गुलाबी कागद निळी शाई....7जवळीक

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
10 Jul 2020 - 7:24 am

गुलाबी कागद निळी शाई..6 शहारा
Hi
हायेssss. शिकारी खुद यहा शिकार बन गया.....
शप्पथ सांगते तेव्हा मी अजिबातच notice नव्हतं केलं तुला.
Btw मी पण योगा सोडला आणि मेंगो कलरचा ड्रेस होईनासा झाला. तुझेच शब्द बदलून
कली का फूलगोबी होते,
बादल का बादली होते,
दूध का दुधी (भोपळा) होते,
किसने देखा है?
दुनिया देखे न देखे,
मैने ग्राम को किलोग्राम होते देखा है...
;););)
तशी मी कालपासून हसतेय. तुझी शायरी वाचून. म्हणजे आधी मी ती मराठीत आहे असंच समजले. मग जो भन्नाट विनोदी अर्थ लागला की नंतर खरा अर्थ कळूनही ते हसू थांबले नाही. अरे वेड्या, विरामचिन्हे नाम की भी कोई चीज़ होती है ना?
ए, चिडला नाहीस ना?
काय करू? मला पटकन हसू येते. अगदी नको तेथे. अन् थांबवता पण येत नाही. माझ्या दुर्गुण list मध्ये अजून एक भर. योगा क्लास म्हणूनच सोडला. त्या सगळ्या instructions ऐकताना इतकं हसू यायचं. आणि माझ्यामुळे तिथली शिस्त बिघडून गेली असती.
Btw मी तर माझी list चालू केलीय. पण तुझ्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. सांग ना तुझ्याबद्दल. म्हणजे अगदी 1,2,34 असं नाही पण in general. तेवढा मोकळेपणा वाटत असेल तरच अर्थात. मी अजून तितकी ओळखत नाहीय तुला पण का कोण जाणे तुझ्याजवळ मोकळेपणाने व्यक्त होऊ शकेन एवढा विश्वास नक्की वाटतो. आणि वयाची पस्तिशी गाठली की थोडीफार माणसंही ओळखता येतात ना? त्यामुळे तू शिकारी चुकूनही वाटत नाहीस मला.
पुरुष आणि स्त्री यात हाच महत्त्वाचा फरक असावा का? स्त्री आधी मनाने जवळ येते मग स्पर्शाने. तुझ्या जवळ यायला खूप उत्सुक...
तुझी

मुक्तकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

रातराणी's picture

10 Jul 2020 - 12:30 pm | रातराणी

फार छोटी पत्रं लिहिताय. पोस्टकार्डच लिहायचं असं काही ठरवलंय का? लिहा की जरा दणदणीत अंतर्देशीय पत्र. आम्ही लहान असताना पत्र लिहायचो तर कोपरा न कोपरा भरून जात असे. :)

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 7:51 am | प्राची अश्विनी

अभिवाचनासाठी हा पत्र प्रपंच केला होता. मात्र ठे व्हिडिओ कुणी पाहील की नाही ही शंका होती. असो. पुढच्या पत्रात संपेलच.

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 7:51 am | प्राची अश्विनी

#मोठे

श्रीकांतहरणे's picture

12 Jul 2020 - 2:31 pm | श्रीकांतहरणे

फारच रोमँटिक मूड पकडलाय. सोळावं व वरीस धोक्याच ऐकलं होत पस्तिशी पण तसंच काही का :-))

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 7:49 am | प्राची अश्विनी

:)

प्रचेतस's picture

13 Jul 2020 - 9:17 am | प्रचेतस

मस्त

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 7:49 am | प्राची अश्विनी

धन्यवाद..

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2020 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले

अपेक्षाभंग.

टायटल वाचुन खुप जास्त अपेक्षा ठेऊन धागा उघडाला होता , पण हे तर फारच दवणीय निघालं हो .

मला पोरींच्या, विशेश करुन मराठी , रोमॅन्स च्या कल्पनांविषयी च्या कल्पंनांचे फार कुतुहल आहे पण हे असे लेखन वाचले की फारच के.एल.पी.डी. होतो राव =))))

प्राची अश्विनी's picture

18 Jul 2020 - 1:10 pm | प्राची अश्विनी

:)) हम्म्... चालायचंच.