आमने सामने

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
31 Mar 2009 - 12:15 pm

(सदर लेख हा फक्त मौजमजा आणी मिपाकरांना थोडेसे हास्य क्षण द्यावेत म्हणुन लिहिला आहे. लेखात ज्या ज्या मिपाकरांची नावे आली आहेत त्या पैकी एकाचीही मी ह्या साठी परवानगी घेतलेली नाही. ह्या लेखा मागच्या भावना समजावुन घेउन तुम्ही मला माफ कराल असा मनात विश्वास (म्हणजे आपले पानिपत होणार नाही) आहे.

ह्या लेखात झालेल्या उल्लेखानी कोणी दुखावले गेल्यास मी त्याची आधीच जाहिर माफी मागत आहे. संपादक मंडळास ह्या लेखात काही अनुचीत वाटल्यास ते कुठल्याही क्षणी हा लेख येथुन उडवुन लावु शकतील.)
--------------------------------------------------------------------------------------------

लालकृष्णजींनी सरदार मनमोहन सिंग यांना दुरचित्रवाहिनीवर आमने सामने यायचे आव्हान दिले, परंतु आपल्याकडे ते शक्य न्हवतेच. पण या बातमीनी मिपावर मात्र एक प्रकारचा उत्साह वाहायला लागला, 'च्यायला आपल्या हॉटेलात का होईना दोघांना पकडुन हा आमने सामने शो व्हायलाच पाहिजे' असे वारे मिपावर वाहायला लागले. आमने सामनेची कल्पना मिपावर फारच उचलली गेली.

सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की आमने सामने आयोजीत करणे म्हणजे दोन विरुद्ध पक्ष पाहिजेत, त्यांना चिखलफेकीचा अनुभव पाहिजे. मिपावर तर कधी दोन विरुद्ध पक्ष पडलेत असे झालेच न्हवते (थोडी कंपुबाजी आहे म्हणे) पण मग आता काय करायचे ? पण शेवटी हे सगळे मनोरंजन आणी आमने सामने चा आनंद लुटण्यासाठी असल्याने दोन लुटिपुटिचे उमेदवार निवडण्याचे ठरले. मी कशाला मी कशाला अशी सुरुवात होउन शेवटी 'एक परदेशी विरुद्ध एक देशी मिपा वाला' किंवा 'एक संघ वाला विरुद्ध एक गांधीवादी' इथपर्यंत गाडी येउन थांबली. शेवटी ह्या सगळ्यावर काट मारुन सर्वसंमतीने तात्या विरुद्ध प्रा. डॉ. असा आमना सामना ठरला.

'चला शालु बाहेर काढायला मुहुर्त मिळाला.' हे चतुरंगांचे वाक्य मिपावरील लगबगीचे वर्णन करायला पुरेसे आहे असे वाटते. सगळ्या हॉटेलात नुसता उत्साह पसरला होता. तात्या का प्रा. डॉ. अशा चर्चेला उत आला होता. मिसळीचे प्रेमी, 'पुरी' प्रेमी ह्यांच्या संस्थळावरही याच कार्यक्रमाच्या चर्चेने उच्छाद मांडला होता.

"बा**** डॉक्टर दोन बायका पण ठेवायच्या का स्टेजवर वारा घालयला ?" गुरुवर्य तात्या.

"तात्या, आपण तिकडे आमने सामने उभे राहुन एकमेकांशी वाद घालणार आहोत, दरबारात बसुन मधुबालाचे नृत्य बघणार नाही आहोत." प्रा. डॉ. नी परस्पर प्रश्न निकालात काढुन टाकला.

"पण साला निदान मध्यंतरात एखादा पेग तरी अलाउड केला पाहिजे नाहितर काय शा*** वाद रंगणारे ? तात्या उवाच.

"ते बघु नंतर. पण तात्या स्टेजवर हे असले शब्द टाळलेलेच बरे." प्रा. डॉ. ची समजावणी.

"खरे आहे बाबा.. आजकाल तात्याला पार बंधनात अडकवुन टाकला आहेत लेको तुम्ही, पण प्रेमाचे पाश आहेत... तोडता येत नाहीत." तात्या.

म्हणता म्हणता 'आमने सामने' चा दिन उजाडला.
आ हा हा वर्णन करायला शब्द तोकडे पडतील असा उत्साह ओसंडून वाहात होता. जेष्ठ मिपाकरांबरोबरच आत्ता आत्ता मिसळीची तर्री ओरपायला शिकलेले मिपाकरही जातीने हजर होते. हॉटेल मधल्या सभासदांबरोबरच, मिसळीचे प्रेमी, 'पुरी' चे प्रेमी सुद्धा मोठ्या संख्येनी गर्दी करुन होते.

"वा ! खुप छान वाटतय.. गर्दी पण कीती आहे ना." इती नैनी बाई.

"हम्म्म्म गर्दी तर काय आठवलेंच्या सभेला पण जमते हो !" टारझनाचा फुत्कार.

"जरा तुमच्या हिन आणी हिणकस कॉमेंट बंद करुन कार्यक्रम बघाल का ?" डॉनरावांनी मागुन पृच्छा केली.

टारझननी त्यानंतर दंडाची फुगवुन दाखवलेली गोटी बघुन डॉनराव दोन रांगा मागे जाउन बसले.

ह्या गडबडीत तात्या आणी प्रा. डॉ. मंचावर हजर झाले. पंच म्हणुन देवबाप्पांची एकमताने निवड करण्यात आली. एक वेगळी परंपरा म्हणुन तात्या व प्रा. डॉ. ह्यांनीच एकमेकांचा सत्कार केला. आता दोघेजण पुर्ण तयारीने आमने सामने उभे राहिले.

"फोकलीच्यांनो, प्रा. डॉ. सारख्यांचा आमना सामना करायला तुम्हा लोकांना कोण सापडला तर हा बाई बाटली वाला तात्या होय ?" असे म्हणत तात्यांनी आदरानी प्रा. डॉं. ना नमस्कार वगैरे केला.

'ज्यानी हाताचे बोट धरुन आंतरजालावर हिंडवले, ह्या जगाची ओळख करुन दिली आज त्याच्या समोरच उभे राहायची वेळ आली." असे बोलत प्रा. डॉं. नी सुद्धा तात्यांना नमस्कार केला. (इथे समस्त मिपाकरांनी आपल्या डोक्याला हात मारुन घेतला)

"विषयाला धरुन बोला. अवांतर नको. विषय काय ? तुम्ही बोलताय काय ? का आता 'आमने सामनेचे' पण विडंबन बघायला लावताय आम्हाला ? " संत दुखोबा समोरच्या रांगेतुन ओरडले. वेळ पडल्यास हे मिपाच्या मालकांनाही दमात घ्यायला कमी करत नाहीत.

"ह्यांच्या कडे पाण्याचा प्रॉब्लेम दिसतोय." विप्र गुर्जी शेजारीच बसलेल्या परा च्या कानात कुजबुजले.

"घरी पाणी नाही... आणी सार्वजनीक नळापाशी ह्यांना कोणी येउ देत नाही. हॅ हॅ हॅ बरोबर का नाही नाना?" पराचे एकाच वेळी विप्रंना उत्तर आणी नानाला प्रश्न.

"आमच्या घराशेजारी धरण आहे !" नानाची एका वाक्यात प्रकरणाचा निकाल लावुन टाकला.

"एका संस्थळानी तुम्हाला संमेलनाचा अध्यक्ष बनवायचा घाट घातला होता म्हणे ? तुम्ही काय आम्हाला ताकास सुर लागुन दिला नाहीत!" तात्यांनी आपल्या भात्यातला पहिला बाण काढला होत.

"येउन जाउन होतत ना त्या संस्थळावर ? त्या शिवाय कसे कळाले तुम्हाला ? आणी मी विचार केला की होउन जाउदेत एकदा मतदान मग बघु." प्रा. डॉं. चा सावध बचाव.

"कोणते स्थळ हो ते ?" कोदांचा अतिशय निरागस प्रश्न पुढच्या रांगेत बसलेल्या अदितीतैं साठी.

"भोचक प्रश्नांची उत्तरे द्यायची का नाही ते मला डॉनराव आणी पराशी बोलुन ठरवावे लागेल." कोदांच्या उत्साहावर थंड पाणी ओतत अदितीतै म्हणाल्या.

"दिवाळीच्या आधी 'रोशनी' पुर्ण करतो म्हणुन जाहिरनाम्यात आश्वासन दिले होतेत. आता शिमग्याच्या बोंबा पण मारुन झाल्या पण 'रोशनी' काय पुर्ण व्हायची चिन्ह नाहीत. प्रा. डॉं. च्या भात्यातला एक अणुकुचीदार बाण.

"खाजगी आणी वैयक्तीक प्रश्नांची उत्तरे द्यायला हा तात्या कोणालाही बांधील नाही." तात्यांचा अभेद्य बचाव.

कार्यक्रमाला आता खरा रंग भरायला सुरुवात झाली होती.

क्रमश:

विनोदसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Mar 2009 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll

रंगतदार सुरुवात झाली आहे. पुढचे भाग टाका लवकर...

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

घाशीराम कोतवाल १.२'s picture

31 Mar 2009 - 12:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

बघु तरी कसा होतो हा कलगी तुर्‍याचा सामना
बाकि तात्यांची व्यक्ती रेखा जमली बुवा
आता प्रा डॉ काय उत्तरे देणार बुवा ?
लगे रहो
मला नाहि वाटत कोणी आक्षेप घेइल ह्यावर अजुन काहि आक्षेपार्ह णाहि झाले ना
मिपाच्या धोरणानुसार मग

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

निखिल देशपांडे's picture

31 Mar 2009 - 12:27 pm | निखिल देशपांडे

सुरवात चांगली झालि आहे....
दिवाळीच्या आधी 'रोशनी' पुर्ण करतो म्हणुन जाहिरनाम्यात आश्वासन दिले होतेत
खरच तात्या कधी पुर्ण करणार रोशनी????

लेख मस्त जमत आहे रे परा लव्करच येवु देत पुढचा भाग.

सुनील's picture

31 Mar 2009 - 12:33 pm | सुनील

सुरुवात छानच.

पुलेशु

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 12:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कार्यक्रमाला आता खरा रंग भरायला सुरुवात झाली होती.

आत्तातर कुठे हसायला सुरूवात झाली आहे, परा, एवढ्यात काय रे 'क्रमशः'?

"भोचक प्रश्नांची उत्तरे द्यायची का नाही ते मला डॉनराव आणी पराशी बोलुन ठरवावे लागेल." कोदांच्या उत्साहावर थंड पाणी ओतत अदितीतै म्हणाल्या.
=)) =)) परा, मेल्या, भोचकपणे खरडवह्या पहातोस त्याचा पुरावा मिळाला रे! ;-)

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

अमोल खरे's picture

31 Mar 2009 - 12:38 pm | अमोल खरे

मजा येतेय वाचायला. पुढचा भाग टाकायला जास्त वेळ लावू नका. राजे.....तुम्हीपण हिमालय पूर्ण करायचे घ्या पाहू मनावर.

Nile's picture

31 Mar 2009 - 12:46 pm | Nile

लई बेस!

(पुढ्च्या प्लेट्ची order करतो!)Nile

दिपक's picture

31 Mar 2009 - 1:51 pm | दिपक

"हम्म्म्म गर्दी तर काय आठवलेंच्या सभेला पण जमते हो !" टारझनाचा फुत्कार.
=))

टारझननी त्यानंतर दंडाची फुगवुन दाखवलेली गोटी बघुन डॉनराव दोन रांगा मागे जाउन बसले.
=))

एक वेगळी परंपरा म्हणुन तात्या व प्रा. डॉ. ह्यांनीच एकमेकांचा सत्कार केला
=)) =)) पुढचा भाग लवकर टाका आता परा.

टारझन's picture

31 Mar 2009 - 4:41 pm | टारझन

टारझननी त्यानंतर दंडाची फुगवुन दाखवलेली गोटी बघुन डॉनराव दोन रांगा मागे जाउन बसले.

आर्रे बाबा .. का मागं लागलायस ? त्या डाण्यानं एक (जर्मन) घोडा काढला की (दंडातल्या) गोट्या कपाळात जातील की भो .. ते आमचे धाकले भाव .. :)

असो .. परा भाव .. खवाट हासलोय काही ठिकाणी .. एकंदरीत लेख उत्तम .. थिम थोडी जुणी आहे का रे ?

दशानन's picture

31 Mar 2009 - 12:55 pm | दशानन

=))

=))

=))

लै भारी परा ;)

मैत्र's picture

31 Mar 2009 - 1:48 pm | मैत्र

छान चालू आहे... पुढचा भाग लवकर टाक!!
आठवले काय, दोन रांगा मागे .. निरागसपणे .. चौफेर फटकेबाजी करुनही संयमित फलंदाजी... फारच भारी बॉ!!

कुंदन's picture

31 Mar 2009 - 1:50 pm | कुंदन

पुढचे भाग जरा मोठे आणि लवकर टाका.....

नाटक्या's picture

31 Mar 2009 - 1:59 pm | नाटक्या

परा,

जरा मोठे भाग टाक रे!! रंग भरायला लागल्या लागल्या संपला बघ. हे म्हणजे फोकलीचं बाटलीच्या बुचाने दारू पिण्यासारखं आहे, चव खरच कशी होती हे कळे पर्यंत संपली!!!! जरा जीभ तरी भिजू दे ....

- नाटक्या

दशानन's picture

31 Mar 2009 - 2:00 pm | दशानन

ह्याला म्हणत्यात अट्टल प्रतिसाद ;)

अनिल हटेला's picture

2 Apr 2009 - 12:07 pm | अनिल हटेला

>>>>ह्याला म्हणत्यात अट्टल प्रतिसाद

अट्टल टल्ली प्रतीसाद असं म्हणावं काय !! ;-)

अवांतर-प-या ,मेल्या शिंच्या वगैरे ! पूढचे भाग मोठे आणी लवकर लवकर टाक ,नायतर शिंगावरच घेतो !!! :-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शिप्रा's picture

31 Mar 2009 - 4:51 pm | शिप्रा

=)) मस्त लिहिले आहे..लवकर येऊ दे पुढ्चा भाग

चंद्रशेखर महामुनी's picture

31 Mar 2009 - 5:16 pm | चंद्रशेखर महामुनी

परा..... लेका.. चांगलाच सुटलायेस लेका...
लगे रहो..

विनायक प्रभू's picture

1 Apr 2009 - 4:06 pm | विनायक प्रभू

आण़खी काही जोड्या आमने सामने करता उदा:
संत दुखोबा- संत विप्रबा

प्राजु's picture

1 Apr 2009 - 6:05 pm | प्राजु

हम तुम्हारे साथ है!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

1 Apr 2009 - 6:06 pm | शितल

परा,
दंडवत बाबा तुला _/\_ .
हसुन हसुन फुटायची वेळ आली.
=))

रेवती's picture

1 Apr 2009 - 6:32 pm | रेवती

सुरुवात मस्त!
पुढचा भाग लवकर टाका,
नाहीतर त्याची रोशनी व्हायची.
आपण तात्यांना रोशनीबद्दल सारखं टोकत असतो,
पण तसे अनेक क्रमश: लेख पहिल्या भागानंतर आले नाहीत.
उदा. मुक्तभाऊंची बनी, धमाल मुलानेही फक्त त्याच्या गोष्टीचा
पहिला भाग टाकून पलायन केले आहे. इथं वाचक बसलेत वाट बघत
दुसर्‍या भागाची.

रेवती

दशानन's picture

2 Apr 2009 - 11:31 am | दशानन

अबे,

पुढचा भाग कधी :?

काय तुला पण राजेच्या क्रमशःचे वारे शिरले अगांत ;)

चल फटाफट टाक आजच !

निखिल देशपांडे's picture

2 Apr 2009 - 11:44 am | निखिल देशपांडे

काय तुला पण राजेच्या क्रमशःचे वारे शिरले अगांत
असेच म्हणतो.... ते राजेच्या क्रमशःच्या मागे जाउ नको लवकर लवकर टाक पुढचा भाग....

प्राजु's picture

3 Apr 2009 - 5:59 am | प्राजु

राजेच्या क्रमशःच्या मागे जाउ नको लवकर लवकर टाक पुढचा भाग....

खरे तर.. क्रमशः भाग भराभर लिहिण्याच्या बाबतीत राजेंचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना कधीही आठवण करून द्यावी लागत नाही. नाहीतर आमचे तात्या... आठवण करून दिली तरी दुर्लक्ष करतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शेखर's picture

3 Apr 2009 - 7:18 am | शेखर

>>क्रमशः भाग भराभर लिहिण्याच्या बाबतीत राजेंचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना कधीही आठवण करून द्यावी लागत नाही.

खरे आहे. हिमालय भाग किती भरभर टाकले व मालिका संपवली राजेंनी ;)

विशाल कुलकर्णी's picture

2 Apr 2009 - 3:56 pm | विशाल कुलकर्णी

यार्, आमची गोची करणार तुम्ही, हापिसात गुपचुप वाचण्याची सोय नाय ठेवली राव, हसु तर येणार आणि समद्यास्नी कळणार...
काय करणार्..खाऊ श्या बॉसच्या..पण तुमी ल्ह्या राव्..आमी वाचणारच !

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2009 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ज्यानी हाताचे बोट धरुन आंतरजालावर हिंडवले, ह्या जगाची ओळख करुन दिली आज त्याच्या समोरच उभे राहायची वेळ आली." असे बोलत प्रा. डॉं. नी सुद्धा तात्यांना नमस्कार केला. (इथे समस्त मिपाकरांनी आपल्या डोक्याला हात मारुन घेतला)

लै दिसापासून लै लोकाच्या मनात खदखदतंय, एकदा तरी असा सामना रंगलाच पाहिजे. पर परीकथेतल्या राजकुमारा...तात्याशी सामना करुन जायचं कोणत्या संस्थळावर ? :)

असो, आमने सामनेचे पहिले प्रकरण चांगले रंगवले आहे, असेच बारकावे शोधून आखाड्यात अनेकांना येऊ दे !

पुलेशु......

-प्रा.डॉ.