स्मरणरंजन २

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
22 Oct 2020 - 8:25 am

स्मरण रंजन
रेडिओ (२)
  गुजरा हुआ जमाना..
अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी.
काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'.
रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात
जास्त प्रसिद्ध.
रात्री उशीरा,
'आपली आवड'. सर्वांचीच.
सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी',
'मला हे दत्त गुरू दिसले,'
'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' ,
इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता.

बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम.
नवनवीन भावगीते.
महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी
अनेक उत्तमोत्तम गाणी  याच कार्यक्रमात दिली.
शुक्रतारा मंदवारा...

आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात  आठवड्यातून
एकदारात्री  शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.
नोव्हेंबर महिन्यात महिनाभर संगीत महोत्सव. हिंदस्तानी ,दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत.
सांगितिक अभिरुची  वृद्धींगत  करणारे.
मोठमोठ्या गायक वादकांचे 'प्रस्तुतीकरण '
ऐकायला मिळे.

   'विविध भारती 'ची ओळख झाली
अन वेगळे संगीत विश्व सापडले.
'संगीत सरिता' . शास्त्रीय संगीताची तोंड ओळख.
कुठले  गाणे कुठल्या रागावर आधारित हे ओळखायची ,
शोधायची सवय जडली.
एक ही फिल्म के गीत.
( इथे की श्रीलंका ब्रॉडकास्ठिग कॉर्पोरेशन वर?)
हा  कार्यक्रम आवडायचा .
'सती सावित्री 'ची गाणी खूप आवडती. अजूनही.
एकदा  वटसावित्री पोर्णिमेला  त्या  चित्रपटाची गाणी  लागतील ही  वेडी आशा  धरून बसलेलो.
दुपारी अडिच ते तीन हिंदी चित्रपट गीते.
श्रोताओंकी फरमाईश पर.
दुपारी साडेतीन ला  शास्त्रीय संगीताचा
पंधरा मिनिटाचा कार्यक्रम. खूप आवडता.
प्रादेशीक संगीताचा कार्यक्रम.
पण ऐकायचो.
या शिवाय इतरही गाण्याचे
कार्यक्रम. गीतमाला.
संध्याकाळी,फौजी भाईयो के  लिए 'जयमाला '.
आठवड्यातून एकदा सादर कर्ता,फिल्मी कलाकार .
ते  वेगळेच आकर्षण.
रात्री उशिरा  छायागीत.
कितीतरी  कार्यक्रम.सगळे आठवणीत पण नाहीत.
ऑल इंडिया रेडिओ  च्या उर्दू प्रसारणासेवा 
मधे,दुपारी साडेतीन ते पावणेपाच
खूप छान छान गाणी .फरमाईशी.

अनेकदा रेडिओ वर गाण्यांचे कार्यक्रम
नसले तर बेचैन.
रात्री बेरात्री ,रेडिओ च्या खुंट्या पिरगाळून
कुठे काही ऐकायला मिळते का हे पाहाणे.
अफगाणिस्तान,रशीया इथल्या रेडिओ स्टेशनवर
गाणी ऐकायला मिळत.जगभरातील अगम्य भाषेतील
असंख्य रेडिओ स्टेशन्स ,आपसात शत्रुत्व असलेल्या राष्ट्रांचीही ,गुण्यागोविंदाने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असत. त्या जंजाळातून,आणि ऐकू येणारे खरखरीतून नेमक्या हव्या त्या स्टेशनची फ्रिक्वेंसी मिळवण्यासाठी, दांडगा अनुभव, कमालीचा संयम ,कौशल्याची गरज .ते  येरागबाळ्याचे काम नव्हते. ध्यान धारणाच एक प्रकारची.

   परिक्षे च्या काळात, मध्यरात्री बाहेर  फेरफटका मारणे, हॉटेल मधे , चहा पित , रेडिओवर गाणे ऐकणे ,अभ्यासा करुन(?)येणारा शीण घालवण्यासाठी आवश्यक असे.
परतताना ,
बीडच्या सराफ गल्लीतील,अनेक  दुकानात
कारागीर मंडळी ,रात्री च्या नीरव शांतते त
रेडिओ वर  गाणी ऐकत,
ऐकत दागिने घडविताना दिसत.
किती सुरक्षित काळ ...

आनंद, दुःख,आशा,निराशा,विरह,
अशा वेगवेगळ्या  मूड्स मधे ,
विविध ताण तणावाचे प्रसंगी
गाण्यांची सोबत .

आता  इंटरनेटचे काळात हवे ते गाणे 
क्षणात समोर हजर होते.
पूर्वी आवडणारी 'ती' दिसावी यासाठी
जशी वाट  पाहावी  लागे,
तशी आवडत्या गाण्यांची वाट.
तेरी  राहोमे  खडे  है  दिल  थाम के...
अनपेक्षितपणे खूप आवडीचे गाणे अचानक
कानावर पडले की होणारा परमानंद
अवर्णनीय.
वेगळे च दिवस होते.
गुजरा हुआ जमाना आता नही दोबारा...
                             ( क्रमशः )
                  नीलकंठ देशमुख   .
                   ८७९३८३८०८०
nilkanthvd1@gmail.com
    
                    

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

22 Oct 2020 - 11:19 am | सोन्या बागलाणकर

सुंदर फेरफटका स्मरण गल्लीचा (a trip down the memory lane)
अनेक सुंदर गाण्यांची पहिली ओळख रेडिओ सिलोन, विविधभारती वगैरे स्टेशन्समुळे झाली.
पुभाप्र!

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:23 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:24 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2020 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेडीयोचा प्रवास एका पिढीचा असाच आठवणींचा असावा, छान लिहिताय. पहिला भाग वाचला होता, दुसराही भाग छान. आभार.

आकाशवाणीचं हे औरंगाबाद परभणी केंद्र आहे. असे ऐकून ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो.
सालं, हे औरंगाबादला परभणी का जोडलेले असावे असा प्रश्न मला सतत पडत असे.

स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम पहाटे सहाच्या हिंदी बातम्या संपल्या की सुरु व्हायचा. स्वरांजली झालं की सहा पन्नासच्या बातम्या. मग आम्ही पुणे च्या बातम्याचं स्टेशन लावायचो. पुन्हा औरंगाबाद परभणी केंद्र. मग उर्दु सबरंग कार्यक्रम. साडेअकराला आकाशवाणी मुंबै केंद्र, गाण्यांसाठी जळगाव केंद्र. साडेबाराला आपली आवड. दीडला विविध भारतीवर रवाना झालो की थेट चार पन्नास रेडीयो बंद व्यायचा. बिनाका, सिबाका गीतमाला हा झालेला बदल आम्ही पाहिलेला. सीलोन लाव रे, की कमी जास्त शिट्या मारत ते केंद्र पकडायचे. साडेपाचला युववाणी हा युवकांसाठी कार्यक्रम. भजनी मंडळ, भगीनी मंडळ, असायचंच. रात्रीच्या वेळी स्टेशनांची गर्दी व्हायची. पुढे एफ.एम. आलं आणि रेडीयोची फ्रीक्वेंन्सी कमी झाली. पण मोठा रोचक प्रवास.

आठवणी अशा येत असतात बघा.

-दिलीप बिरुटे

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:23 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:23 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

दुर्गविहारी's picture

22 Oct 2020 - 10:14 pm | दुर्गविहारी

मस्त आठवणींची सफर

चौकटराजा's picture

23 Oct 2020 - 9:31 am | चौकटराजा

अगदी मोजक्या शब्दात १९५० चे दरम्यान जन्माला आलेल्या पिढीची श्रीमंती उलगडलीत ! वा ! फारच आभारी आहे !

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:24 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

23 Oct 2020 - 10:25 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

सिरुसेरि's picture

24 Oct 2020 - 10:48 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . आठवड्यातुन एकदा रात्री १० वाजता श्रोत्यांच्या आवडत्या मराठी गीतांचा "आपली आवड " हा लोकप्रिय कार्यक्रम प्रसारीत होत असे . यामधे बरेचदा प्रख्यात गायिका बकुल पंडीत यांनी गायलेले "उगवला चंद्र पुनवेचा " हे गीत सादर होत असे . रात्रीच्या शांत वातावरणात हे सुरेल गीत ऐकण्यात वेगळाच आनंद असे .

नीलकंठ देशमुख's picture

25 Oct 2020 - 9:44 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद