सोशल डिस्टंन्सिंग
एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता. मराठी विज्ञान परिषदेत एक व्याखान होते. त्याचा विषय होता शरीरातील जीवजंतू व आपण- डॊ. अपुर्वा बर्वे यांचे व्याखान होते. त्यांनी तो किस्सा सांगितला होता. त्या परदेशात गेल्या होत्या.एका एअर पोर्टवर त्या लाईनीत एका माणसाच्या मागे उभ्या होत्या. समोरचा मनुष्य फार अवस्थ वाटत होता. म्याडमला काही कारण कळेना. शेवटी त्या माणसाने नम्रपणे सांगितले madam you are consuming my space.मग त्यांच्या लक्षात आले कि त्या भारतीय सवयीनुसार कमीत कमी अंतर ठेवुन त्या माणसाच्या मागे उभ्या होत्या.सुरक्षित अंतर हे केवळ सुरक्षिततेसाठी नसत तर ते मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील असत. करोना निमित्त असलेल्या सोशल डिस्टन्सिंग निमित्त आठवल एवढच. त्याला लगेच मी सामाजिक दुरावा असे म्हणणार नाही.
प्रतिक्रिया
31 Mar 2020 - 12:21 pm | Nitin Palkar
अर्थाअर्थी संबंध नाही तरी देखील अपूर्वाई मधील पु.लं चे वाक्य आठवले, ' दोन ब्रिटीश माणसे जेव्हा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात तेव्हा रंग सुरु होते'.
31 Mar 2020 - 1:36 pm | प्रकाश घाटपांडे
अर्थ लागत नाही
31 Mar 2020 - 1:51 pm | मोदक
अहो त्यांना रांग म्हणायचे आहे.
अवांतर - वरील वाक्य "महार / महाड" टोन मध्ये वाचले तरी चालेल. ;)
31 Mar 2020 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे
आता सुधरलं! आदुगर वाटल यांचे रंगढंग चालू व्हतात काय!
31 Mar 2020 - 2:10 pm | चित्रगुप्त
ओ पी नय्यर सिनेमा बघायला जात तेंव्हा तीन तिकिटे काढत, त्यापैकी मधल्या खुर्चीवर स्वतः बसून बाजूच्या दोन्ही खुर्चांवर हॅट, कोट वगैरे ठेवीत, असे वाचण्यात आले आहे. कदाचीत चौरा यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
31 Mar 2020 - 2:29 pm | संजय क्षीरसागर
ओपींनी स्वतःचं म्युझिक असलेला एकही चित्रपट बघितला नाही. कदाचित त्यांनी मनात केलेलं गाण्याचं चित्रिकरण आणि पडद्यावरचं गाणं यात बरंच डिस्टन्स असणार !
3 Apr 2020 - 11:53 am | चौथा कोनाडा
नख वाढवू फेम, गिनिज बुक रेकॉर्डवाले श्रीधर चिल्लाळ यांच्या बद्दल देखील असाच किस्सा वाचण्यात आला होता.
ते सिनेमा रिलिजच्या पहिल्या दिवशी म्हण्जे शुक्रवारी रात्री ९ चा खेळ हमखास बघायचे, नेहमी दोन तिकिटं काढायचे, एक बसायला एक त्याच्या समोरची सिट तंगड्या पसरायला.