काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती. रिचाने स्काय ब्लू कलरचा शर्ट व नेव्ही ब्लु कलरचा मिनी स्कर्ट घातला होता. तिचे गोरे पाय अगदी उठून दिसत होते. लांब सडक केस गालावर रूळत होते. तिने केलेला लाईट मेकअप तिचा चेहरा आणखिनच खुलवत होता. चेहऱ्यावर व एकूणच वागणुकीतील आब तिच्या खानदानीपणा व श्रीमंतीची ग्वाही देत होता. कायाला रिचाचा मनोमन हेवा वाटला.
रिचाच्या बोलण्याने काया भानावर आली व उसनेच हासली.
रिचा,“ can I sit?”
काया,“ प्लीज बस ना?” काया बोलली
रिचा, “मी रिचा सरनाईक शिवीनची.....” ती पुढे बोलणार तर मध्येच तिचे बोलणे तोडत काया म्हणाली.
काया,“ फीआन्से”
रिचा ,“ sorry but मी इथे माझं व शिवीनचे पर्सनल नाते सांगायला नाही आले. मी त्याची फीआन्से होण्याच्या अगोदर त्याची बिजनेस पार्टनर आहे तर इथे मी डिल व कँट्राक्ट विषयी बोलायला आले” रिचा म्हणाली.
कायाला तिची चूक लक्षात आली व ती चाचरत रिचाला बोलली.
काया,“ हो मला माहित आहे मी सहज बोलून गेले.”
रिचा, “ its ok , तर मुद्द्यावर येते. तुम्ही घातलेल्या कँट्राक्ट मधील अटी शिवीनला मान्य नाहीत तशा त्या मला ही मान्य नाहीत. तुम्ही त्यातल्या काही अटी मागे घेतल्या तर बरं होईल कारण आमच्या फॅशन हाऊसला या प्रोजेक्टची नितांत गरज आहे. रिचा शांतपणे बोलत होती.
काया,“ मला वाटतंय त्या अटी योग्य आहेत पण...” काया पुढे काही बोलणार तोच रिचा उठली व म्हणाली.
रिचा, “ ठीक आहे. हे डिल आपल्या मध्ये होणं शक्य नाही. मी शेवटचा प्रयत्न म्हणून आले होते.” अस म्हणून रिचा निघाली.
कायाने कँट्राक्ट मधील काही अटी मागे घ्यायच्या असे ठरवले होते पण तिला वाटले रिचा तिच्या अटी मान्य करायला आली असेल पण तिने जास्तच ताणले हे तिच्या लक्षात आले होते व शिवीनला ती इतक्या सहजा-सहजी सोडू शकत नव्हती. रिचा आज ऑफिस मधून गेली तर शिवीन तिच्या हाती लागणार नाही आणि हे तिला परवडणार नव्हते. म्हणून कायाने रिचाला थांबवले व बोलू लागली.
काया,“ प्लीज सीट , तुम्हाला जशी या प्रोजेक्टची गरज आहे तशीच आम्हाला ही आहे सो मी काही अटी बदलायला तयार आहे तुम्ही तुमच्या बिजनेस पार्टनरला बोलावून घ्या मी Mr मानेना बोलावते आजच डिल फाईनल करू.” काया असे बोलली व तिने सुधीरला इंटरकॉम वरून कॅबिनमध्ये बोलावून घेतले. रिचा कायाच्या कॅबिन बाहेर आली व तिने शिवीनला फोन करून सगळे सांगीतले. शिवीन कायाच्या ऑफिस मध्ये यायला तयार झाला. तो व Mr माने एकदमच काया फॅशन हाऊस मध्ये पोहचले. मिटिंग सुरू झाली.कायाने सुधीरला कँट्राक्ट वाचायला सांगीतले.
सुधीर,“ कँट्राक्ट मधील अटी खलील प्रमाणे होत्या व त्यात हा बदल केला जाईल.
१ कोणते ही डिजाईन काया फॅशन हाऊस ने अप्रु केल्या शिवाय वर जाणार नाही पण काया फॅशन हाऊस k.t फॅशन हाऊसला न विचारता कोणतेही डिजाईन वर पाठवू शकेल ही अट रद्द करून दोहोंच्या संमतीने डिजाईन फाईनल केले जातील.
२ जर kt फॅशन हाऊसने मध्येच प्रोजेक्ट सोडले तर 15cr त्यांना दंड द्यावा लागेल ही अट बदलली जाणार नाही कारण काया फॅशन हाऊस कडे प्रोजेक्टमध्ये लावायला तितका फाईनान्स उपलब्ध नसल्याने हे प्रोजेक्ट काया फॅशन हाऊस पार्टनरशिप मध्ये करत आहे जर मध्येच तुम्ही प्रोजेक्ट करायला नकार दिला तर अचानक आमचे फॅशन हाऊस फाईनान्स कुठून आणेल म्हणून ही अट.
३ हे प्रोजेक्ट पूर्ण होई पर्यंत Kt फॅशन हाऊस कोणते ही मोठे प्रोजेक्ट घेऊ शकणार नाही पण छोटी- मोठी कामे घेऊ शकेल ही अट क्षिथील केली आहे.
4 kt फॅशन हाऊसचे फिफ्टी परसेंट पार्टनर या प्रोजेक्टमध्ये सामील होऊ शकतील.
तर Mr शिवीन यांनी आक्षेप घेतलेल्या अटी आम्ही बदलल्या आहेत.”असे म्हणून सुधीर बसला व शिवीन बोलण्यासाठी उठला.
शिवीन, “ ठीक आहे मला या अटी मान्य आहेत. रिचा तुझं काय मत आहे?” असं तो रिचाकडे पाहत म्हणाला. काया मात्र शिवीन कडेच पाहत होती तो आल्या पासून खरं तर शिवीनच लक्ष ही नव्हतं तिच्या कडे पण सुधीरच्या नजरेतून हे सुटलं नाही.
रिचा,“ I am also agree.” असं ती शिवीनचा हात धरत म्हणाली. ते पाहून मात्र कायाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिचे डोळे रागाने लाल होत होते.सुधीरने ते टिपले व तो शिवीनला म्हणाला.
सुधीर,“मग कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे ना आज म्हणजे उद्या पासून कामाला लागायला बरे!”
शिवीन ,“हो लीगल फॉर्म्यालिटी पूर्ण करू आज.”रिचाच्या हातातून त्याचा हात सोडवुन घेत बोलला.
Mr माने ,“ मग आज सगळ्या फॉर्म्यालिटी पूर्ण झाल्या की माझी ड्युटी संपली.”
कायाच्या सांगण्यावरून सुधीरने पेपर तयार ठेवले होते.तो पेपर घेऊन आला. काया , शिवीन व Mr मानेनी पेपर साईन केले व डिल फाईनल झाली.
ही डिल म्हणजे सुरवात होती शिवीन व रिचाच्या आयुष्यात येणार्या काया नावाच्या वादळाची.
क्रमशः
●●●●
प्रतिक्रिया
22 Jan 2020 - 9:03 pm | शब्दांगी
https://shabdagan.blogspot.com/2020/01/blog-post_14.html
23 Jan 2020 - 8:53 am | श्रीरंग_जोशी
रोचक वाटत आहे कथामालिका. वातावरणनिर्मिती उत्तम झाली आहे.
पुभाप्र.
23 Jan 2020 - 2:53 pm | शब्दांगी
धन्यवाद
23 Jan 2020 - 10:33 am | श्वेता२४
पु.भा.प्र.
23 Jan 2020 - 2:53 pm | शब्दांगी
धन्यवाद पु. भा .लवकरच