कॉलेजातील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या एका युगुलाची 'विलगीकरणाने' होणारी घालमेल मांडायचा प्रयत्न...
ती :
जीवघेणे हट्ट तुझे
वाऱ्यासंगे पळायचे
अबोल्याचे मास्क सोडून
क्वारंटाईन मोडायचे ।।
मन किती जिद्दी तुझे
सोशल डिस्टंसिंग झुगारायचे
अत्यावश्यक निमित्ताने
आमच्या हृदयात घुसायचे।।
नातं किती घट्ट तुझे
श्वासांनाही बांधायचे
आठवणींची गर्दी करून
क्वारंटाईन मोडायचे।।
किती रे निगरगट्ट तू?
कधीही आरश्यात यायचे
माझे डोळे कन्फर्मड् बघून
क्वारंटाईन मोडायचे
तो :
आयुष्य असं किती गं आपलं
त्याचे नियम किती मानायचे?
विचारांनाही क्वारंटाईन केलं
तर प्रेम कसे करायचे ?।।
मठ्ठ वाटते काळजी सारी
घाबरत घाबरत का जगायचे?
जीव झाला तुला देऊन
तरीही क्वारंटाईन पाळायचे ?
- अभिजीत
प्रतिक्रिया
8 Apr 2020 - 3:44 pm | Cuty
आवडली कविता !
8 Apr 2020 - 11:24 pm | मायमराठी
प्रतिसादाबद्दल अनेकानेक धन्यवाद