चक्कर कथा

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जनातलं, मनातलं
9 Apr 2009 - 3:16 am

घरातल्या पावडर रूममधले वॉश बेसिन आणि कमोड बदलायची गरज निर्माण झाली होती. तातडीने बदलणं आवश्यक होते. घरातली दुरूस्ती / सुधारणा अशा प्रकारची कामं करण्यातला माझा उत्साह (आणि माझं कौशल्य !) या दोन्हीवर विश्वास असल्यामुळे दीपानं लगेच हँडीमॅनला फोन करायला सांगितला !

कुठल्याही देशात जा हो, चांगला सुतार / गवंडी / प्लंबर / इलेक्ट्रिशियन माणूस मिळणं आधीच अवघड…. त्यातही त्या माणसाने “स्वस्तात मस्त” काम करून देणं तर अजूनच अवघड ! हॅंडीमॅन म्हणजे तर ही सगळी कामं स्वस्तात करू शकणारा माणूस शोधायचा ! एक वेळ गुलबकावलीचं फूल मिळेल पण…. !

इथे Handyman आणि Cleaning Lady या दोन व्यक्तींशी बोलताना आपण पुन्हा एकदा इंग्लिशचे धडे गिरवतोय असं वाटतं. म्हणजे आपण म्हणायचो ना… “I do, you do, he, she, it does…” त्या धर्तीवर एक एक शब्द हळूहळू उच्चारत आणि त्यांचं बोलणं समजावून घेत संवादाची वाट काढायची.

थोडी चौकशी केल्यावर ख्रिस नामक देवदूत लगेचच्या शनिवारी यायला तयार झाला. त्याहून महत्वाचे म्हणजे माझं इंग्लिश त्याला आणि त्याचं इंग्लिश मला लगेच समजत होतं. म्हटलं चला….अर्धं काम तर इथेच झालं. ख्रिस लाख चांगला असला तरी पुढे काय होणार आहे ते आधी माहिती असतं तर टॉयलेट बदलण्याचं झेंगट निदान त्या दिवशी तरी काढलंच नसतं ! शनिवारी सकाळी आठ ते नऊच्यामधे येतो असं ख्रिस म्हणाला. अरे ! शनिवार सकाळ आठ ही काय वेळ आहे का? थंडीच्या दिवसांत इथे त्यावेळेला अजून सूर्यही उगवलेला नसतो मग आपल्यासारखे सूर्यवंशी काय उठणार आहेत ? पण हँडीमॅनसमोर काय बोलता म्हाराजा? त्याने सांगितलेली वेळ पाळावीच लागणार ना !

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी मी आणि दीपाने जवळच्या होम डेपोमधे चक्कर मारली. हातात वेळ कमी होता म्हणून विकत घ्यायचे वॉश बेसिन आणि कमोड (अमेरिकेतल्या उल्लेखाप्रमाणे ’टॉयलेट बोल’ !!) बघून ठेवले. असं ठरवलं की संध्याकाळी शांतपणे येऊन दोन गाड्यांमधून ते घरी घेऊन जाऊ.

संध्याकाळी आम्ही पुन्हा एकदा होम डेपोमधे. बेसिनबद्दल काहीतरी माहिती पाहिजे होती म्हणून होम डेपोचा कुणी माणूस किंवा कुणी बाईमाणूस दिसतंय का ते शोधत होतो. एक जण दिसला पण त्याची हेअर स्टाईल पाहूनच त्याला प्रश्न विचारायचा विचार बदलला ! आपल्या इतिहासाच्या पुस्तकांतला ’सिकंदर’ अलेक्झांडरचा फोटो आठवतोय? त्यात ’सिकंदर’चे शिरस्त्राण जसं दिसतं ना, तसाच त्या माणसाचा हेअर कट होता ! खरंतर त्याने नीट माहिती दिलीही असती कदाचित पण कधी कधी आपण किती सहज, आपल्याही नकळत, ’वरलिया रंगा’वरून माणसाबद्दल मत बनवतो ना?

वेगवेगळ्या ठिकाणी लपंडाव खेळणाऱ्या आदित्यला शोधून काढत, सांभाळत एकदाची खरेदी संपली. पार्किंग लॉटमधे आल्यावर मग ती मोठाली खोकी गाडीत बसवायची खटपट सुरू…. ते ही उणे ३ वगैरे तापमानात !! आमची सगळी खटपट बघून बाजूने जाणाऱ्या एका माणसालाही उत्साह आला. तो एकदम परोपकाराच्या वगैरे भावनेने आम्हाला मदत करायला लागला. आम्ही कसंबसं एका खोक्यातलं सामान गाडीच्या ट्रंकमधे कोंबलं… ट्रंक उघडीच राहणार होती पण त्याला पर्याय नव्हता. दोन मिनिटे हाश्श हुश्श केल्यावर त्या माणसाच्या लक्षात आलं की अरे अजून एका गाडीत सामान भरायचंय… त्याने एकदम, “ह्या पुढचं तुम्हाला जमेल” अशा तोंडभरून शुभेच्छा देऊन तिथून कण्णी कापली !

शेवटी एकदाचं दोन्ही गाड्यांमधे सामान भरून आमची वरात निघाली. मी चालवत असलेल्या गाडीची ट्रंक उघडीच होती. हळूहळू तसाच निघालो. दीपा अगदी माझ्या पाठोपाठ दुसरी गाडी चालवत राहिली. दोन्ही गाड्यांचे hazard light लावून अक्षरश: वरातीच्या गतीने निघालो. एरवी जे अंतर पाच मिनिटांत पार केले असते ते जवळपास २० मिनिटे घालवून पार केले आणि एकदाचे घरी पोचलो. शुक्रवारी रात्री, सिनेमा / टीव्ही काही न बघता, शहण्या मुलांसारखे सगळे जण लवकर झोपलो.

शनिवार सकाळ उजाडली. भल्या पहाटे सव्वाआठच्या सुमारास ख्रिसचं आगमन झालं. चांगला उंचपुरा, मजबूत शरीरयष्टीचा, थोडी दाढी राखलेला आणि पोलिश / रशियन असा ऍक्सेंट असलेलं इंग्लिश बोलणारा ख्रिसबद्दल प्रथमदर्शनीच विश्वास वाटला की ये अपना काम कर सकता है ! मुख्य म्हणजे ख्रिसकडे छान विनोदवृत्ती आहे. मस्त बोलता बोलता कोपरखळ्या मारायचा….. मनात म्हटलं लेको क्या बोल्ते? पुण्यात वाढलेल्या माणसाला शिकवतो का… तिरकस बोलणं म्हणजे काय ते ! दीपाने त्याच्यासाठी गरम गरम कॉफी केली होती आणि आमच्यासाठी चहा. कॉफी पितानाच ख्रिस कामाला लागला. मी चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसलो आणि…….

ख्रिसने जाहीर केलं की आम्ही बॉक्सवरची मापं वगैरे बघून आणलेला बेसिनचा सेट (बेसिन आणि त्याच्या खालचं लाकडी कपाट) आधीच्या बेसिनपेक्षा मोठा आहे ! मग काय…. मी आणि ख्रिसने तो सगळा सेट ख्रिसच्या व्हॅनमधे ठेवला आणि होम डेपोमधे गेलो. तरी बरं… घरापासून होम डेपो फक्त पाच मिनिटांवर आहे. होम डेपोमधे तो बेसिनचा सेट परत केला आणि दुसरा घेतला. घेताना बॉक्सवर तीन-तीनवेळा माप पाहून घेतलं. बॉक्सवर झक्कपैकी लिहिलेलं होतं की २० * १७ इंच या आकारासाठी योग्य. म्हटलं बरोबर… आपल्याला हाच आकार हवाय. ते बेसिन घेऊन घरी आलो, बॉक्समधून बाहेर काढलं आणि प्रत्यक्षात बॉक्समधल्या बेसिनचा आकार निघाला -- २१ * १८ इंच !

पुन्हा एकदा ते बेसिन घेऊन मी होम डेपोमधे गेलो. यावेळी मी एकटाच गेलो. ख्रिस म्हणाला मी तेवढ्यात कमोड बदलायचं काम करून टाकतो ! त्याला बिचाऱ्याला काय माहिती की त्याच्या विधीलिखितात त्याने अजून पंधरा मिनिटांनी मला होम डेपोमधे भेटणं लिहिलं होतं !!

मी होम डेपोमधे पोचलो. यावेळी बेसिनसाठी मदत करायला नेमका तो ’सिकंदर’ आला. त्याने सगळं समजावून घेतलं. मग त्याचा आणि त्याच्या साहेबाचा विचार विनिमय झाला. चर्चेअंती त्यांनी जाहीर केलं की मला पाहिजे त्या आकाराचे बेसिन स्पेशल ऑर्डर करावे लागेल आणि फक्त (!) दोन आठवड्यांत मिळेल !! त्या दोघांना थोडं चिकाटीनं विचारल्यावर ’सिकंदर’ने जरा खटपट केली आणि एका शेल्फवर अगदी वरच्या बाजूला ठेवलेला एका बेसिनचा बॉक्स खाली उतरवला. झक्कास… आम्हाला पाहिजे होते तसे बेसिन मिळाले एकदाचे. ’सिकंदर’ने दोन दोनवेळा माप मोजून खात्री करून घेतली. ’का रे भुललासी वरलिया रंगा’ हेच खरं, नाही का?
त्या बेसिनची shopping cart ढकलत निघालो तर दुकानात थोडं पुढे ख्रिस दिसला ! तो म्हणे कमोड बदलण्याआधी त्याने जुने कमोड काढून टाकले तर कमोड ज्याच्यावर घट्ट बसवायचे ती लोखंडी चकती बदलावी लागणार होती. त्याला अजून दोन-तीन वस्तू हव्या होत्या त्याही घेतल्या. ख्रिस मला म्हणाला आता तू या सगळ्याचे पैसे भर, तोपर्यंत मी पुढे होतो आणि तयारी करून ठेवतो. Self check out मधून पैसे भरायला गेलो तर नेमका ख्रिसने घेतलेल्या चकतीवर किंमतीचा bar code नव्हता. पुन्हा ढूँढो … ढूँढो रे ! आता ख्रिस पुढे निघून गेल्यामुळे आधी हे शोधायचे होते की त्याने चकती नेमकी कुठून घेतली होती. अवाढव्य होम डेपोमधून एका लोखंडी चकतीचा कप्पा शोधायचा होता ! थोडं सामान्यज्ञान आणि थोडं दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं ज्ञान वापरून एकदाची चकती, बारकोडसहित, मिळाली ! सगळं घेऊन घरी आलो तर .....
… ( क्रमश: )

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

मीनल's picture

9 Apr 2009 - 3:18 am | मीनल

हं .मग पुढे काय झाल?
मीनल.

अनामिक's picture

9 Apr 2009 - 3:52 am | अनामिक

अरे काय संदीप भौ, हे क्रमशःचं दुखणं तुम्हालाही लागलं का?
पुढचा भाग लौकर येऊ द्या राव!

-अनामिक

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 3:58 am | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 6:30 am | विसोबा खेचर

वाचतोय...

हेच म्हणेन...

तात्या.

प्राजु's picture

9 Apr 2009 - 4:12 am | प्राजु

लवकर लिही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

9 Apr 2009 - 4:36 am | समिधा

पुढे काय झाल?

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

अनिल हटेला's picture

9 Apr 2009 - 5:50 am | अनिल हटेला

पूढे काय ? :-?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2009 - 6:30 am | भडकमकर मास्तर

मस्त लेखन...
अवांतर : मला वाटलं , तिकडे तरी ही कामं लवकर होत असतील... सगळीकडे सारखंच... :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पाषाणभेद's picture

9 Apr 2009 - 11:28 am | पाषाणभेद

एकूण तिकडेही इकडच्यासारख असत तर. मी मनाला उगाचच लावून घेत होतो.
- पाषाणभेद

अमोल केळकर's picture

9 Apr 2009 - 12:06 pm | अमोल केळकर

मस्त
पुढील भाग केंव्हा ?
---------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अवलिया's picture

9 Apr 2009 - 12:09 pm | अवलिया

मस्त. येवु दे अजुन लवकर लवकर .. :)

--अवलिया

जागु's picture

9 Apr 2009 - 2:22 pm | जागु

कुठल्याही देशात जा हो, चांगला सुतार / गवंडी / प्लंबर / इलेक्ट्रिशियन माणूस मिळणं आधीच अवघड

अगदी बरोब्बर लिहलयत हो ! आमच पण हेच दु:ख आहे.

बाकी लेख छानच. पुढचा लवकर टाका.

धमाल मुलगा's picture

9 Apr 2009 - 3:58 pm | धमाल मुलगा

क्काय पीडाच म्हणायची की वो ही!

कसं कसं काय सोसलं इतकं सगळं राव :(
मला तर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात गेलं की भंजाळायला होतं. किचनमधल्या गळक्या नळाचा वायसर (वायसरच म्हणतात ना हो? मी आपला प्लंबर जे म्हणतो ते म्हणतोय. ;) ) बदलायला तब्बल ७ वेळा (अक्षरी: सात) त्या दुकानात हेलपाटे घातले आणि शेवटी वैतागून एक नवा नळच विकत घेउन आलो... झंझटच नै मंगताय आपुनको ;)

संदीपदा, भारी लिहिलंयस रे. बरोब्बर 'क्योंकी सास..' वगैरे श्टाईलीत वाक्य अर्धवट सोडून 'क्रमशः' टाकलास की रे!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

संदीप चित्रे's picture

9 Apr 2009 - 6:09 pm | संदीप चित्रे

पुढचा भाग लवकरच टाकतो....

अरे धमाल...
मला तर कुठल्याही दुकानात गेल्यावर (पुस्तकं, म्युझिक आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सोडून) भंजाळल्यासारखं होतं आणि मॉलमधे गेल्यावर चक्करल्यासारखं होतं :)

रेवती's picture

9 Apr 2009 - 7:19 pm | रेवती

अरे काय संदीप हे?
त्या क्रमश: ने सळो की पळो करून सोडलय.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.

रेवती

लिखाळ's picture

9 Apr 2009 - 7:52 pm | लिखाळ

मस्त ! .. पुढे काय झाले ते सांगा :)
-- लिखाळ.

अभिज्ञ's picture

9 Apr 2009 - 8:01 pm | अभिज्ञ

मस्त सुरुवात.

पुढचा भाग लवकर येउ द्यात.

अभिज्ञ

चतुरंग's picture

9 Apr 2009 - 8:50 pm | चतुरंग

मस्तच सुरु केलीये चक्कर कथा पण पुढचा भाग वाचायला पुन्हा पुन्हा चकरा मारायला लवून आमच्यावर सूड उगवू नका! ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

10 Apr 2009 - 12:13 am | विसोबा खेचर

संदीप, सह्ही रे! :)

तात्या.

शितल's picture

10 Apr 2009 - 3:23 am | शितल

दमलास होय रे..
लिहि लवकर. :)

धनंजय's picture

10 Apr 2009 - 3:31 am | धनंजय

म्हणजे फक्त बेसिन आणि कमोड असलेली छोटीशी बाथरूम असते, हे मला कित्येक वर्षे माहीतच नव्हते.

आणि ऐकले तेव्हा "असे कसे विचित्र नाव" हे कोडे पडले - आणि त्याचे भन्नाट कारणही समजले.

तुम्हाला "पावडर रूम" शब्द माहीत होता, म्हणजे तुमचे इंग्रजी बरेच हायर-इंग्लिश आहे!!!

(लिहा क्रमशः लवकर...)