शेंगोळी

बबु's picture
बबु in जनातलं, मनातलं
2 Apr 2020 - 3:33 pm

लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.
प्रत्येकाचे लहानपण म्हणजे संस्कारांची एक वाकळ किंवा गोधडी असते. सामाजिक स्तर किंवा संस्कृती या अनुसार जिभेवरही काही संस्कार होतात. आमचे एक मित्र गमतीने म्हणायचे, "आपण सारे खलगोटे ". त्यांचा संकेत अर्थात कोंबडीचे अथवा मटणाच्या कालवणाकडे असायचा.
तर व्हाट्स अप वर कार्यरत असणाऱ्या गृहिणींना एक नम्र विनंती. फर्माईश येण्या अगोदरच शेंगोळीचा बेत होईन जाऊंद्या. काय?

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

मोदक's picture

2 Apr 2020 - 3:38 pm | मोदक

पाकृ टाका की..

शेंगोळी म्हणजे व्हेज रस्सा उकळत असतना त्यामध्ये डाळीच्य पिठाच्या लांबट रिंग / कडबोळ्या सोडून त्या शिजवून घेणे इतकेच माहिती आहे.

सस्नेह's picture

2 Apr 2020 - 4:17 pm | सस्नेह

हे मितानचे उकडशेंगोळे
उकडशेंगोळे