आज सकाळी जाग आल्या आल्या पुन्हा तिने फेसबुक, व्हॉट्सअप चालू केलं. फेसबुकवर त्याचं नाव शोधलं पण ते दिसत नव्हतं म्हणजे अजूनही ब्लॉक लिस्ट मधेच आहे मी. तिने विचार केला आणि हसली मनात. काही मोठा इश्यू किंवा मोठं भांडण नव्हतं झालं. तरीपण त्याने तिला ब्लॉक केलं होतं. खुप रागवला होता तिच्यावर कारण पण तसंच होतं तिने मेसेज केला नव्हता त्याला. आता मेसेज नाही केला म्हणून इतकं काय रागवायचं?
इतकंच कारण होतं. पण त्याचा रागच असा होता. तिने त्याला खुपदा समजून सांगितलं की मोबाईल बिघडला होता. वरून पडून त्याचा डिस्प्ले गेला होता. खुप समजावून सांगितलं. मोबाईल नीट करून आणलेलं बीलही दाखवलं. त्याला पटलंच नाही. शेवटी ती ब्लॉक आणि तो रागवलेला. शेवटी ती गप्प झाली. मेसेज वगैरे सगळं बंद.
फोन करावा तर त्याने नंबर पण ब्लॉक करून ठेवला होता. वेडा. किती राग येतो याला पण प्रेम पण तितकंच जीवापाड आहे. मेसेज नाही बघून व्हॉट्सअप, फेसबुक पुन्हा बंद केलं. मलाच आठवण येते का?? त्याला नाही येत एकदापण?? साधा मेसेज नाही केला असं म्हणून तिने ऑफिसला जाण्याची तयारी केली. नऊ पाचची लोकल पकडायची होती तिला.
"आई जाते गं" म्हणत ती ऑफिसला निघाली. ऑफिसमध्ये तर तिचं लक्षही लागत नव्हतं. ऑफिसच्या फोनवरून पण तिने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कॉल उचलला नाही. काही वेळाने प्रयत्न केला तर ब्लॉक. हा ही नंबर?? हद्द झाली. तिने साधे मेसेजही खुप केले पण त्याने बघितले पण नसतील. इतका कसला राग आला आहे त्याला? मंद. असं मनात म्हणून ती कामाला लागली.
असेच पाच दिवस गेले. तिने पुन्हा त्याला मेसेज कॉल केला नाही. काही दिवसांनी त्याने स्वतःहून कॉल केला.
"काय करतेस?" तो
"काही नाही. ट्रेनमध्ये आहे. गाणी ऐकतेय." ती
"कोणतं गाणं आहे?" तो
"अभी न जाओ छोडकर.." ती
"के दिल अभी भरा नही" तो
"हो तेच" ती
"मग नको जाऊस सोडून" तो
"नाहीच जाणार. तुच मला सोडून जातोस एकटं नेहमी." तिचा आवाज रडका झाला होता.
"सॉरी गं. मी असाच आहे. मी तरी काय करू?" तो
"बोलू नकोस माझ्याशी. मला एकटं सोडून गेलास. पाच दिवस झाले." आवाज अजूनही रडवेलाच होता.
"खरंच सॉरी. तु शिक्षा कर मला मग. सांग मी काय करू शिक्षा म्हणून" तो
"काही नको" ती
"मी रडवलं किती तुला. पण मी पण रडलो गं रोज रात्री. सांग मी स्वतःला काय शिक्षा करू?" तो
"काही करू नकोस. नीट घरी जा बस्स आणि धडपडू नकोस." ती
"तु सावरायला असताना मी बरा पडेन." तो
"पुरे. पुन्हा ब्लॉक कर तुझे दातच पाडते बघ." ती
"माते क्षमा असावी. रात्री बोलू मेसेजवर. टेक केअर, लव्ह यू गब्बू" तो
"लव्ह यू टू बबडु" ती
खुप छान वाटत होतं तिला त्याचा आवाज ऐकल्यानंतर. तीने पुन्हा तेच गाणं रिपीट केलं...
"अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही.."
प्रतिक्रिया
4 Nov 2019 - 1:27 pm | विजुभाऊ
वा खूप सुंदर कथा आहे.
साधासा पण छान जर्म आहे.
मुख्य म्हणजे या वेळेस कथेची शैली मस्त जमली आहे.
एवढ्यातल्या एवढ्यात तीन वेळा कथा वाचून पाहिली.
खूपच मस्त. झक्कास आहे एकदम
4 Nov 2019 - 1:39 pm | शुभांगी दिक्षीत
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद..
4 Nov 2019 - 1:33 pm | श्वेता२४
बहुतांशी सगळअयांच्या आयुष्यात घडणारा प्रसंग. पण छान खुलविली आहे. जुने दिवस आठवले :)
4 Nov 2019 - 1:40 pm | शुभांगी दिक्षीत
आभार आपले..
4 Nov 2019 - 1:43 pm | गुल्लू दादा
आवडली..लिहीत राहा..
4 Nov 2019 - 2:06 pm | शुभांगी दिक्षीत
नक्कीच प्रयत्न करेन