"माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी "

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
29 Dec 2019 - 10:05 pm

फुकटची प्रसिद्धी हि कुणाला आवडणार नाही . दूरदर्शनवर दिसणारे कलाकार यांचा मला उगीचच हेवा वाटतो . अर्थात आमच्या लहान पणी टीव्ही हा प्रकार नव्हता ,रेडीओ असायचा. रेडिओची विविध भारती,मराठी गितां साठी आपली आवड ,या सारखे कार्यक्रम ऐकला मला लहानपणी खूप आवडायचे .त्यात विविध भारती व आपली आवड या कार्यक्रमात गाण्याची पसंती कळणाऱ्या श्रोत्यांची नावे सांगण्याची एक विशेष आशी पद्धत होती आणि ती सगळ्यांना आवडायची देखील .झुमरी तलयासे कन्हय्यालाल ,नांदेड से बबिता चव्हाण और उनके मातापिता ,राहोली उन्नत से मुरली अगवरवाल और उनके दोस्त परिवार, हि नावे भारतात गाण्याची फरमाईश करणाऱ्या श्रोत्यांची म्हणून प्रसिध्दीला आली .
मलाही या बोलक्या डब्यातून आपलेही नाव कोणीतरी घ्यावे असे सदोदित वाटायचे . रेडिओ मधूनआपले नाव येण्यासाठी काय करावे बरे, ह्या वर मी सारखा विचार करीत असे ,बर मीकोणी कलाकार किंव्हा स्कॉलरशिप मिळवणाऱ्या पैकी हुशार विद्यार्थी पण नव्हतो. जेम तेम कटावर पास किव्हा पुढे ढकलला ,पालकांनी वर्ग शिक्षकांना भेटावे असा माझ्या प्रगती पत्रकवर कायम शेरा ठरलेला असायचा.
माझी हि कल्पना मी माझ्या बाल मित्रा जवळ एकदा बोलून दाखवली ,त्यावर तो म्हणाला " हात्तीच्या ,एवढच होय ! एक काम कर ,एक दहा पैशाचे पोस्टकार्ड आण आणि तुला आवडणारे एखादे गाणे त्यावर लिही व त्यांच्या पत्यावर पाठव ,तुझे नाव झकत त्यांना रेडिओ वर सांगावेच लागणार ""हा !मित्रा मी याचा कधी विचार देखील केला नव्हता" . मित्राच्या सांगण्या नुसार मी हे पोस्टकार्ड उपलब्ध केले . त्यात आणखीन एक शक्कल लढवलीय ,माझ्या आवडीचे ते गाणे असो कि नसो ,माझे नाव आकाशवाणी मधून आले पाहिजे म्हणून त्या वेळी अतिशय प्रसिद्ध असणारे सोंगाड्या या दादा कोंडके यांच्या चित्रपटातील "माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी " हे गाणे पसंतीस कळवले " कोल्हापूर शिवाजी पेठेतून संजय " असे मुद्दाम लिहले . (आम्हा कोल्हापूरकरांचे शिवाजीपेठ हे एक सिक्रेट आहे )
आमच्या काळातील आकाशवाणी केंद्रवाले देखील खूपच चेंगट होते . आठवड्यातून मराठी गाणी फक्त दोनच वेळेस म्हणजे सोमवार व गुरुवार, ती पण एक तास व रात्री नऊ वाजता सादर करीत असत . हि मंडळी इतकी का अरसिक होती ,कुणास ठाऊक! .इतर वेळी मात्र सारखे एकदा हिंदीतून तर एकदा इंग्रजीतून बातम्या, टू डे इन पार्लमेंट नाहीतर शास्त्रीय संगीत ,द्रुतताल बोल -------- ,अंतराचे बोल------ ,एकाच गाण्याचे हे दोन कसले बोल ,जे आम्हाला कधीच कळले नाहीत . एकदा का मराठी माणसाने हिंदीतून बातम्या ऐकल्यावर त्याला इंग्रजी मधुन बातम्या ऐकण्याची काय गरज .
सोमवारी माझे नाव आकाशवाणीवर येणार या कल्पनेने मी हरपून गेलो होतो .माझ्या सर्व वर्ग मित्रांना मी आठ वाजल्या पासून बोलवून घेतले होते . यदाकदाचित लाईट गेला तर सेल वरील ट्रान्झिस्टर शेजाऱ्यास त्याच्या सह यावे असे निमंत्रण दिले होते . शेवटी आपली आवड चालू झाली . आज माझे नाव रेडिओ वर यायलाच हवे ,असा शेअर बाजारवाल्याच्या प्रमाणे मला हि खात्री होती . पहिले गाणे झाले ,दुसरे गाणे झाले . कारण नसताना नावडती गाणी मला ऐकून घेणे क्रमप्राप्त होते आणि शेवटी आता ऐका "दादा कोंडके यांच्या चित्रपटातील "(मित्रांनी एकच गलका केला पण मी त्यांना शांत केले) असंख्य श्रोत्यांच्या आवडीचे गीत" माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी, श्रोत्यांची संख्या अधिक असल्या मुळे सर्वांची नावे ह्या खेपेस घेणे कठीण आहे म्हणून क्षमस्व ,तर शेवटी ऐकुया माळ्याच्या ----------------.
मळ्यात जमलेले पक्षी भुर्रकन कधीच उडून गेले ,मी मात्र एकटाच राहिलो

विनोदलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

30 Dec 2019 - 7:38 am | जॉनविक्क

पण इथे मात्र प्रतिसाद भरपूर येणार बरं का.

शा वि कु's picture

30 Dec 2019 - 8:08 pm | शा वि कु

मी पण कुठल्यातरी कार्यक्रमात जिथं दाम्पत्याच्या मागण्या ऐकवत तिथं माझी शाळेतली आवडती मुलगी आणि माझं नाव पाठवलेलं. मी मिलेनियल असल्यामुळे कुठल्याही वर्गमित्राने हे ऐकण्याची सुतराम शक्यता नव्हती. शेवटी माझं (आमच?) गाणं निवडलं. आईशप्पथ, नाव ऐकताना जे अंगावर शहारे आले :o

दामपत्याच्या मागण्य म्हणजे तुम्ही नेमक काय मागित होते.मग पुढे काय झाले.

शा वि कु's picture

30 Dec 2019 - 10:32 pm | शा वि कु

जोडपी गाण्यांच्या मागण्या करत sms पाठवून.मी पण आशिकी 2 मधलं कुठलतरी मेलोड्रामॅटिक वाजवायला सांगितलं जे शाळेत फार उदात्त वगैरे वाटायच.ते कार्यक्रमात त्यांनी निवडलं आणि आमची नावं वाचून दाखवली. इतकंच. Anticlimatic झालं, सॉरी. :)

nanaba's picture

3 Jan 2020 - 8:56 pm | nanaba

:D

Nitin Palkar's picture

6 Jan 2020 - 12:34 pm | Nitin Palkar

तुमच्या लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फर्माईशकारांमध्ये अनेक माहित नसलेल्या गावांची नावे समजत असत. झुमरी तलैय्या प्रमाणेच राजनांद गाव हे कुठेशी असेल बरं असं कुतूहल अनेक वर्ष वाटत होतं. आकाशवाणी वरील अनेक कार्यक्रम सध्याच्या तरूण पिढीला नवलाचे वाटतील. 'विश्वम्भर उसगावकर कोकणीतल्यान खब्रो दितान' हे वाक्य अजून आठवते (हे प्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकरचे काका आहेत असं कळल्यावर वर्षा बद्दलचा आदर वाढला होता). न्यूज रेड At स्लो स्पीड, आजचे बाजारभाव, संस्कृत वार्तां श्रूयताम,. विविध भारतीवरील हवा महल, छायागीत, बेला के फुल, फौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला, शनिवार रविवारचे प्रायोजित कार्यक्रम. त्या पैकी अजून आठवत असलेला क्रिकेट विथ विजय मर्चंट, इन्स्पेक्टर ईगल, बिनाका गीतमाला आदी अनेक...