करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.
COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.
बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.
१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.
गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.
रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.
करोना विषाणू पासून आपला बचाव--
१) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे
आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.
हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.
आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.
चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात
अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल
सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे
मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.
वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.
हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.
पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.
लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
प्रतिक्रिया
8 May 2020 - 10:28 am | सुबोध खरे
गिरीश कुबेर यांची यात काय महत्ता/ अधिकार आहे कि त्यांनी लस या विषयावर आपली मुक्ताफळे उधळावीत?
केवळ आपल्याला संपादक पदाच्या खुर्चीवर बसवले म्हणजे आपल्याला सर्वच ज्ञान आले असली वृत्ती असलेल्या माणसांबद्दल कमी बोलावे तितकेच थोडे.
उद्या हि लस खरंच तयार झाली कि हे दीड शहाणे मी चुकलो म्हणून सार्वजनिक माफी मागतील काय?
असंतांचे संत हा लेख मागे घेताना याना लाज वाटली नाही.
एकतर नागीण हा रोग काय आहे हे त्यांना माहिती नाही. नागीण हि आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात त्याचे जंतू आपल्या मज्जासंस्थेत लपून राहतात (स्लीपर सेल सारखे) आणि आपली प्रतिकारशक्ती अशक्त झाली कि तेच जंतू त्या नसेत परत सक्रिय होतात.
नागीण (herpes zoaster) हा रोग नसून ते एक लक्षण आहे.
आणि कांजिण्यांवर ती होऊच नये म्हणून अतिशय परिणामकारक लस आहे हे या उंटावरच्या शहाण्याला माहिती आहे काय? Varicella vaccine, also known as chickenpox vaccine, is a vaccine that protects against chickenpox. One dose of vaccine prevents 95% of moderate disease and 100% of severe disease. Two doses of vaccine are more effective than one.
https://en.wikipedia.org/wiki/Varicella_vaccine
या दुव्यातच नागीण(herpes zoster) बद्दल हि माहिती आहे.
सर्व जगातील अक्कल आपल्याला आहेच असा आव आणणाऱ्या माणसाने लस तयार होणारच नाही म्हणून समाजात (विशेषतः वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांना हर्ड इम्युनिटी चा फायदा तेवढा होणार नाही आणि त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण बरेच जास्त आहे) घबराट पस्रवल्याबद्दल याना तुरुंगात खडी फोडायला का पाठवू नये?
8 May 2020 - 5:30 pm | मराठी कथालेखक
डॉ. खरे सर,
सदर लेखाच्या शेवटी
असे वाक्य आहे. म्हणजे "लस तयार होणारच नाही" असं लेखक म्हणत नाहीये तर लस तयार होईलच असं म्हणता येणार नाही असं त्यांचं म्हणणं दिसतंय. मला वाटतंय ते वास्तवाला धरुनही आहे. नागीण खेरीज लेखकाने एड्स , डेंग्यू, सार्स इत्यादींचाही उल्लेख केला आहेच.
मला वाटतंय इथे मुद्दा इतकाच आहे की प्रत्येक विषाणूजन्य आजारवर लस निर्माण करता येईलच का हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकणार नाही.
8 May 2020 - 7:32 pm | सुबोध खरे
जगात सर्वत्र प्रचंड छळणारा आजार म्हणजे नागीण.हर्पिस नावानं ओळखला जाणारा हा आजारही असाच विषाणूजन्य. जगातले वैद्यकतज्ज्ञ गेली तब्बल ४० वर्ष झगडतायत. पण या आजाराला रोखणारी लस अजूनही काही तयार होऊ शकलेली नाही.
वैद्यकीय ज्ञानाबद्दल अज्ञान असला तरी बेलाशक ठोकून दिलंय.
कांजिण्यांनी माणसं अशी सहज मरत नाहीत म्हणून त्याच्या लसी बद्दल सर्वत्र उदासीनता दिसून येते.
सार्सची लस जवळजवळ तयार झाली होती परंतु तोवर ती साथच संपली. त्यामुळे त्याचे संशोधन तेथेच थांबले. संशोधनावर अफाट खर्च होतो तो कुणी करायचा?
कारण पुढची पायरी म्हणजे निरोगी मानवी स्वयंसेवकांमध्ये ती लस टोचून त्यानंतर त्यांना सार्सचा संसर्ग घडवून आणायचा आणि त्यांना रोग होतो कि नाही हे पाहायचे. साथ संपल्यावर निरोगी लोकांना असे तोफेच्या तोंडी द्यायला कोणती कंपनी तयार होईल?
परंतु हेच संशोधन आता कोव्हीडच्या आजारात उपयोगी होत आहे.
A SARS vaccine was developed in response to the 2002 outbreak, but was never sold since public health measures got the disease under control before it was ready
https://www.discovermagazine.com/health/sars-vaccine-could-be-stopgap-me...
एड्स ची लस का तयार होऊ शकली नाही याची कारणे फार वेगळी आहेत.
डेंग्यू ची लस तयार होऊ शकली नाही हि पण लोणकढी थाप त्यांनी मारलीच आहे.
In May 2019, Dengvaxia® was approvedexternal icon by the U.S. Food and Drug Administration (FDA) in the United States for use in children 9-16 years old living in an area where dengue is common (the US territories of American Samoa, Puerto Rico and the US Virgin Islands), with laboratory confirmed prior dengue virus infection.
https://www.cdc.gov/dengue/prevention/dengue-vaccine.html
कुठे आहे ती बस.. आपली नाही ती बस..
यात बस या शब्दाच्या जागी लस हा शब्द घालायचा.. बाकी सर्व तेच.
याचा अर्थ पाचवीतील मूल सुद्धा सांगू शकेल.
महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रात अग्रलेख लिहून संपादक इतक्या थापा एखादा मारू शकेल यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही.
8 May 2020 - 8:19 pm | मराठी कथालेखक
कुबेरांची लेखनशैली वादातीत नाहीच.. आणि काही मुद्दे (नागीण, डेंग्यू संदर्भातले) कदाचित चुकलेले असतीलही. (पण एडस् ..कारणे काहीही असली तरी एडस् ची लस नाही हे खरेच)
आणि कोरोनावर लस लवकरात लवकर मिळावी असे सगळ्यांनाच वाटते आहे. सध्याच्या काळात अतिशय आशावादी असायलाही हवं. (एडस् वर लस येवो वा न ये..पण कोरोनाची लस तर यायलाच हवी) परंतू तरीही पाचवीतील मूल असो वा तज्ञ डॉक्टर कुणाच्याही मनात प्रश्न असेल की
प्रत्येक विषाणूजन्य आजारवर लस निर्माण करता येईलच किंबहूना योग्य वेळेत येईल (चार-पाच वा दहा वर्षांनी नव्हे) याची ग्वाही कुणी देवू शकतो का ?
आणि ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने "अमूक कालावधीत लस उपलब्ध होईल" असे सांगण्यास काय हरकत असावी ?
9 May 2020 - 1:03 pm | सुबोध खरे
ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने "अमूक कालावधीत लस उपलब्ध होईल" असे सांगण्यास काय हरकत असावी ?
ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने लग्न झाल्यावर अमूक इतक्या कालावधीत मूल होईलच असं असे सांगण्यास काय हरकत असावी ?
9 May 2020 - 6:02 pm | मराठी कथालेखक
अगदी अगदी.. म्हणूनच लग्न झाल्यावर मूल होईलच अशी खात्री कुणीही देवू शकत नाही.. असो.. :)
8 May 2020 - 8:49 pm | Rajesh188
लस म्हणजे प्रतिबंधात्मक औषध असा अर्थ सामान्य लोक घेतात आणि तोच अर्थ योग्य आहे.
म्हणजेच त्या आजाराची लस घेतली की भविष्यात तो आजार होणारच नाही.
देवी,पोलिओ, हे रोग तर लसीकरण मुळे नष्ट झाले.
रेबीज हा आजार वर पण लस आहे पण ती वन्य प्राण्यांनी चावा घेतला नंतर द्यायची असते अगोदर नाही.
आणि ती लस पण बर्या पैकी यशस्वी आहे.
Tb chi las aahe.
Pan ti 100% result det nahi.
Maleria, कॉलरा ह्यांची लस नाही पण उपचार यशस्वी आहेत.
त्या मुळे corona var las निर्माण नाही झाली म्हणून आकाश कोसळणार नाही.
उपचार निर्माण झाले तरी हेतू साध्य होत.
आणि corona bara करणारे औषध नक्कीच शोधाल जाईल.
9 May 2020 - 1:10 pm | सुबोध खरे
रेबीज हा आजार वर पण लस आहे
या लसीमुळे प्रतिकारशक्ती साधारण फक्त एक वर्ष पर्यंत टिकते. यामुळेच हि लस सरसकट सर्वाना टोचता येत नाही.( पाच इंजेक्शने उगाच कुणालाही टोचण्यात काय हशील आहे?
9 May 2020 - 6:04 pm | मराठी कथालेखक
मुद्दा योग्यच आहे..आणि लसपेक्षाही औषध जास्त गरजेचे. कारण लस काही कारणाने घेण्याचे राहून गेले आणि रोग झाला तरी औषधाने बरा करता येईल
9 May 2020 - 1:11 pm | सुबोध खरे
करोना वर लस जर दोन महिन्यात निर्माण झाली तर?
कुबेर याना लस निर्माण होणारच नाही अशा तर्हेचे वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती.
सामान्य माणसांना आपण सांगतो कि करोना मुळे अशाच लोकांचा मृत्यू होतो ज्यांचे वय जास्त आहे किंवा ज्यांना हृदयरोग फुफ्फुस रोग मधुमेह किंवा रक्तदाब आहे.
पण माझ्या सारखया डॉक्टरांना वरिष्ठ नागरिक विचारतात डॉक्टर मला मधुमेह आणि रक्तदाब आहे आणि माझे वय ७५ आहे.
त्यांना मी लस काही तयार होणार नाही तेंव्हा आता तुम्ही लटकलात असं सांगायचं का?
लष्करात एक कायम शिकवले जाते कि
NO FIGHT IS LOST TILL YOU HAVE STOPPED FIGHTING
त्या ऐवजी येथे मराठी कथालेखक लस तयार होणारच नाही हे कुबेरांचे वक्तव्य समर्थन करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.
9 May 2020 - 2:20 pm | मोदक
सोडा हो डॉक.. मी एक सुचवू का? कुबेर किंवा त्यांच्या अहो रूपम.. अहो ध्वनी फेम समर्थक लोकांना फाट्यावर मारा. ते त्यांच्या स्वतःची मते थोडीच मांडतात..?
बाकी माहितीपूर्ण प्रतिसाद वाचत आहेच - त्याबद्दल अनेक धन्यवाद.
9 May 2020 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते केवळ शक्यता व्यक्त करीत आहेत. ते संशोधन आहे. यशस्वी होईल न होईल त्याचा योग्य अशी ठरलेली तारीख नाही, यशस्वीतेची आज तरी कोणती अधिकृत खात्री नाही, लोकांनी सावधानता बाळगावी लसीवर विसंबून राहण्यात आज तरी अर्थ नाही.
बाकी जाऊ द्या तुमच्या धाग्यावरील तुमचे नवे माहितीवरील आधारित प्रतिसाद वाचत आहोत. आभार.
-दिलीप बिरुटे
9 May 2020 - 6:13 pm | मराठी कथालेखक
जाऊ द्या डॉक्टर साहेब
इथे वैद्यकीय ज्ञानापेक्षा मला वाटते मराठी भाषेचे ज्ञान जास्त महत्वाचे आहे.
मी काही कुबेर यांचा चाहता नाही. पण "लस येइलच असे नाही इतकंच ते म्हणत आहेत" आणि त्यांच्या म्हणण्यातून तुम्ही "लस येणारच नाही असं कुबेर म्हणत आहेत" असा तुम्ही निष्कर्ष काढत आहात. कदाचित कुबेरांवर काही राग असेल, हरकत नाही ,कुबेरांना बाजूला ठेवा "लस येईलच" (म्हणजे योग्य वेळेत येईल) असे ठामपणे म्हणता येईल का इतकाच मुद्दा आहे.. बाकी कुबेरांचे अग्रलेख मागे घेणे वगैरे गोष्टी तशा अवांतरच म्हणाव्यात ना (तसं. थोडं अवांतर म्हणजे तरीही तो अग्रलेख लाखो लोकांपर्यंत पोहोचलाच आणि आजही बहूधा ई पेपरमध्ये उपलब्ध असावा ..पण ते सगळं असो)
9 May 2020 - 6:22 pm | मराठी कथालेखक
अगदी योग्य.. पण लस आली नाही म्हणून "लढाई हरलो किंवा हरु" असंही नाही..योग्य ती काळजी, प्रभावी उपचार यांच्या सहायाने आजार दूर ठेवता येईल किंवा झाला तरी रुग्ण बरा होईल.
मला पुन्हा पुन्हा द. कोरियाचे नाव घ्यावेसे वाटते. त्यांची रुग्णसंख्या ३ एप्रिलपासून दहा हजारांच्या आसपास आहे. या काळात त्यांनी सार्वत्रिक निवडणूकाही घेतल्यात.
लस हवीच आहे.. पण ती येईपर्यंत हतबल होण्याची गरज नाही आणि लॉकडाऊन नको आहे. लस आणि लॉकडाऊन दोन्हीच्या अभावातही रोगापासून दूर राहता यायला हवे.
9 May 2020 - 6:26 pm | धर्मराजमुटके
त्यांच्यासारखी शिस्त आपल्या लोकांत येईल याबद्दल तुम्ही आशावादी आहात काय ?
9 May 2020 - 6:38 pm | मराठी कथालेखक
का नाही ? योग्य शिक्षण मार्गदर्शन , नियमावली , इतर पोषक गोष्टी असल्यात की का नाही शिस्त येणार..
आपण "भारतीय लोक बेशिस्त" ही नकारात्मक मानसिकता बदलायला हवी.
मी स्वतः कधी गेलो नाही, पण गँग्टोक येथील स्वच्छता वगैरे बद्दल खूप ऐकून आहे. हे भारतातच आहे ना ?
मला स्वतःला पन्हाळागडावरील स्वच्छताही नक्कीच स्पृहणीय (अगदी आदर्श नसेल कदाचित) वाटली.
10 May 2020 - 5:37 pm | धर्मराजमुटके
आपला आशावाद आवडला !
9 May 2020 - 6:45 pm | मराठी कथालेखक
झालंच तर भारतीयच काय तेवढे बेशिस्त आहेत असं नाही.
कोरोना व्हायरस पार्टीबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ?
https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus_party
10 May 2020 - 9:13 pm | माहितगार
कुबेरांच्या लेखाचा उद्देश कदाचित सावधगिरीचा असावा, त्यांच्या लेखावर माझा तेवढा आक्षेप नाही पण उपरोक्त चर्चेत २ तार्कीक उणीवा जाणवल्या
१) दुसर्यांच्या चुकीने आपल्या चुकीचे (म्हणजे युरोपीयनांच्या चुकीने भारतीयांच्या चुकीचे समर्थन होत नाही)
२) अपवादाने नियम सिद्ध होत नाही, शिस्तबद्ध सार्वजनिक वर्तनात स्वच्छता पालन इत्यादीत भारतीयांचे रेकॉर्ड सर्वसाधारणपणे आदर्श समजावे असे राहीलेले नाही किंवा कसे.
11 May 2020 - 12:05 am | मराठी कथालेखक
काहीही.. मी समर्थन वगैरे केले नाही.. फक्त इतकंच म्हणत आहे की भारतीय समाजच तेवढा बेशिस्त असं वगैरे काही नाहीये (कारण असं मानलं की पुढे येते ती निराशा, भारतात काही धड होवू शकणार नाही वगैरे निराशावाद) ...तर प्रत्येकच समाजात कमी अधिक प्रमाणात बेशिस्तीचा गुण आढळतो. जपानसारख्या देशात असा बेशिस्तपणा फारच अभावाने आढळेल कदाचित तर फ्रान्स , स्पेनसारख्या देशात काही अधिक प्रमाणात (कदाचिता भारतीय समाजाशी तुलना होवू शकेल)
हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. जिथे गोष्टी खराब आहेत तिथे आपण निराश होतो आणि जिथे चांगल्या आहेत त्याकडेही "नियमाला अपवाद" म्हणून बघतो. मला वाटते हा नकारात्मक दृष्टीकोन होईल. ..त्यापेक्षा जिथे गोष्टि चांगल्या आहेत त्याकडे एक चांगले उदाहरण , रोल मॉडेल वा "होय आम्ही ही हे करु शकतो " या दृष्टीने पाहिले आणि जिथे गोष्टी खराब आहेत तिथे "सुधारणेस बराच वाव आहे" असे म्हंटले तर गोष्टी सुधारु शकतात... वेळ लागेल , पण सुरुवात तर व्हावी.. पण "चांगले काही होणारच नाही" असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर मग अजिबातच होणार नाही.
कुबेरांच्या लेखावरील प्रतिसाद आणि वरील माझा प्रतिसाद यांचा काही संबंध नाही. दोन्ही वेगळे विषय आहेत.
9 May 2020 - 4:17 pm | माहितगार
म्युटेशन D614G (टाईम्स नाऊ वृत्त)
9 May 2020 - 4:19 pm | माहितगार
कोविड १९ ची धारावी कथा
9 May 2020 - 7:49 pm | सुबोध खरे
लस तयार होईपर्यंत तरी प्रभावी औषध मिळाले तर आपण अनेक वरिष्ठ नागरिकांचे प्राण वाचवू शकू.
औषधाचे आपले दुष्परिणाम असू शकतात विशेषतः ज्यांना या औषधाची जास्त गरज पडेल अशा लोकांना अगोदरच त्यांच्या आधीच्या आजाराची(रक्तदाब, मधुमेह हृदयविकार इ) औषधे चालू असतात त्यांना असे दुष्परिणाम त्रासदायक असू शकतात.
लस तयार झाली कि एक (किंवा दोन) इंजेक्शनने आपली प्रतिकारशक्ती तयार करून जवळजवळ आयुष्यभर त्यापासून आपल्याला सुटकारा मिळू शकेल.
उदा हिपॅटायटिस बी, गोवर इ. विषाणू जन्य रोग
अर्थात लस तयार करण्यासारख्याच पायऱ्या औषधासाठी पार करायला लागतील.
याचसाठी आधीपासूनच वापरात असलेली अनेक औषधे (उदा हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन) वापरून पाहण्याचा पर्याय (REPURPOSE) वापरला जात आहे कारण या औषधांचा चांगला वाईट परिणाम काय आहे याची आपल्याला अगोदरच माहिती आहे.
9 May 2020 - 7:53 pm | ऋतुराज चित्रे
अमुक अमुक महिन्यात कारोनाची लस उपलब्ध होईल, किंवा झाली आहे अशा बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारीत होत आहेत. लोकं अशा बातम्यांवर विश्वास ठेऊन बेफिकीर होऊ शकतात. अशा बातम्यांवर कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. कुबेर खोट्या आशेवर ठेवत नाही आणि अशी लस येणारच नाही असेही म्हणत नाही.
10 May 2020 - 5:56 pm | चौथा कोनाडा
+१
9 May 2020 - 8:12 pm | Rajesh188
कुबेर नी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांचे मत आहे .
जे त्यांनी अनेक बातम्या,माहिती वाचून बनवले आहे.
ते काही संशोधक नाहीत किंवा त्या क्षेत्रातील अभ्यासू पण नाहीत.
त्यांच्या मताला योग्य ती किंमत योग्य ती माणसं देतील.
त्यांनी लिहला म्हणजे ते सत्य आहे असा समज कोण्ही करून घेत नाही.
चिंता नसावी.
9 May 2020 - 8:13 pm | चौकटराजा
सध्या सर्वात धोका आहे तो जीवशास्त्राचे चे विद्यार्थी सोडून बाकीचे पत्रकार वगरे लोक आपली जी अक्कल पाजळताहेत त्यांचा .लस शोधणे ,नवीन औषध शोधणे ,आपलयाला संसगापासून अलिप्त ठेवणे ,ज्ञात असलेल्या युक्त्यांनी प्रतीकारशक्ती वाढविणे ई आपल्या हातात आहे. त्यात यश येणारच नाही असे म्हणून कसे चालेल . लशीवरचे संशोधन हा एक जुगार असतोच. कारण औषध व लस हे वेगवेगळ्या पध्द्दतीनें काम करतात. लास तयार झाल्यावर विषाणूच जर म्युटेट झाला तर संशोधनावरचा खरच वाया जाऊ शकतो. पण मानव जात आताच इतका फालतू गोष्टीवर खरच करीत आहे की उदा चंद्रावर यां पाठविणे ई. ,त्यात माणसाचे प्राण वाचवू शकत असेल तर अशा गुंतवणुकीला प्राधान्य हे असलेच पाहिजे. एरवी टर्मिनल इलनेस माहीत असूनही म्हाताऱ्यावर काही लाख खरच करणारे नातेवाईक असतातच की !
11 May 2020 - 1:41 pm | सुबोध खरे
त्यांनी लिहला म्हणजे ते सत्य आहे असा समज कोण्ही करून घेत नाही.
हो पण एका प्रथितयश वृत्तपत्राच्या संपादकाने असत्य तरी लिहू नये एवढी अपेक्षा बाळगणे चूक आहे का?
उदा डेंग्यू, नागीण या रोगांवर लस नाहीच.
हर्पिस वर चाळीस वर्षे शास्त्रज्ञ झगडत आहेत परंतु त्याला लस निर्माण करण्यात यश आलेले नाही असले विधान करून जगभरातील शास्त्रज्ञांचे अपयश दाखवण्याच्या अगोदर कमीत कमी हर्पिस वर अत्यंत गुणकारी लस आहे आणि ती गेली २५ वर्षे वापरात आहे एवढी तरी किमान खात्री करून घ्यायला हवी होती.
निदान अशा जागतिक महामारीच्या वेळेस शास्त्रज्ञांवर बोट दाखवून हे महाशय काय मिळवत आहेत हे देवास ठाऊक?
वयोवृद्ध माणसे हि लस तयार होईल आणि आपण बाहेर पडून आपले पूर्वीचे जीवन जगू शकू या आशेवर असताना अशी लस तयार होणारच नाही असे घबराट पसरवणारे वक्तव्य पसरवून याना काय मिळवायचे आहे?
हे काही एखाद्या व्हॉट्स अँप वरचे ढकलपत्र नाही कि त्याकडे दुर्लक्ष करावे. काही लाख लोक तरी ते महाराष्ट्रात वाचतात.
आणि आश्चर्य म्हणजे येथे लोक त्यांच्या अशा बेजबाबदार विधानाचे समर्थन करत आहेत.
11 May 2020 - 4:06 pm | ऋतुराज चित्रे
कदाचीत ते ह्या हर्पस बद्दल बोलत असतील https://www.healthline.com/health-news/why-we-still-dont-have-a-herpes-v...
11 May 2020 - 7:43 pm | सुबोध खरे
शक्यच नाही.
नागीण हि हर्पिस सिम्प्लेक्स मुळे होत नाही तर हर्पिस झोस्टर मुळे होते.
तेंव्हा या दोनात गल्लत नको.
11 May 2020 - 7:56 pm | ऋतुराज चित्रे
त्यांची गल्लत झाली असेल. असेही नागिनिवरील लस ही ५० वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी असून तिचा प्रभावही मर्यादित काळासाठी आहे. पूर्णपणे संरक्षण नाहीच.
11 May 2020 - 10:41 pm | सुबोध खरे
https://en.wikipedia.org/wiki/Varicella_vaccine
या दुव्यातच नागीण(herpes zoster) बद्दल हि माहिती आहे.
हे वाचून घ्या
मग चर्चा करू
11 May 2020 - 11:05 pm | Rajesh188
लस निर्माण करण्यात माणसं नी यश मिळवलं आहे.
अनेक विषाणू जन्य रोगांवर लस शोधण्यात यश प्राप्त केले आहे.
लसी चे विविध प्रकार असतात(ह्या विषयी डॉक्टर च सांगतील)
पण मला माहित असलेली माहिती अशी आहे.
अर्ध मेले रोग कारक जिवाणू ,विषाणू शरीरात सोडले जातात आणि आपल्या प्रतिकार शक्ती ला त्याची ओळख करून दिली जाते.
मग प्रतिकार शक्ती स्वतचं रोग नष्ट करण्यास सक्षम होते.
लस निर्माणच होणार नाही ह्याची सविस्तर कारण कुबेर ह्यांनी जगभरातील लेख वाचून दिली पाहिजे होती.
पण तशी त्यांनी दिली नाही.
अर्धवट आपल्याला हवी तीच माहिती देण्याची आणि दुसरी बाजू झाकून ठेवण्याची त्यांची जुनी खोड आहे.
11 May 2020 - 11:57 pm | मराठी कथालेखक
लस निर्माणच होणार नाही असा त्या लेखाचा अर्थ काढणार्या व्यक्तीची भाषेची समज संशयास्पद आहे.
"लस निर्माण होईलच असे नाही" = "लस निर्माणच होणार नाही" असा समज करुन घेतला जात असेल तर कठीण आहे.. !!
12 May 2020 - 12:50 pm | चौथा कोनाडा
करोनाचा प्रसार वाढल्यानंतर केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅप विकसित केलं. हे अॅप लोकांनी वापरावं, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील लॉकडाउन वाढवण्याविषयी जारी केलेल्या सूचनांमध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदारांनी हे अॅप वापरावं, असे सक्ती आदेश दिले होते. काही ठिकाणी हे लोक अॅप वापरत नसल्याबद्दल पोलिस कारवाई देखील सुरु केलीय.
त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी सवाल केला आहे. आता या वरूनही वादंग सुरु होण्याची शक्यता आहे
आरोग्य सेतू अॅप’ची सक्ती का करत आहात?
12 May 2020 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरोग्य सेतू अॅप किती उपयोगाचं आहे त्याबद्दलही शंका आहेच. आता माझ्या गावात एक किलोमिटर अंतरावरील असलेल्या उपजिल्हारुग्णालयात पाच रुग्न कन्फर्म बाधीत आहेत आणि अॅपवर फक्त एकच दिसत आहे.
आता युजर म्हणून आपण आपली निरोगी माणसांची माहिती अपडेट करतो पण रुग्णाची माहिती कोण अपडेट करेल. सर्व रुग्णांची माहिती अपडेट डाटा डिपार्टमेंट ऑफ हेल्थ करणार. आता माझ्या तालुक्याच्या गावी असलेल्या रुग्णालयातल्या रुग्णांचा डाटा तिकडे जाईल आणि मग माहिती अॅपवर येईल. खरं तर रुग्णाच्या मोबाइलवरुन जर ती माहिती भरल्या गेली असती तर त्या इफेक्टेडची रुग्णाची माहिती अपडेट झाली असती आणि लोकेशन द्वारे रुग्ण कुठे आहे, त्याची माहिती मिळत गेली असती. पण तसे काही त्यावर दिसत नाही.
असो. चालायचंच. सर्वांनी काळजी घ्या. घरीच राहा. विनाकारण बाहेरु पडू नका.
-दिलीप बिरुटे
12 May 2020 - 6:18 pm | मराठी कथालेखक
बरीच गोर गरीब जनता अद्याप स्मार्ट फोन वापरत नाही. मग हे अॅप त्यांच्यापर्यंत कसे काय पोहोचणार ?
12 May 2020 - 2:54 pm | मराठी_माणूस
एक वेगळा विचार
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-on-will-just-f...
12 May 2020 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विचार करायला चालना मिळत राहते. लिंक बद्दल आभार.
आपल्याकडे आहेच आज रात्री ठीक आठवाजता आहेच भाईयो और बहनो. :)
-दिलीप बिरुटे
12 May 2020 - 5:33 pm | चौथा कोनाडा
भाईयो और बहनो... आणि अर्थातच मित्रों ... :-)
12 May 2020 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खपलो....!
-दिलीप बिरुटे
12 May 2020 - 5:16 pm | Rajesh188
लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर डोक्यावर पडला आहे .
चीन,अमेरिका इटली ह्या देशांची काय अवस्था झाली आहे हे त्याच्या बत्थड मेंदूत खुसत नाही.
अशी जर प्रतिकार शक्ती विकसित होत असती.
सर्व संशोधन बंध करून फक्त रोगाचा प्रसार केला की जग रोग मुक्त झाले असते.
त्या कुबेर ला इंजेक्शन मधून व्हायरस टोचून त्याची प्रतिकार शक्ती वाढत आहे हे बघायचे आहे.
आणि हीच माझी मागणी आहे.
15 May 2020 - 11:49 am | चौकस२१२
"संपादकाने " जरा अजून जगभर बघून मग लिहिले असते तर बरं झाले असते ..
-त्या देशातल्या करोनाबाधितांची संख्या आहे २६,३२२ आणि त्यातले ३,२२५ इतके जण प्राणास मुकले. त्या देशाची लोकसंख्या आहे जेमतेम सव्वा कोटी
म्हणजे धोरण बोंबललेच किहो .. उदाह्रणसकट दाखवतो
ऑस्ट्रेलाई ची लोकसंख्या २.७ कोटी एकूण बळी ११० च्या आसपास.. तेवहा येथील धोरण स्वीडन पेक्षा यशस्वी आणि ते कोणते तर पूर्ण नाही तरी बरेच निर्बंध , म्हातार्यांन फक्त घरी आणि "सुदृढांना " मोकळे सोडा असला मूर्खपणा येथे नाही....
- ‘‘घरी बसा, देश वाचवा’’ अशा प्रकारच्या कोणत्याही हास्यास्पद .."
हास्यास्पद? कुबेरांना मुसक्या बांधून न्यू यॉर्क मध्ये हिंडवले पाहिजे मग कळले असते
-"याचा अर्थ सरळ आहे. जितकी टाळेबंदी कठोर तितके बळींचे प्रमाणही अधिक."
अरे काय याड लागलाय का याला...
17 May 2020 - 4:40 pm | मराठी_माणूस
स्वीडनच्या प्रख्यात वैद्यकतज्ज्ञ्यांचे मत
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-johan-giesecke...
17 May 2020 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''एकाही देशाने टाळेबंदी जाहीर करण्याआधी आपण त्यातून बाहेर कसे पडू याचा क्षणभर तरी विचार केला नसेल' हे वाक्य आवडलं.
आपल्याकडे तर आता ४.० ची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात
वाढती रुग्णसंख्या काळजीचा विषय आहेच. पुढे जीवनमान सुरक्षित कसे होतील त्यासाठी भविष्यातील उपाययोजना ? यातून बाहेर कसे पड़ायचे त्यावर अजुन काहीच हालचाली दिसत नाहीत, ते आवश्यक आहे.
लिंकबद्दल आभार...!
-दिलीप बिरुटे
12 May 2020 - 6:38 pm | ऋतुराज चित्रे
हर्ड ईम्युनीटी चा प्रयोग कुबेरांनी नव्हे तर स्वीडन ने केला आहे. त्याचे रिझल्ट काय मिळतात हे लवकरच कळेल. सध्यातरी त्या देशात कोरोना बराच नियंत्रणात आला आहे .
12 May 2020 - 6:45 pm | चौथा कोनाडा
हर्ड ईम्युनीटीचा प्रयोग कुबेरांनी केला आहे असं कोण म्हणत आहे ? असे प्रयोग कुबेरांनी कधी पासून सुरु केलेत ?
12 May 2020 - 7:18 pm | सुबोध खरे
आपला मुद्दा सिद्ध करायला काहीच्या काही लिहिणे हा आता कुबेरांचा आता स्थायीभाव झाला आहे
लोकसंख्येची घनता भारतात एक १ चौरस किलो मीटर ला ला ४६४ आहे तर स्वीडन मध्ये १ चौरस किलो मीटर ला २५ आहे
आणि मुंबईचीलोकसंख्येची घनता २२ हजार ५०० आहे आणि धारावीत १ चौरस किलो मीटर ला २ लक्ष ७७ हजार.
साधा हिशेब करा
एक मीटर अंतरावर माणसे उभी करायची तर एक चौरस किमी म्हणजे ३३ x ३३ मीटर अशा हिशेबाने उभी केली तर १००० माणसे उभी राहतील.
स्वीडन मध्ये २५ च माणसे आहेत. मुंबईत २२हजार ५०० आणि धारावीत २ लाख ७० हजार.
With a population density of over 277,136/km2 (717,780/sq mi), Dharavi is one of the most densely populated areas in the world. (विकी)
अशी स्थिती असताना सामाजिक अंतर ठेवणे किती शक्य आहे याचा लोकानीच विचार करावा.
मानवी विकास निर्देशांकात स्वीडन ८ वा आहे आणि भारत १२९
स्वीडनचे दरडोई उत्पन्न ४८ हजार डॉलर्स आहे तर भारताचे ६ हजार ८०० आहे.
तुलना करण्यासाठी कोणताही देश निवडायचा आणि टीका करायची.
अर्थात त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वाना माहिती आहे.
एके काळी अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे कुबेर आता मात्र असले भंपक लेख /असली भंपक तुलना करून आपली विश्वासार्हता मात्र घालवून बसले आहेत.
12 May 2020 - 7:24 pm | Rajesh188
माधव गडकरी आणि भरत राऊत सोडले तर लोकसत्ता चे सर्व संपादक अती हुशार च होते.
नेहमी जगाच्या पुढचा विचार करायचे.
त्यांचे विचार वर्तमान काळाला. कधीच लागू होत नाहीत..
सर्व हजार वर्ष जगाच्या पुढे.
14 May 2020 - 10:23 pm | माहितगार
मी योगा योगाने गोदरेजच्या ईझी लिक्वीड डीटर्जंट बद्दलच्या वेबसाईटला भेट दिली. https://www.godrejezee.com/en त्यात इतर डिटर्जंटप्रमाणे सोडा नसल्याचे म्हटले आहे. सोड्याचा आणि वीषाणू मरण्याचा संबंध मला कल्पना नाही. viruses ani bacteria var itar regular detergent evedhech effective asel kaa ?
jankarankadun mahiti Havi
14 May 2020 - 11:49 pm | सुबोध खरे
हात धुवायच्या साबणात पण सोडा नसतो. स्वच्छतेसाठी साबण महत्त्वाचा.
सोड्याचा उपयोग पाणी मृदू करण्यासाठी आणि पाणी अल्कालाईन बनवण्यासाठी होतो.
इझी साबण कोव्हिडं साठी चालेलंच पण महाग पडेल.
साधा लाईफबॉय वापरा स्वस्त आणि मस्त
15 May 2020 - 12:14 am | मराठी कथालेखक
या होमिओपथिक डोसबद्दल काही चर्चा होवू शकेल का ? मुंबई महापालिका या औषधाचे काही ठिकाणी वितरण करणार आहे. (संदर्भ)
15 May 2020 - 11:30 am | सुबोध खरे
जिज्ञासू/जाणकारांनी जरूर करावी
कुणाच्याही कोंबड्याने का होईना पण उजाडल्याशी मतलब
मला होमिओपॅथीतील काहीही कळत नाही.
त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगण्यात असमर्थ आहे.
क्षमस्व
15 May 2020 - 1:54 pm | झम्प्या दामले
ह्या लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे. जिथे जगातल्या मोठमोठ्या वैद्यकीय संस्था पण कोरोना बद्दल काहीही मत मांडायला धजावत नव्हत्या तिथे ह्या महाशयांनी लेख लिहायची घाई करून चुकीची विधान केली आहेत. आत्ता भारतातली कोरोना परिस्थिती पाहता ह्या लेखातला फोलपणा लक्षात येईल. माझी प्रशासकांना विनंती आहे की हा लेख अप्रकशाती करावा. लेखात तोडलेले तारे खाली देत आहे.
1. आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.
2. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.
3. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
15 May 2020 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी आपल्या भूमिका बदललेल्या त्यामुळे अनेकदा त्यावरुन अनेकांनी आपली मतं बदलली किंवा बदल करावे लागले ही सर्व सुरुवातीची मतं आहेत त्यामुळे थोडं उन्नीस बीस चालायचच पण त्यांची धाग्यातील इतर माहिती उपयुक्तच आहे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
15 May 2020 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने लस विकसित केली आहे. या लसीच्या चाचण्या सध्या सुरु आहेत... एक बातमी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/experts-see-progress-as-oxford...
-दिलीप बिरुटे
17 May 2020 - 6:12 pm | चौकस२१२
आपल्या भावाला ज्या खस्ता खाव्या लागल्या त्याबद्दल सहानुभूती, आणि आपणं म्हणता कि "भारताची महाप्रचंड लोकसंख्या ह्याला कारणीभूत आहे." हे हि अगदी बरोबर.
तसेच सरकारचं धरसोड नियमावली मुले अश्या छोट्या उद्योजकाचे नुकसान होते हे हि दुर्दैवी ( रस्त्याकडेच्या बारवर बंदी आली एकदम असे धोरण बदलणे )
परंतु काही कठोर सत्य आहेत ती टाळू नाही शकत
-"धंदा करायचा तर बँका अजिबात कर्ज देत नसतात.": बँक हे वयसाय आहेत त्यांना त्यांच्या भागधारकांना तोंड द्यावयाचे असते त्यामुळे ते असे सहसासहजी कर्ज देत नाहीत आणि देणार नाही फक्त सरकार हे करू शकते पण त्याला पण मर्यादा आहेत
- सरकार नि खूप काही द्व्यावे हि अपेक्षा जर असेल तर एकदा आपल्याला हा हि विचार करावं लागेल कि सरकार पैसे आणणार कोठून ? ज्यांना आयकर भरणे जरुरीचे आहे आणि शक्य आहे ते टाळतात ..भारताला काही खनिज संपत्ती सारखी लॉटरी लागली नाहीये आणि जिथे गरीब देशात अशी लागली आहे ( इंडोनेशिया) तिथे सुद्धा ते धन गरिबांपर्यंत पोचत नाही ..
-आयटी आयला अद्मिशन मिळाले नाही ओपण मध्ये असल्याने. " ओपन नॉन ओपन हा विषय तर ना काढ्लेलाच बरा! नाही का!
- "आयटीआयला १०वी नापास झालेल्या तरुणाला सुद्धा अद्मिशन मिळायला हवे"...जरी तांत्रिक शिक्षणाचा प्रसार झालं पाहिजे हे मान्य असले तरी असा प्रवेश देणं हे काही योग्य नाही .. मग कशालाच काही धरबंध राहणार नाही ..
सरकारने आपलं पैसे हे शिक्षण स्वस्त करण्यात घालावा हे बरोअबर पण याचा अर्थ असा होत नाही कि शिक्षणाचा दर्जा घसरवावा ...मग त्या आयटीआय ल काही अर्थ उरणार नाही
- गेली २०-३० वर्षात हे मात्र म्हणता येईल कि अनेक क्षेत्रात भारतात संध्या उपलब्ध झाल्या आहेत/ अनेक उद्योग धंदे नवीन उघडले आहेत याची लांब यादी होईल त्यात इंटिरियर डिजाईन , माल साठवणी आणि वाहतूक ( सप्लाय चेन ) इत्यादी त्याआधी परिस्थती अजून अवघड होती ( पूर्वी फक्त २ गाडी निर्माते आणि २ ट्रक निर्माते होते , महाराष्ट्रात फक्त ९ ठिकाणी इंजिनीरिंग ची पदवी घेता यायची इत्यादी )
17 May 2020 - 10:27 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/desh-videsh-news/banks-technically-write-off-ov...
ह्या केसेस मधे काय झाले होते ?
18 May 2020 - 5:19 am | चौकस२१२
अगदी खाजगी बँक सुद्धा चुकीची कर्जे देतात .. तो त्यांचा जोखीम पत्करण्याची व्यसनाचा भाग असतो त्याचा फटका त्यांना असं अबसूं शकतो .. आणि त्यात जर बँक निम सरकारी असेल तर अधिकारी वर्गावर तेवढा टॅन नसतो जेवढा स्पूर्ण खाजगी बँकेवर असतो.. माझा मुद्दा हा आहे कि बँक कर्ज देतं तपासून घेतात तेवहा ते नैसर्गिक आहे त्याबद्दल टँकर कशी . तो धंदा आहे .. हा त्यात कुशीत जास्त व्याज दार किती असावा यावर सरकार नियम करू शकते किंवा आमूलाग्र बदल करायचा तर देशाचे बँकेचे कायदे बदला आणि "समाजहिताची कर्जे" खाजगी बँकांनी दवयवीत असे फर्मान काढा... मग बघा काय होते ते . परवडत असेल तर बँक देशात वयसाय करतील नाही तर बंद होतील
पण खाजगी व्यसायाकडून ( खाजगी बँक) तुम्ही कर्ज का देत नाही या प्रश्नाला काय अर्थ ..
17 May 2020 - 9:11 pm | Rajesh188
वटवाघूळ कडून corona virus Manvi शरीरात आला असे मानले जाते.
त्या पहिल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर त्यांनी स्वतःची उत्पत्ती केली म्हणजे ती त्या व्हायरस ची मानवी पेशीत निर्माण होणारी पहिली पिढी असेल ना? असं प्रतेक शरीरात प्रवेश करून जी चैन निर्माण झाली ती त्या व्हायरस ची पुढची पुढची पिढी च ना?
मग चक्रातून जाताना मूळ व्हायरस च्या रचनेत फरक पडत असेल ना.
.
उत्क्रांती वादाचा सिद्धांत प्रमाणे.
मग हळू हळू तो निष्क्रिय तरी होईल किंवा जास्त आक्रमक तरी होईल हा विचार योग्य आहे का?
26 May 2020 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा- कोरोनाची दुसरी लाट येत आहे, रुग्णांची संख्या कमी होतीये असे गृहित धरू नका https://divyamarathi.bhaskar.com/news/who-coronavirus-news-world-health-...
-दिलीप बिरुटे
9 Jun 2020 - 8:43 am | शाम भागवत
कोरोनाशी कसं लढायचं ते आता पाकिस्तान उत्तरप्रदेशचे मु.म. योगी आदित्यनाथांपासून शिकणार.
कोरोनाशी कसं नाही लढायचं ते आता पाकिस्तान महाराष्ट्राचे मु.मं. उद्धव ठाकरे यांचेपासून शिकणार.
इति सकाळ ०९/०६/२०२०
:)
https://www.esakal.com/global/yogi-adityanathna-appreciation-newspaper-p...
सकाळने बातमी काढून टाकायच्या अगोदर वाचून घ्या.
;)
9 Jun 2020 - 10:06 am | शाम भागवत
https://twitter.com/Fahdhusain/status/1269650837967691777
इथे महाराष्ट्र व पाकिस्तानचा ग्राफ पहायला मिळेल.
पाकिस्तानची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट आहे.
पण जिडीपी वगैरे बाबतीत पाकिस्तान महाराष्ट्राच्या मागे आहे.
मुंबई व कराची दोन्हींना आर्थिक राजधानी समजली जाते. त्यामुळे दोन्हीकडे झोपडपट्या आहेत. :)
आणखी बरीच माहीती चार्टमधे आहे.
17 Jun 2020 - 6:06 pm | गामा पैलवान
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. तत्संबंधी लेख शोधंत होतो. अमेरिकेवरील लेख सापडला एकदाचा (इंग्रजी दुवा) : https://www.anti-empire.com/mind-virus-19-and-the-government-killed-3500...
Enjoy!
-गा.पै.
15 Jul 2020 - 6:46 pm | माहितगार
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?
या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.
15 Jul 2020 - 6:10 pm | गामा पैलवान
लोकहो,
करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात वगैरेचा झटका येऊ शकतो. हा निष्कर्ष मुंबईच्या केईएम रुग्णालयात झालेल्या अभ्यासावरून काढला आहे. संबंधित बातम्या :
१. https://www.esakal.com/mumbai/these-type-covid-patients-has-more-risk-he...
२. https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-news-corona-patients-risk-bloo...
करोना हा फ्लू सारखा आजार आहे. फ्लू मुळेही असंच रक्त दाट बनतं. मला स्वत:ला फ्लू मुळे किमान एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) बसवण्यात आली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी ( म्हणजे २०१९ साली ) ऐन फ्ल्यूच्या मौसमात म्हणजे जानेवारीत घडला. डिसेंबर ते मार्च हा युरोपात फ्ल्यूचा मौसम मानला जातो. हेच जर या वर्षी घडलं असतं तर इथे इंग्लंडमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा असूनही करोनाच्या थोतांडापायी मी गचकलो असतो ना? मुंबईत असे अनेक रुग्ण योग्य उपचारांच्या अभावी दगावले आहेत. भारत/महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
तर सांगायचा मुद्दा असा की विकारप्रवण लोकांना करोनामुळे अतीव काळजी घ्यायची गरज आहे. धडधाकट माणसाला विलगीकरणाची अजिबात गरज नाही. करोना अंगात सापडलेल्या सरसकट सर्वांना विलगीकरण केल्याने आरोग्यसेवेवर अपरिमित ताण पडतो. त्यामुळे गंभीर रोग्यांना वेळेवर उपचार मिळंत नाहीत. ही परिस्थिती विकारप्रवण व्यक्तींसाठी प्राणघातक आहे. हा मुद्दा बऱ्याच आधी मांडलेला होता. हळूहळू त्यास स्वीकृती मिळते आहे.
ज्यांना त्रास होतो आहे केवळ अशांनाच रुग्णालयात हलवून अतिदक्ष पातळीचे उपचार केले पाहिजेत. साहजिकंच टाळेबंदी हे महाथोतांड आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2020 - 6:46 pm | माहितगार
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ?
या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.
15 Jul 2020 - 7:25 pm | सुबोध खरे
हा विषय एका प्रतिसादाचा नसून एका लेखमालेचा आहे.
त्यातून आज जी माहिती उपलब्ध आहे त्यातील २० टक्के सुद्धा तीन महिन्यांपूर्वी उपलब्ध नव्हती.
त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने असे करायला हवे होते तसे करायला हवे होते हे आता सांगणे हि पश्चातबुद्धी आहे.
महाराष्ट्रात सरकारच्या काय चुका झाल्या आणि काय करायला हवे होते हे सांगणे फार सोपे आहे. तशीच स्थिती केंद्र सरकारबद्दलही म्हणता येईल.
अर्थात त्याला राजकीय रंगही दिला जाईल. जो इतर काही धाग्यांवर स्पष्टपणे दिसतो आहे.
पण आता असे करायला हवे होते तसे करायला हवे होते हे सांगणे म्हणजे दीड शहाणपणा होईल.
यासाठी मी यावर टिप्पणी करण्यास नम्र पणे नकार देत आहे.
क्षमस्व
15 Jul 2020 - 8:12 pm | माहितगार
हा श्वसनमार्गे संसर्ग करणार्या वीषाणूंचा शेवटचा पँडेमीक असणार असल्याची खात्री आपण आत्ताच देऊ शकतो ? किंवा ही शेवटची आपत्ती व्यवस्थापन परिस्थिती आहे ? जर नसेल तर , आले वारे गेले वारे करून, शिकण्याची संधी का घालवायची की जे झाले यातून काही शिकायचे ?
15 Jul 2020 - 7:28 pm | सुबोध खरे
धडधाकट माणसाला विलगीकरणाची अजिबात गरज नाही. करोना अंगात सापडलेल्या सरसकट सर्वांना विलगीकरण केल्याने आरोग्यसेवेवर अपरिमित ताण पडतो.
हि वस्तुस्थिती नाही.
43% of Covid patients in India who died had no comorbidities: Govt analysis
while over half of the deaths are occurring among senior citizens — a group that has been repeatedly asked to stay at home even after the unlocking process began — there is a significant proportion of mortality in the 45-59 age group.
https://theprint.in/health/43-of-covid-patients-in-india-who-died-had-no...
16 Jul 2020 - 1:44 am | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
ज्याअर्थी ४३ % मृतांना पूर्वव्याधी नव्हत्या, त्याअर्थी करोनाने त्यांच्यात असे काही बदल घडवले की ते प्राणघातक ठरले.
हे बदल नेमके कोणते? तर करोनामुळे रक्त दाटून अधिक गुंतागुंत उत्पन्न होणे, हृत्कोषास (पेरीकार्डीयम) सूज येणे, मधुमेह नव्याने उत्पन्न होणे असे विविधांगी आहेत. करोनामुळे हृत्शूल होऊन मृत झालेले अनेक रोगी योग्य उपचार मिळाले असते तर वाचले असते ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे माझ्या मते सर्वांना सरसकट विलग करून ठेवण्यापेक्षा ज्यांना त्रास होतो आहे अशा आणि केवळ अशाच रुग्णांवर अतिदक्ष रीतीने उपचार व्हावेत. अशा अर्थाचा एक लेख इथे सापडला : https://milindwatve.home.blog/2020/07/13/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%... . या लेखाचा लेखक जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे.
आ.न.,
-गा.पै.
20 Jul 2020 - 12:01 am | Rajesh188
है दोन्ही संक्रमित एकाच पद्धती नी होतात.
एकाच प्रकारच्या पेशी वर हल्ला चढवतात.
श्वसन यंत्रणा ह्यांची टार्गेट असते.
लक्षण सामान असतात.
प्रोटीन्स सुद्धा सामान असतात ह्या मुळे मानवी पेशींना चिकटत .
वटवाघूळ हाच मुल स्तोत्र आहे.
ह्या दोन्ही व्हायरस मध्ये एवढी समानता आहे तर.
Covid 19 हा व्हायरस अपरिचित आहे ह्या वाक्याचा अर्थ काय?
22 Dec 2022 - 3:24 pm | चौथा कोनाडा