवून लावलं होतं काय?
isbn 9786133417601 क्रमांकाचं पुस्तक आहे म्हणतात : https://www.loot.co.za/product/lambert-m-surhone-ram-pyari-gurjar/lscl-1...
पण हिच्यासंबंधी खात्रीलायक नोंदी सापडंत नाहीत.
-गा.पै.