दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

chittmanthan.OOO's picture
chittmanthan.OOO in जनातलं, मनातलं
4 May 2020 - 9:40 pm

कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर
पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही.
मास्कने चेहरा झाकला होता पण डोळ्यातलं ते. समाधान तो आनंद कॅमेरामन च्या कॅमेरात कैद होत नव्हता. एखाद्या युध्दात केलेल्या परक्रमासाठी इनाम घ्यायला ज्या जोशात गेले नसतील त्याहून जास्त आवेशात छाती बाहेर काढून रांगडे गडी आणि बाया रांगेत उभ्या होत्या.
रांगेतल्या लोकांना जणू काही सर्व स्वप्नवतच होत सार. दोन महिन्यांची क्रूर प्रतीक्षा संपली होती.गेल्या दोन महिन्यात यांनी ग्लास उचलला तो पाणी पिण्यासाठी.. बर्फ टाकला तो सरबत बनवण्यासाठी आणि शेंगदाणा खाल्ला तो उपवासाच्या शाबुमध्ये.आता थरथरणारे ओठांच दुःख संपलं अस वाटत असतानाच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दारू दुकान उघड ठेवायच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली. आपला आनंद कुणाला सहन होत नाही अस म्हणून बंद व्हायच्या भीतीनं आणि दोन बाटल्या एक्स्ट्रा घेणाऱ्या बेवड्यानी बोट मोडली.
अनेकांनी दारू विक्री सुरू ठेवावी अशी मागणी केली होती. काहींना वाटलं हे बेवड्यांची बाजू घेत आहेत. अर्थशास्त्र समजनाऱ्याना वाटलं आर्थिक स्त्रोत म्हणून ही मागणी केली आहे. खरंच इतका मोठा वाटा दारू विक्रीचा आहे का? तर उत्तर होय अस येत. गेल्या दोन महिन्यात बंद असलेल्या दारू विक्री मुळे देशाला दररोज जवळपास सातशे कोटी च्या कराला मुकावे लागले.
भारतात जागतिक ३३% सरासरीच्या तुलनेत दारू पिनाऱ्यांचे प्रमाण कमी म्हणजे 15% असले तरी भारतात गेल्या सात वर्षांत दारूची मागणी 38% नी वाढली आहे.इतक्या झपाट्याने मागणी वाढणारे हे बहुदा एखादेच क्षेत्र असेल. भारतातल्या खूप साऱ्या राज्यात एकूण कर गोळा होतो त्याच्या जवळपास 20% वाटा हा दारुउद्योग चा आहे. सरकारदरबारी नोंद नसलेल्या गावठी दारू, ताडी आणि भांग पिणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे.
हे झालं अर्थशास्त्र. आता समाजावरचा परिणाम तितकाच महत्वाचा. जसं दारू विक्री वाढली तर कर उत्पन्न वाढते तसाच दारूचे दर वाढल्यावर कुटुंबावर होणारा खर्च कमी होतो असाही निष्कर्ष काढला जातो. ज्यातून चांगलं अन्न, आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. घरगुती हिंसाचार वाढतो.दारू पिऊन गाडी रेटणारे लाखो अपघातांना निमंत्रण देतात. विषारी दारू प्यायल्याने मेलेले लोक सुध्दा खूप आहेत.
आर्थिकदृष्ट्या फायद्याची बाजू समाजशास्त्रीय दृष्ट्या चुकीची असेल तेव्हा दोघांमध्ये समतोल साधणे कठीण होऊन जातं. तरी समतोल साधायचाच अस ठरवल तर सुरवातीच्या टप्प्यात जे लोक दारूच्या पूर्ण आहारी गेले त्यांची संख्या कमी करावी लागेल.ती करताना जोरदार समाजजागृती, वैद्यकीय मदतीबरोबर मानसोपचार तज्ज्ञांची पण मदत दिली पाहिजे.दुसरं म्हणजे दरडोई दारू प्राशन 2007 साली जे 2.4 लिटर होते ते वाढून 2016 मध्ये 5.2 लिटर इतके झाले होते ते कमी करावे लागेल. हे कमी झाल्याने उद्योग तोट्यात जाऊ नये म्हणून लीकर उद्योगाला निर्यात कशी वाढवता येईल यासाठी मदत करावी लागेल. भुमध्य समुद्राला लागून असलेले देश वाइन निर्मिती मध्ये अग्रेसर आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतीची वाइन भारतात निर्माण व्हावी यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे.ज्यातून रोजगार निर्मिती ही होईल.
मद्य उद्योग हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडेल किंवा मंदी येईल असा नाही. त्यामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम कमी करून ह्या उद्योगाचा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी करून घेणं गरजेचं आहे.

टीप- वरील लेख कुणीही मद्याचे सेवन करावे ह्यासाठी प्रोत्साहन करत नाही. मद्याच्या आहारी गेलेल्या लोकांमुळे होणारे समाजाचे नुकसान जाणतो .ह्या लेखातून फक्त वास्तविकता मांडलेली आहे.

जीवनमानविचारलेखमत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2020 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम माहितीपूर्ण लेखन, मनापासून आवडले. आभार.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

5 May 2020 - 10:24 am | चौकस२१२

दारू निर्यात .. आहों कोणाला पडलेली दिसत नाहीये
जगातील सर्वाधिक खप असलेल्यापकी एक रम म्हणजे ओल्ड मन्क.. पण ती सुद्धा आपल्या एअरपोर्ट "एक्सिट ड्युटी फ्री" ला तरी मिळावी.. जेणेकरून भारताची आठवण म्हणून लोक नेतील पण तेवढे पण नाही
मारे "अमृत" हि सर्वात जागतिक भारि व्हिस्की आशय बढाया मारतो पण तिची एकूण विक्री किती?
ओल्ड मन्क ला स्वदेशी म्हणून मार्केटिंग करता येईल पण नाही... टिपत देशातील कॅप्टन मॉर्गन जगात तर मिळतेच पण भारतात आली पण ओल्ड मन्क बाहेर पोचली नाही..
याशिवाय जरा ब्रॅण्डिंग करून फेणी निर्यात करता येते .. पण यासाठी लागणारे प्रयत्न, आणि पैसे खर्च कार्याला नकोत
दारू सोडा.. अशो छोटा श्री लंका आपलं डिल्मा जगभर पोचवतो पण भारतीय चहा स्वतःचं नावाखाली नाही? मिळतो भारतांबेहर पण ते फक्त भारतीय किराणा मालाचं दुकानात...

chittmanthan.OOO's picture

5 May 2020 - 11:05 am | chittmanthan.OOO

धन्यवाद

खूप कर गोळा होत असला तरी या परिस्थितीमध्ये दारूची दुकाने उघडणे धोकादायक आहे. कमी आर्थिक प्राप्ती होत असताना दारूवर पैसे खर्च होण्याचा धोका आहे.

तो धोका असला तरी लॉकदाऊन वाढेल तस सरकारला खर्च करायला रक्कम ही लागेल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2020 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही जनता तर कालपासून मद्यसेवकांच्या नावाने बोटं मोडून हा मद्यसेवकांचा परिवार किती अधाशी, किती हावरट, आणि किती व्यसनी आहेत यावर बोल्ड अक्षरं करुन काथ्याकूट करतांना दिसला. मी काही भलामन करीत नाही आणि तो काही कौतुकाचा विषय नाही. मद्य सेवनाचे दुष्परिणाम वगैरे हे अखंड सप्ताह आयोजित करुन बोलण्याचा विषय आहेच त्यात काही वाद नाही.

असं असलं तरी सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. सरकारला हे काय माहिती नसणार का, किती गोंधळ होईल, किती संसर्ग होऊ शकतो, किती काळजी घ्यावी लागेल. हे सर्व माहिती असून सरकार जेव्हा असा धोका उचलते तेव्हा लक्षात येते की सर्व सोंगे करता येतात पैशाचे सोंग करता येतनाही. काही बातम्यांमधून असेल दिसले की सरकारला २१०० कोटींचा महसूल मे अखेर मद्यविक्रीतून अपेक्षित आहे. कोणत्याच काळात मंदी नसणाया-या मद्यांच्या कंपन्यांचे शेअर तेजीत दिसले.

एकूणच कोरोनाच्या आजारापेक्षा मद्यसेवनाने जी काही हानी होईल ते होऊ द्या परंतु मद्यविक्रीतून महसूल मिळाला पाहिजे हा स्पष्ट हेतू त्यात आहेच. बदनामी मद्यपींची होईल सरकारची नाही, त्यामुळे अर्थशास्त्राच्या गणिताबद्दल अजून काही माहिती असेल तर ती वाचण्यास उत्सुक आहेच.

-दिलीप बिरुटे

सरनौबत's picture

5 May 2020 - 10:31 pm | सरनौबत

अर्थव्यवस्था मजबूत करी दारू
बाटलीस स्पर्श त्वरित करू

चौकस२१२'s picture

6 May 2020 - 4:25 am | चौकस२१२

जगात सगळीच सरकार दोन अघड्यवर लढत आहेत १ ) विषाणू आणि २) आर्थिक संकट त्यामुळे काही निर्णय विचित्र वाटणारच ...
आपण सरकारचं जागी असतो तर आपल्याला हे निर्णय घेणे किती अवघड गेले असते याचा सर्वांनी विचार करावा
आणि त्यात आगीत तेल म्हणजे ज्या समाजात दारू म्हणलं कि दोन टोकाच्याच भूमिका असतात तिथे हा वाद झाला तर काय नवल..

त्यामुळेच पाठिंबा आहे दारू विक्री सुरू करायला

Nupur Padekar's picture

6 May 2020 - 10:37 am | Nupur Padekar

अगदी सुंदर लेखन.

गणेशा's picture

6 May 2020 - 11:01 am | गणेशा

बरोबर लिहिले आहे..

सरकार च्या तिजोरीचा खडखडाट पाहता हे करावेच लागणार होते..

तरी हि अन्य बाबी test आणि इतर लिहायला घ्याव्यात असे वाटायला लागले आहे..
शनिवारी लिहिण्याचा प्रयत्न करतो..

जगभर आता "निर्बंधी मागे घ्या " यावर सरकार ला काम करावे लागतंय त्यात मगकोणी अति शहाणे कुठे "घरबंदी म्हणजे कम्युनिस्ट पणा" इत्यादी तारे तोडत आहेत तर कुठे "दारूच्या दुकानांनाच का उघडू दिली" यावर वाद...
दारू च्या दुकानपुरते बोलायचे तर तेथील वर्दळ कशी असेल यावर हे अवलंबून असले पाहिजे... अनेक देशात भली मोठीही दुकाने असतात आणि तशी वर्दळ कमी असते तिथे माणसात अंतर राहू शकते.. इअर ठिकाण अवघड
महसूल आणि सामाजिक स्वास्थ्य यातील हे वैचारिक युद्ध आहे म्हणजे परत अति उजवे आणि अति डावे!
अशावेळी परत "जबाबदार भांडवलशही+ समाजवाद " हि लांब पाल्यासाठी चांगले यावरील विश्वास वाढला ( ऑस्ट्रेलिया कॅनडा इत्यादी )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2020 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवळाच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. यात्रा-उत्सव आहेतच.  आज एक मित्र म्हणाला ते पटलं, फूकट काही असलं तर लोकांची झुंबड उडतच असते, इथे तर पैसा मार्केट मधे येतोय. हे पैसे खर्च करणारे कोण आहेत ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असेच असतील.  सध्याही बॅंकेत पैसे काढायला लोकांनी गर्दी केलीच  परश्न गर्दीपेक्षा संसर्गजन्य रुग्णाशी संपर्क आला तर त्या भीतीचा असला पाहिजे आणि यापूढे ही भिती नेहमीच आपल्याला बाळगावी लागणार आहे. मला तर या मद्यसेवकांबद्दल आता सहानुभूती वाटायला लागली आहे, असे अडलेले नडलेले मद्यसेवक थेट गाडीत बसवून दुकानापर्यंत न्यावे, जिथे कुठून बसलेले असतील, अडखळत असतील तर गाडीत घरापर्यंत सोडून यावे... असेही वाटू लागले आहे.(अटीलागू)   (ह.घ्या) धाग्याला पीन करुन वर ठेवा रे....!⋆ता.क. मद्यसेवन आरोग्यास अपायकारक आहे. सदरील प्रतिसादामुळे कोणास प्रोत्साहन अथवा इच्छा झाल्यास व अपायझाल्यास त्यास प्रतिसादकरता जवाबदार असणार नाही. -दिलीप बिरुटे

chittmanthan.OOO's picture

7 May 2020 - 4:02 pm | chittmanthan.OOO

हाहा खरे म्हणता आपण

चौकस२१२'s picture

7 May 2020 - 2:42 pm | चौकस२१२

दर्ग्यात / मशिदीत चेंगराचेंगरी होते तेव्हाही लोक असेच विचारांचे तारे तोडत असतात. उरूस, हाज यात्रा आहेतच.
" सर्वधर्मसमभाव "

शेखरमोघे's picture

7 May 2020 - 6:55 pm | शेखरमोघे

छान लिहिले आहे.
"नैतिक - अनैतिक" तसेच सरकारच्या आर्थिक परिस्थितीकरता चान्गले पण लोकाना हानीकारक यात इतर बर्‍याच बाबी समविष्ट होऊ शकतील - जसे धूम्रपान, जुगार मटका, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इ. इ.
काही युरोपिअन देश अमली पदार्थ वापरणार्‍या लोकाना, त्याना दूषित सुया पुन्हा वापरल्याने HIVची बाधा होऊ नये म्हणून मोफत नव्या सुया पुरवतात. त्यामध्ये अशा सरकारचा काहीतरी cost benefit analysis असेलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2020 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मद्यसेवकांच्या गर्दीमुळे फिजीकल डिस्टेंचा बोजवारा उडाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने होम डिलीव्हीरीची व्यवस्था करावी असे राज्यांना आदेश दिल्याची बातमी वाचनात आली. सरकारच्या आदेशात मद्यविक्रेत्यांना विक्रीच्या बाबतीत स्पष्टता दिसत नसल्यामुळे याचिका आलेली दिसते. एकूणच भविष्यातही अशी व्यवस्था व्हायला पाहिजे, मी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या भूमीकेशी सहमत आहे, फार गर्दी केली पहिल्या दिवशी लोकांनी. तशाही, आता गर्दीच्या बातम्या फार दिसत नाहीत . मद्यसेवकांनी नियमांचं मनावर घेतलेले दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. नियम पाळले पाहिजेत.

बातमी संदर्भ.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2020 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अखेर मद्यसेवकांनीच सांभाळली अर्थव्यवस्था. दोन दिवसात ५० कोटींची उलाढाल.काळजी घ्या रे बाबांनो.तब्यतीला जपा. देश आपल्या भरवशावर
हळूहळू का होईना समर्थपणे वाटचाल करीत आहे. पॅकेज वगैरे सर्व अंधश्रद्धाच वाटत आहे.

''रसत्यात दिसला कुठे हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा तर त्याच्या पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणा''

संदर्भ :बातमी.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

21 May 2020 - 12:15 pm | सुबोध खरे

५० कोटी ची उलाढाल त्यात सरकारला कर किती तर ३५ कोटी

नंगा नहायेगा क्या और निचोडेंगा क्या?

मराठी कथालेखक's picture

21 May 2020 - 4:15 pm | मराठी कथालेखक

दारू दूकान सुरू करण्यामागे फक्त अर्थिक कारण म्हणजे सरकारी महसूल असेल असे वाटत नाही. तसेही अनेक व्यवसाय, कारखाने बंद असताना हजारो कोटींचा कर/ महसूल बुडत असताना एकट्या दारुने कितीसा महसूल मिळणार ?
सरकारचे अर्थिक नुकसान तर खूप झाले आहे. पण मला वाटते सरकार आता लवकरच नोटा छापणार (म्हणजे आरबीआयला छापायला लावणार). मी काही अर्थतज्ञ नाही पण कमालीच्या अर्थिक संकटात हा शेवटचा उपाय असू शकतो असे मला वाटते. माझे विचार चुकीचेही असू शकतील, तज्ञांनी मत व्यक्त करावे ही विनंती.
दारु दुकान चालू करण्यापाठीमागे दुसरे काही कारण्/दबाव असू शकेल. दारु दुकानांकरिता दुकानदार वर्षाकाठी मोठी फी भरतो का ? तसे असल्यास त्याचे होणारे नुकसान यामुळे दारु दुकानदारांकडून दबाव असू शकतो का ?

शेर भाई's picture

21 May 2020 - 5:42 pm | शेर भाई

बरेच दिवस मासे न मिळाल्याने मद्य न वाचता सुरुवातीला मस्त्य वाचले. पण तळटीप वाचून खुलासा झाला

शेर भाई's picture

21 May 2020 - 5:43 pm | शेर भाई

तळटीप वाचून थोडी मौज वाटली. आजकाल सिरीयलमध्ये कौटुंबिक हिंसाचार दाखवतात आणि वर तळटीप टाकतात “आम्ही याचे समर्थन करत नाही.” दारूकाम sorry मद्यपान दाखवतात, आणि तळटीप टाकतात “मद्यपान आरोग्यास अपायकारक आहे, सबब आम्ही याचे समर्थन करत नाही.”
अप्रत्यक्षपणे एखाद्या गोष्टीचे समर्थन करायचे आणि त्याच वेळी आपण स्वत: नामानिराळे राहायचे, मस्तच प्रकरण आहे.
एखादी गोष्ट पांढरीच किंवा काळीच असते अस शिकविलेल्या OLD School वाल्यांसाठी हे Grey – Matter पचताना थोडा वेळ लागेल, पण पचेल हळूहळू.
तळटीप: -
जे आकडे तज्ञ “भारतीय दारूचे जागतिकीकरण आणि त्याने भारतीय अर्थकारणाचा होऊ घातलेला विकार विकास” अभ्यासू इच्छितात त्यांनी आपल्या संशोधनात Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप (पाण्याचा नव्हे) यांच्या विक्रीची आकडेमोडपण विचारात घ्यावी. कारण बहुतेक ठिकाणी धुम्रवलयांकित मद्यसेवन पहिले जाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2020 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका, सध्या सरकारला जो अबकारी कराचा नगदी अड्डा सापडला आहे त्यावरच चर्चा सुरु आहे.

बाकी, आपल्याकडे जर Cigarette, विडी, हुक्का आणि पाईप यांच्या विक्रीतुन जो काही कर मिळतो त्याचा विदा असेल तर तोही घेऊन या आपण त्याचीही चर्चा करू.

आपल्या मिपावर सर्व प्रकारचा काथ्या कुटुन मिळतो.

-दिलीप बिरुटे

शेर भाई's picture

21 May 2020 - 9:53 pm | शेर भाई

माझा प्रतिसाद “तळटीप” संबधी होता. पण “तळटीप” न टिपता नको ते टिपलय अस वाटत. बाकी चर्चा कशावर चालू आहे ते समझलच होत, तरीही पुनःप्रत्यायासाठी धन्यवाद . आपण मस्त्यप्रेम vs or = मद्यप्रेम miss केलत
तळटीप: -
काका, दादा किंवा आजोबा ठरविण्याचा Thumb rule काय आहे??

सुबोध खरे's picture

21 May 2020 - 7:14 pm | सुबोध खरे

दारूची दुकाने बंद असली तरी अनधिकृत विक्री चालूच होती.

यात सरकारचा महसूल बुडतो

अबकारी खात्याचे रोजे चालू होतात

दारूच्या दुकानदारांनी टेबलाखालून दिलेले पैसे त्यांना वसूल करून घ्यायचे होते

इ अनेक कारणे आहेत

हुच्चभ्रू लोकांच्या घरचा साठा संपला होता.

तणावमुक्ती साठी दुसरा उपाय सुचत नव्हता

यात भर म्हणजे हातभट्टी किंवा सॅनिटायझर पिणे हे प्रकार चालू होते.

ते पिऊन जर विषबाधा झाली असती तर सरकारचे नाक कापले गेले असते

म्हणून सरकारने दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली

सुबोध खरे's picture

21 May 2020 - 7:16 pm | सुबोध खरे

हुच्चभ्रू लोकांमध्ये बॉलिवूडचे लोक उद्योगजगतातील बडी धेंडे इ लोक, अनेक वरिष्ठ सनदी आणि सरकारी अधिकारी होते.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:37 pm | आयर्नमॅन

म्हणून दुकाने उघडायची वेळ आली ?

हया हया हया... कोरडा घसा तर सामान्यांचा होतो

सुबोध खरे's picture

22 May 2020 - 11:11 am | सुबोध खरे

कोरडा घसा तर सामान्यांचा होतो.

सामान्य माणसांना कुत्रं सुद्धा विचारत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2020 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारला एकूण किती महसुल जमा झाला काही अधिकृत माहिती ??

-दिलीप बिरुटे

शा वि कु's picture

2 Jul 2020 - 6:17 pm | शा वि कु

दारूचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत, पण दारूची दुकाने बंद ठेवणे हे व्यसनाधीन व्यक्तींसाठी फार क्लेशदायक ठरते. त्यामुळे असे अचानक दुकान बंद केल्यावरती त्रास सहन करावा लागू शकतो.

आणि दारूची वाढीव किंमत आणि दारूचा कमी खप असे कोरिलेशन खरच असते काय ? यावर काही विदा असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा.