शशक- माकडांपासून सुटका!!

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
5 Apr 2020 - 6:56 pm

मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती.
एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली. बघते तो एक माकड पटकन पळून गेले. माझ्या मैत्रिणीही खूप घाबरल्या. एकीने सांगितले, अशीच एकदा माकडाने तिची वेणी ओढली होती. आम्ही वर्गात बसलो असताना व-हांड्यात माकडे दात विचकत सदैव फिरायची. शिक्षकही वैतागले. शेवटी घरच्यांनी तोडगा काढला!
एक दिवस गावाहून मामा, एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. घरच्यांनी त्याच्याबरोबर माझे लग्न लावून पाठवून दिले. आता दहा वर्षे झाली, आमच्या घराजवळ माकडे अजिबात फिरकत नाहीत !!

कथालेख

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

5 Apr 2020 - 8:34 pm | प्रमोद देर्देकर

कमाल आहे !
तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न माकडा बरोबर कसे काय बरं लावून दिले ?

प्रचेतस's picture

5 Apr 2020 - 9:07 pm | प्रचेतस

=))

अहो शेवटी किती झालं तरी माणूस म्हणजे सुधारीत आवृत्ती असलेलं माकडचं की.

धर्मराजमुटके's picture

5 Apr 2020 - 8:41 pm | धर्मराजमुटके

मस्त लिहिलयं ! कथा आवडली.

जव्हेरगंज's picture

5 Apr 2020 - 10:32 pm | जव्हेरगंज

जबरदस्त!!

कथा मस्त जमलीये... !!

मदनबाण's picture

5 Apr 2020 - 10:46 pm | मदनबाण

एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला.
गोरिला ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye

नावातकायआहे's picture

6 Apr 2020 - 12:38 pm | नावातकायआहे

गोरिला!!! :=))

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार !
अहो कथेमध्ये ही सर्व बिनशेपटीची आणि पोरींना त्रास देणारी टगी माकडं आहेत !

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2020 - 3:49 pm | मराठी कथालेखक

अहो कथेमध्ये ही सर्व बिनशेपटीची आणि पोरींना त्रास देणारी टगी माकडं आहेत

हो का ?
मगा या पोरीने एका माकडाशी लग्न केले की..
म्हणजे ही एका माकड आणि माकडिणीच्या लग्नाची गोष्ट आहे तर..
असो.

काय आहे, जेव्हा मुलगी मोठी होते, काॅलेजला जाते तेव्हा तिच्यामागे अशा माकडांचा त्रास लागतो. घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो. त्या माकडाबरोबर एकदा मुलीचे लग्न लागले कि, ईतर माकडांपासून आपोआप सुटका होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2020 - 5:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुलगी मोठी झाली की माकडे मागे लागतात आणि त्यापासुन सुटका मिळवायला तिचे लग्न केले जाते? म्हणजे कायद्याचा धाक वगैरे नाहीच म्हणायचा?

विनोदी कथा आहे. वाचकांनी कृपया विनोदबुध्दीनेच वाचावी.

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2020 - 5:19 pm | मराठी कथालेखक

माकडाशी लग्न करते म्हणजे ती मुलगी पण माकडिणच.. आणि हे माकडाला आणणारे "मामा" म्हणजे पण पुर्वाश्रमीचे माकडच ..

सतिश गावडे's picture

7 Apr 2020 - 7:03 pm | सतिश गावडे

घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो

हे बहुतांश वेळा तेव्हाच होते जेव्हा माकडीणीचाही त्या माकडचाळ्यांमध्ये सहभाग असतो.

माकडीणीचा सहभाग नसेल तर माकडीणीच्या कुटुंबाकडून कायदेशीर कारवाईचा वापर केला जातो. आणि माकडीणीचे कुटुंब प्रभावी नसेल तर कायदेशीर कारवाई करण्यास यंत्रणा टाळाटाळ करते आणि मग एखादी दुर्दैवी घटना घडते.

घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो
खरं तर मला हे वाक्य नीट समजलेले नाही ! म्हणजे...
१] परगावातील माकडा ने त्याच्या गावात त्याने केलेले चाळे इकडच्या माकडीणीच्या घरच्यांना ठावुक नसतात ?
२] परगावतील माकडाला इकडच्या गावाकडील माकडांचे [ इथे माकडीण इकडच्या माकडांना फक्त वाकुल्याच दाखवते असे गृहित धरले आहे. ] प्रताप माहित नसल्याने त्याची निवड केली ?
३] परगावाच्या माकडाची शुद्ध फसवणुक झालेली आहे ? [ इथे माकडीण देखील इकडच्या माकड चाळ्यांत सहभागी आहे असे गृहित धरले आहे. ]
४] परगावाच्या माकडाने देखील चाळे केलेत हे कशावरुन समजुन येते ? [ हे पहिल्या प्रश्नाशीच निगडीत आहे. ]

वरील सर्व प्रश्नां पेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न :- माकडीणीला माकडीण म्हंटलेले चालते / सहन होते का ? :)))

जाता जाता :- सध्या गोरिला काय करतो ? नाही लॉक डाउन आहे म्हणुन विचारले ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir

भीमराव's picture

6 Apr 2020 - 10:49 am | भीमराव

छान

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Apr 2020 - 9:38 am | बिपीन सुरेश सांगळे

मस्त कथा
मस्त रूपक
मस्त विनोदी

सर्व वाचकांचे पुन्हा आभार!

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 3:46 pm | चलत मुसाफिर

माकडांचे टोळी
माकड दबंग
माकडची गुंड
माकडांचे

वगैरे (टाळचिपळ्यांसह) गाण्याचा मोह होत आहे.

गामा पैलवान's picture

7 Apr 2020 - 7:38 pm | गामा पैलवान

क्युटी,

तुमची मर्कटकथा आवडली. लायसन नामे एक मर्कटप्रतिसारक कृष्णमणिमाला बाजारी मिळते. वापरून पाहायला हवी होती. कथेची खुमारी वाढली असती (वै.म.).

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद चलत मुसाफिर,
धन्यवाद गामा पैलवान. शेवटी मुलीच्या घरच्यांनीही तिच्या गळ्यात मंगळसूत्रच (लायसन नामे कृष्णमणिमाला)घातले आहे.

गामा पैलवान's picture

9 Apr 2020 - 7:20 pm | गामा पैलवान

ते तर आहेच. नाईलाजको क्या इलाज ....!
मी म्हणंत होतो की नुसतंच लायसन लटकावायचं. माकड गळ्यात बांधून न घेता. वाटल्यास एक दीर्घव्यासी रक्तबिम्बिकासुद्धा भालप्रदेशी चिकटवून द्यायची.
-गा.पै.

खेडूत's picture

9 Apr 2020 - 10:11 pm | खेडूत

कथा म्हणून आवडली...

फक्त शशक का नाव दिलं कळलं नाही :)
पूर्वी शंभरच शब्द असत..हल्ली एकूण सगळंच वाढलं आहे!

- खेड्यातील माकड

dhananjay.khadilkar's picture

14 Apr 2020 - 6:54 pm | dhananjay.khadilkar

उत्तम कथा

जेम्स वांड's picture

15 Apr 2020 - 8:56 am | जेम्स वांड

माकड माकडीण माकड माकडीण कशात काय टोटल लागेना, हे लिहायच्या अगोदर जव्हेगंज ह्यांची 'माकडीचा माळ' वाचली असती तर बरे झाले असते.