विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार. युरो-ट्रिपच्या एका प्रवासात सिमरनवर भाळणारा, प्रेमात पडून जबाबदार होणारा वैगेरे अनेक बाजू असलेला, त्याची नायिका त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची.बुजरी, शिस्तीत वाढलेली, वडिलांनी हिच्या संमतीशिवायच तिचं लग्न ठरवलेलं.
रडून,भेकून,तिच्या घरच्यांना पटवून धावत्या रेल्वेत सिमरनचा हात पकडणारा राज हा पुढे अनेक (खऱ्या) प्रेमकथांची प्रेरणा ठरला, त्याचप्रमाणे मराठी लोकांमध्ये करवाचौथ सारख्या प्रथा पण घुसडल्या गेल्या. गावातून शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या तरुणींना वडील 'जी ले अपनी जिंदगी' म्हणू लागले. दिलवाले दुल्हनिया मध्ये आदित्य चोप्राला राज मल्होत्राच्या रोल साठी ' टॉम क्रूझ' ला घ्यायचं होतं, पण सुदैवाने यश चोप्रांनी याला नकार दिला (आता सिमरन ला पलट म्हणणाऱ्या टॉम क्रूझ ची कल्पना सुद्धा करू शकत नाही). डर, बाजीगर सारख्या चित्रपटांमुळे आधी अँटी हिरो इमेज असलेल्या शाहरुख खानला या सिनेमाने रोमँटिक नायक केलं,'अमिताभ नंतर कोण?' या प्रश्नाचे तितके प्रभावी नसले तरी तितकेच यशस्वी बॉलिवूडला मिळाले होते.
'दिलवाले दुल्हनिया..' प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे लोटली.थेम्स आणि सतलजमधून आता बरंच पाणी वाहून गेलं आहे, Trafalgar Square पाशी कबुतरांना दाणे टाकायलाही तिथल्या प्रशासनाने बंदी घातली आहे म्हणे. , सध्या नात्यांच्या संकल्पनाही काळानुरूप बदलल्या. पण 'दिलवाले दुल्हनिया..'ची मोहिनी मात्र आजही कायम आहे. खऱ्या आयुष्यात राज मल्होत्रा च्या बापासारखा बाप कुठे खरच असतो का हे नाईंटीज वाली पोरं अजूनही शोधत आहेत. बाकी प्रेमकथा पडद्यावरच नेहमी मोहक वाटतात पण खरं आयुष्य माणसाला वासेपूर मधला 'फैजल' बनवतं ......!
प्रतिक्रिया
20 Oct 2020 - 4:04 pm | भीमराव
हिंदुस्थान मे जब तक सनीमा है, लोग *** बनते रहेंगे.
- लोकसंत रामाधीरसिंग
20 Oct 2020 - 4:07 pm | महासंग्राम
अगदी अगदी
21 Oct 2020 - 12:30 pm | साहना
बॉलिवूडच्या सतत रद्दड कथेच्या चित्रपटांपेक्षा जास्त कुतुहूल मला अश्या लोकांचे वाटते जे लोक हे चित्रपट पैसे देऊन पाहतात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इतका मूर्खपणाचा चित्रपट होता..... एका सिन मध्ये शाहरुख आणि काजोल ट्रेन मध्ये जाताना काजोलच्या अगदी अंगावर पडतो, मग तिचे कपडे काढतो (तिच्या बॅग मधून, अंगावरील नव्हे) इत्यादी. कुठल्याही रोमियोने हा प्रकार मुंबईतील ट्रेन मध्ये केला तर तो पुन्हा प्रेम करायच्या लायकीचा राहणार नाही ! मुळांत प्रेम म्हणून असल्या गोष्टी दाखवणे हेच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
21 Oct 2020 - 1:16 pm | योगी९००
हो बरोबर.. बरेचसे सिन न पटण्यासारखे होते...
घरी वडीलांना घाबरून "ओम जय जगदीश " करणारी काजोल प्रवासात मात्र चर्च मध्ये प्रेयर ऑफर करायला जाते. मी परदेशात बरीच वर्ष राहीलो. एकाही चर्च ला प्रेयर साठी कधी गेलो नाही किंवा जावेसे वाटले नाही. (फक्त काही चर्च बघण्यासाठी मात्र गेलो होतो).
तसेच काजोल ट्रेनमध्ये पुस्तक घेऊन वाचत बसली असताना बाजूने पुस्तकात डोकावण्याऐवजी शाहरूख पुस्तकाच्या खालून डोके घालून (म्हणजे ते पण तिच्या सर्वांगाला स्पर्श करत) ती काय वाचते आहे असे प्रयत्न करतो. आपण प्रवासात कोठेही अनोळख्या व्यक्तीच्या पुस्तकात बाजूनेही डोकावण्याचे धाडस करणार नाही. हा मात्र एकदम अंगचटीला जातो. तिला ही त्याचे जास्त काही वाटत नाही.
20 Oct 2020 - 7:39 pm | योगी९००
टॉम क्रूझला हिंदी चित्रपटात ?
त्याने आत्तापर्यंत चित्रपटाने जेवढा धंदा केलाय तेवढे पैसे घेतले असते.
20 Oct 2020 - 9:50 pm | महासंग्राम
अगदी खरंय
21 Oct 2020 - 9:27 am | शा वि कु
गुगल प्रमाणे सध्या टॉम पेक्षा शाहरुख जास्त प्रति सिनेमा जास्त पैसे आकारतो.
खरे खोटे शाहरुख (आणि टॉम) जाणे.
21 Oct 2020 - 3:10 pm | तुषार काळभोर
१९९६ च्या मिशन इम्पॉसिबल साठी टॉम क्रुझ ला ७ कोटी डॉलर्स मिळाले होते.
शाहरुखला आता तीन कोटी डॉलर्स एका चित्रपटाला मिळतात.
20 Oct 2020 - 9:16 pm | उपयोजक
कदाचित दुबईतून भाईचा फोन यश चोप्रांना आल्याने 'टरकून' चोप्रांना ही संधी शाहरुखला द्यावी लागली असावी. ;)
21 Oct 2020 - 7:25 am | Gk
आणि मग चांदणी , सिलसिला बनवताना कुनाचा फोन आला होता ?
21 Oct 2020 - 8:10 am | तुषार काळभोर
युरो ट्रीप हा सर्वात आवडता भाग. तो सोडून बाकी पिक्चर आता अर्ध्या तासात बसवायला लागेल.
अमरीश पुरी एक लंबर
अनुपम खेर जरा बालिश, पण पोराच्या मागे खंबीर पणे उभा राहतो प्रत्येक वेळी.
आणि शाहरुख ... किलर!
' पलट ' चा सीन त्याच्या इतका चांगला कुणाला जमला नसता.
21 Oct 2020 - 2:03 pm | प्रचेतस
हा सिनेमा सुमारच होता. ह्याच्यापेक्षा हम आपके है कौन नक्कीच भारी आहे.
21 Oct 2020 - 3:04 pm | तुषार काळभोर
लो चली मै गाण्यानंतर पाहवत नाही!
21 Oct 2020 - 3:08 pm | प्रचेतस
त्यानंतर एकदमच सूर बदलतो सिनेमाचा.
21 Oct 2020 - 6:49 pm | महासंग्राम
मी फक्त रेणुका शहाणे पायऱ्यांवरून पडते तेव्हा पर्यंत पाहतो
21 Oct 2020 - 3:48 pm | Gk
मराठा मंदिर मुंबई सेंट्रल
अजून सुरू आहे
21 Oct 2020 - 3:51 pm | शा वि कु
यांचा ddlj वरचा व्हिडीओ भन्नाट आहे.
https://youtu.be/TOZyX3bv2Hc
21 Oct 2020 - 6:36 pm | दुर्गविहारी
तीनही खान ( आणि अजुन कोणी असतील ते ) डोक्यात जात असल्यामुळे हा किंवा इतर चित्रपट बघायचा प्रश्नच येत नाही.बाकी हि चित्रपट मराठा मंदिरमध्ये चालविला गेला आहे.केवळ रेकॉर्ड्साठी. अधिक काही लिहायची इच्छा नाही.
21 Oct 2020 - 11:52 pm | माम्लेदारचा पन्खा
त्याच्या हातामागे धावत जाते....... अशा मठ्ठ बाईला ह्या हकल्याशिवाय चांगला मुलगा मिळणार नाही हे अमरीशपुरी ओळखून चुकले आणि त्यांनी तिचा हात सोडला शेवटी !
22 Oct 2020 - 11:07 am | दुर्गविहारी
लोल ! :-))))
करणं जोहरी आणि चोप्राचे चित्रपट बघताना मेंदूचा वापर बंद करायचा. तरच सुसह्य होऊ शकत.
22 Oct 2020 - 11:40 am | महासंग्राम
हाहाहाहाहा
22 Oct 2020 - 5:19 pm | Gk
गाडी चालू आणि आपण लगेच चढले तर आपण पडू
थोडे पळून पकडले तर धक्का कमी लागेल
असा माझा अंदाज आहे