नारायण धारप यांच्या भयकथा !!!

किल्लेदार's picture
किल्लेदार in जनातलं, मनातलं
20 Jan 2015 - 11:55 am

भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.
स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती.

तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.

कथामाहिती

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

23 Aug 2018 - 8:02 pm | सस्नेह

Kindle पहिल्या महिन्यात फ्री आहे.

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने 'लुचाई / अनोळखी दिशा खंड १ / २ / ३ ' प्रकाशित केले आहेत. मर्यादित प्रती!!
लवकर आपली मागणी नोंदवा.

संपर्क - साकेत प्रकाशन - ९८८१७ ४५६०५

साबु's picture

6 Apr 2020 - 4:21 pm | साबु

धारपांच time travel वर एक पुस्तक का कथा आहे . एक बाई चुकून time travel ने स्वातंत्र पूर्व काळात जाते. तिला परत येता येत नाही पण ती चिठ्ट्या लिहून ठेवते असं काहीतरी आहे. कुणाला आठवते आहे का ?

किल्लेदार's picture

6 Apr 2020 - 4:36 pm | किल्लेदार

पळती झाडे या पुस्तकात अशी एक गोष्ट आहे.

साबु's picture

6 Apr 2020 - 5:27 pm | साबु

धन्य्वाद किल्लेदार... सध्या outlander नावाची एक सिरीज बघतोय नेटफ्लिक्स वर त्यात असेच कथानक आहे . एक बाई १९५४ मधून एकदम १७५४ मध्ये जाते स्कॉटलंड मधून ....ती परत यायचा प्रयत्न करते पण नाही जमत मग तिकडेच लग्न करते आणि तिला परत यावा लागत ..फार मस्त आहे

किल्लेदार's picture

6 Apr 2020 - 9:16 pm | किल्लेदार

अरे वा ... बघावी लागेल.

वामन देशमुख's picture

18 Aug 2023 - 4:34 pm | वामन देशमुख

मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक नारायण धारप यांचे २००८ साली आजच्या दिवशी निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली.

केदार पाटणकर's picture

6 Sep 2023 - 3:09 pm | केदार पाटणकर

धारप. साहित्यातून वगळता न येणारे नाव.

उन्मेष दिक्षीत's picture

7 Sep 2023 - 1:56 am | उन्मेष दिक्षीत

आठवले, मीत्राला उर्मीला मातोंडकरचा नैना पिक्चर बघायला घेऊन जात होतो आम्ही तर तो म्हणाला
उगीच पैसे देऊन घाबरायला जायचं काय