नक्की प्रॉब्लम काये ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
31 May 2020 - 4:08 pm

एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे.

सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.

____________________________________________

१. देवभोळे लोक :

जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.

देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.

देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ?
पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे.
श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला !

वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे.
आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे.
अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे.

देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही.
आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्‍याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे.

प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.

सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात.
अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ?
परिणामी ते निरुत्तर होतात.

मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात.

थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो.
____________________________________________

२. नाम, जप, परिक्रमा.........

एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात.

पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत.

इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात.

त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात.

आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो.

कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ?
का त्याची देशाला गरजच नाही ?

___________________________________________

३. राजकारण

सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे.
प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे.
फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे.

सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे.

सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही.

पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे.
पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही.
पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि
सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे.

थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे.
सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे.

तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले,
तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य !
______________________________________

४. अध्यात्म

सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे
हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे.
त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही.

तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की......
लोक जाम पिसाटतात.
जर सर्वच सत्य आहे तर
इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो,
सत्यच आहे.

पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक,
आपण चुतिया आहोत असा काढतात !

मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा;
तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.

परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते.

संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर,
इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही.
______________________________________

५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन

स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो
प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं.

स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो.
परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो.

स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो.

कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु :
मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं.....

मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ?

मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?

___________________________________________________

६. व्यावसाय :

पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे.
व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे.
अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे.
जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे.

सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे
आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो.

तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार,
अमक्या अ‍ॅक्टमुळे दुकान बंद होणार....
जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.
काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?

अशा काहीही कमेंटस मारतात.

मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो.

__________________________________________

७. भग्व्दगीता :

हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे.

पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून
अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे.
त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही.

थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा,
अध्यात्मिक ग्रंथ नाही.

सांख्ययोगातले दोन श्लोक;
नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि
या निशा सर्व भूतानां, सोडले तर,
सामान्य साधकाला उपयोगी होतील,
असे कोणतेही श्लोक यात नाहीत.

यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा
कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे.

फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म....
अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे
बहुतेकांचा कल,
सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी;
नाईलाज म्हणून काम आणि
शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे.

गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम
भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे.

या निरर्थक प्रयासाबद्दल,
जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला
की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात.

नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं,
ज्यानं देशाचं भलं झालं ?
कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ?
यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा,
पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ?

_________________________

तर अशी सगळी परिस्थिती आहे.

मग कुणी खरडफळा रगडतोयं,

अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत
ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही
ते मला विचारतात
तीन वर्ष झक मारली का ?

आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज
मनोगतवर प्रकाशित झाली आहे.
अष्टावक्राच्या सांख्ययोगावर
लेखमाला लिहीली आहे.
निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर
लेख प्रकाशित झाले आहेत.
बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली
यांचावर तिथे लिहीलं आहे.
कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर
लोकोपयोगी भाष्य केलंय.
विवाह, उत्सव, भय, सजगता
अशा अनेकविध विषयांवर
लेखन केलंय....

कुणी तद्दन कविता टाकतो.
कुणी भंकस लेख लिहीतो....

गप्प करणारं उत्तर दिलं की मग
वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो !

काय साधतो आपण या सगळ्यातून ?

-----–---------------------–-----------------------------------
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन

----------------------------------------------------------------

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

गणेशा's picture

31 May 2020 - 5:39 pm | गणेशा

लिहिलेले बरोबर आहे..
तसे मी तुम्हाला ओळखत नाही..
पण माझे स्पष्ट मत आहे, प्रत्येक लिखान हे कोणी लिहिले या पेक्षा काय लिहिले आणि का लिहिले हेच महत्वाचे आहे..

दुसरे असे की..

प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की आपली सगळीच मते बरोबर नसतात, एका घरात चार लोकांच्यात आपल्या मतांना न मानणारे असतात.. मग तर हे सोशल जग आहे..
हा लोकांचा समुद्र आहे.. कधी कधी त्याला कळातच नाही की कधी लाटा उडवाव्यावत आणि कधी शांत व्हावे...

माझे स्पष्ट मत आहे
की आपली मते वेगळी असतील.. तरी ती बिंधास्त मांडावीत..
मग ती राजकिय असुद्या, किंवा इतर.. मत असणे हेच चांगल्या मनाचे लक्षण आहे..
फक्त सोशल मेडिया वर, आपल्या विरुद्ध मत असले तरी त्याचा आदर करणे सोडु नये..
मते ही वेगळी असणारच.. सर्वांची मते एकच असती तर निवडनुका तरी का झाल्या असत्या ?
सगळे एकसारखे नाहीच ..

ज्याला दुसर्‍याचा आदर करणे जमत नसेल अश्या माणसांशी बोलण्यात काय अर्थ उरतो मग ? आणि आपण त्याला काय समजावतो ?
समजावयाचे असल्यास आधी दुसरा पण माणुस आहे हे समजवावे लागेल, मग बाकीचे ...

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 7:27 pm | संजय क्षीरसागर

खोडी काढत नाही.

लेखात लिहील्याप्रमाणे, कोणताही हेतू नसतांना केलेलं व्यक्तीनिरपेक्ष लेखन, भावना दुखावल्या गेलेले लोक वस्तुनिष्ठपणे वाचण्याऐवजी पर्सनल करुन घेतात.

त्यांना चालू लेखावर प्रतिवाद करता येत नाही.

परिणामी > खरडफळा, ट्रोलींग, फालतू कविता, भिकार लेख, माझ्या मागच्या पोस्ट उचकणे असे कारभार करून > कुठे फट मिळतेयं का ते बघतात. ती मिळत नाहीच !

पण या भानगडीत वाद वाढत जातो.

त्यामुळे या संकेतस्थळासारख्या एका चांगल्या सुविधेचा उपयोग योग्य कारणासाठी होत नाही.

सर, मागे मी राजकीय लिहिले होते, india deserves better तेंव्हाचा अनुभव आहे.. पण त्यात विरोधात बोललेले लोक यांचा ना मी उद्धार केला ना त्यांनी माझा...
त्यामुळे विरोधक जर लायकीचा असेल तर बोलण्यात अर्थ...

लायकीच नसेल तर उगा का लक्ष द्यायचे... असे माझे मत..

आपण आपल्याला समजावू शकतो.. जगाला समजावणे अवघड..
तसेच कोणी जुणे खुसपट काढले आणि दुर्लक्ष करायचे असेल तर तू बरोबर.. जिंकला म्हणायचे आणि आपला वेळ वाचवायचा बस..

--
अवांतर :-
मी तुम्हाला ओळखत नाही...
उदा देतो...
तुम्ही सशक कथे ला जे रिप्लाय दिले ते मला आवडले होते..
जरी माझ्याच 'इच्छा' कथेला तुम्ही निगेटिव्ह रिप्लाय दिले तरी त्यात वावगे काय होते.. तुम्ही बरोबर बोलत होता..
ते धरून जर मी तुमच्याशी भांडत किंवा विरोधाला विरोध करत असेल तर ते चूक.. मग अश्या माणसाला तुम्ही जवळ येऊच का देताल?

विचार करणारा हा, त्याच्या अनुभवा वर विचारांवर बोलत असतो.. respect him..

ज्याला विचारावर विचारांनी बोलता येत नसेल त्याच्यावर विचारच का करावा असे माझे मत..

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 5:11 am | चौकस२१२

आपला वरील लेख वाचला रोख सगळा आपण स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे आणि काही ना कळणारे असाच दिसतोय
आपले पुनरागमन आधीचे लेख माहित नाहीत पण सध्या जे चालू आहे त्यात सगळं हाच कारभार
"त्यामुळे या संकेतस्थळासारख्या एका चांगल्या सुविधेचा उपयोग योग्य कारणासाठी होत नाही."
याला जबाबदार आपण हि आहात हे विसरू नका
मग लोकांना ट्रोल म्हणा नाहीतर मिपामालकानं दोष द्या काय फरक पडतो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2020 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलेही प्रतिसाद असेच असतात स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे.
सरकारच्या वतीने काही नियुक्त मानधनावर काम करत असल्यासारखे निरर्थक,
प्रतिसाद. भाषेच्या बाबतीत तोल गेलेले आणि प्रतिसादाचे निरर्थक शेपूट.

संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते.
दुसर्‍याला सांगण्याअगोदर स्वतःकडेही पाहिले पाहिजे असे वाटते.

हल्ली आपले प्रतिसाद वाचतही नाही.
पण इथे ज्ञान देतांना दिसले म्हणून सांगावे वाटले.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

1 Jun 2020 - 4:11 pm | मोदक

आपलेही प्रतिसाद असेच असतात स्वतः किती बरोबर आणि इतर कसे चुकीचे.
सरकारच्या वतीने काही नियुक्त मानधनावर काम करत असल्यासारखे निरर्थक,
प्रतिसाद. भाषेच्या बाबतीत तोल गेलेले आणि प्रतिसादाचे निरर्थक शेपूट.

तुमचे प्रतिसादही असेच असतात, फक्त "तुम्हाला सरकार विरोध करण्यासाठी मानधनावर नियुक्त केले असावे" इतकाच बदल आहे.

संस्थळावर हेल्दी वातावरणासाठी काही समजही आवश्यक असते.
दुसर्‍याला सांगण्याअगोदर स्वतःकडेही पाहिले पाहिजे असे वाटते.

लॉकडाऊनच्या धाग्यात इमानेइतबारे मोदींवर वाट्टेल ते लॉजिक वापरून टीका केल्यावर आता मानभावीपणे हेल्दी वातावरणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

"तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय समाजाने / सरकारने करावी" अशी अपेक्षा असलेले तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्याकडेही दुर्लक्ष केले होते, पण इथे ज्ञान देतांना दिसलात म्हणून सांगावेसे वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2020 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही तरी आमचे विचार आम्ही प्रतिसाद मांडतो. आपले प्रतिसाद तर आमच्याच आलेल्या प्रतिसादाचे नेहमी कॉपी पेष्ट असतात
शब्दांना नुसते उलट-पालट केलेले आमचेच शब्द. शब्दांचे फेरफार. निव्वळ. थोडेफार शिकला असाल तर स्वतःचे विचार करुन लिहायला शिका.
चालु द्या.....!

अरेच्चा.. मला वाटले होते तुमच्या समजण्याच्या क्षमतेत घोटाळा आहे, त्यामुळे सतत असे होत आहे. आता तर वाचनक्षमतेचा घोटाळा पण अधोरेखीत होत आहे.

असो.. मी लिहितो ते वाचायला इतकेही अवघड जाऊ नये.. शक्य झाल्यास लक्ष देऊन वाचा. पूर्वग्रहाचे चष्मे घातले आहेत ते काढणे थोडे अवघड जाईल कदाचित पण ते चष्मे काढून वाचायचा प्रयत्न करून बघा..

mayu4u's picture

3 Jun 2020 - 9:49 pm | mayu4u

शब्दांना नुसते उलट-पालट केलेले आमचेच निरर्थक शब्द

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 6:37 pm | चौकस२१२

""तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराची सोय समाजाने / सरकारने करावी" अशी अपेक्षा असलेले "
मस्त .. हसुन हसुन पोट दुखले मोदक राव ..

एक वेगळ्या विषयावरील धागा.

जर ट्रोलभैरवांनी येथे उच्छाद मांडला नाही तरकाही वेगळे वाचायला मिळेल अशी अपेक्षा.

सतिश गावडे's picture

31 May 2020 - 6:01 pm | सतिश गावडे

मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?

तुम्ही खरडफळ्यावर मान्य केल्याप्रमाणे हा तुमचा दृष्टीकोन किंवा तुमची मांडणी आहे. पुराव्याने सिद्ध झालेलं सत्य नाही. :)

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 6:05 pm | संजय क्षीरसागर

असं म्हणणं आहे

सतिश गावडे's picture

31 May 2020 - 6:12 pm | सतिश गावडे

तुमच्या म्हणण्याचा आदर आहे. आपल्याला आपली मते असण्याचा आणि ती मांडण्याचा अधिकार आहे, असला पाहीजे.

mrcoolguynice's picture

31 May 2020 - 6:24 pm | mrcoolguynice

का कोणास ठाऊक, पण माझा पुनर्जन्म "थियरीवर" विश्वास नाहीये.

नही कुछ हैं होता ।
और कुछभी होना ।।
तो गाओ खुषीसे, बजा कर के विन ।।

सतिश गावडे's picture

31 May 2020 - 6:39 pm | सतिश गावडे

का कोणास ठाऊक, पण माझा पुनर्जन्म "थियरीवर" विश्वास नाहीये.

आपण भारतीय पुनर्जन्म या संकल्पनेकडे पाप-पुण्य आणि कर्मविपाक सिद्धांत यांच्या परीप्रेक्ष्यातून पाहतो. त्यामुळे विवेकी विचार करणारे असे काही असण्याची शक्यता स्विकारत नाहीत. उत्सुकता असल्यास या विषयावरील पाश्चिमात्यांचे विशेषतः Dr Ian Stevenson, Jim Tucker संशोधन/लेखन वाचा. या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळू शकेल.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 6:54 pm | संजय क्षीरसागर

व्यक्तीच्या कर्मचा डेटा कुठेही नसतो.

निधनानंतर तो सगळा वॉश आऊट होतो.

थोडक्यात, एका मृत्यूबरोबर एक कहाणी पूर्णपणे संपते.

तस्मात, कर्मविपाक सिद्धांत फक्त मॉरल पोलीसिंग आहे.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

काय म्हणणं आहे ?

mrcoolguynice's picture

31 May 2020 - 7:00 pm | mrcoolguynice

बाय द वे,
तुमच्या मते,
प्राचीन सोशल ओपिनियन मेकर्स वर अकौंटींग समकक्ष विचारसरणीचा कितपत प्रभाव असु शकतो ?
नाही म्हणजे, मला.. कधी कधी...
पाप व पुण्य आणि डेबिट व क्रेडिट
हे कुंभ के मेले मे बिछडे हुय भाई लगते हैं ।
;)

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 7:04 pm | संजय क्षीरसागर

मानवी कल्पना आहेत

डेबिट - क्रेडीट चा उपयोग अकाऊंटींगसाठी होतो.

पाप- पुण्याचा उपयोग समाज सुरळीत चालावा म्हणून होतो

ज्या प्रमाणे , ऑलिव्ह रिडले कासव, अंड्यातून बाहेर पडण्याच्या क्षणाच्या पुढच्याच क्षणाला , उपजत ज्ञानाने समुद्राच्या दिशेला जाऊन समुद्रात मिसळतो....

त्याच प्रमाणे मनुष्य जन्मतः त्याला पाप पुण्य, पुनर्जन्म यांचे उपजत ज्ञान प्राप्त होते ? की
कोणी त्या मनुष्याला या संकल्पना ची माहिती देतो....?

>>>पाप- पुण्याचा उपयोग समाज सुरळीत चालावा म्हणून होतो

मग समाजाची बॅलन्स शीट साधारणपणे किती वर्षांनी टॅली होते..?

मी पुनर्जन्म या संकल्पनेकडे, (तुम्हाला कदाचित कल्पना असल्याने ),
ऑब्जेट्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग समकक्ष थियरीवर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 7:01 pm | संजय क्षीरसागर

ऑब्जेक्ट ओरियंटेड प्रोग्रामिंग ?

कारण अस्तित्व स्वयंभू आहे.
त्याचा प्रोग्रामर कुणीही नाही

सर, अहो मी, "पुनर्जन्म " या गहन, अदृश्य व ऍबस्त्र्याकट्ट संकल्पनेला उमजण्यासाठी
, माझ्यापरीने समांतर आकलन करत आहे.

पुनर्जन्म मी तेंव्हा मानेल जेंव्हा मी स्वतः माझा आधीचा जन्म पाहू शकेल..

जर असे होत नसेल तर मी पुनःजन्म मानत नाही हे चूकच म्हणताना कुठले ही उदा. कोणी ही दिली तरी ती त्यांनी ती मानावीत..
मी तीच मानवीत हा आग्रह कोणीच करू शकत नाही..

तुम्ही इतरांनी सांगितलेले शास्त्र मानत असला तरी मी मला झाला तोच साक्षात्कार मानेल..
...

तुम्ही तुमच्या विचाराशी.. मी माझ्या विचाराशी प्रामणिक..

संजय सर -

(येथे जर मी माझेच कसे बरोबर आणि तुम्ही कसे चूक हे सांगितले तर खुप रिप्लाय वाढतात.. म्हणून हा मार्ग, विषय क्लोज येथे..
)
मला असे म्हणायचे होते.. respect other but आपली बाजू सोडायचीच नाही

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 8:44 pm | संजय क्षीरसागर

स्वतः माझा आधीचा जन्म पाहू शकेल..

हे बरोबर आहे. यात वादाचा मुद्दाच नाही.

आता हीच थियरी देवाला पण लावा !

बरोबर, मला जोपर्यंत देवाचा साक्षात्कार होणार नाही तो पर्यंत मी तो मानणार नाही..

कोणाला काही अद्भुत तो करतो असे वाटते तो त्याला मानतो..
मला तर निसर्ग अद्भुत वाटतो, मी त्याला देवच मानेल.. पण ते माझे मत आहे..
काहींना मेंदू सगळे करतो म्हणून मेंदू देव वाट्टेल ते मानु शकतात..

पण कोणी शंकर, पैंगबर, येशू ह्यांना आता ही देव मानत असेल तर मी ते मानत नाही.. हे माझे मत..

हा, हे लोक इतिहासात असतील आणि त्यांच्या परोपकारी वृत्ती ने त्यांना माणुस नसून मसीहा म्हणाले असेल आणि नंतर देव मानले गेले असेल तर ठीक आहे..
पण मी त्यांना माणुस मानतो..

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 10:12 pm | संजय क्षीरसागर

लोकांच्या धरणा त्यांच्याकडे !

पण इथे नामस्मरणावरचा ग्रंथ अपलोड होतो.
नामस्मरणाबद्दल शंकराचार्य नक्की काय म्हणतात ? तीन श्लोक सांगा असा प्रष्ण होता.

सदस्याला कदाचित वादविवादात धोका वाटला असेल किंवा तंद्रीतून बाहेर पडू असं वाटलं असेल. त्यानी उत्तर टाळलं.
काही हरकत नाही.
मी मुद्दासोडून दिला.

सदस्यानं खरडफळ्यावर दंगा सुरु केला !

मग तिथे मला परत आठवण करुन द्यावी लागली.
तेंव्हा सूं बाल्या केला !

असा प्रकार आहे.

शाम भागवत's picture

31 May 2020 - 11:56 pm | शाम भागवत

हाहाहा.
मजा आली.
:)

तर.....
शेवटी विजय तुमचाच झाला तर.
अभिनंदन.
:)

Rajesh188's picture

31 May 2020 - 7:48 pm | Rajesh188

मानव एक प्राणी आहे आणि त्याच्या मेंदू ला मर्यादा आहे त्या मर्यादे बाहेर जावून ती बघू शकत नाही,विचार करू शकत नाही आणि अनुभव सुधा घेवू शकत नाही.
त्या माणसाला वाटत म्हणजे ते तसेच आहे असं काही नाही.
देव शक्ती आहे ह्या वर माझा पूर्ण विश्वास आहे तो आहे हे अनुभवता येते पण सिद्ध करता येत नाही कारण ते मानवी बुद्धीच्या पलीकडले आहे.
तसेच देव नाही असे पण सिद्ध करता येत नाही.
कारण ब्रह्मांड सोडा तो विषय खूप मोठा आहे .
पृथ्वी वरील पण किती तरी घटना कशा घडतात ह्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.

गणेशा's picture

31 May 2020 - 7:57 pm | गणेशा

बरोबर,
त्यामुळे जे देव आहे हे मानतात ते पण बरोबर त्यांच्या जागेवर
आणि जे देव नाही, हे मानतात ते पण बरोबर.. त्यांच्या जागेवर..

काहींना शक्ती निसर्ग वाटतो, काहींना शक्ती देव वाटतो, काहींना शक्ती चमत्कार वाटतो..
प्रत्येक जण बरोबरच..

देव आहे की नाही सिद्ध करता येत नसेल तर लॉजिकली सगळे बरोबर..

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 8:39 pm | संजय क्षीरसागर

एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे.

सिद्धत्वाचे तीन नियम आहेत : स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता आणि वारंवारिता.

उदा. गुरुत्वाकर्षण : कुठेही, केंव्हाही, कुणीही हाततली वस्तु सोडा ती कायम खालीच येणार.

देवाच्याबाबतीत सगळे अनुभव व्यक्तिगत, स्थल-काल सापेक्ष आणि सातत्यहीन आहेत.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 8:59 pm | सुबोध खरे

एखादी गोष्ट आहे असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे.

काय सांगताय?

एखादी गोष्ट नाही असं म्हणणार्‍यावर ते सिद्ध करण्याची जास्त जवाबदारी आहे.
उदा. पुण्यात हिरव्या चाफ्याचं झाड नाहीच म्हणणार्याला अख्ख्या पुण्यातील झाडे शोधून त्यात हिरवा चाफा नाहीच हे सिद्ध करावे लागेल.
या उलट एक जरी झाड दाखवले तरी पुण्यात हिरवा चाफा आहे हे सिद्ध होते.

> करण्याची जास्त जवाबदारी आहे ?

तुमच्या दवाखान्यात तुम्ही स्वतःच सर्टीफिकेट लावलायं
ते कशासाठी आहे ?

तुम्ही डॉक्टर आहात
हे सिद्ध करायची जवाबदारी कुणाची आहे ?

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 12:46 am | सुबोध खरे

ते सर्टिफिकेट लावलं पाहिजे असा कायदा आहे म्हणून.

अन्यथा मी सहाय्यक प्राध्यापक पण आहे ते कुठे लिहिलेलं नाही.

आणि मी निवृत्त लष्करी अधिकारी आहे हा भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेला मान आहे आणि मी तो अभिमानाने मिरवतो.

मला काही सिद्ध करण्याची गरज नाही.

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 12:58 am | संजय क्षीरसागर

तुम्ही डॉक्टर आहात हे सिद्ध करायची जवाबदारी तुमची आहे.

तद्वत, "देव आहे" असं म्हणणाण्यावर ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे

मला तर्कवादच मान्य नाही..

देव दिसत नाही तरी ते मानणारे मला बरोबर वाटतात..

देव दिसत नाही म्हणून ते न मानणारे ही मला बरोबर वाटतात..

मला वयक्तिक ती माणसे बरोबर वाटतात..
मला देव ही संकल्पनाच व्यक्ती सापेक्ष वाटते..

कोणाला काय वाटावे.. कोणाची कोणावर भक्ती हा ज्याचा त्याचा प्रश्न.
त्यामुळे मला देव मानायचा की नाही हा माझा वयक्तिक प्रश्न..

देव आहे तर दाखव हे म्हणणे पण चूक..
आणि देव नाही हे सिद्ध कर हे म्हणणे पण मला चूकच वाटते..

देव आहे मानणारा, चमत्कार म्हणजे देव माणू शकतो..
अलोंकीक शक्ती म्हणजे जसे साईबाबा यांना देव माणू शकतो..

तसेच देव नाही असे माणणारा, ह्या सगळ्या घटना म्हणजे शास्त्रीय, मानवीय, मनाची शक्ती असे मानून देव नाही म्हणू शकतो..

Prove करायचेच का?

शा वि कु's picture

3 Jun 2020 - 7:04 pm | शा वि कु

सिद्ध करण्याच्या चढाओढीत काही अर्थ नाही हा तुमचा मुद्दा पटला. आणि कोणी काय मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न हेही अगदी खरे. पण आपले विश्वास परिस्थितीशी सुसंगत आहेत का, हा प्रश्न पडणाऱ्या माणसाला तर्कवादाशिवाय काय पर्याय ?
उदा- एखादा व्यक्ती ड्रॅगनवर विश्वास ठेवू शकतो/किंवा हत्ती नावाचा प्राणी एक कल्पना आहे असेही म्हणू शकतो. हे दोनही विश्वास त्यात्या माणसाने ठेवण्यात काही वाईट नाहीच. पण ड्रॅगन आहे/नाही आणि हत्ती असतो/नसतो दोन्ही प्रश्नांना दोन पूर्णपणे बरोबर आणि दोन पूर्णपणे चुकीची उत्तरे आहेत. हे शोधणे कुणी कुणावर थोपवू नये, पण जर उत्तर शोधणे हे ध्येय असेल, तर तर्कवादाला पर्यायच नाही.

माझी खात्री आहे, की तुम्हालाही माहिती असणार. तरीही, for the sake of completion सांगतो.
Euclidean geometry त्रिमितीत लागू पडत नाही पण द्विमितीत ती खरी असतेच. आईन्स्टाईनने सिद्ध केलंच, की स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता अशी काही नसते.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 10:18 pm | संजय क्षीरसागर

की स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता अशी काही नसते.

तुम्ही त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीबद्दल बोलतायं का ?

______________________________________

स्थल-काल निरपेक्षितता, व्यक्ती निरपेक्षितता आणि वारंवारिता
हे सर्व वैज्ञानिक सिद्धतेचे प्रमाण निकष आहेत.

राज्य करते हे मालक च असतात देशाचे.
देशाची सर्व जबाबदारी त्यांच्या वर सोपवलेली असते म्हणजे ते मालक च.
वाईट गोष्टीला जबाबदार सरकार आणि चांगल्या घडणाऱ्या गोष्टीत त्यांना श्रेय नाही हे पटत नाही.
देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर अवलंबून आहे म्हणजे ते मालकच.
फक्त मालक निवडण्याचे अधिकार जनतेला आहे.
समाज जसा अधिकाराची भाषा बोलतो तशी त्याला कर्तव्याची पण जाणीव असली पाहिजे.
देशाप्रती कोणतीच कर्तव्य पार पाडायची नाहीत आणि अधिकार साठी भांडायचे हा स्वार्थी पना झाला.
मी तर म्हणतो जो व्यक्ती नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याला राज्यकर्त्या वर टीका करण्याचा बिलकुल हक्क नाही.
कर चुकवणारे,कायदे मोडणार,गैर मार्गांनी पैसे मिळवून सरकार आणि देशाचे नुकसान करणार
त्या लोकांना सरकारी सोयी सुविधा च उपयोग
का करून द्यावा.
रस्ता पासून वीज,पाणी पर्यंत सर्व सुविधा त्यांना नाकारायचा सरकार ला पूर्ण अधिकार असावा

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 8:09 pm | सुबोध खरे

सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.

कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.

जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.

काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?

असं आहे का?

चालू द्या.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 8:09 pm | सुबोध खरे

सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.

कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.

जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.

काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?

असं आहे का?

चालू द्या.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 8:21 pm | संजय क्षीरसागर

आणि जी आठवली ती दिली आहेत.

पैकी एक जिएसटीच्या पोस्टवरचं आहे.
दुसरं काल या लेखावरचं आहे.
तिसरं डिबींच्या कवितेवरचं आहे.

एका सदस्यानं "तुमच्यासारखे सिए बेरोजगार करतो" वगैरे म्हटलं होतं.
"बँकीग क्षेत्रात तुम्ही कोणत्या कार्यप्रणाली विकसित केल्यात ?"
यावर त्यानं आवरतं घेतलं.

त्यात व्यक्तिगत रोख नाही.

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 8:31 pm | सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही.

असं आहे का?

मग ते सोनोग्राफीच्या रिटर्न्स चं कुठून आठवलं तुम्हाला?

काय आहे की मला असे कुठले रिटर्न भरल्याचे आठवत नाहीये म्हणून विचारलं.

म्हणजे माझा कर सल्लागार (सी ए च्या परीक्षेत नंबर काढलेला आहे) त्याने असे काही रिटर्न असतात असेही गेल्या 10 वर्षात सांगितले नाही.

म्हणजे राहून गेले असतील तर दंडासहित भरून टाकावेत म्हणतोय.

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 12:52 am | सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही.
हंगाशशी
आता कसं
?

जाता जाता:-- ते सामान्य माणसांना कळण्यासाठी आहे.

त्याला रिटर्न म्हणत नाहीत किंवा त्याचा कर किंवा पैशाशी काहीही संबंध नाही.

तो एक रोजचा अहवाल असतो.

मुलगा किंवा मुलगी ही तपासणी करु नये म्हणून आम्ही केलेल्या सोनोग्राफीचा पाठपुरावा सरकार करतं आणि दुसरीकडे केलेल्या गर्भपाताचे त्याच्याशी ताडून पाहिले जाते की स्त्री गर्भाचा गर्भपात केला आहे का?

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 1:05 am | संजय क्षीरसागर

मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहे

हे कुणी लिहीलं आहे ?

पुढे लिहीलंय : गावागावात जर साधी माणसं व्हॉटस ऍप वापरू शकतात तर रिटर्न भरायला काहीही प्रश्न नाही

जिएसटी रिटर्न भरणं म्हणजे वॉटस अ‍ॅपवर पोस्टीटाकणं आहे का ?

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 1:16 am | सुबोध खरे

त्यात व्यक्तिगत रोख नाही.
तुमचं पितळ उघडं पाडणं हा हेतू होता.

बाकी त्या धाग्यावरचं धुणं इथे कशाला धुताय?

पडलो तरी नाक वर सिद्ध करायला?

ते धुणं त्या धाग्यावर धुवू या हवं तर

बाकी चालू द्या तुमचं

प्रथम पुरुषी
मी वचनी

Rajesh188's picture

31 May 2020 - 8:11 pm | Rajesh188

पुनर्जन्म वर लेखकाने व्यक्त केलेलं मत हे त्यांचे स्वतःचे मत आहे.
ते खरे आहे असे समजण्याची बाकी लोकांना गरज नाही.
फक्त त्यांच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार त्यांनी तसा विचार केला आहे .
त्याला ठोस असा काहीच पुरावा देण्याची त्यांची क्षमता नाही तो फक्त विचार आहे.
मानवी मेंदू ला हार्ड डिस्क फक्त तेच म्हणू शकतात आम्ही नाही.
मानवी मेंदू फक्त माहिती साठवण्याचेच काम करत नाही तर डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रतेक दृष्या चे विश्लेषण पण मेंदू करतो.
महत्वाचे साठवून ठेवणे आणि बाकी delete karne he kam pan मेंदूचं करतो.
शरीराच्या प्रत्येक क्रिया ,प्रतिक्रिया हे पण मेंदूचं करतो.
आणि अशी किती तरी काम मेंदू करतो त्या विषयी मानव प्राण्याला अजुन माहिती नाही.
हार्ड डिस्क हे सर्व कंप्युटर मध्ये करत नाही.
लेखकाची मत त्यांच्या पुरतीच सत्य आहेत.
ते काही खरे सत्य नाही.

काम करणारी कार्यप्रणाली आहे.
डेटा स्टोरेज > रिट्रायवल > अ‍ॅप्लिकेशन ही दोहोत समानता आहे.
मेंदू हा कमालीचा बहुआयामी बायोकंप्युटर आहे.
साध्या कंप्युटरची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही.

पुनर्जन्म हा स्मृतींशी निगडीत आहे.
तिथे : डेटा स्टोरेज > रिट्रायवल > अ‍ॅप्लिकेशन हीच प्रोसेस आहे. .

मामाजी's picture

31 May 2020 - 8:46 pm | मामाजी

संक्षी साहेब थोडे स्पष्ट बोलतो त्या बद्दल क्षमा करा.. आपल्या लिखाणावरून असे वाटते की आपले व्यक्तिमत्व हे एक गोंधळलेले व विस्कळीत अशा स्वरूपाचे असावे.

आदि शंकरचार्यांचा एक किस्सा आपल्या माहीत असेलच.. आपल्या अद्वैत मताचा प्रचार करताना त्यांनी ब्रह्म सत्य व जगन्मिथ्या हा सिद्धांत मांडला.. एकदा ते वाराणशीला आपल्या शिष्यांसह गंगेच्या घाटावर जात होते.. तेवढ्यात त्या अरूंद गल्लीत समोरून एक पिसाळलेला हत्ती येतना त्यांनी बघीतला व ते जीव वाचवण्यासाठी आपल्या शिष्यांसह विरूद्ध दिशेने धावायला लागले.. त्यांच्याकडून शास्त्रार्थात पराभूत झालेले पंडित याच संधीची वाट पहात होते.. त्यांनी लगेच टोमणा मारला आचार्य, ब्रह्म सत्य व जगन्मिथ्या या सिद्धांतानुसार समोरून येणारा हत्ती हा मिथ्या आहे आपण जागीच उभे रहा पळता कशाला.. तेंव्हा आचार्यांनी पळत पळत उत्तर दिले गजोsपी मिथ्या पलायनम् अपी मिथ्या.. ज्या दृष्टिकोनातुन आपण हत्ती मिथ्या आहे हे सांगत आहात तर त्याच दृष्टिकोनानुसार माझे पलायन हे पण मिथ्याच आहे तेव्हा काळजी नसावी..
आपल्या लिखाणा वरून मला हे जाणवले की वडाची साल पिंपळाला लाऊन ते झाड जांभळी चे नसुन आंब्याचेच आहे हे सिद्ध करण्यासारखा आपला प्रयत्न असतो..

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 9:03 pm | संजय क्षीरसागर

इथे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितेवरचे प्रतिसाद पाहा.

तुमचा सदस्य काळ सदस्यकाळ 3 years 6 months आहे
त्या दरम्यान माझा आयडी ब्लॉक्ड होता.

तुम्ही मागे जाऊन माझ्या सर्व लेखनाचा वेध घेतलात तर तुम्हाला मुद्दा कळेल.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 9:06 pm | संजय क्षीरसागर

या लेखावरचे शेवटचे प्रतिसाद पाहा.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2020 - 2:35 pm | llपुण्याचे पेशवेll

ते शंकराचार्यांकडून पराभूत द्नझालेले पंडित हे बौद्ध मताचा प्रचार करणारे होते हे विषेश. ज्ञानेश्वर माऊलींचा "सर्प विंचू नारायण , परी वंदावे दूरून' हा दृष्टांत पण फार बोलका आहे.

प्राब्लेम काहीच नाही. कुणी काय सांगतो याचाही नसतो कारण तिथे येणारा तीच श्रद्धा, तोच विश्वास घेऊन येतो.
कुठे?
तीर्थस्थळी.
तिथल्या एकेक कथा इथे पटणारही नाहीत पण तिथे पटलेले भाविकच येतात.

पण मिपावर वादविवाद होणारच.
'मला असे वाटते' 'अशी माझी ठाम श्रद्धा आहे' अशी दोन इंजिंने घाट चढण्याअगोदर मागे लावली की कुठेही गाडी थांबवली जात नाही.

-----------
ब्लॉग लिहिणे उत्तम. कुणी लॉगिन करून मतं मांडायच्या कॉमेंट टाकायला खटपट करत नाही.
संजय सोनवणीचे ब्लॉग - २ दशलक्ष लोकांनी वाचले!

रविकिरण फडके's picture

31 May 2020 - 9:39 pm | रविकिरण फडके

पण तो दिल्याशिवाय राहावत नाही!

देव ही माणसाची निर्मिती आहे हा गाभा असलेली दि. बा. मोकाशींची 'कल्पान्त' ही अप्रतिम सुंदर कथा आठवल्याशिवाय राहत नाही. 'आदिकथा' नामे संग्रहातील ही शेवटची कथा आहे. पहिली 'आदिकथा'. ही कथा वाचली की भारावून जातो माणूस, आणि खात्री पटते, की देव म्हणजे आपलीच आयडिया!

तर मंडळी, ज्यांना कुणाला (मराठी) साहित्यात रस असेल आणि (तरीही) हा कथासंग्रह वाचला नसेल तर विनाविलंब वाचा. नाही वाचलात तर काहीतरी महत्वाचं राहून जाईल! सध्या तरी हे पुस्तक मिळतंय. Out of print झालं की मिळायचंच नाही.

आठवल्याशिवाय राहत नाही.

काये कथेचा सारांश ?

रविकिरण फडके's picture

31 May 2020 - 10:38 pm | रविकिरण फडके

कथा समोर नाहीये, म्हणून लिहिताना काळजी घ्यायला हवी नपेक्षा काही चुकीचं लिहून जाईन, म्हणूनही.

शंकर आणि पार्वती बसलेले असताना नारदमुनी घाईघाईने येऊन त्यांना सांगतात, अहो बघा, मानवाने काय भयंकर संहार चालविला आहे पृथ्वीवर, काही शिल्लक राहाणार नाही असं दिसतंय. मानवही शिल्लक राहाणार नाही.
मग पार्वती शंकराला घाई करते आणि ती दोघं विमानातून पाहणी करायला निघतात. सगळं काही जळून खाक झालेलं असतं पृथ्वीवर. एक माणूस म्हणून नजरेला पडत नाही. पार्वती रडकुंडीला येते. म्हणते, हिमालयाचं काय झालंय ते तरी पाहूया. ती हिमालयाची कन्या, तिला माहेरची साहजिकच काळजी. तिथेही आनंदच असतो. पार्वती काळजीत पडते. आता आपलं काय होणार, ती शंकराला विचारते. शंकर म्हणतो, आपलं काय होणार, आपल्याला माणसाने कल्पनेने निर्माण केलं, माणूसच राह्यला नाही तर आपण तरी कसे राहाणार?
कथा ह्यापुढे जे वळण घेते ते भन्नाट आहे. शंकर-पार्वती राहातात, कारण जीवन पुन्हा उभारी घेते. अनेक गोष्टी घडत घडत शेवटी पाऊस पडतो, पृथीवरची आग आग, प्रचंड उष्णता नष्ट होते, वेली पुन्हा उभारू लागतात. इथे पृथ्वीच्या सुरुवातीच्या, साडेचारशे कोटी वर्षांपूर्वीच्या, काळाचा संकेत आहे.
A very potent story, open to interpretations. म्हणून ग्रेट.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 11:32 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही सारांशही यथोचित दिलायं त्याबद्दल धन्यवाद !

मोकाशींनी असा प्रष्ण उपस्थित केलायं की देव मानव- निर्मीत की मानव देव- निर्मीत ?
_______________________
मोकाशींचा अध्यात्मिक अभ्यास कितपत होता याची कल्पना नाही.

वस्तुस्थिती अशी आहे की अस्तित्व सवयंभू आहे.
त्याचा निर्माता कुणीही नाही.

बुद्ध याला शून्यवाद म्हणतो.

तस्मात, शंकर, पार्वती, नारद या केवळ मानवी कल्पना आहेत.
असा कोणताही शंकर नाही आणि तो काहीही निर्माण करत नाही.

Rajesh188's picture

1 Jun 2020 - 12:26 am | Rajesh188

देव म्हणजे निर्माता असा अर्थ घ्या त्याला काही नाव देवू नका.
नाव माणसांनी दिली आहेत,
देव ही संकल्पना निर्माण करण्याची गरज का निर्माण झाली असा प्रश्न विचारला की निसर्गाचे भयंकर रूप बघून माणसाला भीती वाटायची म्हणून देव ही संकल्पना निर्माण झाली.
किंवा आजू बाजूला घडणाऱ्या घटना कश्या घडत आहेत त्या मागची कारण माहीत नसल्यामुळे देव ही संकल्पना निर्माण झाली.
अशी दोन उत्तर जे देव (निर्माता) मानत नाहीत ते देतात.
पण आता माणसाला सर्व घटना कशा घडतात हे थोडेफार माहीत आहे,बर्या पैकी निसर्गावर ताबा मिळवला आहे तरी सुधा देव ही संकल्पना अजुन सुधा बहुसंख्य लोक मानतात.
का?
पृथ्वी वर सजीव निर्मिती झाली त्याची कारण
ऑक्सिजन,पाण्याची उपलब्धता,योग्य तापमान,आणि बाकी गोष्टी ज्या इथे अस्तित्वात आहेत असे आपण विश्लेषण करतो.
पण ह्या सर्व गोष्टी ची बिलकुल गरज नसलेले जीव पृथ्वी आहेत(सुष्म जीव) वर आहेत तर बाकी ठिकाणी पण असू शकतात पण.
आपण ऑक्सिजन ,पाणी,शोधत बसलो आहे ब्रह्मांड मध्ये.
विश्व हे एका बिंदू मधून निर्माण झाले असे गृहितक सांगते पण त्या बिंदू अगोदर काय होत असे विचारले की काही नव्हत असे समजा असा प्रतिवाद केला जातो हे विज्ञान मध्ये चालत .
प्रत्यक्षात nothing मधून काहीच अस्तित्वात येत नाही हे पण विज्ञान च सांगत.
कारण काही प्रश्नांना उत्तरं नाहीत.
फक्त पृथ्वी पुरताच विचार केला तर
पृथ्वी वरची सजीव सृष्टी नियोजित पने तयार केल्यासारखी च वाटते.
प्रतेक प्राणी,वनस्पती ह्याची निर्मिती नियोजित पने केल्यासारखी आहे.
देव माणसांना निर्माण केला हे टाळ्या घेणारे वाक्य आहे.
पण देवाचे अस्तित्व,ह्या वर खूप विशाल लेखन आहे.
त्याचा प्रतिवाद एका उथळ वाक्यांनी करता येणार नाही.
किंवा जग देवांनी निर्माण केले तर देव कोणी निर्माण केले असल्या अती उथळ वाक्यांनी सुद्धा करता येणार नाही.
आणि ते लोकांना पटणार पण नाही.

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 9:09 am | संजय क्षीरसागर

त्याच्या "द ग्रँड डिजाइन" मधे म्हटलंय :

Invoking God is not necessary to explain the origins of the universe, and that the Big Bang is a consequence of the laws of physics alone.

प्रसाद गोडबोले's picture

31 May 2020 - 9:51 pm | प्रसाद गोडबोले

प्रश्नः नक्की प्रॉब्लेम काये ?

उत्तर : कोणाचा ? लोकांचा की संक्षींचा ?

लोकांचा प्रॉब्लेम हा आहे कि बहुतांश लोकं कधीच समान बौध्दिक , अध्यात्मिक , वैचारिक , मानसिक आणि आर्थिक पातळीला नसतात. त्यामुळे आपले लेखन सर्वानच्यच लक्षात येइल अन सगळेच कौतुक करतील ही अपेक्षाच फोल आहे. इथे लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे अन त्यांना तुम्ही " काळ भास आहे" असं काही सांगायला लागला की लोकंना कसे कळेल ? ते विनोदच करणार ना ? अहो इथे बहुतांश लोकांना पॅन कार्ड कसे काढायचे अन का काढायचे हे माहीत नाही अन तुम्ही त्यांना इन्कम टॅक्स रिटन वर एक्स्टेन्शन कसे फाईल करायचे सांगताय !!

आता, माझ्या तुमच्या लेखनावरुन केलेल्या काही अनुमानांच्यावरुन, तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते सांगायचा प्रयत्न करतो :

१. तुमच्या लेखनाचा उद्देश कधीच क्लियर नसतो . म्हणजे की तुमचे लेखन कोणाला उद्देशुन आहे, कोणाला काय आकल्न व्हावे हे अपेक्षित आहे. तुम्हाला तुमची मते इतरांना पटवुन द्यायची आहेत की त्यांची मते खोडुन काढुन खंडन्मंडन करायचे आहे ? की तुम्हाला - " शहाणे करुन सोडावे | अवघे जन || " ह्या समर्थ उक्ती नुसार लोकांना शहाणे करुन सोडायचे आहे ? ( की तुमचे लेखन माझ्या लेखन शैली प्रमाणे स्वांन्तःसुखाय अर्थात स्वतःच्याच आनंदासाठी आहे ? :प )
अगदी ह्या लेखातही तुमचा उद्देश काय हे क्लियर नाहीये , तुम्हाला लोकांचा काय प्रॉब्लेम आहे असे विचारायचे आहे की माझे काही चुकत आहे का असे विचारायचे आहे ? एकदा स्पष्ट केले तर सगळं कसं खुप सोप्पं होऊन जाईल !
जर तुम्ही तुमचा लेखनाच्या सुरुवातीलाच उद्देश स्पष्ट केलात तर कदाचित प्रतिसादात राडा होणार नाही. (अगदी लगेच्च थांबेल असे मी म्हणत नाही, तुमचा कर्मविपाक सिध्दांतावर विश्वास नसला तरीही तुमचे मिसळपाव वरील "संचीत कर्म" काही तुमची पाठ सोडेल असे दिसत नाही, ते तुम्हाला भोगुनच संपवावे लागेल :ड)

२.तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.
तुम्हाला ओशो आणि जे. कृष्णमुर्ती माहीत असतील ना, ( त्यातील कोणाचे विचार तुम्हाला पटतात अन कोण अगदीच फोल आहे हे तुर्तास सोडुन देऊ) ओशो कडे तब्बल ९१ रोल्स रॉईस होत्या हातात डायमंड चे कोट्यावधी रुपयांचे घड्याळ की काय होते जे त्यांच्या प्रत्येक प्रवचनात चकाकत असते ! जे. कृष्णमुर्तींचे लोकांना नावही माहीत नसावे . असे का ? का तर मार्केटिंग स्किल्स. !!
तुम्ही लोकांची सतत अक्कल काढत राहिलात , किंव्वा कायमच अनाकलनीय बोलत राहिलात तर तुमचा फॅन क्लब कधीच निर्माण होणार नाही ! इथे अब्राहम लिंकन ह्यांचा एक अतिषय उत्तम क्वोट आठवला - “In this age, in this country, public sentiment is everything. With it, nothing can fail; against it, nothing can succeed. Whoever molds public sentiment goes deeper than he who enacts statutes, or pronounces judicial decisions.”― Abraham Lincoln .

(बाकी माझ्या लेखनाचा उद्देश स्वतःच्याच आनंदाकरता असल्याने लोकांच्या सेंटिमेन्ट्स चा मला काहीच फरक पडत नाही. फक्त कधीकधी अगदीच बावळट लोकं दिसली की त्यांची टवाळकी उडवायला मात्र मजा येते ;) )

३. आता सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचे : तुमचा सर्वात मोठ्ठा प्रॉब्लेम आहे की तुमच्या लक्षात येत नाहीये की हे स्थळ खाजगी आहे. आपल्या सोयीनुसार लोकांचे लेखन उडवणे , लोकांचे प्रतिसाद ऊडवणे , काही चनावाला टाईप लोकांना पाठीशी घालणे , तर काही लोकांचे आयडी उडवणे हा येथील अत्यंत बेसिक पॉलिसी आणि प्रोसेजर चा भाग आहे. मला सुरुवातीला ह्याचा फार त्रास झालेला पण नंतर लक्षात आले की

हा सारा प्रकार एकदम वैजुवयनींसारखा आहे.

जोवर दोघांना मजा येत आहे तोवर मजा घ्यायची , अधुन मधुन आपण वैजुला चापट्या मारायच्या अन अधुन मधुन ती आपल्याला प्रेमाने लव्हबाईट्स देईल , पण अगदीच वैजु वयनींच्या नवर्‍याला संशय यायला लागला तर थोडावेळ दुर रहायचं . संशय विरला कि परत भेटायचं . अ॑शी ही तारेवरची कसरत आहे, मजा येत आहे तोवर करत राहु, अगदीच बोअर व्हयला लागला तर आपण आपल्या मार्गाला , वैजु तिच्या मार्गाला !!
( आता वैजुवयनी कोण हे कृपया विचारु नये, तो ग्रुप बंद पडुन जमाना झाला :( )

असो.

आता तुम्ही ह्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिग करणारा प्रतिसाद द्या किंवा मुद्दे पटले असा प्रतिसाद द्या किंवा कसेही ! मला काहीच फरक पडत नाही , मला प्रतिसाद टाईप करताना मजा आली म्हणुन टाईपले . आपलं सारंच स्वांतःसुखाय आहे आता !

बाकी तुम्ही बीयर पिता का? एकदा बसुन चर्चा करु !

चीअर्स !

संजय क्षीरसागर's picture

31 May 2020 - 10:37 pm | संजय क्षीरसागर

> इथे लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे ....

इथे लोक भरल्या पोटीच येतात !

> तुमच्या लेखनाचा उद्देश कधीच क्लियर नसतो ?

कोणत्याही लेखाचं ओपनिंग स्टेटमंट पाहा > उद्देश स्पष्ट लिहीलेला दिसेल.

> तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.

मान्य !

अध्यात्म हा जेके आणि ओशोंचा धंदा होता.
अध्यात्म हा माझा छंद आहे.
मला त्याचा व्यावसाय करायची गरज नाही.

> In this age, in this country, public sentiment is everything......

राजकारणी पब्लिक सेंटीमेंट ओळखूनच जगतो.
अध्यात्मिक त्याला जे गवसलंय ते सांगतो.
लोकांच्या धारणा आणि भावना हाच तर उलगडा होण्यातला अडसर आहे.

> मजा येत आहे तोवर करत राहु, अगदीच बोअर व्हयला लागला तर आपण आपल्या मार्गाला , वैजु तिच्या मार्गाला !!

सौ टके की बात !

थँक्स !

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 5:19 am | चौकस२१२

मार्कस ऑरेलियस यांचे निरीक्षणाशी मी सहमत आहे
परंतु ज्यानं उद्देशून त्यांनी लिहिलंय त्यांना यातील काही घ्यायचे नाही... कारण सर्वन्यानी आपणच आहोत हेच ब्रीद वाक्य दिसतंय...

बोलघेवडा's picture

31 May 2020 - 10:16 pm | बोलघेवडा

संजय सर लेख उत्तम आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही गल्ली चुकला आहात!! कोणत्या प्रेक्षकांसमोर काय सादर करायचं हे ज्याला कळतं तो खरा कलाकार.

हे ज्याला कळतं तो खरा कलाकार.

हे कलाकाराच्या संदर्भात बरोबर आहे.

पण असा कलाकार फक्त प्रेक्षकांच्या फरमाईशी पूर्ण करत राहील.
स्वतःचं आवडतं गाणं तो कधीही गाऊ शकणार नाही.

सुबोध खरे's picture

1 Jun 2020 - 1:01 am | सुबोध खरे

तुमची मार्केटिंग स्किल्स अगदीच कमकुवत आहेत.

मान्य !

मार्कस यांचा मी शिवतीर्थावर सत्कार चारायला तयार आहे.
त्यांनी संक्षी यांच्या परिपूर्णतेतील त्रुटी शोधून काढली आणि ती संक्षी यांनी मान्य ही केली.

बजाओ टाळी

निनाद's picture

1 Jun 2020 - 5:32 am | निनाद

मी (च) बरोबर आणि जग मूर्ख आहे -
तेच तेच वैचारमैथुन
त्याचीच नशा करत बसायची आणि इतरांनीही ती नशा करायची - नशा केलीच पाहिजे, अशी मागणी करत रहायची!

फक्त लेखन पाहा >

देवभोळे, जपजाप्यवाले, परिक्रमाबहाद्दूर....

मला नेमकं काय म्हणायचंय ते सोदाहरण सिद्ध करतील !

____________________

एखादा स्वतःच्या प्रतिसादाच्या नेमक्या लिंक्स दिल्यामुळे सैरभैर झाला असेल
पण एकूण मामला तोच !

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 9:33 am | शाम भागवत

:)

नाखु's picture

1 Jun 2020 - 9:57 am | नाखु

मला तुमचे लेख (बहुंतांश वेळा ) सुरुवात चांगली पण शेवट नेहमीच एकटा कपूरच्या मालिकेनुसार कायम लफडी आणि त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या हातखंडा वाटेवर जाणारी मालिका अशी वाटतात आली आहे.

आणि त्यानांतर कुणी असहमतीचा सूर तुमच्या लेखाखालची काढला किंवा प्रतिसादात उत्तरादाखल दाखविला कि नेमकी तुमची अवस्था नेमकी अशी होते .

गोल फिरून आपलॆच पुच्छ चावणार्या श्वानासमान ,त्याला गोचीड चावायची असते पण त्या नादात शेपटी चावली जाते मग रागाने तो अजून जोरात चावतो आणि तीच क्रिया निरंतर चालू राहते

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार

खरतर वरती प्रगोंनी बैलाचा डोळा फोडला आहे, त्यांचा प्रतिसाद नीट समजला तर त्या नंतर काहिही लिहायची गरज नाही.

तुमच्या लेखनातून तुमचा व्यासंग नक्की जाणवतो, तुमच्या कडे अनेक वेगवेगळे विषय हाताळाण्याचीही क्षमता आहे. उदा एखाद्या गजलेचा आस्वादात्म्क लेख लिहावा तर तो तुम्हीच किंवा मागे एकदा तुम्ही ग्रेस वर एक लेख लिहीला होता त्या नंतर मला ग्रेस नव्याने भेटायला लागला. तुम्ही लिहिलेली "रुणुझुणु" ही लेखमाला, किंवा भय इथले संपत नाही हे लेख खरोखर वाचनिय आहेत. तुमच्या गेसाल्ट वरच्या लेखाने तर मला जगा कडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, वाटले अरे? असेही काही असू शकते ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. या नव्या दृष्टीकोनाचा मला वैयक्तीक आयुष्यात खुप फायदा झाला.

असे असताना सुद्धा तुमचा तिटकारा यायला केव्हा सुरुवात होते? तर त्याचे उत्तर तुमच्या प्रतिसादांमधे आहे. कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यात काहि वेगळा विचार/ वेगळा दृष्टीकोन मांडायचा प्रयत्न केला की त्याला आपण असे का केले हा पश्च्याताप होईपर्यंत तुम्ही त्याची पाठ सोडत नाही.

एखाद्या नुकत्याच रांगायला लागलेल्या मुलाला जर आपण "आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे" याचा अर्थ समजावून सांगू लागलो तर त्याला तो समजणार आहे का? तो समजण्यासाठी त्याच्या बुध्दीचा आणि अनुभवविश्वाचा विस्तार होणे गरजेचे आहे. त्या नंतर त्याला तो अर्थ आपोआप उमजणारच आहे. पालक म्हणून आपले काम इतकेच की त्याला पसायदानाची ओळख करुन द्यायची आणि वाट बघत रहायचे. पण जर पसायदान समजले नाही म्हणून पालक आपल्या मुलाला निर्बुध्द किंवा मतिमंद समजून त्या पध्दतिने वागवत असतील तर हे समजल्यावर त्या मुलाला आपल्या पालकांचा आणि पसायदानाचा तिटकारा येणे स्वाभाविक आहे.

मी जर मुंबईतल्या एखाद्या मनुष्याला, ज्याने पुणे पाहिलेलेच नाही त्याला, पाषाणचा तलाव किती सुंदर आहे हे सांगू लागलो तर काही काळ त्याच्या मनात नक्की उत्सुकता निर्माण होईल पण मी जेव्हा म्हणेन "अरे पाषाणच्या तलावापुढे तुमचा समुद्र झक मारतो" तेव्हा त्याचा माझ्याकडे पहायचा दृष्टीकोन नक्की बदलेल आणि मग हळू हळू त्याच्या प्रतिक्रियाही बदलत जातील.

मुंबईला पुण्यावरुनही जाता येते, नाशिकवरुनही जाता येते आणि अहमदाबादवरुनही निघालेला मनुष्य मुंबईला पोचतोच. प्रत्येकाचा रस्ता बरोबरच असतो. पण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे म्हणून नाशिकच्या मनुष्याला पुण्याला बोलवून मग मुंबईला पाठवणे व्यावहारीक नाही.

"मै जहा पे खडा रहेता हू, लाईन उधरसेही शुरु होती है" हा अ‍ॅटीट्युड सिनेमात बघायला मस्त वाटतो. पण तोच प्रयोग जर कोणी प्रत्यक्ष जीवनात आपल्यावर करायला लागले तर त्याला नैसर्गिकरित्या प्रतिकार होणारच. कारण खर्‍या जगात प्रत्येका मधेच एक अमिताभ दडलेला असतो.

तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती इतकीच की ही एवढी आणि एवढी एकच छोटीशी सुधारणा करता आली तर बघा..... सगळे बदलून जाईल.

या निमित्त्ताने मी आतापर्यंत अनेकवेळा अनेक ठिकाणी तुमची टवाळी केली त्या बद्दल तुमची परत एकदा क्षमा मागतो.

पण याचा अर्थ या नंतर पुन्हा कधीही टवाळी करणार नाही असा नक्कीच नाही. "क्यो की मै अपने कमजोर स्टुडंट का हाथ कभी नही छोडता"

पैजारबुवा,

गवि's picture

1 Jun 2020 - 10:09 am | गवि

__/\__

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 10:14 am | शाम भागवत

प्रगोंनी छानच लिहलंय.
पैजारबुवा तुम्हीपण मस्त लिहिलंय.

थोडक्यात सांगायचे तर मी म्हणेन की,
“व्यक्ति तितक्या प्रकृती“ ही निसर्गाची योजना आहे. विविधतेतून एकता हे त्याचे सार आहे. या विविधतेचा आदर ठेवता न येणे हा एकमेव प्राब्लेम आहे. अन्यथा हा एक राजामाणूस आहे.
असो.
_/\_

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 10:19 am | शाम भागवत

माणसाचा मीपणा वाढला की तो या विविधतेचा नकळत अनादर करायला लागतो. मीपणा जसजसा कमी होत जातो त्याप्रमाणात या विविधतेचा त्या माणसाकडून आपोआप आदर केला जाऊन, तो माणसाचा जग आदर करायला लागते.

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 10:20 am | शाम भागवत

*त्या माणसाचा*

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 12:23 pm | चौकस२१२

पैजारबुवा आपण अगदी चपखल शब्दात मांडले आहेत विचार.. खास करून " असे असताना सुद्धा तुमचा तिटकारा यायला केव्हा सुरुवात होते? तर त्याचे उत्तर तुमच्या प्रतिसादांमधे आहे."
हे तर अगदी तंतोतंत पण त्याचा विचहर हे महाशय करतील असे वाटत नाही

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 4:10 pm | संजय क्षीरसागर

> कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यात काहि वेगळा विचार/ वेगळा दृष्टीकोन मांडायचा प्रयत्न केला की त्याला आपण असे का केले हा पश्च्याताप होईपर्यंत तुम्ही त्याची पाठ सोडत नाही.

माझी बाजू अत्यंत प्रामाणिकपणे मांडतो,
याला प्रतिवाद समजू नका

सौंदर्य आणि बुद्धीमत्ता ही माझी दोन आकर्षणं आहेत

मग तो विशी किंवा कार्लसनचा चेस असेल,
कविच्या कल्पनेचा उत्कट अविष्कार असेल,
एखादी सुंदर धुन असेल,
ओशोंचा रुतबा असेल,
निसर्गदत्त महाराजांचं आकाशावर लिहावं असं विधान असेल,
एखादं रमणीय पर्यटन स्थळ असेल,
रसिल्या वारुणीची नशा असेल,
एखादी रसमय पाककृती असेल,
अष्टावक्राच्या प्रतिभेचा झगमगाट असेल,
उपनिषदातला सत्याचा उद्घोष असेल,
जगणं सोपं करणारं संशोधन असेल,
इथे प्रकाशित झालेली कथा किंवा कविता असेल.....

बुद्धीमत्तेचा म्हणजे गोष्टी सोप्या करणं
आणि सौंदर्य म्हणजे मन मोहून जाणं

तस्मात, कुणीही काही सोपं केलं किंवा कुठेही सौंदर्याविष्कार दिसला की
अनाहूतपणे दाद ही दिलीच जाते,
त्यात जरा ही कसूर होत नाही.

थोडक्यात, माझा प्रतिवाद हा कधीही हेकेखोरपणातून होत नाही

आयुष्य सोपं करणं आणि अभिव्यक्ती कलात्मक करणं इतकाच माझा छंद आहे
___________________________________________

उदा. काल हा भास आहे हे माझं विधान आहे
आणि ती उघड वस्तुस्थिती आहे
मी तसा जगतो आणि मनुष्यसोडता सगळे सजीव तसं जगतात

जीवनातला वेळेचा दंश काढून टाकण्याचा केलेला तो अत्यंत सोपा प्रयत्न आहे
लोकांचं जगणं मजेचं व्हावं यापलिकडे काहीही हेतू नाही

इतरांना पटल्यामुळे माझी खातरजमा होण्याचा प्रष्णच नाही,
मग लोकांना पटवून देणं याला हेकेखोरपणा कसं म्हणता येईल ?

____________________________________

तरीही तुम्ही माझे २ / ३ प्रतिसाद निदर्शनास आणून दिले
की जिथे दुसरा उघडपणे बरोबर आहे
आणि तरीही मी दुराग्रह धरलायं....

तर मला आनंद होईल आणि तुमचा आभारी होईन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 4:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्याशी किंवा त्या साठी कोणाशीही प्रतिवाद करणारा मनुष्य हा बरोबर का चूक हे ठरवणे म्हणजे दोनही पार्ट्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. कारण माझ्या मते चूक किंवा बरोबर या व्यक्तीसापेक्ष कल्पना आहेत. महभारतात दुर्योधनही बरोबर होता आणि धर्मराजही.

एखादी घटना किंवा कल्पना ही व्यक्तीनुरुप आणि कालानुरुप चूक किंवा बरोबर असते. काही काळापूर्वी सती जाणे हे शास्त्रसंम्मत होते पण आज ते नाही. डोक्याचा पुर्ण चकोट करुन घेउन गावभर फिरणे काही पूर्वीच्या काळी अशुभ मानले जायचे आज लॉकडाउनच्या काळात मी स्वतःच्या हातानेच स्वतःचा चकोट करुन घेतला आहे आणि भेटणारे सगळेजण माझे त्यासाठी कौतुक करत आहेत.

धर्मराजाच्या समोर जेव्हा मनुष्यवधाचा गुन्हा केलेले चार आरोपी आणले जातात तेव्हा त्यांचा गुन्हा एकाच प्रकारचा असुनही तो प्रत्येकाला वेगवगळी शिक्षा सुनावतो.

त्यामुळे क्षमा करा, तुमच्याशी प्रतिवाद करणारा मनुष्य बरोबर असे म्हणून तुम्हाला चूक म्हणणे मला शक्य होणार नाही.

मी तुम्हाला फक्त एवढेच सुचवू इच्छित होतो की समोरच्या व्यक्तीला त्याची चूक समजावुन घेण्याची संधी आपण दिली पाहिजे. पण तुमच्या समजावून सांगण्याच्या पध्दतीमधे तुमच्या अरोपीचे मानसिक खच्चीकरण होते व त्याच्यामधे सुधारणा घडवण्याची तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होण्याची फार कमी शक्यता उरते.

पैजारबुवा,

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 4:53 pm | संजय क्षीरसागर

> तुमच्या समजावून सांगण्याच्या पध्दतीमधे तुमच्या अरोपीचे मानसिक खच्चीकरण होते व त्याच्यामधे सुधारणा घडवण्याची तुमची जी इच्छा असते ती पूर्ण होण्याची फार कमी शक्यता उरते.

इथून पुढे कदापीही असं होणार नाही अशी हमी देतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 7:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

असे करण्याचा तुम्ही यशस्वी होणार याची मला 100% खात्री आहे,

तुमच्या पुढील लेखनाला अनेक अनेक शुभेच्छा, तुम्ही स्वांतसुखाय लिहित रहा आम्ही त्याचा आनंद घेत राहू

पैजारबुवा

कोंबडा's picture

1 Jun 2020 - 10:22 pm | कोंबडा

संजूबाबा 0 : पैबु ३

ऑ?

प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.

अगदी योग्य. सुंदर.

मात्र या संकल्पनेच्या अभावामुळे किंवा तिला बोथट केल्याने (जे अवघडच आहे), युद्धं टळली असती किंवा टळतील असं वाटत नाही संक्षी.

नव्या, वेगळ्या स्वरूपात गट होणार, संघर्ष होणार. वी अनिमल्स लव्ह इट.

गम-ए-इश्क गर न होता तो गम-ए-रोजगार होता..

धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.

हे वाक्य अर्धसत्य आहे.
धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे आणि त्यानंतर त्या बोधात (विचारात नव्हे) त्या साधकाने उर्वरित जीवन जगायचं आहे.
पहिल्या भागात यश मिळाल्याच्या आनंदात ह्या दुसऱ्या भागाचे विस्मरण होते. प्रत्यक्षात हा दुसरा भाग सर्वात कठीण आहे. “रात्रंदीन आम्हां युध्दाचा प्रसंग” असे तुकोबा म्हणतात ते याच भागाबद्दल म्हणतात.

साधारणत: उन्मनी साधणे हेच धेय्य समजले जाते. समाधी अवस्था हे धेय्य समजले जाते. पण उन्मनी पचली पाहिजे हे विसरले जाते. केवळ या एका गोष्टीमुळे साधनी माणसाचे पतन होत असते. निद्रेमधे जसा निवृत्त अससी। जागेपणी हो तसा ।। ही गोष्ट या भागात साधायची असते.

असे का घडते याचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, उपासना करताना, मी व माझे संपूर्णपणे बाजूला काढून ठेवल्यावर उन्मनी अवस्था प्राप्त होते. (कोणि याला निराकार गवसला असे म्हणेल तर कोणी सत्य सापडले/गवसले असे म्हणेल. कोण काय म्हणेल हा मुद्दा येथे नाही.) तर सांगायचा मुद्दा असा की, उपासनेतून बाजूला होऊन व्यवहारात उतरताना असा साधक बाजूला काढून ठेवलेले मी व माझे परत आपल्यात सामावून धेतो आणि इथेच सारी गफलत होते.

सगळी परिस्थिती अनुकूल असताना स्वरूपाचा बोध करून घेणे ही क्रिकेटमधली नेट प्रॅक्टिस असेल तर, या बोधात उर्वरित जीवन जगणे ही प्रत्यक्ष क्रिकेटची अंतीम मॅच असते.

मी व माझे बाजूला ठेवलेला माणूस आपोआपच विविधतेचे कौतुक करायला लागतो. कारण त्या विविधतेतच तो एकता पाहायला शिकत असतो/शिकलेलाअसतो. त्यामुळे त्या विविधतेचे तो आदर करायला लागतो व आपोआप इतरांच्या आदरास पात्र होतो.

सर्व प्रकारच्या उपासनेमधे मनाची एकाग्रता साधणे हेच प्रथम शिकायचे असते. उन्मनी अवस्था प्राप्त करण्याच्या स्थितीत येईपर्यंत ही कला चांगलीच साधलेली असते. याच कलेच्या जोरावर अशा माणसाची आकलन शक्ति अफाट वाढते. त्यामुळे असा माणूस सर्वच क्षेत्रात सर्वसामान्य माणसांमध्ये उठून दिसायला लागतो. निरनिराळ्या कला, सिध्दी मिळवण्यासाठी हीच एकाग्रता व हीच आकलन क्षमता उपयोगी पडत असते. पण साधारणत: हे लक्षात न आल्याने बरेचसे साधक आपल्या भौतिक प्रगती बरोबर आपला “मी” मोठा करत नेतात व त्यातून “चांगदेव“ आकार घेतात.

हा दुसरा भाग खरेतर सापशिडीच्या खेळासारखा असतो. मिळणाऱ्या यशाची प्रत्येक गोष्ट ही सापाच्या तोंडासारखी असते, तर “कोणत्याही क्षणी झटकन साधता येणारी एकाग्रता”, ही शिडी सारखी काम करते. हे ज्याला कळेल आणि त्यानंतर वळेल, तो नक्की सापशिडीच्या पटावरील घरापर्यंत पोहोचेल हे नक्की.

आनन्दा's picture

1 Jun 2020 - 1:20 pm | आनन्दा

माझे एक साधे तत्व आहे, जो माणूस मला सगळे कळले म्हणतो त्याला काहीही कळलेले नाही.

अध्यात्माची सुरुवात मला काही कळत नाही या पासून होते, आणि शेवट मला खरेच काही कळत नाही इथे होतो.

सगळे कळणारा युगपुरूष शतकातून एखादा येतो, आणि त्याला आक्रस्ताळेपणा करून स्वत:ला सिद्ध करावे लागत नाही, सिद्धी त्याच्या आश्रयाने राहतात.

उर्वरित जीवन जगायचं आहे.

> चुकीच्या अध्यात्मिक शिकवणी मुळे भारतीय मानसिकतेचा बोजवारा उडाला आहे.

अध्यात्म म्हणजे मी नाहिसा करणं नाही.
तर प्रत्येक जण ज्याला मी म्हणतो,
तो आपल्या सर्वांचा मी एकच आहे
हा उलगडा होणं !

हा मी सार्वभौम आहे
आणि तो स्थल-कालरहित असल्यानं
नाहिसा होणं अशक्य आहे.

हा सार्वभौम मीच सत्य आहे
तोच सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे.

एकदा उलगडा झाल्यावर
उर्वरित जीवनात कोणताही बोध वगैरे घेऊन जगण्याची गरज उरत नाही.
हे खरं मुक्त आणि स्वातंत्र्यपूर्ण जीवन आहे

____________________________________

मी नाहिसा करण्याच्या प्रयत्नात
साधक आयुष्यभर असंभव प्रयत्न करत राहतो
कारण सार्वभौम मी अखंड आहे
तो साधकाचंच स्वरुप आहे
आणि तो नाहिसा होणं शक्य नाही
हाच तर अध्यात्माचा दावा आहे.

पण संतशिकवणीविरुद्ध कसं जाणार ?
परिणामी साधक विनम्र होण्याच्या मागे लागतो
यातून तो सर्वसमावेशक होण्याऐवजी
सर्व समन्वयक होतो !

थोडक्यात, त्याला स्वत्व रहात नाही.
सगळंच बरोबर म्हटल्यावर कशातच ठामपणा उरत नाही.

परिणामी अशा चुकीच्या अध्यात्माच्या भानगडीत न पडलेला
पाश्चात्य टॅक्सी ड्रायवर सुद्धा
आपल्या महाराजांपेक्षा ऐटबाज वाटतो !
कारण त्यानं मी नाहिसा करण्याचा घाट घातलेला नसतो.

आणि आपले महाराज मी लपवण्याच्या नादात
दिसेल त्याच्या पाया पडून ....
आपली विनम्रता दाखवत असतात.

शाम भागवत's picture

1 Jun 2020 - 7:03 pm | शाम भागवत

तुमचे विचार तुम्ही मांडले याबद्दल धन्यवाद.
_/\_

कानडाऊ योगेशु's picture

1 Jun 2020 - 11:47 pm | कानडाऊ योगेशु

स्वामी नित्यानंद पण हेच तर नाही सांगत ना?