लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते तिने पहिल्यांदा शतशब्दकथा स्पर्धेत भाग घेतला होता
उत्साहाने २ कथा पाठवून रोज लहान मुलासारखे संकेतस्थळ उघडून प्रतिसादांची वाट बघायला लागली पण काहीच प्रतिसाद नसल्यमुळे खट्टू व्हायची
अशातच स्पर्धेची मुदत संपली,विजेते पण घोषित झाले आपण नसणार हे माहिती होतेच
'जाऊदे पहिलाच प्रयत्न होता,स्वान्त सुखाय लिहिले होते असेच गम्मत म्हणून' हिरमुसलेल्या मनाची समजूत घालून ती विसरून गेली आणि रोजच्या रहाटगाडग्यात मग्न झाली
पंधरवड्याने मेल बॉक्स बघताना उडालीच टुणकन खुर्चीतून ----------------
"आपली संकेतस्थळावर --------------- हि शतशब्दकथा वाचली कथेतली storyline आवडली असून त्यावर
वेबसिरीज बनवायचा मानस आहे तरी आपण मला ह्या मेल वर संपर्क करा म्हणजे बोलता येईल "
----------------
आघाडीचा दिग्दर्शक
प्रसिद्ध निर्मितीसंस्था
प्रतिक्रिया
29 Apr 2020 - 4:58 pm | जव्हेरगंज
शशक वर वेबसिरीज.... 🤓
29 Apr 2020 - 6:00 pm | king_of_net
हिंदी वाले ३६५ भागाची शीरेयल पण काढतील... ;-)
29 Apr 2020 - 5:06 pm | Prajakta२१
कल्पनाशक्तीचे चौखूर उधळलेले घोडे...… day dreaming दुसरे काय
चित्रपट टाकणार होते पण अचानक वेबसिरीज च आले मनात
spacing गंडल्यामुळे इफेक्ट कमी झालाय
प्रकाशित करताना spacing एकदम कमी होऊन शेवटच्या ओळी एकदम वर आल्यात
29 Apr 2020 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर लेखन केलं की प्रतिसाद किती आले हे बघायचं नाही, त्रासाचं काम असतं ते.
बाय द वे, कोणती कथा होती. लिंक द्या प्लस वन. करुन येतो.
-दिलीप बिरुटे
29 Apr 2020 - 9:29 pm | Prajakta२१
धन्यवाद सर
पण नियमांनुसार ओळख उघड करायची नाहीये क्षमस्व
29 Apr 2020 - 11:01 pm | मायमराठी
'मिसळपाव' इति संस्थळस्य कृते श्री भगवान उवाच
" लेखने एव अधिकारस्ते मा प्रतिसादेषु कदाचन...।"
29 Apr 2020 - 11:18 pm | स्मिताके
मस्त आहे दिवास्वप्न!
30 Apr 2020 - 7:11 am | OBAMA80
आवडले विचार. माझे पण असेच होते..... माझे जे लेखन मला खूप आवडते व वाटते कीआपल्याला खूप प्रतिसाद येतील...तेंव्हा एकदम कोरडे प्रतिसाद मिळतात. उलट असेच टाईमपास म्हणून टाकलेल्या गोष्टींना भरभरून प्रतिसाद येतात. बरेच वेळा मला असा अनुभव आला आहे - काही ठिकाणाहून लेखन आवडले मित्र किंवा नातेवाईक जमणार आहेत...तुझा लेख वाचला तर चालेल का अशी विचारणा होते...पण वाचन झाल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रीया सुध्दा कळवत नाहीत...
30 Apr 2020 - 6:47 pm | Prajakta२१
https://misalpav.com/node/27397
काल असाच हा धागा बघत होते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
ओबामा ८० ह्यांच्याशी लेखन विषय आणि प्रतिसाद संख्या ह्याबद्दल सहमत
:-)