प्रिय,
एकदा लिहिलं , खोडलं , पुन्हा लिहीलं, पुन्हा खोडलं
पण प्रिय तर आपल्याला ज्या व्यक्ती आवडतात त्यांना लिहितो ना मग का खोडलं मी?
प्रिय
तुझं भावना पत्र मिळालं. तुला माहितेय इतक्या वर्षांनी मला कोणीतरी संबोधून पत्र लिहिलंय.
आज अनेक वर्षांनी मी पत्र वाचतोय. तेही केवळ मला आलेलं. आणि कोणी लिहिलेलं? तिने जिने मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी स्थान ग्रहण केलय. वर लिहीत होतो खोडत होतो आता धीर आलाय. हो केलं आहेस तू एक स्थान तयार माझ्या मनात. म्हणजे जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर.
थोड्याश्या भीतीने तू म्हणालीस चहा कॉफी? ही भीती मला कायम स्वरूपी मुकशील गमावशील अशी असेल तर तुझ्या माझ्या बद्दलच्या भावना किती दाट आहेत हे कळतंय मला.
निमित्त भेटण्याचं असतं पण त्यात बिचारी चहा कॉफी उगाचच उकळते. जळते बिचारी. आपली मैत्री वाढली तर जळतील का गं आजूबाजूचे? आपल्यावर? तुझ्यावर ? माझ्यावर? जाऊदेत माझ्या मनी लागलेली आग छान उब देतेय हे नक्की.
तुझा .... नाव लिहू?
प्रतिक्रिया
26 Jun 2020 - 7:32 am | @tul
26 Jun 2020 - 11:02 am | अनिंद्य
हौ क्यूट :-)
पण पूर्वार्ध जास्त आवडला मला.
26 Jun 2020 - 12:50 pm | रातराणी
खुप छोटं आहे हे पत्र. अजून लिहा :)
27 Jun 2020 - 5:17 pm | @tul
आहो शेवटी पुरुषाचं पत्र ते; किती लिहिणार हा हा हा
27 Jun 2020 - 5:18 pm | @tul
आहो शेवटी पुरुषाचं पत्र ते; किती लिहिणार हा हा हा
27 Jun 2020 - 6:53 pm | प्राची अश्विनी
हेच लिहिणार होते. :)
28 Jun 2020 - 8:50 am | प्रचेतस
=))
29 Jun 2020 - 12:34 pm | रातराणी
हा हा मला वाटलं पत्र लिहायला जमतं पुरुषांना, समोरासमोर बोलायची वेळ आली की शब्द सुचत नाहीत वगैरे वगैरे =))
28 Jun 2020 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे रहो.
-दिलीप बिरुटे