✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुन्हा पानिपत!

म
मनो यांनी
Tue, 12/01/2020 - 03:58  ·  लेख
लेख
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे. या विषयावर आजपर्यंत अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. लढाईनंतर लगेच बखरी लिहिल्या गेल्या जाऊ लागल्या. आधुनिक काळात मराठी इतिहासाचे भीष्मपितामह वि का राजवाडे, शेजवलकर, फाटक, पगडी, पांडुरंग बलकवडे, विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी ही या विषयावर लिहिलेल्या साहित्यातील अगदी काही निवडक ढोबळ नावे. डॉ उदय कुलकर्णी यांनीही गेल्या काही वर्षात इंग्रजी आणि मराठीत पानिपताबद्दल लिहिले आहे, व्याख्यानांच्या द्वारे लोकांसमोर मांडले आहे. माझ्या मित्राच्या भाषेत सांगायचे तर "अगदी पिळून कोरड्या केलेल्या" अश्या या विषयावर मी का अजून एक पुस्तक प्रकाशित करतो आहे? त्याचं कारण असं आहे की, कित्येक पुस्तकांमधून आपल्याला लेखक स्वतः मराठ्यांच्या बरोबर पानिपतमध्ये "लढताना" आढळतात. मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा प्रशंसनीय तर आहेच. आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना आपल्याला अभिमान वाटेल अश्या गोष्टी समोर ठेवायच्या असतात, त्यामुळे अशी पुस्तके लिहू अथवा वाचू नयेत असे माझे म्हणणे नाही. पण वस्तुनिष्ठ दृष्टीने या लढाईबाबत मराठी साधने काय सांगतात, एवढेच नव्हे तर शत्रूच्या बाजूची फारसी, दारी, पश्तो साधने काय सांगतात, या लढाईत भाग न घेतलेले इंग्रज, फ्रेंच आपल्याला काय सांगतात हे तपासून पाहिलं तर एक आजवर न उलगडलेलं विश्वच आपल्यासमोर अवतीर्ण होतं. त्या विश्वात रंग भरण्याचं काम करतात ती परदेशातील आणि भारतातील आजवर अप्रकाशित असलेली चित्रे. या विश्वानं मला मोहात पाडलं. वाचकांनाही या गतकाळातील स्मृतिचित्रांचा मोह पडेल अशी मला अशा आहे. कित्येक दिवस, महिने, वर्षे, महिने अभ्यास केल्यावर इतक्या विस्तीर्ण विषयावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांतील न उलगडलेल्या बाबी मला समजू लागल्या. त्या पक्क्या करण्यासाठी मी ज्या मूळ साधनांवरून हे ग्रंथ लिहिले आहेत ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही वाट खूप खडतर होती. त्यासाठी आवश्यक असणारे फारसी, दारी, पश्तो वाचनाचे ज्ञान, मोडी लिपी वाचन हे शिकताना मला अनेक लोकांची प्रचंड मदत झाली. श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि दिल्लीचे फारसी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर यांच्या मदतीने अनेक वाटा खुल्या झाल्या. मूळ साधने घरबसल्या अभ्यासून पाहताना या पुस्तकाची कल्पना माझ्या मनात साकारत गेली. या पुस्तकासाठी मी जगभरातून अनेक तपशील मिळवले आहेत. नावंच सांगायची तर इंग्लंड, अमेरिकेतील साधने तर आहेतच, पण पॅरिस येथील फ्रेंच साधने, मध्य-पूर्वेतील कुवैत, अफगाण शाहनामा-पेशावर, पाकिस्तानातील लाहोर, खैबर-पख्तुनवा, भारतातील सागर, डीग, हैदराबाद, जोधपूर, जयपूर अश्या अनेक मराठी वाचकांना अपरिचित अश्या जगातून इतिहासाचे कण गोळा केलेले आहेत. या नवीन पुस्तकाच्या रूपाने मागच्या पंचवीस-तीस वर्षातील संशोधन आणि अनेक अप्रकाशित नवीन चित्रे, साधने अन माहिती वाचकांच्या समोर ठेवताना मला आनंद होत आहे. cover मिसळपाव हे संकेतस्थळ माझ्यासाठी खास आहे, कारण इथे लिहिलेल्या माझ्या लेखनाला अनेक इतिहासप्रेमी वाचकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी खूप प्रोत्साहन दिले आहे. एवढेच नव्हे तर नुसतं पुस्तक लिहितो आहे हे समजताच काहींनी त्याच वेळी आपली प्रत राखून ठेवली आहे! आज पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु करताना मला आपल्या सर्वांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. पुस्तकाचे प्रकाशन २० डिसेंबर २०२० रोजी करण्याचं ठरवलं आहे. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी आपले नाव इथे नोंदवावे. https://panipat-signup.web.app/ दोन पर्याय उपलग्ध आहेत: १) गूगल पे, अँपल पे अथवा क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे रुपये ७५०/- देऊन नोंदणी किंवा २) सध्या पैसे न देता फक्त नाव,पत्ता देउन नोंदणी करता येईल - (पुणेरी स्वभावाला न अनुसरून!) कुठलीही काटकसर न करता उत्तम दर्जाच्या जाड कागदावर, ८०+ चित्रे सुबकपणे या जाड पुठ्ठयाच्या (hardcover) पुस्तकात छापली आहेत. - पुस्तक जगभर कुठेही पाठवता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे - पुस्तकाची किंमत रुपये १५००/- आहे, पण २० डिसेंबरपर्यंत ते रुपये ७५०/- म्हणजे ५०% सवलतीत मिळेल - पुस्तक दिलेल्या पत्त्यावर प्रकाशन झाल्यावर हणजे २० डिसेंबरनंतर पाठवले जाईल - पुस्तक प्रकाशन झाल्यावर amazon किंवा दुकानातही मिळू शकेल, तशी व्यवस्था करणे चालू आहे - नोंदणी करताना काही अडचण आल्यास panipat.rediscovered अँट gmail.com या पत्यावर किंवा इथे संपर्क करावा धन्यवाद !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
वाङ्मय
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
32580 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

राज२००९
Tue, 12/01/2020 - 05:25 नवीन
पुस्तकाची अनुक्रमणिका इथे देऊ शकाल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अनुक्रमणिका

मनो
Tue, 12/01/2020 - 05:51 नवीन
अनुक्रमणिका Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राज२००९

धन्यवाद.

राज२००९
Tue, 12/01/2020 - 20:33 नवीन
पुस्तकाची मागणी नोंदवुन पैसे भरले. अमेरिकेत शिपिंग्चा वेगळा चार्ज असेल तर प्लीज कळवा. सध्या फक्त $१०.१७ चार्ज झालेले आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

हो नक्कीच. USPS द्वारे

मनो
Tue, 12/01/2020 - 22:23 नवीन
हो नक्कीच. USPS द्वारे standard cost ने जात असेल तर अजून काही shipping लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राज२००९

अभिनंदन मनो.

सनईचौघडा
Tue, 12/01/2020 - 08:18 नवीन
अभिनंदन मनो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

श्रीगुरुजी
Tue, 12/01/2020 - 08:52 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन मनो.

प्रचेतस
Tue, 12/01/2020 - 09:03 नवीन
अभिनंदन मनो. पुस्तक इंग्रजीत असल्याने जगभर जाईलच यात शंकाच नाही पण मराठीत आणण्याचाही अवश्य प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन. अत्युत्तम..

गवि
Tue, 12/01/2020 - 09:08 नवीन
अभिनंदन. अत्युत्तम..
  • Log in or register to post comments

व्वा!

सोत्रि
Tue, 12/01/2020 - 09:34 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन!! - (पुस्तक मिळण्याची इच्छा असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

अभिनंदन

खेडूत
Tue, 12/01/2020 - 09:55 नवीन
मागणी नोंदवत आहे... मराठीत सुद्धा यायला हवे असे वाटते. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत. इंग्लीश मधे लिहण्यामागे

मराठी_माणूस
Tue, 12/01/2020 - 11:50 नवीन
सहमत. इंग्लीश मधे लिहण्यामागे काही खास विचार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ

मनो
Tue, 12/01/2020 - 22:59 नवीन
जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ-मराठी अश्या पानिपतमधील जाट बांधवाना, भारताबाहेर राहणाऱ्या इतिहास-प्रेमींना वाचता यावे म्हणून सुरुवात इंग्रजीत केली. मराठी आवृत्ती नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मराठी आव्रुत्ती लवकरच यावी

खटपट्या
Fri, 12/25/2020 - 19:23 नवीन
मराठी आव्रुत्ती लवकरच यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

पुस्तकाचे manuscript

मनो
Tue, 12/01/2020 - 10:06 नवीन
पुस्तकाचे manuscript काळजीपूर्वक वाचून मिसळपावकर बॅटमॅन यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. प्रकाशन आणि छपाई यातील अनेक खाचाखोचा मला अभ्याशेठ यांनी स्वतः खूप कामात आणि गडबडीत असताना देखील समजावून सांगितल्या. त्याबद्दल या दोघांचे आभार!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मित्रहो
Tue, 12/01/2020 - 10:33 नवीन
मनःपूर्वक आभिनंदन पुस्तकाची प्रत राखून ठेवण्याची नोंदणी पैसे भरुन पूर्ण केली. आता पुस्तक मिळायची वाट बघतोय
  • Log in or register to post comments

नविन

प्रसाद_१९८२
Tue, 12/01/2020 - 10:37 नवीन
पुस्तका बद्दल अभिनंदन ! -- पुस्तक नोंदणीसाठी जो दुवा दिलाय त्यावर क्लिक केल्यावर एरर येतोय.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे आत्ता व्यवस्थित

मनो
Tue, 12/01/2020 - 10:48 नवीन
माझ्याकडे आत्ता व्यवस्थित उघडते आहे साईट. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहाल का? कदाचित temporary error असेल. नाहीच जमलं तर panipat.rediscovered@gmail.com या पत्त्यावर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल देऊन ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

अभिनंदन मनो.

अनिंद्य
Tue, 12/01/2020 - 12:11 नवीन
अभिनंदन मनो. इंग्रजीत असल्याने पुस्तक अधिक वाचकांपर्यंत पोहचेल, हे उत्तमच आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/01/2020 - 12:48 नवीन
मस्त बातमी, अभिनंदन, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अभिनंदन,

सौंदाळा
Tue, 12/01/2020 - 13:24 नवीन
अभिनंदन, कृपया मराठी अनुवाद करण्याबाबत विचार करा.
  • Log in or register to post comments

आभिनंदन

केदार-मिसळपाव
Tue, 12/01/2020 - 15:23 नवीन
नोंदणी केली आहे. वाट बघतो आहे, तुम्हाला अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Tue, 12/01/2020 - 15:59 नवीन
पुस्तका बद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

पुष्करिणी
Tue, 12/01/2020 - 17:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा ऑनलाइन मिळेल का? किंडल आवृत्ती? ऑडिओ बुक पण विचार करा. माझ्यासारखे खूप लोक्स प्रवास करताना ऑडिओ बुक ऐकतात.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

पुष्करिणी
Tue, 12/01/2020 - 17:29 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा ऑनलाइन मिळेल का? किंडल आवृत्ती? ऑडिओ बुक पण विचार करा. माझ्यासारखे खूप लोक्स प्रवास करताना ऑडिओ बुक ऐकतात.
  • Log in or register to post comments

पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे

मनो
Tue, 12/01/2020 - 23:02 नवीन
पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे त्यातील दुर्मिळ अप्रकाशित चित्रे. ऑडिओबुकमध्ये ते करणे शक्य नाही, म्हणून त्याचा विचार सुरुवातीला केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

नोंदणी केली आहे.

pspotdar
Tue, 12/01/2020 - 18:20 नवीन
गुगल पे चा option नाही दिसला
  • Log in or register to post comments

मी stripe checkout वापरतो आहे

मनो
Tue, 12/01/2020 - 22:18 नवीन
मी stripe checkout वापरतो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या फोनवर जर गूगल पे असेल तरच तो option दिसतो. कदाचित त्यांच्या detection मध्ये गडबड झालेली असेल. तुम्ही केली नसेल तर सध्या payment न करता साधी नावनोंदणी करा, मी हा option test करून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pspotdar

धन्यवाद

pspotdar
Tue, 12/29/2020 - 14:13 नवीन
पुस्तक मिळाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल

दुर्गविहारी
Tue, 12/01/2020 - 18:36 नवीन
पुस्तकाबध्दल हार्दिक अभिनंदन मित्रा, बाकी पुस्तक मराठीमध्ये अनुवादीत केल्यास आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल.पुस्तकाची काही सँपल पेजेस उपलब्ध केउन दिली तर बरे होईल.पुस्तक नक्कीच बुक करणार आहे.
  • Log in or register to post comments

माझं दहावीपर्यंत शिक्षण हे

मनो
Tue, 12/01/2020 - 22:13 नवीन
माझं दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे, त्यामुळं मराठीतून करण्यास अडचण काहीच नाही. इंग्रजीत प्रथम करण्याचा हेतू असा की हे पुस्तक जगभर पोचावे, भारतीयच नाही तर जे पाश्चात्य संशोधक भारतीय इतिहासावर काम करतात, त्यांना वाचताना काही अडचण येऊ नये. एकाच दिवसात इंग्रजी पुस्तकाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादावरून असं वाटतंय की मराठी आवृत्ती लगेच काढावी लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

अभिनंदन. हा विषयच अद्भुत आहे.

चित्रगुप्त
Tue, 12/01/2020 - 18:50 नवीन
अभिनंदन. महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर खास जुन्या चित्रांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश हा विषयच अद्भुत आहे. आपल्याकडे असा प्रयास प्रथमच होत असावा. पुस्तक बघण्याची खूपच उत्सुकता दाटली आहे. मला पुस्तक नक्कीच हवे आहे. नोंदणी करतो. मात्र सध्या पुढील साताठ महिने भारताबहेर असल्याने आणि घरी कुणी नसल्याने ते कोणत्या पत्त्यावर मागवावे हा प्रश्न आहे. अमेरिकेत मागवता येईल का? कृपया कळवावे. अनेक आभार.
  • Log in or register to post comments

हो नक्कीच, तुमच्या अमेरिकेतील

मनो
Tue, 12/01/2020 - 22:14 नवीन
हो नक्कीच, तुमच्या अमेरिकेतील पाट्यावर पाठवेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

*पत्त्यावर :)

मनो
Tue, 12/01/2020 - 22:14 नवीन
*पत्त्यावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

नोंदणी केली आहे

चित्रगुप्त
Tue, 12/01/2020 - 19:02 नवीन
आत्ताच अमेरिकेतील पत्ता देऊन नोंदणी केली आहे. आत्ता मला पैसे भरता आले नाहीत. पुढील प्रक्रिया काय आहे ?
  • Log in or register to post comments

चित्रगुप्तकाका, मी सध्या

मनो
Tue, 12/01/2020 - 22:04 नवीन
चित्रगुप्तकाका, मी सध्या अमेरिकेतच आहे. पुढची प्रक्रिया साधारण (covid-permitting) अशी ठरवली आहे. २० डिसेंबरला प्रकाशनाचा समारंभ पुण्यात करतो आहे. बहुतेक online livestream करू, त्यामुळे बऱ्याच लोकांना घरबसल्या पाहता येईल. प्रतिसादावरून मला कोणत्या देशात किती प्रती लागतील याचा अंदाज येईल (आणि भरभरून प्रतिसाद आला आहे!), त्यावरून तिथे amazon FBA द्वारे, अथवा स्वतःच कुरिअरने पाठवता येतील. अमेरिकेसाठी मी स्वतःच २४ डिसेंबर तारखेला लागतील तितक्या प्रती घेऊन येणार आहे. त्या amazon FBA द्वारे पाठवण्याचा विचार आहे. ज्यांनी नावनोंदणी केली आहे, पण payment झालेलं नाही, त्यांच्यासाठी एक स्पेशल कुपन कोड पाठवतो, तो वापरून ५०% किमतीत amazon वरून तुमच्या पत्त्यावर पुस्तक डिसेंबरच्या शेवटी येऊ शकेल. तुम्हाला अजून सोपा मार्ग सापडला तर मला नक्की कळवा, मी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो.

चित्रगुप्त
Wed, 12/02/2020 - 22:27 नवीन
@मनो, तुम्ही करणार असलेला अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो. हे मी आमचा अनुभव तसेच अलिकडेच एक परिचित फक्त मुंबईहून दिल्लीला विमानाने गेले, त्यातून त्यांना कोविड संसर्ग झाला, यावरून म्हणत आहे. शक्यतो अमेरिकेत राहूनच पुस्तक प्रकाशन करून प्रती इकडे मागवून घेणे सद्यपरिस्थितीत ठीक राहील असे मला वाटते. विमानातील बंदिस्त वातावरणात एवढे तास बसणे धोक्याचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

काका, तुमची सूचना अगदी योग्य

मनो
गुरुवार, 12/03/2020 - 08:43 नवीन
काका, तुमची सूचना अगदी योग्य आहे, पण मला एका जमीन व्यवहारासाठी जाणे भाग आहे. इतके दिवस लांबणीवर टाकला होते, पण २०२० संपण्याच्या आधी करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पानिपत सुद्धा काय जमिनीसाठी लढाई

शशिकांत ओक
Sun, 12/13/2020 - 19:14 नवीन
मनो, काळ बदलला आता हातघाईच्या लढाया नाहीत पण कागदी घोडे नाचवायला पुण्यापर्यंत मुलुख गिरी करणे भाग आहे असे दिसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

अभिनंदन

तुषार काळभोर
Tue, 12/01/2020 - 22:06 नवीन
अतिशय अभिमानास्पद अन कौतुकास्पद..! मराठी पुस्तकाची जी इच्छा व्यक्त केली जात आहे त्याला जोरदार अनुमोदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो मनोबा !!

अर्धवटराव
Tue, 12/01/2020 - 23:27 नवीन
पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय असेलच यात शंका नाहि. शिवाय अनेक 'कोकोनटां'साठी 'भारत एक खोज' बुक करतो लवकरच.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

टर्मीनेटर
गुरुवार, 12/03/2020 - 09:04 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! 👍
  • Log in or register to post comments

उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे

मनो
Tue, 12/08/2020 - 11:54 नवीन
उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. प्रकाशन समारंभ youtube वर live असेल, त्याचे आमंत्रण ४-५ दिवस आधी जरूर टाकेन.
  • Log in or register to post comments

**(UPDATE 08 December 2020)**

मनो
Wed, 12/09/2020 - 02:49 नवीन
**(UPDATE 08 December 2020)** ५०% सवलत (रु. ७५०/-) ही फक्त १० डिसेंबर २०२० मध्यरात्रीपर्यंतच उपलग्ध आहे. ११ डिसेंबरनंतर पुस्तकाची किंमत रु. १५०० असेल. अर्थात, amazon, पुस्तकाची दुकाने आणि इतर ठिकाणी अजून काही सवलत नंतरही मिळू शकेल, पण ती एवढी कमी निश्चितच नसेल. प्रकाशनपूर्व किंमत रु. ७५०/- ही फक्त १० तारखेपर्यन्त ज्यांनी नाव-नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच असेल. त्यामुळे आजच जरूर तुमचे नाव नोंदवून ठेवा. नोंदणीची वेबसाइट - https://panipat-signup.web.app
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

सुक्या
Wed, 12/09/2020 - 11:03 नवीन
नोंदणी केली आहे.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन आणि

रुपी
गुरुवार, 12/10/2020 - 19:38 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! नाव नोंदणी केली आहे. काही email येणे अपेक्षित होते का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी

मनो
गुरुवार, 12/10/2020 - 21:04 नवीन
धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी स्वतःच स्क्रिप्ट चालवले की मग नंतर ई-मेल जाते. तुम्ही अमेरिकेत असल्याने amazon वर डिस्काउंट कोड देईन, तिथून तुमच्याकडे पुस्तक येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

मी नोंदणी केली आहे. परंतु आता

जानु
गुरुवार, 12/10/2020 - 22:06 नवीन
मी नोंदणी केली आहे. परंतु आता रक्कम द्यायची असेल तर काय करता येईल?
  • Log in or register to post comments

जिथे नोंदणी केली तिथेच (https

मनो
Fri, 12/11/2020 - 04:23 नवीन
जिथे नोंदणी केली तिथेच (https://panipat-signup.web.app/) पुन्हा एकदा जाऊन या वेळी pay now बटन वापरा. फॉर्म मध्ये कंपलसरी असल्यानं माहिती पुन्हा टाकावी लागेल, पण दोन कॉपी होणार नाहीत. मागच्याच ऑर्डर मध्ये पेमेंट झालं अशी नोंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु

अभिनन्दन

बांवरे
Fri, 12/11/2020 - 05:17 नवीन
मनो, मनःपूर्वक अभिनंदन. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. मी नोंदणी केली आहे. अमेरिकेत पुस्तक पाठवायला जमले तर खूपच बरे होईल.
  • Log in or register to post comments

हो अमेरिकेत नक्की पाठवू शकेन,

मनो
Fri, 12/11/2020 - 10:45 नवीन
हो अमेरिकेत नक्की पाठवू शकेन, करण मी स्वतः परत अमेरिकेत येणार आहे, त्यावेळी बरोबर आणेन. इथून USPS ने पाठवीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा