शशक-करिअरभृण हत्या

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
28 Jan 2020 - 1:50 pm

बारावीचा निकाल! 64 टक्के. खोलीत ती मलूल होऊन पडली होती.
बाहेर आईच्या डोळ्यांत पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं. हुशार आहे, ईंजिनिअरींग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही. खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही. सगळं जागेवर. तुम्हीच सांगा.'
'नशीबंच फुटकं!', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अॅडमिशन मिळेल.',एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनिअरींग!!', वडिल उद्विग्न.
सर्वजण पांगले.

'जन्मतःच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती. आता हिलाच बीसीएसला घालून वर होस्टेलचा खर्च!
तरी वर्षभर मारली, कोंडली, कुणाशी बोलू दिलं नाही.'
' मी पण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होतो.'
ती सावकाश उठून बसली. 'सुटले! जीव वाचला, खड्ड्यात गेलं ईंजिनिअरींग!'

समाजलेख

प्रतिक्रिया

गवि's picture

28 Jan 2020 - 2:19 pm | गवि

अस्वस्थ करणारी शशक.

फक्त एकच उल्लेख अतार्किक वाटला

'जन्मतःच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती. आता हिलाच बीसीएसला घालून वर होस्टेलचा खर्च!

मुलीने कडक अभ्यास करुन इंजिनिअरिंग करावं म्हणून इतके टोकाला जाऊन लक्ष केंद्रित करणारे पालक मुलगी म्हणून जन्मतः नख लावण्याचा विचार मनात येणाऱ्या प्रकारातले वाटत नाहीत. शिवाय खर्च इंजिनिअरिंग केल्यासही आलाच असता. मुलगी असल्याने तो "वसूल"ही झाला नसता.

पालक वाईट आहेत, पण दोन विपरीत दिशांच्या वाईट गुणांची सरमिसळ भासली.

बाकी कमी शब्दांत परिणामकारक वर्णन.

राजाभाउ's picture

28 Jan 2020 - 2:41 pm | राजाभाउ

आई वडील लोकांसमोर खोट बोलत आहेत, खर तर त्यांना मुलीचे शिक्षण बंद करायचे आहे, पण मुलगी पास झाली त्या मुळे ते आता करता येणार नाहीये म्हणुन ते वैतागलेत, तर उलट मुलगी चला इंजिनिअरिंग नाही तर नाही निदान शिक्षण तर सुरु राहील म्हणुन खुश आहे.

शशक च्या शब्द मर्यादे मुळे लिंक लागत नाहीये. पण मला कळलेला अर्थ असा

गवि's picture

28 Jan 2020 - 2:42 pm | गवि

खरंच की

पुन्हा वाचलं. तुम्ही म्हणता तसाही अर्थ दिसतोय त्यात. मान्य.

मी खालील वाक्यांवरून अर्थ लावला:

तरी वर्षभर मारली, कोंडली, कुणाशी बोलू दिलं नाही.'
' मी पण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होतो.'

प्रशांत's picture

28 Jan 2020 - 3:30 pm | प्रशांत

श श क आवडली

गवि,राजाभाऊ,प्रशांत धन्यवाद.
राजाभाऊ बरोबर अर्थ सांगितलात. शशकच्या शब्दमर्यादेमुळे कदाचित लिंक लागत नसावी. मात्र आईवडिलांच्या बोलण्यावागण्यातील विरोधाभास दाखवण्यासाठी परिच्छेद पाडले आहेत.

चौथा कोनाडा's picture

28 Jan 2020 - 5:32 pm | चौथा कोनाडा

दुर्दवी वास्तव.

दिवसेंदिवस :
मुलं सांभाळण्ं जड होत चाललंय,
शिक्षण महाग होत चाललंय,
जगणं अवघड होत चाललंय.
इंजिनीयरींग आणि चांगल्यापैकी कमाई या स्वप्नातून एक एक जण धाडधाड जमिनीवर कोसळतायत !

शशक आवडली.

Cuty's picture

29 Jan 2020 - 3:30 pm | Cuty

धन्यवाद, चौथा कोनाडा. खरे तर शिक्षण असो की जगणे, ते जेव्हा महाग होते तेव्हा पहिली झळ पोहोचते ती मुलींनाच!