सनकी भाग ४

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
12 Jan 2020 - 4:21 pm

वेस्टर्न फॅशन हाऊसची एक टीम मिटिंगसाठी आली होती.मिटिंग कॉफर्न्स हॉल मध्ये सुरू झाली. मिस्टर विल्सन स्मिथ हे टीम लीडर होते व त्याच्या बरोबर आणखीन दोन जण होते. त्यातला एक महाराष्ट्रीयन होता. कायाने त्यांना बसायला सांगीतले व ती म्हणाली

काया, “ good afternoon all of you and welcome Mr smith ,what is the project? give us some information about that.” ती अस बोलून खाली बसली. मिस्टर स्मिथ आता उठले व बोलू लागले.

मिस्टर स्मिथ,“ good afternoon , we have to launch our brand in India. And your fashion house is best for that. Mr mane explain it well in marathi. Mr mane please go ahead.”

मिस्टर माने, “ thank you sir, तर सर म्हणाले तस वेस्टर्न फॅशन हाऊस भारतात इंडोवेस्टर्न ब्रँड लॉन्च करणार आहे. त्यासाठी काया फॅशन हाऊस बेस्ट आहे. अस आमच्या कंपनीला वाटत. तर हे एक वर्षाचा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही या एक वर्षाच्या कालावधीत इंडोवेस्टर्न कपडे डिझाइन करायचे व ते अप्रुअलसाठी आमच्याकडे पाठवायचे मग त्याचे प्रोडक्शन सुरू करायचे, लहान मुले, लेडीज आणि जेड्स असे सर्व प्रकार आणि प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर एक फॅशन शो ऑर्गनाईझ करायचा व ब्रँड लॉन्च करायचा. त्यासाठी आम्ही फिफ्टी परसेन्ट फाईनान्स पुरणार व तुम्हाला तूर्त तरी फिफ्टी परसेन्ट फाईनान्स या प्रोजेक्टला द्यावा लागेल प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पूर्ण पैसे नफ्या सहित मिळतील. तसे लीगल कॉन्ट्रॅक्ट केले जाईल. It’s a partnership project. हा 100 करोडचा प्रोजेक्ट आहे.

काया,“ ok but we haven’t 50cr for this project. I think; we have to merge this project with another fashion house and k.t. fashion house is perfect for this project. what do you think about that?

कायाने तिचा डाव टाकला होता.आणि दान तिच्याच बाजूने पडणार याचा तिला विश्वास होता. Mr स्मिथने थोडा विचार केला व ते k.t. fashion house ला या प्रोजेक्ट मध्ये सामील करायला तयार झाले. पण कायाने एक अट घातली की k.t फॅशन हाऊस बरोबर लीगल कॉन्ट्रॅक्ट तिच्या मना प्रमाणे करायचे म्हणजे k.t फॅशन हाऊस तिच्या अंडर काम करणार.ही अट ही Mr स्मिथने मान्य केली. पण डिल फायनल करण्यासाठी k.t फॅशन हाऊसशी संपर्क करणे आवश्यक होते. काया या प्रोजेक्टसाठी 35cr लावणार होती व राहिलेले k.t फॅशन हाऊस लावणे अपेक्षित होते.Mr स्मिथने k.t फॅशन हाऊसशी संपर्क करण्याची जबाबदारी मानेवर सोपवली अस ही k .t फॅशन हाऊस या प्रोजेक्टसाठी नाही म्हणण्याची शक्यता नव्हती कारण ते हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. Mr मानेनी शिवीनशी संपर्क साधला व त्याला प्रोजेक्ट विषयी सविस्तर माहिती दिली व काया फॅशन हाऊसच्या ओनरला भेटा असे सांगितले.

शिवीन खुष झाला कारण हे प्रोजेक्ट त्याच्या आर्थिक विवंचना दूर करणार होते व फाईनान्स ही कमी लागणार होता पण त्यातून मिळणारा नफा भरपूर होता.तो दुसर्‍या दिवशी कायाला भेटायला तयार झाला.

शिवीन शार्प अकरा वाजता काया फॅशन हाऊसमध्ये गेला. कायाने त्याला त्याच वेळेला बोलावले होते. पण त्याला रिसेप्शननिस्ट म्हणाली की मॅम अजून आल्या नाहीत तर तुम्ही थोडा वेळ बसा . शिवीन जरा खट्टू झाला पण काया येईन म्हणून तो वेटिंग एरिआमध्ये वाट पाहत बसला. पण एक वाजला तरी काया आली नाही म्हणून तो चिडून रिसेप्शन जवळ जाऊन बोलू लागला.

शिवीन, “मला अकरा वाजता मिटींगसाठी बोलवले होते ना तुमच्या मॅमनी आता एक वाजून गेला तरी त्या आल्या नाहीत अजून what the hell is this?

सुधीर लांब उभारून शिवीनची मज्जा पाहत होता. त्याला काही माहीतच नाही अशा आवेशात तो रिसेप्शन जवळ आला व शिवीनला पाहून न पाहिल्यासारखे करून रिसेप्शनिस्टला बोलू लागला.

सुधीर ,“ शीला आज काया मॅमच काय स्केडूल आहे? तू अस कर आज असणाऱ्या सगळ्या मिटिंग कॅन्सल ; अस सगळ्या लोकांना फोन करून कळवं. काया मॅम आज ऑफिसला येणार नाहीत.” असं म्हणून तो निघणार तोवर शिवीन त्याला चिडून बोलला.

शिवीन,“ काय? आज काया ऑफिसला येणार नाही मग मला इथे कशाला बोलावलं आहे. अकरा वाजताची मिटिंग आता दीड वाजून गेले. मी वाट पहात आहे किती वेळ झालं आणि हे तुम्ही आत्ता सांगताय. माझा इतका वेळ वाया गेल्यानंतर! What the hell is this? ” तो रागाने लालबुंद झाला होता. हे सगळं काया तिच्या कॅबिनमध्ये बसून तिच्या लॅपटॉपवर पाहत होती.

सुधीर ,“ mind your language! By the way who are you? अस सुधीरने विचारताच शिवीनच्या रागाचा पारा अजून चढला.

शिवीन,“ who I am? I am shivin thakur from k.t. fashtion house ज्याला तुम्हीच मिटिंगसाठी बोलावलं होतो. ” तो हे सगळं रागानेच बोलत होता.डोळे व चेहरा रागाने लालबुंद झालेला.

सुधीर,“ sorry sorry मी तुम्हाला ओळखलं नाही Mr ठाकूर पण मी काही करू शकत नाही कारण मॅम आज ऑफिस मध्ये आल्याचं नाहीत, तुम्ही उद्या या प्लीज .” अस सुधीर सारवा- सारवीच्या सुरत म्हणाला.

शिवीन खरं तर खूप चिडला होता पण चिडून काही उपयोग नव्हता.म्हणून तो रागानेच आल्या पावली परत गेला. इकडे केबिनमध्ये काया हे सगळं पाहून हसत होती.

ये तो आगाज था बस,

अंजाम तो अभी बाकी था।

क्रमशः

कथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Jan 2020 - 12:08 pm | प्रचेतस

छान लिहिताय

शब्दांगी's picture

13 Jan 2020 - 12:18 pm | शब्दांगी

धन्यवाद