शशक-२०२०: पिंजरा

Nishantbhau's picture
Nishantbhau in जनातलं, मनातलं
27 Apr 2020 - 10:37 pm

" हे ना अमेरिकेतलं the Best झू आहे". निर्मोह ला कडेवर घेऊन श्रावण त्याला माहिती सांगत होता.
"इतक्या सुंदर आणि मोठ्या पिंजऱ्यात फक्त एकच गोरिल्ला?" निर्मोह ने कुतूहलाने विचारल.
"अरे तो इथला सगळ्यात हुशार गोरिल्ला आहे."
गोरिल्लाला जवळून बघत निर्मोह ने विचारल "पण याचे मॉम डॅड कुठे आहेत? "
"ते लांबच्या जंगलात."
"पप्पा आपण याला पिंजऱ्यातून सोडून द्यायचं, म्हणजे तो आपल्या मॉम डॅड कडे जाईल."
आपल्या मुलाकडे कौतुकाने बघून हसत श्रावण म्हणाला "अरे तो नाही जाणार. बघ इथे किती special treatment मिळते त्याला."
निर्मोह हिरमुसला आणि त्या गोरिल्ला कडे बघत म्हणाला "How Sad."
पिंजऱ्यातून आवाज आला “Just Like your Dad!”

कथालेख

प्रतिक्रिया

Nishantbhau's picture

27 Apr 2020 - 10:40 pm | Nishantbhau

मुलांची नावे अध्यात्मिक ठेवून भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांना वर्ष दोन वर्षातून एकदा भेटणाऱ्या सर्व श्रावण बाळांना समर्पित.

जव्हेरगंज's picture

27 Apr 2020 - 10:44 pm | जव्हेरगंज

ग्रेट!! आवडली!!

ज्योति अळवणी's picture

27 Apr 2020 - 11:19 pm | ज्योति अळवणी

अत्यंत समर्पक

शेखर's picture

28 Apr 2020 - 8:19 am | शेखर

+१

Nishantbhau's picture

28 Apr 2020 - 9:33 pm | Nishantbhau

माझी कथा योग्य सदरात चिकटवण्यासाठी कोणी मदत कराल का?

तुषार काळभोर's picture

28 Apr 2020 - 10:05 pm | तुषार काळभोर

स्पर्धेत प्रवेशिका देण्यासाठी साहित्य संपादकांना व्यनि पाठवणे आवश्यक होते.
आता ही शशक तुमच्या नावाने प्रकाशित झाली आहे तर तुर्तास मुख्य पानावर असूद्या...

Nitin Palkar's picture

30 Apr 2020 - 7:09 pm | Nitin Palkar

छान!