"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय.
कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता."
.
.
"पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???".
.
"अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!!
.
आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!!
म्हणजे ह्यांना रान मोकळं!!
.
बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!!
मी काय दिलं नसतं करून??
.
काssयबाई...मेला आचरट प्रकार!!.. शी...!"
.
.
"पण झालं तरी काय??"
.
.
.
"अगss..काल रात्रीची गोष्ट.
मी झोपेत आहे अस समजून हे हळूच गच्चीची किल्ली घेऊन सटकले.
मलाही वास आला होताच...
मी ही गेले मग वर तरातरा!!! गाऊन वरच..."
.
.
.
"मssग???"
.
.
.
"आता रंगेहाथ पकडाव म्हणून फाssट्टकन दिवा लावला गच्चीचा...
.
.
.
बघते तर काय??
.
.
.
टाकीच्या एका बाजूला, समोरचा तो मेला आगाऊ चंद्या अन् त्याची चांडाळ चौकडी दारू पीत बसलेली...
.
.
.
अन् दुसऱ्या बाजूला...
हे...हे...
.
.
ओणवे होऊन मांजरासारखे...त्या सवितानं वाळत घातलेल्या
.
.
.
.
.
.
.
.
.
ओल्या पापड्या आणि कुरडया खाण्यात मग्न.
.
.
.
लोकं हसतायत गsss आता आमच्यावर ...फिदीफिदी...!!!
प्रतिक्रिया
2 May 2020 - 6:10 pm | जव्हेरगंज
=))
मला वाटलं तिसरंच झेंगाट सापडतंय आता..!
2 May 2020 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप चे फॉरवर्ड्स इथेही मिळू लागले!?
क्रांतिच झाली म्हणायची!
2 May 2020 - 6:44 pm | बोलघेवडा
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मी आजपर्यंत मिसळपाव काय कोणत्याच स्थळावर टाकलेले नाही. जे आहे ते स्वतचे आहे.
2 May 2020 - 8:10 pm | कोंबडा
एला आत्म्य्या, आधी proof दे. उगा फुकाचे आरोप करू नकोस.
कैपण
2 May 2020 - 9:23 pm | वामन देशमुख
3 May 2020 - 2:08 pm | मन्या ऽ
:D
5 May 2020 - 10:23 pm | चौथा कोनाडा
हा .... हा ..... हा .....
पापड्या आणि कुरडया खाण्यात मग्न झाला तर !
5 May 2020 - 10:59 pm | तुषार काळभोर
आताच्या उन्हात सकाळी दहाला केलेल्या कुरडया पापड्या सूर्य मावलायच्या आत वाळत्यात. रात्री ओल्या कुरडया पापड्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर केलेल्या असणार.